What is Hindu Dharm ? | Hindu Religion explained in Marathi

आपला हिंदु धर्म / Hindu religion जपणे आज आपली सर्वात मोठी जबाबदारी बनली आहे, Hindu religion म्हणजेच हिंदू धर्मामध्ये आपण शास्त्रानुसार अनेक सण – समारंभ रूढी आणि परंपरेने आपण साजरे  करतो.

आपल्या देशाच्या पावन भूमीमधे अनेक शूरवीर, साधुसंत, विचारवंतांनी आपल्या आचार – विचाराची बीजे रोवली व त्याचे आचरण गेले अनेक वर्ष आपणं करत आहोत.

आज 21 व्या शतकात त्यामध्ये थोडा बदल झाला असला तरी ते आपणं आनंदाने साजरे करतो.

या ब्लॉग मध्ये आपण आपला हिंदु धर्म / Hindu religion याचा इतिहास आणि कालांतराने त्यात होत असलेले बदल याची माहिती घेणार आहोत.

हिंदू धर्माचा इतिहास (Hindu Religion history in Marathi)

हिंदू धर्माचा इतिहास खुप प्राचीन आणि गौरवशाली आहे.

आपला hindu धर्म चार वेदांवर आधारित आहे आणि आपला धर्म जगातला तिसरा सर्वात मोठा धर्म असे मानला जातो.

अनेक साधू – संतांनी आपआपल्या विचारानी हिंदू धर्माची महती गायली आहे.

हिंदू हा फक्त धर्म नसून ती जीवन जगण्याची एक पद्धत आहे, सिंधू काळात म्हणजेच सुमारें ५ हजार वर्षापूर्वी आपल्या hindu religion ची निर्मिती झाली.

जस जसा काळ जाईल तसं तसे त्यामध्ये बदल होत गेले, हिंदू ही जीवनपद्धती, संस्कृती आणि परंपरा तयार झाली.

जो हिंदुस्थानात राहतो तो हिंदू त्यात सगळ्या जातीधर्माचे लोक येतात… ठराविक जात किंवा ठराविक वर्ग असे काही नसते.

वरील वाक्याला अनेक लोक अनेक अर्थ लावतील, पण हे खरं आहे जो या हिंदुस्तान च्या भूमी वर राहतो तो हिंदू.

हिंदू धर्म व भारत ( Hindu Religion and Bharaat)

भारत हा धर्मनिरपेक्ष देश मानला जातो, यामध्ये विवीध जाती, धर्म आणि संस्कृतीने आपल्याला जवळून दर्शन होतें.

आपल्या भारत देशामध्ये सर्व जाती धर्मातील लोकांना समान न्याय, समान हक्क आहेत.

कोणीही कोणत्या जाती, धर्म आणि माणसासोबत दूजाभाव करू शकत नाही, म्हणूनच सर्व धर्म समभाव अशी शिकवण आपला देश आणि आपल्या देशाचे अनेक क्रांतिवीर आणि स्वातंत्र्यवीर देवून गेले.

आज आपल्या भारत देशासाठी समान नागरी कायदा (UNIFORM CIVIL CODE) अस्तित्वात येणे खुप गरजेचे बनले आहे.

भावी पिढीसाठी UNIFORM CIVIL CODE (समान नागरी कायदा) हे खुप महत्त्वाचे असणार आहे, कारण याचे महत्व येणाऱ्या काळात सर्वांनाच समजेल.

(Western Culture) पाश्चात्य संस्कृतीमुळे तसेच आधुनिकतेमुळे आपली तरुण पिढी भरकटत चालली आहे त्यांना वेळीच आपल्या संस्कृतीची वेसन घातले पाहिजे.

तरुण पिढीला hindu religion समजून घ्यावा लागेल, सद्यस्थितीत हे अत्यंत गरजेचे आहे.

हिंदू धर्म आणि संस्कृती (Hindu religion and Hindu Culture)

हिंदू धर्म आणि आपले सर्व सण यांचे आपल्या जीवनात अनन्य साधारण महत्व आहे, छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य निर्माण केले त्याच्यासाठी आपले प्राण पणाला लावले.

छत्रपती संभाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य जपण्यासाठी आपल्या प्राणाची आहुती दिली.

लोकमान्य टिळक, स्वातंत्र्यवीर सावरकर, जोतिबा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर अशा महान व्यक्तींनी आपल्याला मानवतेची शिकवण दिली. 

हिंदू ही केवळ धार्मिक किंवा राजकीय संकल्पना नसून ही एक आदर्श समाज व्यवस्था आहे.

या समाजामध्ये आपण राहतो म्हटल्यावर एक माणूस म्हणुन आपले आपल्या समाजाप्रती खुप मोठे कर्तव्य आहे आणि सामाजिक घटक म्हणून आपण आपली सामाजिक जबाबदारी पार पाडली पाहिजे.

आपण आपल्या hindu religion व hindu culture चा प्रसार केला पाहिजे, जास्ती जास्त लोकांपर्यंत धर्म पोहचवणे गरजेचे आहे.

हिंदु धर्माची वैशिष्ट्ये (Hindu Religion Features)

हिंदु लोकांची संस्कृती, सभ्यता, परंपरा, इतिहास, धर्म, साहित्य, कला आणि राजकारण क्षेत्रामध्ये संपन्नता असते, प्रामाणिकपणा, कार्यक्षमता आणि न्याय ही हिंदु धर्माची वैशिष्ट्ये आहेत.

Hindu religion मानवांमध्ये मूल्ये आणि मनोबल जोपासतो, जगातील सर्वात मोठी लोकशाही आणि संस्कृती म्हणून भारतीय हिंदू संस्कृती, चालीरीती आणि परंपरा ओळखली जाते.

पण स्वतंत्र पुर्व काळ आणि आता पण हिंदूंनी तत्व आणि मूल्य यांचा बाजार मांडला आहे, त्यामुळे नीतिमत्ता ढासळलली आहे.

हिंदु धर्म आणि आपल्या संस्कृती समोर संपुर्ण जग झुकले आहे, आपलं आचार-विचार, आपलं खान-पान पाश्चात्य लोकांकडे फॅशन बनली आहे.

पण आपण आपली संस्कृती सोडून त्यांची संस्कृति म्हणजेच Western culture आत्मसात करतं आहोत.

हिंदू देवदेवता आणि सण उत्सव (Hindu deities and festivals)

ब्रह्मा, विष्णू, शिव आणि कृष्ण अशा अनेक देवदेवता यांचा इतिहास आणि महती आपल्या डोळ्यासमोर लहानपणापासून ठेवलं जाते….. आपल्याला सागितले जाते. 

जातीनुसार प्रत्येकाने आपले देव वाटून घेतले असले तरी सण उत्सव सारखेच व उत्साहाने साजरे केले जातात, 12 महिन्या मध्ये होळी, दिवाळी , ई सारखे अनेक सण आपण साजरे करतो.

प्रामुख्याने मकर संक्रात, बेंदुर, नवरात्र, दिवाळी असे अनेक पारंपारिक सण आपण उत्साहाने साजरे करतो, त्यात आता काही पाश्चात्य सणांची भर पडली आहे.

हिंदु धर्म आणि आधुनिकता (Hinduism and Modernity)

हिंदू स्वतःची संस्कृती स्वतःच नष्ट करत आहेत, असे जुन्या जाणत्या लोकांचे मत आहे.

हिंदूं लोकांनी पारंपरिक सणांऐवजी वाढदिवस, डेज साजरे करायला सुरुवात केली आहे, प्रत्येक समारंभात आपलेपणापेक्षा दिखावा जास्त सुरु आहे.

आध्यात्मिक संस्कृती, सभ्यता, इतिहास, परंपरा इत्यादी सर्व कांही आहे, पण पाश्चात्य संस्कृतीला आपले समजून आंधळेपणाने आपण आपल्या संस्कृतीचा नाश करत आहोत.

आधुनिकतेच्या नावाखाली अनेक प्रथा हिंदूंनी सोडल्या आहेत.

त्यामधे मुख्यत्वे करून संस्कार, चालीरीती, परंपरा, भाषा, तुमचा पेहराव याला आपण मागासलेपणाचे समजत आहोत.

आपली सभ्यता व संस्कृती नष्ट होण्यामागची खरी कारणे काय ती सर्व हिंदूंनी शोधली पाहिजेत.

हिंदू धर्म आणि राजकारण (Hind Religion and Politics)

हिंदुत्व याचे सदैव भान राखणारा आपला देश राजकारणी मंडळी कोठे तरी भरकटत घेवुन चालली आहेत.

गेल्या वर्षीपासून राजकारणामध्ये अनेक उलटा – पालथी झाली, अनेक बदल झाले, या सगळ्यात भरडून निघाले ते हिंदु धर्म आणि जनता.

आता काही राजकारणी आणि सत्ताधारी मंडळींनी हिंदुत्व हे हत्यार बनवून जाती – धर्मांमध्ये तेढ निर्माण करण्याचे साहस केले आहे.

आपल्या राजकीय स्वार्थासाठी दिल्ली, मुंबई, कोल्हापूर, पुणे इ. ठिकाणी जातीयवादी दंगली घडविल्या.

आज पर्यंत सर्व जाती- धर्मातील बंधुभावाने राहणारे लोक आज एकमेकांचे शत्रू बनले आहेत.

देव धर्माचे राजकारण करुन अनेक राजकीय पक्ष आपले वर्चस्व प्रस्थापित करण्याच्या प्रयत्नात आहेत.

जर त्यांना आपल्या हिंदु धर्माची आणि सामान्य जनतेची ताकद दाखवून द्यायची असेल तर आपण सर्वांनी हिंदुस्थानी म्हणून एकत्र यावे लागेल आणि कोणत्याही राजकारणी पक्षाच्या आणि व्यक्तीचा भूलथापांना बळी न पडता.

आपल्याला एक सुजाण नागरिकाची भूमिका पार पाडली पाहिजे.

निष्कर्ष

जिथे विचार असतो तेथे माणुसकी शकते आणि जेथे माणुसकी शकते ते धर्म संपतो.

अनेक दशकांपासून आपल्याच अनेक राजकीय पक्ष, राजकीय व्यक्ती, अनेक प्रतिष्ठित लोक यांनी हिंदू अस्मिता नष्ट करण्याची  स्पर्धा सुरू केलेली आहे आणि आज आपणही तेच करत आहोत.

आपल्या सभ्यतेचा,संकृतीचा, धर्माचा अभिमान बाळगण्यासाठी प्रथम आपल्या समाजामध्ये आपली संस्कृती रुजवली गेली पाहिजे.

आपला हिंदु धर्म टिकविण्यासाठी आपण सर्व जाती, धर्म बाजूला सारून मानवता आणि माणुसकी साठी एकत्र येऊन लढले पाहिजे.

धन्यवाद, माय मराठी ब्लॉग

हे सुद्धा वाचा

RSS
Instagram