Data Science म्हणजे काय ? | डेटा सायन्स ची संपूर्ण माहिती

DATA SCIENCE MHANJE KAY

Data Science मध्ये करिअर करायचे आहे ? काळजी करू नका आजचा हा ब्लॉग डेटा सायन्सशी संबंधित आहे.

आजकाल भारतामध्ये डेटा सायन्स साठी खूप मागणी आहे आणि ती दिवसेंदिवस वाढतच चालली आहे.

सॉफ्टवेअरच्या या जगात डेटा सायंटिस्ट हा एक बेस्ट करियर पर्याय आहे असे म्हणता येईल, सध्याच्या जगात असे एकही क्षेत्र नाही की जिथे डेटा सायन्सचा वापर केला जात नाही.

डेटा सायन्स म्हणजे काय ? डेटा सायन्स मधील करिअर, Data scientist म्हणजे काय ? त्यासाठी लागणारे आवश्यक कौशल्य data science courses, नामांकित कॉलेज आणि त्यासाठी लागणारी योग्यता या सर्व प्रश्नांची उत्तरे आज तुम्हाला मिळणार आहेत.

टेबल ऑफ कंटेंट

डेटा सायंसचा इतिहास | History of Data Science

डेटा सायन्सच्या इतिहासातील एक सुंदर गोष्ट म्हणजे डेटा विश्लेषणाच्या क्षेत्रातील विकासाची प्रगती.

1960 च्या दशकात डेटा सायंसची पहिली ओळख झाली.

DATA SCIENCE हा शब्द सुपर कॉम्प्युटर विज्ञानातील कामाच्या संदर्भात झाला होता त्यानंतर 1980 च्या दशकात इंटरनेटचा उदयामुळे डेटा संग्रहण आणि संचयन यामुळे डेटा सायन्स या क्षेत्रात वृद्धी झाली.

त्यानंतर आतापर्यंत डेटा सायन्सच्या क्षेत्रात विलक्षण वाढ आणि अलौकिक प्रगती झाली आहे.

डेटा सायन्स ची अधिक माहिती

तुम्ही एक गोष्ट नोटीस केली असेल, जेव्हा आपण यूट्यूब किंवा कोणत्याही वेबसाइट वर एखादे प्रोडक्ट किंवा व्हिडिओ सारखे सारखे पाहतो, किंवा सर्च करतो.

तर हे आपण पाहिलेले व्हिडिओ किंवा सर्च केलेली माहिती एका ठिकाणी साठवून ठेवली जाते.

आणि पुढच्या दर वेळेस ही माहिती आपल्याला विनाप्रयास स्वचलित पहावयास मिळते.

तर ही माहिती आपण शोधलेले प्रोडक्ट्स गूगल, यूट्यूब, फेसबुक, इंस्टाग्राम यांच्यापर्यंत कशी पोहचते ?

हिच तर कमाल आहे ! डेटा सायन्स ची ! खरं तर, Data Science च्या माध्यमातून या सर्व कंपन्या आपल्यापर्यंत पोहोचतात.

पण फक्त ग्राहकाची वैयक्तिक माहिती साठवून ठेवणे म्हणजे डेटा सायन्स नव्हे तर, ही एक मोठी संकल्पना आहे.

म्हणूनच, डेटा सायंसची संकल्पना समजून घेणे महत्त्वाचे ठरते. उदाहरणार्थ: आरोग्य क्षेत्रात

X-Ray क्ष-किरण, सिटी स्कॅन, एमआरआय या सर्वांसाठी डेटा सायन्स या टेक्नॉलॉजीचा वापर केला जातो.

तसेच बँकिंग, फायनान्स, शिक्षण व परिवहन अशा ठिकाणी डेटा मोठ्या प्रमाणात वापरला जातो.

हा सर्व data या कंपन्यांकडे येतो कुठून ? सविस्तर पाहूया.

डेटा सायन्स म्हणजे काय ? | What is data science ?

डेटा सायन्स हा व्यवसायासाठी अर्थपूर्ण अंतर्दृष्टी (Insight) काढण्यासाठी डेटाचा अभ्यास आहे.

हा एक बहुउद्देशीय दृष्टीकोन आहे जो मोठ्या प्रमाणात डेटाचे विश्लेषण करण्यासाठी गणित, सांख्यिकी, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि संगणक अभियांत्रिकी या क्षेत्रातील तत्त्वे आणि पद्धती एकत्र करतो.

हे विश्लेषण डेटा शास्त्रज्ञांना काय झाले, ते का झाले, काय होईल आणि परिणामांसह काय केले जाऊ शकते हे विचारण्यास आणि उत्तर देण्यास मदत करते.

कोरोना सारख्या महामारीनंतर डेटा वापर कर्त्यांची संख्या कितीतरी पटीने वाढली आहे जितका डेटा तयार होत आहे त्यानुसार त्याचा वापरही केला जात आहे. थोडक्यात या, डेटाचे विश्लेषण म्हणजेच डेटा सायन्स.

business analysts कोणाला म्हणतात ? तर जे लोक डेटा बरोबर काम करतात त्यांना व्यवसाय विश्लेषक (Business Analysts) म्हणतात.

या क्षेत्रात करियर करण्यासाठी योग्यता, अभ्यास आणि कुशलता आवश्यक आहे.

करियर इन डेटा सायन्स | Career in Data Science

डेटा सायन्स मध्ये अभियांत्रिकी आणि संगणक विज्ञानाच्या क्षेत्रांच्या डेटाचे विश्लेषण केले जाते आणि मूल्यवान सुत्रे प्राप्त केली जातात.

डेटा सायन्समध्ये करिअर करण्यासाठी (Science Degree) पदवीधर प्रमाणपत्र अभ्यासक्रम सोबत कॉम्प्युटरमधील अॅड्वान्स लँग्वेज मध्ये प्रमाणित असणे गरजेचे आहे.

Data science या क्षेत्रात प्रवेश करण्यासाठी संगणक, विज्ञान, सॉफ्टवेअर, किंवा संगणक अभियांत्रिकी, अप्लाइड मॅथेमेटिक्स, भौतिकशास्त्र, आकडेवारी किंवा संबंधित क्षेत्रामध्ये पदवी आवश्यक आहे.

तसेच काही कौशल्ये अंगीकृत असणे आवश्यक आहे.

  • गणितीय कौशल्य (Mathematical skills)
  • संख्यात्मक प्रोग्रामिंग भाषा (Numerical programming language)
  • मशीन लर्निंग (Machine learning)
  • डेटा व्हिज्युअलायझेशन (Data visualization)
  • डेटा कलेक्शन अँड क्लिनिंग (Data Collection and Cleaning)
  • कम्युनिकेशन (Communication)
  • क्रिटिकल थिंकिंग (Critical Thinking)
  • प्रॉब्लेम सॉल्व्हिंग (Problem solving)

डेटा सायन्समध्ये करिअर करण्यासाठी काही कोडिंग भाषांअवगत असणे आवश्यक आहेत, पायथन ही एक प्रसिद्ध प्रोग्रामिंग भाषा आहे जिचा वापर डेटा सायन्स मध्ये केला जातो.”

पायथन कोडिंग (Python)

Data science मध्ये पायथन कोडिंग ही एक महत्त्वपूर्ण भाषा आहे ज्याच्यामध्ये डेटा मायनिंग, मशीन लर्निंग इत्यादी मॉडल्सना विकसित करण्यासाठी या भाषेचा उपयोग होतो.

एसक्युएल टेबल मार्फत भिन्न रुपातून आलेला डेटा स्वीकारून त्याचा डेटा बेस बनवून पुढील योग्य प्रक्रियेसाठी पाठवणे हे पायथन कोडिंग चे मुख्य काम आहे.

सी प्रोग्रामिंग (C,C++)

आर प्रोग्रामिंग

पीएचपी

जावा लँग्वेज

मॅटलॅब लँग्वेज

एसक्यूएल लॅन्ग्वेज

या कोडिंग भाषांसोबतच तुम्हाला काही विशिष्ट कौशल्यांची गरज असते.

तसेच या क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी सतत प्रशिक्षण संशोधनात्मक वृत्ती, कम्प्युटरमधील भाषेवर मजबूत पकड, आणि मानसिकता अत्यंत महत्त्वपूर्ण आहे.

डेटा सायन्सची महत्त्वपूर्ण तत्वे | Important Principles of Data Science

मशीन लर्निंग – मशीन लर्निंग सिस्टमची रचना आणि विकास करणे, योग्य एमएल अल्गोरिदम लागू करणे आणि एक्सपेरीमेन्ट आयोजित करणे.

बिगडेटा – आउटेज कमी करण्यासाठी आणि भविष्यातील मागण्यांचा अंदाज घेण्यासाठी, उत्पादन, ग्राहक Feedback आणि return आणि इतर घटकांचे विश्लेषण आणि मूल्यांकन करणे.

बिझनेस इंटेलिजेंस – सर्व कंपन्या मोठा प्रमाणात रोजच्या रोज डेटा प्रोड्यूस करत असतात हा डेटा एकसंध करून माहिती, चार्ट, ग्राफ यांच्याद्वारे प्रस्तुत करणे म्हणजे business intelligence.

डेटा सायंटिस्ट म्हणजे काय ? What is a Data Scientist ?

डेटा सायन्स आणि डेटा सायंटिस्टबद्दल चर्चा करायची झाली तर याच्या नावावरूनच कळते की डेटाबद्दल विश्लेषण करणारी व्यक्ती म्हणजे डेटा सायंटिस्ट.

यामध्ये प्रोफेशनली एक्सपर्ट लोकांची आवश्यकता असते.

डेटा सायन्स हे डेटाचे विश्लेषण करण्यात जसे कि गणित, आकडेवारी ,प्रोग्रामिंग आणि कौशल्य एकत्र करून त्यातून अचूक आणि महत्त्वपूर्ण माहिती काढण्यास जो व्यक्ति मदत करतो तो म्हणजे डेटा सायंटिस्ट होय.

डेटा सायंटिस्टचे काम आणि जबाबदारी

असे म्हणता येईल की, डेटा सायंटिस्टचे कार्य नवीन अंतर्दृष्टी मिळवण्यासाठी तसेच डेटाचे विश्लेषण करणे, परीक्षण करणे आणि मॉडेल तयार करणे.

डेटा सायंटिस्ट समोर असलेली माहिती साठा इमेज किंवा व्हिडिओचा सखोल अभ्यास करून त्यावर योग्य तो निष्कर्ष काढून, मोठे उद्योग आणि दैनंदिन समस्यांच्या निराकरणासाठी प्रभावी उपाय करणे हे डेटा सायंटिस्टचे महत्त्वाचे काम आहे.

परदेशासह भारतातही डेटा सायंटिस्टची मागणी दिवसेंदिवस वाढत चालली आहे.

डेटा सायन्स चे कोर्स | Data Science Courses List

  • पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन बिझनेस अॅनालिस्ट

Post Graduate Diploma in Business Analyst

  • पोस्ट ग्रॅजुएट डिप्लोमा इन डेटा सायन्स

Post Graduate Diploma in Data Science

  • पीजी प्रोग्राम इन डेटा सायन्स

PG Program in Data Science

  • एम टेक डेटा सायन्स अँड आर्टिफिशियल इंटेलिजेंस

M Tech Data Science and Artificial Intelligence

  • एमबीए डेटा सायंस अँड डेटा अॅनालिटिक्स

MBA Data Science and Data Analytics

  • ग्रॅज्युएट सर्टिफिकेट प्रोग्रॅम इन डेटा सायन्स अँड इंजीनीअरिंग

Graduate Certificate Program in Data Science and Engineering

डेटा सायंटिस्ट ला सुरुवातीला आठ ते दहा लाख रु प्रतिवर्ष एवढा पगार मिळतो.

जसजसे तुमचे स्किल आणि अनुभव वाढत जाईल त्यानुसार पगारात वाढ होते, आणि वेगवेगळ्या पदांवर बढती दिली जाते, जसे की

डेटा व्यवस्थापक (Data Manager)

डेटा कलेक्टर (Data Collector)

डेटा डिझाइनर (Data designer)

डेटा सुधारक (Data modifier)

डेटा निर्यातक (Data Exporter)

डेटा प्रेषक (Data sender)

डेटा सायन्स साठी उत्तम भारतीय कॉलेज | Best Indian College for Data Science

इंस्टीट्यूट ऑफ मॅनेजमेंट, रांची

इंस्टीट्यूट ऑफ टेक्नोलॉजी, खरगपूर

इंस्टीट्यूट ऑफ सायन्स, बंगलोर

स्कूल ऑफ बिझनेस, हैदराबाद

Statistical Institute, Kolkata

इंस्टीट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, मुंबई

वर नमूद केल्याप्रमाणे भारतातील सर्वश्रेष्ठ आणि उच्च प्लेसमेंट असलेले नामांकित कॉलेज मध्ये डेटा सायन्सचे कोर्सेस उपलब्ध आहेत.

वरील सर्व संस्थांमधून आपण डेटा सायंटिस्टचा कोर्स पूर्ण करू शकतो हा कोर्स तीन ते सहा महिने आणि पदवी मिळवण्यासाठी एकुण तीन वर्षे असा आहे.

डेटा सायन्स साठी पात्रता किंवा योग्यता

डेटा सायन्समध्ये करिअर करण्यासाठी विद्यार्थ्याला फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथेमेटिक्स हे विषय 12 वीमध्ये असणे अनिवार्य आहे कम्प्युटर सायन्स, फिजिकल सायन्स, गणित यामध्ये डिग्री असणे आवश्यक आहे.

Data Science या कोर्ससाठी चा सिल्याबस

  • आर्टिफिशिअल इंटेलिजन्स (Artificial Intelligence AI)
  • ऑटो मशीन लर्निंग (Auto machine learning)
  • डेटा फेब्रिक (Data Fabric)
  • रोबोटिक प्रोसेस ऑटोमेशन (Robotic Process Automation)
  • नॅचरल लँग्वेज प्रोसेस (Natural Language Processing)
  • डेटा रेग्युलेशन अँड गव्हर्नर्स (Data Regulation and Governors)
  • क्लाउड मायग्रेशन (Cloud migration)
  • डेटा सर्विस (Data Service)

डेटा सायंटिस्ट साठी जॉब ऑप्शन | Job options for data scientists

वरील नामांकित कॉलेज मधून कोर्स पूर्ण केल्यानंतर जॉब साठी बरेच पर्याय उपलब्ध आहेत जसे की डेटा एनालिस्ट, सीनियर इन्फॉर्मेशन अॅनलिस्ट, बिझनेस अॅनालिस्ट, सहाय्यक एनालिस्ट, सॉफ्टवेअर टेस्टर, ई

डेटा एनालिस्ट या पदांवर काम करून आपली करिअरची सुरुवात करू शकतो.

बऱ्याच मॅन्युफॅक्चरिंग कंपन्या ट्रान्सपोर्टेशन, गॅस कंपन्या, टेलीकॉम, फायनान्स, युटिलिटी हॉस्पिटल्स, कन्स्ट्रक्शन प्लॅन, इत्यादी ठिकाणी रोजगार मिळण्याची खात्री आहे.

Data science हे उच्च स्पर्धेचे क्षेत्र आहे म्हणून योग्य कुशलता संशोधकवृत्ती आणि प्रशिक्षण या गोष्टी अंगीकारून उच्चस्तरीय कंपनी आणि व्यवसाय या क्षेत्रात तुम्ही स्वतःला सिद्ध करू शकता.

मात्र एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की आपण जितके अनुभवी आहोत तितकेच या क्षेत्रात नोकरी मिळण्याचे चान्सेस जास्त आहेत.

डेटा सायन्सचे भविष्य | The future of data science

2030 या साली भारतात जास्तीत जास्त डेटा सायंटिस्टची मागणी असेल असे एका संशोधनाद्वारे सिद्ध झाले आहे.

बँकिंग, इन्शुरेंस, एंटरटेनमेंट, ऑटोमोबाईल, टेली कम्युनिकेशन, फायनॅन्स ,हॉस्पिटल इत्यादि ठिकाणी डेटा सायंटिस्टच्या मागणीत अत्यंत प्रभावी पणे वाढ होईल.

Data science course ला तरुणांकडून अधिक प्रमाणात पसंती दिली जात आहे.

हे एक प्रकारचे ज्ञान आहे जे एकत्रित करून बिझनेस किंवा आय टी फील्डमध्ये वापरून एक मूल्यवान साधन बनवले जाते आणि यावर आणि कंपन्या निर्भर आहेत.

निष्कर्ष

अशा प्रकारे आपण Data Science आणि त्या संबंधित सविस्तर माहिती वरील लेखामधून मिळवली आहे.

भारतातील पहिल्या सर्वोच्च पाच क्षेत्राच्या स्थानांमध्ये डेटा सायंसचा नंबर लागतो म्हणून या क्षेत्रात येणार्या दिवसात उज्ज्वल भविष्य आहे असे म्हंटले तरी वावगे ठरणार नाही.

हा कोर्स ऑनलाइन तसेच ऑफलाइन उपलब्ध आहे आणि आपल्याला जर इंटर्नशिप करायची असेल तर त्यासाठीही बरेच पर्याय उपलब्ध आहेत.

कुशाग्र बुद्धिमत्ता, चिकाटी, निरीक्षण क्षमता, कठीण परिश्रम करण्याची तयारी या सर्व गुणांच्या जोरावर आपण आपले करियर डेटा सायन्स किंवा डेटा सायंटिस्ट मध्ये करू शकतो तसेच सर्वोच्च पदावर नक्कीच पोहोचू शकतो.

धन्यवाद, माय मराठी ब्लॉग

हे सुद्धा वाचा

RSS
Instagram