राजीव दीक्षित यांची माहिती | Rajiv Dixit information in marathi

rajiv dixit
Image Credit – https://hi.wikipedia.org/

स्वातंत्र्य पूर्व काळात जशी महात्मा गांधींनी स्वदेशीचा पुरस्कार आणि विदेशी वस्तूंचा निषेध केला, तसाच निषेध Rajiv dixit यांनी सुद्धा केला होता.

त्यांनी जसा स्वदेशी वस्तू  वापरण्यावर भर दिला तसाच उद्देश राजीव दीक्षित यांचा सुद्धा होता.

स्वतंत्र पूर्व काळात जसे स्वदेशी आंदोलन झाले तसेच आंदोलन भारत स्वतंत्र झाल्यावर देखील छेडण्यात आले, कारण आपण करत असलेली विदेशी वस्तूंची गुलामगिरी !

पण हे आंदोलन कोणी आणि का छेडले ? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण आज या BLOG मध्ये जाणून घेणार आहोत.

स्वदेशीचे आंदोलन छेडून ज्यांनी स्वदेशी वस्तू वापरण्यासाठी लोकांना प्रेरित केले ते होते RAJIV DIXIT / राजीव दीक्षित.

कोण होते हे राजीव दीक्षित ? | Who was Rajiv Dixit ?

राजीव दीक्षित हे समाज सेवक होते, त्यांनी स्वदेशी वस्तूंचा जनमानसात प्रचार आणि प्रसार केला.

ते आजीवन स्वदेशी वस्तू वापरण्यासाठी आग्रही राहिले, त्यांनी त्यासाठी ‛भारत स्वाभिमान आंदोलन’ आणि  ‛आजादी बचाओ’  सारखी आंदोलने उभारली.

Rajiv Dixit यांनी त्यासाठी अनेक व्याख्याने दिली, त्यांच्या मते आपण जर स्वदेशी वस्तू वापरल्या तर भारताचा पैसा बाहेर जाणार नाही तो भारतातच फिरत राहील आणि भारतीय तरुणांना रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध होतील.

त्यांना परकीय वस्तूंची गुलामगिरी मान्य नव्हती, त्यांनी स्वदेशी वस्तूं वापरण्याबाबत गावो गावी जाऊन प्रचार केला, व्याख्याने दिली.

स्वदेशी वस्तूंच्या वापरासाठी ते आजीवन झटले, त्यांनी अनेक विदेशी कंपन्यांची पोलखोल केली.

तसेच भारताबाहेरील स्वीज बँकेतील भारताचा काळा पैसा भारतात परत अनण्याबाबत आग्रही राहिले.

2000 ते 2009 या नऊ वर्षात ‛स्वदेशी ओवर विदेशी’ या हॅशटॅगमुळे ते खूप लोकप्रिय झाले होते.

भारत कृषी प्रधान देश असल्याने त्यांनी शेतीला प्राधान्य देऊन ही चळवळ शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला.

त्यांनी रासायनिक खतांच्या ऐवजी स्वदेशी खते म्हणजेच गांडूळ खत, शेण खत ही खते शेतीसाठी वापरण्याचा आग्रह धरला.

राजीव दीक्षित यांचा परिचय | Marathi Information of Rajiv DIXIT

Rajiv Dixit / राजीव दीक्षित यांचा जन्म 30 नोव्हेंबर 1967 मध्ये उत्तरप्रदेश मधील अलिगढ येथे झाला.

त्यांचे बारावी पर्यंतचे शिक्षण फरिदाबाद येथे झाले, त्यांनी अलाहाबाद मधून बी.टेक केले तर आयआयटी कानपुर मधून त्यांनी एम.टेक पर्यंतचे शिक्षण घेतले.

त्यांनी सुरुवातीचे काही दिवस सीएसआयआर आणि फ्रांस टेलिकम्युनिकेशन मध्ये नोकरी सुद्धा केली.

एका प्रोजेक्टवर काम करत असताना ते ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या संपर्कात देखील आले होते.

राष्ट्रसेवा हेच त्यांच्या जीवनाचे ध्येय होते, बाबा रामदेव आणि राजीव यांची 2009 मध्ये भेट झाली आयुर्वेद आणि भारता बाहेर गेलेल्या काळा पैसा याबद्दल असलेल्या सारख्या विचारांनी त्यांची खूप कमी वेळात खूप घनिष्ठ मैत्री झाली.

राजीव दीक्षित यांचा मृत्यू

29 नोव्हेंबर 2009 रोजी छत्तीसगडमधील ‛दुर्ग’ या शहरात रामदेवबाबांच्या ‛भारत स्वभिमानी ट्रस्टने’ आयोजित केलेल्या कार्यक्रमात त्यांनी  नियोजित भाषण केले त्यानंतर त्यांना खूप घाम आला.

Rajiv Dixit यांना दुर्ग येथील ट्रस्टच्या आश्रमात नेण्यात आले.

तिथे ते चक्कर येऊन बाथरुममध्ये पडले, त्यांना तिथून भिलाई  येथील ‛बीएसार अपोलो’ हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले.

उपचार सुरू असताना 1जानेवारी 2010 रोजी डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले, Rajiv Dixit यांच्या मृत्यूचे कारण हार्ट अटॅक आहे असे सांगण्यात आले असले तरी त्यांचा मृत्यू संशयास्पद होता.

राजीव दीक्षित यांचे ‛भारत स्वाभिमान आंदोलन’

राजीव दीक्षित यांनी भारत स्वाभिमान आंदोलन सुरू केले होते, त्यांनी कायम स्वदेशीचा पुरस्कार केला आणि लोकांना स्वदेशी वस्तू खरेदी करण्यासाठी प्रोत्साहन दिले.

आपले ध्येय गाठण्यासाठी त्यांनी ‛युनिलिव्हर’ ही भारतीय कंपनी नाही, कोका कोला कसं तयार केलं जातं ? तसेच पेप्सी पिल्याने आपल्या शरीरावर कसे दुष्परिणाम होतात ते सांगितले.

त्यांनी कायम आयुर्वेदाताचा पुरस्कार केला आणि स्वतः अभ्यास करून लोकांना वेगवेगळ्या विकारांवरचे अनेक प्रकारचे आयुर्वेदिक उपाय माहीत करून दिले. 

Rajiv Dixit यांनी लोकांना स्वदेशी वस्तू वापरून आपल्या तरुणांना  रोजगार मिळवून देण्यासाठी जनजागृती केली.

लोक स्वदेशी वस्तू कोणत्या ते माहिती करून घेऊन त्याच्या याद्या तयार करायला लागले आणि दुकानात जाऊन स्वदेशी वस्तू खरेदी करण्यासाठी आग्रही होऊ लागले.

त्यांनी सुरू केलेले हे आंदोल अवघ्या नऊ वर्षात जनमानसात पोहोचले होते.

राजीव दीक्षित आणि रामदेव बाबा यांची घनिष्ठ मैत्री

Rajiv Dixit आणि योग गुरू रामदेव बाबा यांची भेट 2009 मध्ये झाली खूप कमी वेळात त्यांची  घनिष्ठ मैत्री झाली.

राजीव दीक्षित आणि योग गुरू रामदेव बाबा यांचे विचार सारखे होते आयुर्वेद आणि काळा पैसा  याबाबीत त्यांची मते एक होती.

नोव्हेंबर 2009 मध्ये योग गुरू बाबा रामदेव यांनी राजीव दीक्षित यांची भारत स्वाभिमानी ट्रस्टचे प्रमुख वक्ता, राष्ट्रीय सचिव म्हणून नेमणूक केली होती.

ही जवळीक बाबा रामदेव यांच्या निकटवर्तीय लोकांना खुपत होती असे सुद्धा त्या काळात दबक्या आवाजात बोलले जात होते.

पण ही मैत्री फार काळ टिकू शकली नाही कारण जानेवारी 2010 मध्येच  राजीव दीक्षित यांचा संशयास्पद मृत्यू झाला.

राजीव दीक्षित यांचा संशयास्पद मृत्यू

29 नोव्हेंबर 2009 रोजी राजीव दीक्षित यांनी छत्तीसगडमधील ‘दुर्ग’ या शहरात आपलं नियोजित भाषण केलं.

योग गुरू रामदेव बाबा यांच्या ‘भारत स्वाभिमान ट्रस्ट’ने आयोजित केलेला हा कार्यक्रम आटोपून येत असतांना राजीव यांना अचानक खूप घाम आला होता आणि त्यामुळे त्यांना संस्थेच्या दुर्ग येथील आश्रममध्ये नेण्यात आलं होतं.

आश्रमात असतांना ते तिथल्या बाथरूम मध्ये चक्कर येऊन पडले आणि मग त्यांना भिलाई येथील ‘बीएसार अपोलो’ हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलं होतं.

डॉक्टर दिलीप रत्नानी राजीव यांच्यावर उपचार करत होते, दुसऱ्या दिवशी 1 जानेवारी 2010 रोजी डॉक्टरांनी त्यांना ‘मृत’ घोषित केलं होतं.

ही घोषणा होताच बाबा रामदेव यांच्या आदेशानुसार राजीव दीक्षित यांचं पार्थिव हे ‘चार्टर्ड’ विमानाने हरिद्वारला नेण्यात आलं होतं.

RAJIV DIXIT यांचे मोठे भाऊ PRADIP DIXIT त्यावेळी त्या विमानात हजर होते.

राजीव दीक्षित यांचे निळे झालेले पार्थिव शरीर

Rajiv Dixit यांचा निळा पडलेला चेहरा, ओठ हे प्रदीप यांच्या सर्वप्रथम लक्षात आले होते.

राजीव यांच्या समर्थकांनी ‘पोस्ट मॉर्टम’ करून मृत्यूचं नेमकं कारण कळावे अशी मागणी केली होती, पण बाबा रामदेव यांनी ही परवानगी दिली नाही.

मदन दुबे व बाबा रामदेव भेट

राजीव दीक्षित यांचे जवळचे मित्र मदन दुबे हे योग गुरू बाबा रामदेव यांना भेटले होते.

पण त्यांना बाबा रामदेव यांना ‘अंतिम संस्कार’ लवकर व्हावेत यासाठी कमालीची घाई झालेली दिसून आली होती.

मदन दुबे यांच्या मते, राजीव दीक्षित यांच्याबद्दल अंतर्गत लोकांची असलेली मतभिन्नता, जळफळाट हेच राजीव दीक्षित यांच्या मृत्यूचं खरं कारण आहे.

मदन दुबे यांना असं वाटण्याचं अजून हे एक कारण होतं की, ज्या हॉलमध्ये राजीव दीक्षित यांचे पार्थिव ठेवण्यात आलं होतं तिथे योग गुरू रामदेव बाबा आले आणि त्यांनी हे वाक्य वापरलं की, “पोस्ट मॉर्टम हे हिंदू धर्माच्या विरुद्ध आहे, अंतिम संस्कार लगेच झाले पाहिजे.”

योग गुरु बाबा रामदेव व हिंदू धर्म

योग गुरू बाबा रामदेव हे धर्माची कुबडी घेऊन फार क्वचित एखादं वाक्य वापरतात.

ते भगव्या रंगात असतात, पण त्यांचा प्रमुख भर हा योग शिकवण्याकडे असतो.

पण त्यावेळी रामदेव बाबांनी अशी धार्मिक बाब सांगितली की, जमलेल्या लोकांनी लगेच त्यांच्या म्हणण्याला दुजोरा दिला.

प्रदीप दीक्षित, मदन दुबे यांची मागणी त्यामुळे पुर्णपणे दुर्लक्षित झाली.

संशयास्पद मृत्यू चे पुरावे

राजीव दीक्षित यांचा मृत्यू नैसर्गिक की घातपात हे कायमसाठी रहाणारं एक गूढ आहे, शवविच्छेदनाला झालेला विरोध, घाईत केलेले अंतिम संस्कार आणि ऐन वेळी प्रदीप दीक्षित यांनी पाळलेलं मौन हे यामागची प्रमुख कारणं सांगितली जातात.

जानेवारी 2019 मध्ये भारत सरकारने दुर्ग येथील पोलिसांना या प्रकरणाची पुन्हा तपासणी करण्याचे आदेश दिले होते. पण तसं काहीच घडलं नाही.

राजीव दीक्षित यांच्या मृत्यूने त्यांची स्वप्ने अपूर्ण राहिली

राजीव दीक्षित आणि बाबा रामदेव 2014 मध्ये एक राजकीय पक्ष स्थापन करणार होते ज्यामध्ये केवळ प्रामाणिक लोक असतील.

“भारत जगात शक्तिशाली देश असेल” आणि “स्वदेशी आंदोलन” देशातल्या शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचेल.” अशी त्यांची स्वप्ने होती पण वयाच्या अवघ्या 42 व्या वर्षी त्यांचे निधन झाले आणि ती स्वप्नं अपूर्णच राहिली.

त्यांच्या मृत्यूनंतर “भारत स्वाभिमानी ट्रस्टचे” रूपांतर योग गुरू रामदेवबाबांनी पुढे जाऊन पतंजली केले आणि या पतंजलीमध्ये  देशसेवेची ती उर्मि राहिली नाही.

पतंजली आता एक व्यापारी ब्रँड झाला आहे.

धन्यवाद, माय मराठी ब्लॉग

हे सुद्धा वाचा

RSS
Instagram