Ram mandir new information | राम मंदिर ची माहिती

             

ram mandir information in marathi

अयोध्या म्हणजे भगवान श्री रामांची जन्मभूमी, अयोध्या नगरीमध्ये प्रभू  श्रीरामांचे सर्वात मोठे Ram mandir आज उभारले गेले आहे.

या मंदिराची उभारणी करण्याआधी मंदिराच्या संदर्भांत सर्व निर्णय घेण्यासाठी एक खूप मोठी संस्था उभारण्यात आलेली आहे.

ram mandir चे भूमी पूजन करण्याआधी मंदिराच्या ट्रस्टमधील सदस्यांनी १ जुलै २०१३ रोजी एक खूप मोठी सभा आयोजित केली होती.

यामध्ये मंदिराची उभारणी कशा प्रकारे करायची त्याची वास्तू कशी असेल, रचना कशी असेल या सर्व गोष्टींची चर्चा करण्यात आली आणि काही महत्वाचे निर्णय घेण्यात आले.

या मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे देखील महत्वाचे स्थान आहे, यावेळी मंदिराच्या रचनेमध्ये थोडासा बदल करण्यात आला आहे अशी चर्चा सगळीकडे होती.

या सभेमध्ये चंद्रकांत सोमपुरा हेच ram mandir ची रचना तयार करतील असा निर्णय घेण्यात आला, संपूर्ण देशाचे लक्ष असलेल्या सोमपुरा कोण त्यांचा राममंदिर उभारणीशी काय संबंध हे आपण आता जाऊन घेऊयात.

    

चंद्रकांत सोमपुरा कोण आहेत ?    

chandrkant sompura हे प्रख्यात वास्तू विशारद आहेत, सोमपुरा यांनी सोमनाथ मंदिर, कोलकत्ता येथील बिर्ला मंदीर तसेच मुंबईमधील स्वामींनारायन मंदिर यांची रचना तयार केलेली आहे.

मंदिराची रचना तयार करणारी त्यांची ही १५ वी पिढी आहे, सोमपुरा परिवाराच्या गेल्या १५ पिढ्या मंदिराची रचना तयार करण्याचे काम करत आहे.

विश्व हिंदू परिषदेचे माजी प्रमुख अशोक सिंघल यांनी चंद्रकांत सोमपुरा यांना ३२ वर्षांपूर्वी राम मंदिराची रचना करण्यासाठी संपर्क केला व त्यांनाच हे काम देण्यात आले.

त्यानंतर १९९० मध्येच सोमपुरा यांनी मंदिराची रचना तयार केली होती, १९९० मध्येच कुंभ मेळाव्यात साधूसंतांनी त्यांनी तयार केलेल्या मंदिराच्या रचनेला मान्यता दिली.

त्यानंतर २०२० मध्ये न्यायालयाचा निकाल आल्यानंतर मंदिराच्या रचनेमध्ये काही बदल करून आजचे ram mandir उभारले गेले आहे.

चंद्रकांत सोमपुरा यांनी जगभरातील २०० पेक्षा जास्त मंदिराची रचना तयार करण्याचे काम केलेले आहे.

तसेच चंद्रकांत सोमपुरा यांचे आजोबा प्रभाशंकर ओघडभाई यांनी नव्या सोमनाथ मंदिराची रचना तयार केली होती.

या मंदिराच्या उभारणीच्या कामामध्ये चंद्रकांत सोमपुरा यांच्याबरोबरच निखिल सोमपुरा आणि आशिष सोमपुरा या त्यांच्या २ मुलांचाही समावेश आहे ते देखील प्रख्यात वास्तू विशारद आहेत.

राम मंदिराची रचना कशी आहे ? Architectural details of Ram Mandir 

Ram mandir चे भूमिपूजन ५ ऑगस्ट २०२० रोजी पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले. 

प्रभू श्रीरामांचे मंदिर १६१ फूट उंच, २५० फूट रुंद आणि ३५०फूट लांब आहे, २८००० वर्ग मीटरमध्ये उभारले गेले आहे.

प्रभू श्रीरामाचे हे मंदीर जगातील तिसरे मोठे हिंदू मंदिर आहे, राम मंदिराची रचना नागारा स्थापत्य शैलीतील गुर्जरा चालुक्य शैलीमध्ये केली गेली आहे, ही एक प्रकारची हिंदू मंदिर वास्तुकला आहे जी प्रामुख्याने उत्तर भारतात आढळते.

या मंदिराच्या उभारणी करण्यासाठी कोठेही लोखंडाचा आणि स्टीलचा वापर केला नसल्याचे चंद्रकांत सोमपुरा यांनी सांगितले. कारण स्टील आणि लोखंड यांचे आयुष्य कमी असते तसेच त्यांना गंज ही लागतो.

यामुळे ८०-१०० वर्षांनंतर त्याला रिपेअर करावे लागते, राम मंदिरासाठी बंसी पहाडपूर येथील गुलाबी दगड आणि बलुआ दगडांचा वापर केला आहे, दगडी तुकडे जोडण्यासाठी तांब्याचा वापर करण्यात आला आहे.

हे मंदिर हजारो वर्षांपर्यंत आहे तसेच राहणार आहे, कारण बंसी पहाडपूर दगड हा जितका जुना होतो तितका तो मजबूत होतो, त्यामुळे मंदिर हजारो वर्षे मजबूत राहणार आहे.

टाईम कॅप्सूल 

या मंदिराच्या पायथ्याशी २००० फूट खाली एक महत्वाची वस्तु म्हणजेच टाइम कॅप्सूल ठेवण्यात आली आहे.

या टाइम कॅप्सूलमध्ये  राम मंदिराचा सर्व इतिहास जतन करून लेखी स्वरूपात ठेवलेली आहे. जेणेकरून हजारो वर्षांनंतरही राम मंदिराचा इतिहास माहीत होईल.

ही टाइम कॅप्सूल ही कंटेनरसारखी असते आणि ती विशिष्ट घटकांपासून बनविलेली असते, टाइम कॅप्सूलमध्ये सर्व हवामान सहन करण्यास सक्षम असते, खूप खोलवर असूनही हजारो वर्षे त्याचे कोणतेही नुकसान होत नाही.

राम मंदिराची मुख्य रचना | Main structure of Ram Mandir

मंदिर तीन मजले असलेल्या एका उंच चबुताऱ्यावर बांधलेली बांधले गेले आहे, गर्भगृहाच्या मध्यभागी आणि प्रवेशद्वारावर पाच मंडप आहेत.

एका बाजूला तीन मंडप कुडू, नृत्य आणि रंगाचे असतील आणि दुसऱ्या बाजूला दोन कीर्तन मंडप आणि प्रार्थना मंडप आहे.

विष्णूचे दशावतार,६४ योगिनी आणि देवी सरस्वतीचे १२ अवतार समाविष्ट करण्यासाठी १६ मूर्ती बनवल्या आहेत.

तर पायऱ्यांची रुंदी १६ फूट आहे, या मंदिराचे गर्भगृह अष्टकोणी आहे, मुख्य मंदिर हे १० एकर मध्ये बांधलेले आहे.

आणि राहिलेल्या ५७ एकर जागेमध्ये प्रार्थनागृह, व्याख्यान हॉल, संग्रहालय आणि काही शैक्षणिक सुविधा आहेत.

राम मंदिर चे दरवाजे | Ram mandir Gates

या मंदीरातील दरवाजे तयार करण्यासाठी महाराष्ट्रातील जंगलांमधील सागवानी वृक्षाचे लाकूड वापरण्यात आले आहे.

हे दरवाजे तयार करण्यासाठी सुमारे १७०० घनफुट लाकूड लागलेले आहे, मंदिरामध्ये एकूण ४२ दरवाजे आहेत.

मोर, कलश, शंख, गदा, चक्र आणि विविध फुलांचे या दरवाजांवर कोरीवकाम केलेले आहे, ६.५ मीटर (२१ फूट) उंच प्लॅटफॉर्मवर ग्रॅनाईट दगडापासून मंदिराची वरची रचना बांधलेली आहे.

तसेच मंदिराच्या बांधकामात इंटरकलॉकींग व्यवस्थेमध्ये २ टन वजनाचे सुमारे १७००० ग्रॅनाईट स्टोन ब्लॉक वापरले गेले आहेत.

मंदिराचे गर्भगृहातील आणि पहिल्या मजल्यावर वरील सर्व भिंती संगमरवरी बनविलेल्या आहेत.

तसेच ram mandir मध्ये एकूण ३९२ खांब आहेत. त्यामधील तळमजल्यावर १६६,पहिल्या मजल्यावर १४४ आणि दुसऱ्या मजल्यावर ८२ खांब आहेत.

तर गर्भगृहात पांढरे संगमरवरी खांब बसवण्यात आलेले आहेत, आणि सर्व खांबांवर कोरीवकाम केलेले आहे.                  

अयोध्येतील धार्मिक पर्यटनाला चालना

रामनगरी मध्ये ६ प्रवेशद्वार तयार करण्यात आले आहेत, हे ६ प्रवेशद्वार अयोध्येतील ६ जिल्ह्याना जोडण्याचे काम केले आहे, हे ६ प्रवेशद्वार खालीलप्रमाणे आहेत. (6 entry gates of ram mandir)

१) लक्ष्मण द्वार

या दरवाजाला प्रभू श्रीराम यांचे भाऊ लक्ष्मण यांचे नाव देण्यात आले आहे, हा द्वार आयोध्येला गोंडा हायवे शी जोडतो, गोंडा हे पूर्व उत्तर प्रदेशातील एक प्राचीन ऐतिहासिक शहर आहे.

असे मानले जाते की, त्रेतायुगात अयोध्येतील गायी चरण्यासाठी येथे येत असत, तसेच याच ठिकाणी भगवान विष्णूचा वराह अवतार देखील दिसला आहे.

२) भरत द्वार 

प्रभू श्रीराम यांचा भाऊ आणि कैकेयीचा मुलगा भरत यांच्यावरून या दरवाजाचे नाव भरत द्वार ठेवले आहे.

या द्वाराने प्रयागराज शहर आयोद्धेशी जोडले आहे, तीर्थराज प्रयाग येथून पर्यटकांना थेट रस्त्याने अयोध्येत पोहोचता येते.

३) जटायू द्वार 

अयोध्येतील तिसरे द्वार हे जटायू द्वार आहे हा द्वार वाराणसी शहराला जोडतो, या द्वाराला प्रभू श्रीराम यांना माता सीतेचा समाचार सांगणाऱ्या जटायू पक्षाचे नाव दिले गेले आहे.

रामायणानुसार, जटायू यांनीच माता सीतेचे हरण करून विमानातून घेऊन जाताना रावणास पाहिले होते, आणि सीता मातेस सोडवण्याचा प्रयत्न देखील केला होता.

त्यामुळे जटायूला रावणाने जखमी देखील केले होते, नंतर जेव्हा प्रभू श्रीराम  माता सीतेच्या शोधात निघाले तेव्हा वाटेत जखमी झालेल्या जटायूनेच  सीता माताबद्दल सांगितले होते. 

४) हनुमान द्वार

अयोध्येला गोराखपूरशी जोडण्याचे काम हे हनुमान द्वार करणार आहे.

जसे प्रभू रामाला अयोध्येचा राजा मानतात, तसेच आजही अयोध्येचा रक्षक हनुमानजी यांना मानले जाते, येथील हनुमानगढी मंदिर हे जगप्रसिद्ध आहे, येथे हनुमानजीची मूर्ती लहान मुलाच्या रुपात विराजमान आहे.

५) गरुड द्वार 

रामायणातील महत्वाच्या पात्रांमधील एक असलेल्या गरुड पक्षावरून असलेले अयोध्येचे हे पाचवे प्रवेशद्वार आहे.

हे गरुड द्वार अयोध्येला रायबरेलीशी जोडते.

६) श्रीराम द्वार

अयोध्येचे सहावे प्रवेशद्वार हे प्रभू श्रीराम यांच्या नावाचे आहे.

श्रीराम द्वार हे अयोध्येला लखनऊशी जोडण्याचे काम करते.

प्रभू श्रीराम यांच्या मूर्तीचे स्वरूप

म्हैसूरचे मूर्तिकार अरुण योगीराज यांनी प्रभू श्रीरामांची मूर्ती तयार केली आहे.

ही मूर्ती ५१ इंचाची आहे, तसेच १८ जानेवारी रोजी अयोध्येतील मंदिराच्या गर्भ ग्रहातील कमळावर ही मूर्ती विराजमान झाल्यानंतर या मूर्तीची उंची ८ फूट इतकी होते.

ram mandir मधील या मूर्तीचे वजन २०० ते २५० किलोग्रामच्या आसपास आहे, या मूर्तीला काळ्या पाषाणातून साकारण्यात आलेले आहे.

प्रभू श्रीराम यांच्या मूर्तीचे रूप हे श्यामवर्णी असून त्यात प्रभू रामांची हसरी प्रतिमा साकारलेली आहे.

प्रभू श्रीरामांच्या दोन्ही हाता जवळ ओम, स्वतिक, गदा, चक्र, सूर्यदेव आणि विष्णूंचे दशावतार देखील साकारलेले आहेत. शिवाय प्रभू श्रीराम यांच्या पायाशी हनुमंताची मूर्ती उभी आहे.

अनेक वर्षापासून लाखो भाविक अयोध्येतील राम मंदिराचे स्वप्न पाहत आले आहेत ते स्वप्न 22 जानेवारी 2024 रोजी सत्यात उतरणार आहे.

ll जय श्री राम ll

धन्यवाद, माय मराठी ब्लॉग

RSS
Instagram