What is Internet banking ? इंटरनेट बँकिंग म्हणजे काय व त्याचे फायदे

internet banking mhanje kay

आजकाल जग सोशलमय झालंय…मग यात बँका देखील कशा मागे राहतील, जिकडे तिकडे INTERNET BANKING किंवा ONLINE BANKING चा वापर करून व्यवहार व्यवसाय केले जातात.

मग हे सगळ करताना पैसा हा आलाच आणि हेच पैसै ऑनलाइन बँकिंग किंवा Internet banking द्वारे लोक आता वापरत आहेत.

टेबल ऑफ कंटेंट

Internet Banking चे माध्यम

गुगल पे, फोन पे, पिटीएम, भीम ॲप, अमेझॉन पे अशी online बॅकिंगची बरीचशी ॲप आपण सद्या वापरत आहोत.

दुकानात किराणा असो, भाजी असो, मोबाईल रिचार्ज, टिव्ही रिचार्ज सगळकाही ऑनलाइन झाल आहे.

घरी बसून एका क्लिक वर सगळ काही मिळून जात, बँकेतील ऑफिसमधील कोणतेही Online Bill Payment आपणं आज सहज घरी बसून करतों.

2016 पासुन नोटाबंदीमुळे ऑनलाइन व्यवहार करण्यामध्ये वाढ झाली.

पण मित्रांनो आज जसे सगळे सहज सोपे दिसते तसे अजिबात नाही, ऑनलाइन व्यवहार आणि ऑनलाइन बॅकिंग यांचे जसे फायदे आहेत तसे तोटे देखिल आहेत.

आपण या blog मध्ये internet banking ची माहिती पाहणार आहोत.

इंटरनेट बँकिंग चे फायदे | Advantages of Internet Banking

अलीकडे काही वर्षांत Internet Banking | इंटरनेट बँकिंग मुळे ग्राहक आणि व्यवसायातील लोकांसाठी तसेच व्यवसाय करण्यासाठी लागणारी चलने, खर्च, बिले करण्यासाठीं, व्यवहार करण्यासाठी, आर्थिक गोष्टींची देवाण – घेवाण करण्यासाठी इंटरनेट बँकिंग आज सहज सोपे झाले आहे.

त्यामुळेच या इंटरनेट बँकिंगचे फायदे काय आहेत हे आपण जाणून घेवुया:-

रिचार्ज आणि बिले भरणे

आपले मोबाईल रिचार्ज, टीव्ही रिचार्ज, वीज बिल, गॅस बिल सगळे आता इंटरनेट बँकिंग मुळे सोपे झाले आहे.

बँकेचे स्टेटमेंट आणि बँकेतील पैसै तपासणे

आपण जगाच्या कोपऱ्यात कुठे जरी असलो तरी आपणं इंटरनेट बँकिंगद्वारे (Online Transaction) / व्यवहार करु शकतो.

तसेच इंटरनेट बँकिंग द्वारे पेमेंट केल्याने चेक्स, महागडे लिफापे, स्टॅम्प यांचा खर्च कमी होतो.

यांचा तुलनेत बँकेकडून कमी किंमत आकारणी केली जाते, तसेच बँकेचे स्टेटमेंट आपल्याला पहावयाचे असल्यास आपणं घरी बसून देखिल ते पाहू शकता.

कोणत्याही वेळी पेमेंट आणि वेळेची बचत

Internet Banking ला वेळेचे बंधन अजिबात नसते, दिवसातले 24 तास तूम्ही कधीही online money transfer करू शकता.

तसेच पैसै हवे असल्यास किंवा कोणाला पैसै द्यावयाचे असल्यास तुम्हाला बँकेत जायची गरज लागत नाही.

घरी बसून किंवा ऑफिस मधे बसून देखिल तूम्ही व्यवहार हाताळू शकता, यामुळं काय होत तर नविन काहितरी शिकायला पण मिळतें आणि वेळ पण वाचतो.

विस्तृत सेवेसोबत चांगले दर

आपल्याला कधीही cash / कॅश ची गरज लागली तर त्या बँकेत गेले पाहिजे असे अजिबात नाही.

कारण प्रत्येक बँकेची एटीएम आणि सिडीएम मशीन थोड्या थोड्या अंतरावर आपल्याला पहायला मिळतील.

यामुळं होत काय की थोड्याशा फी मध्ये जास्तीत जास्तीत फायदा हा ग्राहकाला मिळतो.

त्यात बँकाचे दर देखिल आपल्या खिशाला परवडेल असे असतात.

बँकेमार्फत ऑनलाइन कर्ज

आजच्या 21 व्या शतकात सगळ्याच गोष्टी जलद गतीने होत आहेत, आदी आपल्याला कर्ज वगैरे हवे असेल तर काही तर वस्तू तारण ठेवून कर्ज घ्यावे लागे आणि या सगळ्या कागदपत्रे आणि प्रोसेसला खुप वेळ लागत असे.

पण आज आपल्या बँक अकाऊंट नंबर आणि आधार कार्ड नंबर वरून तसेच आपला CIBIL SCORE सिबिल स्कोर चेक करून काही मिनिटातच कर्जाची रक्कम आपल्या बँक खात्याच्या अकाउंट वर जमा होते.

ते योग्य ते व्याजदर लावतात, पण ग्राहकांना गरज असल्यावर ते आता कर्ज देतातच.

त्यांच्या काही योजना देखिल त्या असल्या तर आपल्याला नोटिफिकेशन द्वारे सांगत असतात, टोल फ्री नंबर किंवा बँकेचा नंबर यांच्याद्वारे आपण त्याची माहिती सहज घेऊ शकतो.

कर्जाप्रमाणे बचतीचे देखील अनेक प्रकार आहेत. बँकेमध्ये या सर्वांसाठी पर्याय देखिल आहेत. ते आपण पाहूया. 

इंटरनेट बँकिंग च्या सहाय्याने आपण हे करू शकतो

अल्पकालीन वित्त नियोजन (Short term financial planning)

जर कोणताही ग्राहक थोड्या अवधीसाठी पैसै गुंतवत असेल तर त्याला (Short term financial planning) अल्पकालीन वित्त नियोजन म्हणतात.

हा कालावधी 3 महिने, 6 महिने ते एक वर्षांचा असतो, यामुळं पैशांची बचत होईल आणि तुमची जी काही गरज असेल तात्पुरती ती निघेल.

दीर्घकालीन वित्त नियोजन (Long term financial planning)

आपण Internet Banking च्या सहाय्याने आपल्या भविष्यासाठी किंवा वयोवृद्ध काळासाठी दीर्घकालीन गुंतवणूक करु शकतो, त्यामुळं म्हातारपणी कुणापुढे हात पण पसरावे लागणार नाहीत आणि आपल्या भविष्याची चिंता देखील मिटून जाईल.

पैशाचे योग्य व्यवस्थापण करा

आपल्या मुलभूत गरजा, दैनंदिन सुविधा यासाठी पैशाचे योग्य नियोजन गरजेचे आहे.

कारण आपल्या नावावर काही लोन आहेत आणि घरखर्च यात मेळ बसवताना जी दमछाक होते ती होणारं नाही.

बचत करण्याची सवय

आपण नेहमी बगतो प्रत्येकजण हेच सांगत असतो की सेविंग कर, तेंव्हा आपणं त्याकडे दुर्लक्ष करतो.

पण त्याच एवढीत काही वाईट गोष्ट घडली की तेंव्हा आपल्याला आठवत की सेवींग केली असती तर बरे झाले असते हे एक उदाहरण झाल.

पण आज सगळ्यांनी थोडीफार बचत करणे गरजेचे बनले आहे, त्यामुळं internet banking ने तर बचत करण्याचा राजमार्ग सापडण्यासारख आहे. 

योग्य त्या गोष्टीत पैशांची गुंतवणुक करा

पैसै बचत करताना योग्य तो परतावा मिळत नाही, मग आपले मन उदास होते, म्हणुन आजकाल लोक शेअर मार्केट, फायनान्स किंवा वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये पैसै गुंतवताना दिसतात थोड्याच अवधीत त्या कंपन्या डबघाईला येते आणि आपले पैसे बुडतात.

त्यामुळं पैसै गुंतवताना तिथं रिस्क आहे का याची पुरेपूर माहिती घेवुन पैसै गुंतवावे.

आपली बँक ही पैसै गुंतवणुकीसाठी सर्वात सुरक्षेची जागा आहे, त्यामुळं परतावा कमी असला तरी तुमचे पैसै कुठे जाणार नाहीत. याची बँक काळजी घेते.

किंवा सोने, चांदी किंवा वस्तूरुपात पैशांची गुंतवणुक तूम्ही करु शकता. 

Internet Banking च्या मदतीने गृह कर्ज

आज बँकेद्वारे कर्ज दिले जाते, त्यामध्ये गोल्ड लोन, पर्सनल लोन, कार लोन, हाऊस लोन, एज्युकेशन लोन, बिझनेस लोन इत्यादी अनेक प्रकार पडतात.

योग्य त्या कागदपत्रांची पूर्तता करून बँक काही कालावधीतच तुम्हाला ते Loan सुपूर्त करते.

आता जसे प्रत्येक गोष्टीला दोन बाजू असतात तसेच ऑनलाइन बँकिंग देखील दोन बाजू आहेत एक त्याचे फायदे आणि एक त्याचे तोटे तर इंटरनेट बँकिंग वापरताना आपल्याला काय तोटे होतात तसेच कसे आपण प्रॉब्लेम्स मध्ये येऊ शकतो हे आपण पाहूया.

इंटरनेट बँकिंगचे तोटे | Disadvantages of Internet Banking

24 तास इंटरनेटची गरज

इंटरनेट बँकिंगचा वापर करताना तुम्हाला 24 तास इंटरनेटची गरज असते, मग ते कोणीही असो बँक कर्मचारी किंवा बँक ग्राहक इंटरनेट शिवाय तूम्ही कोणतेच व्यवहार किंवा ट्रांजेक्शन करू शकत नाही.

या गोष्टीमुळेच तूम्ही कुठे जरी ऑनलाइन पेमेंट करणार असला तर इंटरनेट शिवाय तूम्ही काहीच करु शकत नाही त्यामुळं ऑनलाइन बँकिंग किंवा इंटरनेट बँकिंग करताना आपल्याला इंटरनेटची गरज ही लागतेच लागते.

ट्रान्सफर लिमिट असणे

इंटरनेट बँकिंग वापरताना आजकाल सगळेच व्यवहार हे ऑनलाईन झालेले आहेत. पैसे काढायला एटीएम वर कशाला जावे त्यापेक्षा ऑनलाईन पेमेंट सोयीचे म्हणून आपण सगळीकडेच ऑनलाइन कॅश ट्रान्सफर करत असतो.

पण बँकांचे हे लक्षात आल्यानंतर बँकांनी देखील ट्रान्सफर होणाऱ्या या पैशावर लिमिटेशन्स आणले.

आज काही बँकां 5 हजार च्यावर money transfer झाले तर त्याच्यावर बँका फी आकारतात.

अशा पद्धतीने महिन्यातून आपले किती जास्त पैसे ट्रान्सफर होतात त्याच्यानुसार बँक फी आकारत असते.

अलीकडे काही महिन्यापूर्वीच एटीएम चा वापर जास्त झाला तरी देखील बँक आपली फी आकारते, त्यामुळे ग्राहकाच्या खिशाला चाप हा बसतोच.

इंटरनेट फ्रॉड आणि सायबर सिक्युरिटी

आपण पाहतो एटीएम मध्ये पैसे जरी काढायला गेले तरी एटीएम मशीन त्यांच्या प्रोसेस करून झाल्यानंतर आपला पिन नंबर मागत असते.

म्हणजेच तो आपला पासवर्ड असतो तसेच बँकेच्या ज्या काही व्यवहार असतात ते करताना देखील आपण आपला एक सांकेतिक नंबर तेथे सेट करत असतो म्हणजेच पासवर्ड सेट करत असतो.

पण काही लोकांच्या अज्ञानामुळे आपण तो पासवर्ड व्यवस्थित सेट करत नाही किंवा योग्यरित्या आपल्या इंटरनेट खात्यावरून आपण लॉग आऊट करत नाही आणि या सर्वाचाच फायदा सायबर चोरटे करत आहेत.

कारण ते यासाठीच बसलेले असतात, त्यामुळेच आपला सांकेतिक नंबर चुकून कोणालातरी सेंड करणे किंवा इंटरनेट बँकिंगचा वापर करताना योग्य ती खबरदारी न घेणे यामुळे बँक ग्राहकाच्या पैशावर सायबर चोरटे डल्ला मारू शकतात.

आणि या गोष्टी काही मिनिटातच घडत असतात, अशा कितीतरी घटना आणि गुन्हे सायबर सिक्युरिटी मध्ये आज नोंद आहेत त्यामुळेच इंटरनेट बँकिंग वापरताना जर ग्राहक थोडाफार अज्ञानी असेल तर हा सर्वात मोठा तोटा ग्राहकाला होतो असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.

आजकाल इंटरनेट फ्रॉडचे शिकार होण्याचे प्रमाण वाढलेले आहे, त्यामुळं लोकांना योग्य त्या मार्गदर्शनाची गरज आहे.

धन्यवाद, माय मराठी ब्लॉग

हे सुद्धा वाचा

RSS
Instagram