मराठी माणूस आणि रोजगार | Marathi manus aani rojgar

MARATHI MANUS AANI ROJGAR

काम “रोजगार” प्रत्येकाला हवा असतो, पोटाची खळगी भरण्यासाठी, आपल्या मूलभूत बाबींची पूर्तता करण्यासाठी, आपली हौस पूर्ण करण्यासाठी, आपल्याला आपली प्रत्येक गरजा पूर्ण करण्यासाठी Rojgar लागतो.

पैशासाठी हाताला काम लागते, आपल्या महाराष्ट्राची आजची स्थिती बगता शिकल्या सवरल्या लोकांना देखील आज काम मिळणे अवघड झाल आहे.

त्यात अशिक्षित लोकांना रोजगार मिळविण्यासाठी आणि प्रामुख्याने आपल्या मराठी माणसाला Rojgar मिळविण्यासाठी तारेवरची कसरतच करावी लागत आहे.

इंजीनियरिंग, एमपीएससी यूपीएससी करुन देखील अनेक तरूण बेरोजगार आहेत.

अनेक व्यक्तींना रोजगार केल्याशिवाय त्यांची चूल देखील पेटत नाही दोन वेळचे जेवणासाठी त्यांना प्रयत्नाची पराकाष्ठा करावी लागते.

मराठी माणूस म्हणल की त्याला अनेक बंधने आली.

पैशाचा प्रॉब्लेम असल्यावर उद्योग धंदा टाकणे आणि त्यात टिकून राहण्यासाठी खुप पेशन्स असणे गरजेचे आहे.

आपण आज या ब्लॉग मध्ये Marathi manus ani rojgar याबद्दलची सर्व विस्तृत माहिती पाहणार आहोत.

रोजगार आणि मराठी माणूस / Rojgar ani marathi manus

आपल्याला असो किंवा आपल्या वडीलधाऱ्याना आदी पासुन शिकविले आहे की, शाळा शिकायची.. शिक्षण पुर्ण करायचे आणि नोकरी करायची.

त्यामुळे आपणही डोळ्यापुढे एकही ध्येय न ठेवता जसे आपली वडील धारी करतात त्याचेच अनुकरण करत गेलो.

कारण आदी घरातील मोठे व्यक्ति निर्णय घेत, कालांतराने त्यात थोडे बदल झाले पण दुसऱ्याच्या हाताखाली नोकरी करणे, rojgar करणे हेच आपण आपले पैसे कमविण्याचे साधन मानले.

आज बरेचशे रोजगार नोकऱ्या आपल्या सारख्या मराठी माणसामुळे टिकून आहेत.

पण आजकाल रोजगार आहेतच कुठे शिक्षण करणाऱ्या मुलांची संख्या लाखो करोडोंच्या वर आहे.

पण प्रत्येक वेळी तेवढी रोजगानिर्मिती होतें का? नाही? याची कारणे शोधण्याची आपण कधी प्रयत्न केला का नाही म्हणूनच आज या कारणामुळे आपल्याला खूप त्रास सहन करावं लागत आहे.

रोजगानिर्मिती आणि योजना कागदावरच

प्रत्येक वर्षीच्या बजेट मध्ये नव्या रोजगानिर्मिती साठी एवढे कोटी, बेरोजगारांसाठी एवढ्या नोकऱ्या अशा अनेक कल्याणकारी योजना आणल्या जातात,आखल्या जातात.

पण त्या आपल्या पर्यंत पोहोचल्या का याची पाहणी नंतर होतें का? असे प्रश्न मराठी माणसाला पडणे गरजेचे आहे.

एखाद्या उद्योग व्यवसायासाठी किती कर्ज दिले जाते त्याला किती टक्के व्याज लागते याचीही माहिती भरपूर जणांना नाही आहे.

आपल्या आरक्षणासाठी जसा मराठी माणूस हजार वेळा मोर्चे काढायला तयार झाला, तर आपल्या आणि आपल्या मुलांच्या भवितव्यासाठी, त्यांना त्यांच्या पात्रतेचा rojgar मिळवून देण्यासाठी मराठी माणूस का मोर्चे काढत नाही.

ही विचार करण्यासारखी बाब आहे, लाखो रूपये खर्च करून मुलांना शिक्षण द्यायचं, पण त्याच पद्धतीने त्यांना रोजगार आणि रोजगारातून मिळणारे मानधन मिळते का ?

मराठी माणूस आणि बेरोजगारी

आज बेरोजगारीची आकडेवारी बगता आपल्या समोर एक सत्य समोर येतं.

भारतामध्ये बेरोजगारी प्रमाण किती आहे ?

भारतामध्ये बेरोजगारीचे प्रमाण ४.३% आहे.

महाराष्ट्र मध्ये बेरोजगारी प्रमाण किती आहे ?

औद्योगीकरणासाठी नावाजलेल्या महाराष्ट्रामध्ये सरासरीपेक्षा जास्त म्हणजे ४.५% आहे, हे प्रमाण गुजरात पेक्षा दुपटीने आहे. 

ही बेरोजगारीची झळ फक्तं इथेच संपत नाही, मोठमोठे डिग्री आणि लाखो रुपये पैसे खर्च करून शिक्षणं घेतलेल्या तरुणांना आपल्या क्षमतेपेक्षा कमी पगाराची नोकरी मिळते.

पण बेरोजगार राहण्यापेक्षा तेवढे तरी मानधन मिळते म्हणुन तेवढ्या तुटपुंज्या पगारावर आपले कुटुंब चालवत असतात.

गुजरात राजस्थान सारख्या ठिकाणीं देखील उद्योग व्यवसायांना बळकटी मिळत आहे तेथील काही लोक इथे येऊन उद्योग / व्यवसाय करताना दिसत आहेत.

पण यामुळे मराठी माणसाच्या हाताला काम कमी पडत आहे. 

मराठी माणूस बेरोजगार राहण्याची कारणे / Reason of Unemployment in Maharashtra

  • राजस्थान, गुजरात, बिहार, यूपी, मध्य प्रदेश तसेच बाकी बाहेरच्या राज्यातून Rojgar साठी अनेक तरुण येतात.
  • स्थानिक लोकांच्या पातळीवर बाहेरून आलेले तरुण कमी पगारावर जास्त काम करतात. 
  • हे कामगार शिक्षणाचा अभाव असल्याने पडेल ते काम करण्याची तयारी ठेवतात.
  • मराठी माणूस स्थानिक असल्याने आणि शिक्षण इथेच झाल्याने जास्त पगाराची नोकरी मिळण्याची अपेक्षा ठेवतात. 
  • कंपनी किंवा कारखान्याचे मालक आपला फायदा बघून पगार देतात. 
  • एक कठू सत्य मराठी माणूस उद्योगधंदा / व्यवसाय करण्यासाठीं घाबरतो. 
  • मराठी माणूसाणे एखादा उद्योग केला तर तो यशस्वी होईल की नाही याच्याबाबतीत प्रचंड न्यूनगंड मनात बाळगतो. 
  • मराठी माणूस उद्योग किंवा व्यवसायामध्ये जोखीम घ्यायला तयार होत नाही. 

अशी बरीचशी कारणे देता येतील, पण रोजगार आणि कौशल्याच्या अभावामुळेच आज मराठी माणूस बेरोजगार आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.

बेरोजगारीवर उपाययोजना

rojgar ani nokari करण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे.

या उक्तीप्रमाणे प्रमाणेच जो माणूस शिक्षण घेतो त्याला नोकरी मिळायलाच हवी अशा प्रकारे धोरण केले पाहिजे.

त्यासाठी आवश्यक अशा योजना सरकारने अमलात आणल्या पाहिजेत.

त्या नुसता अमलात न आणता योग्य तऱ्हेने चालू आहेत का याचा देखील पाठपुरावा केला पाहिजे.

बेरोजगारीवर उपाययोजना खालीलप्रमाणे

  • बेरोजगारांची आकडेवारी महाराष्ट्र राज्याकडे असायलाच हवी. 
  • याशिवाय जुन्या व नविन उद्योग करणाऱ्या व्यवसायिकांची यादी राज्याकडे असायलाच पाहिजे. 
  • प्रत्येक वर्षी जे तरूण किंवा तरुणी उच्चशिक्षण घेऊन पास आऊट होतात याची देखील नोंद राज्याकडे असायला हवी. 
  • उच्च शिक्षण घेऊन पास आऊट झालेल्या वेगवेगळ्या योजनेतून रोजगानिर्मिती करुन दिली पाहिजे. 
  • उद्योगधंदे किंवा व्यवसाय करण्यासाठी आवश्यक आणि आर्थिक पाठपुरावा त्या त्या योजनेमार्फत केला पाहिजे.
  • उद्योग किंवा व्यवसाय करण्यासाठी तरुणांना योग्य तो आराखडा तयार करून दिला पाहिजे. 
  • तरुण- तरुणींना व्यवसाय करण्यासाठी परावृत्त करणे आज काळाची गरज आहे.

रोजगार कार्ड आणि महिलांसाठी लघुउद्योग / Mahilansathi Rojgar card

अलीकडेच सरकारने रोजगार कार्ड नावाने एक नवीन संकल्पना राबविली आहे या अनुषंगाने 18 वर्षावरील प्रत्येक माणसाचे रोजगार कार्ड असेल तर त्याची माहिती सरकारकडे राहील आणि सरकार याद्वारे रोजगार देण्यासाठी योग्य ते रोजगार निर्मितीचा आराखडा तयार करेल. 

तसेच आज आपल्या महाराष्ट्रातील अनेक महिला सक्षम झाल्या आहेत.

कौशल्यपूर्ण असे अनेक कोर्सेस तसेच लघु उद्योगासाठी बँकांकडून कर्ज तसेच बचत गटांद्वारे अनेक प्रकारचे लघुउद्योग यांच्यामुळे महिलांना सुद्धा घरबसल्या असू दे किंवा बाहेर विविध क्षेत्रात रोजगार उपलब्ध झाले आहेत. 

मराठी भाषा आणि मराठी उद्योग

मध्यंतरी एक बातमी आली की, सगळ्या दुकानांचे बोर्ड मराठी पाहिजेत.

आपण महाराष्ट्रात राहतो म्हटल्यावर आपण मराठी लिहिले पाहिजे, मराठी वाचले पाहिजे, मराठी बोलले पाहिजे.

पण दुर्दैवाने तसे पुढें काही चालले नाही, आज सगळीकडे हिंदी तसेच इंग्रजी बोर्ड दिसतात.

मार्केटमध्ये पाहिले असता सर्रास मारवाडी, सिंधी, गुजराती लोकं उद्योग व्यवसाय करताना दिसतात.

मराठी माणसे उद्योगासाठी गाळे तर घेतात, पण त्यात उद्योग करण्यापेक्षा त्याचे भाडे खाणे ही आपल्या मराठी माणसाची अस्मिता.

मराठी माणसांमध्ये उद्योग करण्याची पात्रता नसते असे नेहमी म्हटले जाते, पण काही अंशी ते बरोबर आहे. 

नुसत्या घोषणांनी आणि अभिमानाने भाषेचा प्रचार प्रसार होत नाही, तर त्या भाषेला आपण आर्थिक पाठबळ देणे अपेक्षित आहे.

आपली भाषा जगवायची असेल तर आपली भाषा व्यवहारात वापरायला हवी, व्यवसायात वापरायला हवी.

व्यवसाय मध्ये जोखीम पत्करण्याची तयारी हवी

ऑफिस मध्ये जर आपले स्किल वापरून सगळ्यांपेक्षा आपण जर वेगळे काम केले तर बॉस कडून आपले कौतुक निश्चित आहे.

पण हे सर्व करण्याचं कंटाळा आपण करतों त्याला कारण म्हणजे, बॉस सगळे काम आपल्यालाच सांगेल.

प्रत्येक वेळी मी का करायचं या सभ्रमात आपण आपल्या कामावर गर्व करु लागतो, आणि मग या सगळ्यात दूसरे कोण तर चांगलं काम करुन दाखवतो आपणं त्याच्या नावाने खडे फोडत बसतो, हे झालं नोकरीच.

व्यवसाय उद्योगांमध्ये तर कुठं वेगळं बघायचा मिळतं आहे, व्यवसायाची जोखिम पत्करून आपण कधी पुढें जातो का नाही ? पहिली मनात ही भीती की यशस्वी होणारं का ? मला यात फायदा होणार का ?

व्यवसायात उतरताना तोंडात साखर आणि डोक्यावर बर्फ ठेवावा असे पद्धत आहे.

पण मराठी माणसाच्या स्वभावात हे बसत नाही, घेणार ते घे, नाहीतर जा ही आपली भाषा याच्या व्यतिरिक्त अमराठी किंवा बाहेरून व्यवसाय करण्यासाठी आलेले लोकं ताई, माई, दादा म्हणून आपला माल खपवतात.

यामुळेच आज काल शहरी भागामध्ये याच लोकांची संख्या वाढताना दिसत आहे.

कारण ते व्यवसायाची जोखीम पत्करतात, अपयशी झाले तरी परत प्रयत्न करतात, पण थांबत नाहीत.

मराठी माणसाने देखील जोखीम पत्करण्याची तयारी दाखवली, थोडं धाडस दाखवलं तर आपला महाराष्ट्र व्यवसायात सुजलाम् सुफलाम् नक्कीच होईल.

मराठी माणूस आणि व्यवसाय/ उद्योगधंदा

व्यवसाय क्षेत्र लहान असो व मोठे मराठी माणूस नेहमी मागेच असतो.

का ? तर पाणीपुरीची गाडी किंवा वडापाव ची गाडी टाकण्याने मराठी माणसाला लज्जा उत्पन्न होते.

आणि आपण खडे फोडतो बाहेरच्या लोकांचा नावाने की त्याने इथ कशी पाणीपुरीची गाडी किंवा ठेल्ला घातला, पण त्यांनी आपल्याला अडवून ठरलेच नाही कधी.

आपण हे असल काम मी करणार नाही, नको त्या मायाजालात अडकून पडलो आहोत.

फक्त आपल्या आर्थिक बाजूंकडे होत असलेल्या गोष्टींकडे लक्ष देत आहोत, पण त्या बाजू समजून घेवून त्यावर मार्गक्रमण करत नाही.

त्यामुळेच आज मराठी माणूस अजूनही तिथेच अडकून आहे, आर्थिक दृष्ट्या सक्षम होण्यासाठी मराठी माणूस प्रयत्न करत नाही आहे आणि यामुळेच उद्योग व्यवसायामध्ये आणि उद्योगधंद्यांमध्ये आपल्या पदरी नेहमी अपयश पडत आहे.

निष्कर्ष

मुख्यत्वे करून कष्टाची तयारी आणि आर्थिक सक्षमता या दोन कारणांमुळेच आपण मराठी लोक आपल्याच राज्यात, आपल्याच गावात मागे पडलो आहोत.

जोपर्यंत आपण जिद्दीने कष्टाची तयारी करत नाही, तोपर्यंत आपण या परिस्थितीत काहीही बदल करू शकत नाही.

आर्थिक दृष्ट्या सक्षम होण्यासाठी उद्योग धंदा आणि व्यापारात पाय रोवून उभे राहिल्याशिवाय मराठी माणसाकडे दुसरा पर्यायच उरला नाही आहे.

धन्यवाद, माय मराठी ब्लॉग

आज आपण Marathi manus ani Rojgar यावर विस्तृत माहिती बघितली ही माहिती कशी वाटली ते आम्हाला नक्कीच कळवा Subscribe करा, आशा करतो तुम्हाला ही माहिती नक्की आवडेल.

हे सुद्धा वाचा

RSS
Instagram