Job or Business / नोकरी की व्यवसाय आजचा हा विषय खूप महत्त्वाचा आणि रंजक असा आहे.
आपल्या दैनंदिन गरजा असोत किंवा अनेक गोष्टी त्या पुर्ण करण्यासाठी आपल्याला पैसे लागतात आणि प्रत्येक माणूस आपआपल्या परीने पैसै मिळवतो.
त्यातूनच आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतं असतो.
पैसै कमविण्यासाठी आज बरेच मार्ग उपलब्ध झाले असले तरी मुख्यत्वे करून दोनच दोनच मार्ग आहेत आणि ते म्हणजे व्यवसाय किंवा नोकरी.
आजकाल तरूण शिकून Job च्या मागे लागतात, पण आपल्या मेहनतीच्या जोरावर किंवा बुद्धिमत्तेचा वापर करून Business करणे त्यांना धोक्याचे वाटते.
कारण आपल्या घरापासूनच त्यांना हे धडे मिळाले असतात, Job or Business दोन्हींही मार्ग चांगले आहेत.
पण त्याबरोबर Job or Business चे फायदे तोटे आपणं समजून घेतले पाहिजेत, म्हणुनच आज या blog मध्ये आपणं नोकरी करावी की व्यवसाय त्यासोबतच या दोन्हींचे पैलू उघडुन पाहणार आहोत.
प्रत्येक नाण्याच्या दोन बाजू असतात, तसे प्रत्येक गौष्टीला दोन बाजु असतात.
Job or Business हा ज्याचा त्याचा विषय आहे, त्यामुळेच नोकरी असो किंवा व्यवसाय त्यांच्या सर्व बाजू आपणं पडताळून पाहणे गरजेचे असते.
नोकरी व व्यवसाय फायदे तोटे / Job or Business Advantages and Disadvantages
नोकरी करण्याचा फायदा
Job म्हटल की आपणं ज्या नोकरीसाठी शिकलो त्याचे कौशल्य दाखवावे लागेल.
नोकरीमध्ये तुम्हाला महिनाभर काम केलं की मग उत्पन्न मिळतें.
ऑफिसला फायदा होवो किंवा तोटा यांचे आपल्याला काहीच टेन्शन राहत नाही.
एकदा 8 किंवा 12 तासाची ड्युटी केली की तुम्हाला कोणत्याही अधिक काम नसते.
नोकरी करण्याचे तोटे
यामध्ये सगळा वेळ नोकरीवर जात असल्याने नविन काहीच शिकायला मिळतं नाहीं.
कितीही कष्ट केले तरी ठरलेल्या रकमेपेक्षा जास्त पैसे मिळत नाहीत.
निर्णय आपणं घेवु शकत नाही, बॉस वर अवलंबून रहावे लागते.
महिन्याच्या उत्पन्नामध्ये सर्व उदरनिर्वाह करावा लागतो.
आपल्या ठरवून दिलेल्या पगारावर काम करावे लागते.
आपली मनमानी चालत नाही, बॉस सांगेल तेच ऐकावे लागते.
व्यवसाय करण्याचे फायदे
कुणाच्याही हाताखाली काम करावे लागत नाही, आपण स्वतः मालक असतो.
व्यवसायाची पुर्ण वेळ म्हणजे 24 तास तुम्हाला द्यावे लागतात.
नविन गोष्टी शिकू शकता त्याचा उपयोग तुमच्या व्यवसाया साठी करुन घेवु शकता.
फायदा झाला तर तुमचाच आणि नुकसान झालं तरी तुमचाच.
फिक्स पगार नसतो कधी जास्त मोबदला मिळतो तर कधी कमी मोबदला मिळतो.
सुट्टी वगैरे घेण्यासाठी कुणावर अमलंबून रहावे लागत नाही.
व्यवसाय करण्याचे तोटे
24 तास लक्ष केंद्रित करावे लागते.
मार्केटनुसार चालावे लागते.
आपल्या प्रगती मधे अनेक अडचणी आडव्या येतात.
स्पर्धा खुप असल्याने आर्थिक फायदा होईल की नाही याची शाश्वती नसते.
तरूण पिढी व्यवसाय न करण्याची कारणे
आपल्या पूर्वजांपासूनच आपल्याला शिकवण मिळाली आहे शिक्षण घेऊ नोकरी करायची.
त्यामुळेच व्यवसाय करण्याचे धाडस आजचे तरुण करत नाहीत.
मध्यमवर्गीय सर्वच कुटुंबीय आजच्या मुलांना व्यवसायात पडताना रोखताना दिसतात, कशाला नको त्या फंदात पडतोस, व्यवसायासाठी भांडवल कुठून आणणार …
त्यामुळेच कितीही इच्छाशक्ती असली तरी व्यवसाय करण्यासाठी घाबरतात, याचे कारण आपणच त्यांच्या मनावर हे बिंबवलय.
“व्यवसाय वाढेल का नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं तो टिकेल का नाही याची भीती आपणच आपल्या मुलांच्या तरुणांच्या मनात निर्माण करतो आणि त्यामुळेच ते व्यवसाय करायचे सोडून नोकरीच्या मागे धावतात”
nokari ki vyavsay हा प्रश्न पडत असेल तर व्यवसाय हा नोकरीपेक्षा कितीतरी पटीने सर्वोत्तम असा पर्याय आहे.
तरीही पालकांनी आपल्या मुलांच्या अंगातील गुण ओळखून त्याला जे करायचे आहे ते करू द्यावे.
स्वतःच साम्राज्य उभे करा | Job or Business
काहीतरी शिकण्यासाठी नोकरी नक्कीच करावी लागते, पण त्यावर फक्तं आपल्या मूलभूत गरजा भागून आपली स्वप्ने तशीच राहत असतील, तर मात्र आपणं चुकीच्या track वर आहोत हे ओळखायचे.
नोकरी मधून आपण फक्त आपल्या घरच्यांच्या गरजा पूर्ण करू शकतो.
तसेच Business / व्यवसायामुळे आपण आपली स्वप्न तर पूर्ण करू शकतो आणि अमाप पैसा देखील कमवू शकतो.
व्यवसायामुळे आपलं सगळी कडे नाव देखील होते आणि आपला मान आपोआपच वाढतो.
व्यवसायामध्ये जास्त अडचण होत असेल तर आपण आपल्या हाताखाली मॅनेजर देखील ठेवू शकतो.
आपल्या Business च्या वेगवेगळ्या Franchise देखील आपण काढल्या तर त्याचा जास्त फायदा आपल्याला होतो.
सांगण्याचा उद्देश हा आहे की, तुमचा व्यवसाय हे तुमच साम्राज्य असतं आणि तूम्ही त्याचे राजे असता.
यामागे पार कष्ट आणि जिद्द असली की काहीही साध्य होत.
व्यवसायाची निवड कशी करायची
Job करत असताना तुम्हाला फक्त घरखर्च जावून काही पैसे शिल्लक राहतात.
काही गोष्टी घेण्यासाठी मग आपल्याला कर्ज घ्यावे लागते एक तर नोकरीच टेन्शन आणि त्यात कर्जाचे टेन्शन यामुळे माणूस द्विधा अवस्थेमध्ये असतो.
तेच जर व्यवसाय असेल तर आपण घर खर्च आणि बाहेरील गोष्टी यांचा समन्वय योग्य रीतीने सांभाळू शकतो, म्हणुनच व्यवसाय करताना या गोष्टी लक्षात ठेवाव्या
– आपली कौशल्ये
– उद्दिष्टे
– परिपूर्ण वेळ
– आर्थिक गुंतवणुक
– जोखीम घेण्याची तयारी
– अपार मेहनत
या गोष्टीचा मेळ बसला की तूम्ही योग्य प्रकारे कोणताही व्यवसाय करू शकता.
कोरोना महामारी आणि बेरोजगारी
2020 मध्ये संपूर्ण जगात कोरोनाचे महामारी आली आणि कितीतरी हजारो लाखो लोकांच्या नोकऱ्या यामध्ये गेल्या.
काही लोक कोरोना महामारीने तर काही लोक नोकरी गेले या टेन्शनने आपल्या गावी परतले.
पण त्यानंतर बऱ्याच तरुणांनी आणि लोकांनी आपल्या गावी राहून छोटा मोठा व्यवसाय सुरु केला.
आपण लाखो रुपये इन्वेस्ट करून नोकरीसाठी दुसऱ्या देशात किंवा गावात जाऊन राहतो पण तीच इन्व्हेस्टमेंट आपण आपल्या गावी करून एकांदा छोटासा व्यवसाय केला तर त्याचे दुय्यम फायदे आपल्यालाच होतील.
एक तर आपल्या कुटुंबाला सोडून दुसरीकडे जावं लागणार नाही आणि दुसरं म्हणजे काही तोटा झाला तर तो आपण परत भरून काढू शकतो.
कारण नोकरी एकदा गेली तर ती मिळवण्यासाठी खूप खस्ता खाव्या लागतात पण व्यवसाय मध्ये तोटा झाला तर आपल्या इच्छाशक्तीच्या आणि जिद्दीच्या जोरावर आपण तो खूप वरती नेवू शकतो.
गावातच सुरू करू शकतो छोटे-मोठे व्यवसाय
आज प्रत्येकाला चांगल्या लाईफस्टाईलची सवय झाली आहे, गावे आत्ता गावे नाही राहिली, शहरांचे रूपांतर महानगरात झाले आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.
गावातली लोक सुद्धा आज खूप पुढारली आहेत, शहरी लोकांचा फक्त लाईफस्टाईल विचार न करता त्यांनी त्यांच्या व्यवसाय करण्याची स्टाईल देखील शिकवून घेतलेले आहे.
आज गावात देखील जागोजागी आपल्याला वेगवेगळे स्टॉल आणि वेगवेगळे गाळे पाहायला मिळतील ज्यामध्ये तरुण अनेक व्यवसाय करताना आपल्याला दिसत आहेत.
त्यामध्ये मोबाइल ॲक्सेसरीज, फूड स्टॉल, पारंपारिक पदार्थ, भाजी स्टॉल, ज्वेलरी, कटलरी, मेडिकल, कपड्याचे दुकाने देखील गावात आज जागोजागी आपल्याला पहायला मिळतात.
आपण कुठे राहतो यापेक्षा आपण तिथं आपल्याला परवडणारा कोणता Business करू शकतो हे लक्षात घ्यायला हवं.
सोशल मीडियावर सर्वकाही | Job or Business Online Earning
नोकरी असो वा व्यवसाय आज सगळकाही online झालं आहे.
सोशल मीडियाची मदत घेवुन आपण आज नोकरी आणि व्यवसायामध्ये नवनविन प्रायोग करू शकतो.
आपल्याला जो business करण्याची इच्छा आहे त्याच्या संबंधित बरीच माहिती आपल्याला सोशल मीडियाच्या माध्यमातून सहज उपलब्ध होते त्याचा योग्य प्रकारे आपण उपयोग केला पाहिजे.
तसेच आपल्या व्यवसाया संबंधित एखादा सल्ला जर आपण परदेशातून घ्यायचा असेल तर सोशल मीडियाच्या माध्यमातून काही मिनिटातच घेऊ शकतो.
आपलं उत्पन्नाची जाहिरात अनेक जण आज सोशल मीडियाच्या माध्यमातून करतात त्यामुळे जगाच्या कानाकोपऱ्यापर्यंत आपला व्यवसाय आपण पोहचवू शकतो.
आज एकविसाव्या शतकात व्यवसायाची जाहिरात करण्यासाठी सर्वात प्रभावी माध्यम म्हणजे Social Media बनले आहे.
सोशल मीडियाच्या माध्यमाने आपण अनेक शहरांमध्ये आपला व्यवसाय वाढवू शकतो.
नोकरी किंवा व्यवसाय करत अनेक ऑनलाईन कामे | Online Job or Business
आज सर्वांनाच वाटते आपल्याकडे सगळ्या गोष्टी असाव्या आपल्या घरातल्यांना कोणत्याही गोष्टीची कमी पडू नये.
वाढत्या महागाईमुळे आहे त्या पगारात जर भागत नसेल तर आज आपली कौशल्ये वापरून किंवा सोशल मीडियावर ऑनलाईन अनेक कामे आपणं करु शकतो.
आपला Job or Business सांभाळत आपणं आज ऑनलाईन व ऑफलाईन अनेक कामे करू शकतो.
– डाटा एन्ट्री,
– टायपिंगची कामे,
-ऑनलाइन कोर्सेस,
– ऑनलाइन शिकवणी,
– कन्सल्टन्सी,
– ऑनलाइन प्रॉडक्ट विक्री,
– ऑनलाइन फूड विक्री आपण करु शकतो.
आजच्या धावपळीच्या जगात जग नुसते पळत आहे सणासुदीच्या दिवशी देखिल अनेक गरजेच्या सणावाराला लागणाऱ्या वस्तू आपल्याला हव्या असतात.
त्या देखील ऑनलाइन विकून आपण पैसे कामाऊ शकतो.
निष्कर्ष
Job or Business दोन्हीकडे कष्ट आहे दोन्हीकडे फळ आहे, फक्तं नोकरी करण्यासाठी हुशारी लागते आणि व्यवसाय करण्यासाठी प्रबळ इच्छाशक्ती आणि अतोनात मेहनत लागते.
तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला नक्की कळवा.
धन्यवाद, माय मराठी ब्लॉग
हे सुद्धा वाचा
- Career opportunities after BBA | बी बी ए नंतर काय करावे ?
- 2G Spectrum Scam case | 2 जी स्पेक्ट्रम घोटाळा
- राजीव दीक्षित यांची माहिती | Rajiv Dixit information in marathi
- G20 म्हणजे काय ? G20 Information in marathi
- Neuralink म्हणजे काय ? Neuralink information in Marathi
- Data Science म्हणजे काय ? | डेटा सायन्स ची संपूर्ण माहिती
- मराठी माणूस आणि रोजगार | Marathi manus aani rojgar
- नॉर्थ सेंटीनेल आयलँड |North Sentinal Island Information in Marathi
- अविश्वास प्रस्ताव म्हणजे काय? | No confidence motion in marathi
- Eye flu म्हणजे काय ? डोळे येणे | Eye Flu in marathi
- ECG test म्हणजे काय? | ECG Information in marathi
- What is Hindu Dharm? | Hindu Religion explained in Marathi
- ChatGPT म्हणजे काय ? Magic of AI in Marathi