औद्योगिक दृष्ट्या प्रगत आणि विकसनशील देशांना एकत्र आणण्यासाठी 1999 मध्ये जागतिक अर्थव्यवस्थेच्या संदर्भात चर्चा करण्यासाठी एक संघटना स्थापन करण्यात आली या संघटनेचे नाव म्हणजे “G20 संघटना किंवा परिषद / G20 summit”.
G20 परिषदेचा इतिहास / G20 History
आर्थिक दृष्ट्या प्रगत असलेल्या 20 देशांची आणि त्या देशांच्या केंद्रीय बँकेच्या गव्हर्नरांची एक संघटना 1999 मध्ये जागतिकदृष्ट्या महत्त्वाच्या असणार्या मुद्यांवर चर्चा करण्यासाठी स्थापन करण्यात आली.
या 20 देशांचे राष्ट्रप्रमुख, त्यांचे अर्थमंत्री, केंद्रीय बँकेचे गव्हर्नर यांची वर्षांतून एकदा बैठक होते.
1 डिसेंबर 2022 ते 30 नोव्हेंबर 2023 याकालावधीत G20 चे अध्यक्ष पद भारताकडे आले होते.
देशाची राजधानी दिल्ली G20 परिषदेच्या नेतृत्वासाठी जय्यत तयारीने सज्ज होती दिल्लीतील प्रगती मैदानाच्या भारत मंडपम्मध्ये 9 सप्टेंबर आणि 10 सप्टेंबर 2023 रोजी या परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.
G20 म्हणजे नक्की काय ? G20 परिषदेची सुरुवात कशी झाली ? यासारखे एक आणि अनेक प्रश्न सर्वसामान्य लोकांच्या मनात घोळवत राहतात.
अशाच अनेक प्रश्नांसाठी आजच्या ब्लॉगमध्ये आपण G-20 परिषदेची सविस्तररीत्या माहिती घेणार आहोत.
G20 Summit Agenda
G20 अध्यक्षपद एका वर्षासाठी G20 अजेंडा चालवते आणि आगामी परिषदांचे आयोजन करतो, G20 मध्ये दोन समांतर ट्रॅक आहेत:
फायनान्स ट्रॅक आणि शेर्पाट्रॅक, अर्थमंत्री आणि सेंट्रल बँकेचे गव्हर्नर फायनॅन्स ट्रॅकचे नेतृत्व करतात तर शेर्पा ट्रॅकचे नेतृत्व शेर्पा करतात.
G20 प्रक्रियेचे समन्वय सदस्य देशांच्या शेर्पांद्वारे केले जाते, जे नेत्यांचे वैयक्तिक प्रतिनिधी असतात.
फायनान्स ट्रॅकचे नेतृत्व सदस्य देशांचे अर्थमंत्री आणि सेंट्रल बँक गव्हर्नर करतात.
G20 म्हणजे काय / What is G20 ?
G20 म्हणजे ग्रुप ऑफ ट्वेन्टी.
हा एक जगातल्या प्रमुख विकसित आणि विकसनशील देशाचा राष्ट्रगट आहे.
जगातील 85 टक्के जीडीपी या 20 देशांच्या ताब्यात आहे, याशिवाय लोकसंख्येबद्दल बोलायचे झाल्यास जगातील 2/3 लोक G20 देशांमध्ये राहतात.
तसेच जागतिक व्यापारात या देशांचे योगदान 75 टक्के इतके आहे, आणि याची परिषद भारताच्या अध्यक्षतेखाली 9 सप्टेंबर आणि 10 सप्टेंबर ला दिल्लीमध्ये झाली.
या परिषदेसाठी अनेक देशांचे प्रतिनिधी उपस्थित होते, G20 परिषदेत अर्जेंटिना, ऑस्ट्रेलिया, ब्राझील, कॅनडा, चीन, फ्रांस, जर्मनी, भारत, इंडोनेशिया, इटली, जपान, मेक्सिको, रीपब्लिक ऑफ कोरिया, रशिया, सौदी अरेबिया, दक्षिण आफ्रिका, तुर्की,स्टेट्स ऑफ अमेरिका, आणि युरोपियन यूनियन यांचा समावेश आहे.
G20 परिषदेचा उद्देश काय आहे / Purpose of the G20 summit
G20 परिषदेत मुख्यतः ग्लोबल वार्मिंग, आरोग्य, दहशदवाद, आर्थिक समस्या, अर्थव्यवस्था यासारख्या महत्त्वाच्या विषयांवर चर्चा केली जाते.
या परिषदेचा मुख्य उद्देश म्हणजे विश्वातील एकाचवेळी वाढलेल्या आर्थिक संकटाच्या प्रश्नावर चर्चा मसलत करणे, आर्थिक विकास आणि आंतरराष्ट्रीय संबंधांच्या वाढीसाठी प्रयत्न करणे, विविध राष्ट्रीय आर्थिक प्रणालीतील सुधारणांसाठी सहकार्य करणे तसेच सामाजिक,संरक्षण, आरोग्य यांसारख्या विषयांवर प्रकाशझोत टाकणे, व उपाय करणे.
घोषणापत्रातील मुद्दे–
- सर्व देश शाश्वत विकासाच्या उद्दिष्टांवर काम करतील.
- भारताच्या मार्गदर्शनाखाली वन फ्यूचर गट स्थापन करणार.
- जैवइंधन आघाडीची स्थापना: भारत, अमेरिका आणि ब्राझील संस्थापक सदस्य असणार.
- ‘एक-पृथ्वी-एक-कुटुंब-एक-भविष्य’ यावर भर देणार.
- बहुस्तरीय विकास बँकांना बळकटी देणार.
- ‘ग्लोबल साऊथ’ च्या मूलभूत गोष्टीवर लक्ष.
- क्रिप्टोकरन्सीवर जागतिक धोरण ठरवण्यासाठी चर्चा करणार.
- कर्ज व्यवस्था रचना समान करण्यावर भर.
- विकसित शहरांना निधि पूरवणार.
- हरित व नवीन तंत्रज्ञान यावर संशोधन.
लोगो आणि विषय
G20 लोगो भारताच्या राष्ट्रीय ध्वजाच्या रंगारपासून प्रेरणा घेतो. भगवा, पांढरा, हिरवा आणि निळा, लोगोच्या खाली “भारत” असे देवनागरी लिपीमध्ये लिहिले आहे.
“वसुधैव कुटुंबकम” किंवा एक पृथ्वी एक कुटुंब एक भविष्य-महा उपनिषदाच्या प्राचीन संस्कृत मजकुरातून काढली गेलेली ही थीम मानवी व सर्व प्राणीमात्रांचे जीवन प्रमाणित करते.
ज्या मध्ये वैश्विक स्तरावर परिवर्तनकारी आणि परिणामस्वरूप उज्ज्वल भविष्य निर्माण करण्याची शक्यता दर्शवतो.
G20 हा लोगो आणि विषय एक प्रकारचा सशक्त संदेश देतो कि त्यामध्ये जागतिक स्तरावर समान विकास संभव आहे.
G20 चे महत्त्व – G-20 ही एक महत्त्वाची संस्था आहे, हे जागतिक जीडीपीच्या 85 टक्के प्रतिनिधित्व करते, आणि म्हणूनच येथे जे घडले ते जागतिकदृष्ट्या अतिशय महत्त्वाचे आहे.
जी ट्वेंटी भारतासाठी महत्त्वाची का आहे ?
G20 परिषदेसाठी भारताचे अध्यक्ष पद हा मैलाचा दगड आहे, लोकशाही आणि बहुपक्षीयतेसाठी वचनबद्ध असणारे शांतताप्रिय राष्ट्र म्हणून भारताची ओळख आहे.
आणि भारताचे अध्यक्ष पद हे सर्वांच्या फायद्यासाठी तसेच “वसुधैव कुटुंबकम्” किंवा “एक जग एक कुटुंब” या कल्पनेला मूर्त स्वरूप देणारे एकमेव राष्ट्र आहे.
G20 रचना व कार्यसमूह
भारताच्या अध्यक्षतेखाली 13 कार्यसमूह आणि तीन गट शिप्रा ट्रॅकद्वारे चर्चा करण्यासाठी तसेच शिफारशीं सादर करण्यासाठी एकत्र आले होते.
G20 कार्यप्रणालीचा निर्णय घेण्याच्या प्रक्रियेचा एक भाग म्हणून या कार्यगटामध्ये तज्ञ आणि संबंधित मंत्रालय असतात की जे आंतरराष्ट्रीयस्तरावर संबंधित समस्यांचे सखोल विश्लेषण करतात.
सर्व कार्य करणारे गट किंवा कार्यसमूह खालीलप्रमाणे
कृषी गट –
जागतिक अन्न धान्याच्या किमतीला स्थिरता देण्यासाठी 2011 मध्ये फ्रांसच्या अध्यक्षतेखाली या कृषी गटाची स्थापना करण्यात आली तेव्हापासून ते G- 20 सदस्यांमध्ये कृषी संबंधित मुद्द्यांवर आणि प्रश्नांवर सहकार्य करण्यासाठी पुढाकर घेत आहेत.
J-UN 2030 अजेंडा विशेषतः झेरो हंगर SDG 2 चे लक्ष साध्य करण्यासाठी महत्त्वपूर्ण असेल.
हां कृषीगट अन्नसुरक्षा, पोषण, प्रतिजैविक प्रतिकार अन्नाचा अपव्यय आणि तोटा, शाश्वतता, यासारख्या अनेक जागतिक मुद्द्यांवर सहयोग करण्यास तयार आले.
G20 अँटी करप्शन वर्किंग ग्रुप –
भ्रष्टाचारविरोधी कार्यगट G20 नेत्यांना भ्रष्टाचारविरोध अहवाल देतो आणि भ्रष्टाचार रोखण्यासाठी मदत करतो.
सार्वजनिक तसेच खाजगी क्षेत्रातील पारदर्शकता, लाचलूचपत प्रतिबंधक, आंतरराष्ट्रीय सहयोग, मालमत्ता पुनर्प्राप्ती यासारख्या विषयांवर लक्ष केंद्रित करते.
या भ्रष्टाचारविरोधी कार्यगटाची स्थापना 2010 मध्ये करण्यात आली.
डिजिटल अर्थव्यवस्था
डिजिटल परिवर्तनाला गती देणे आणि सर्व समावेशक सामाजिक व आर्थिक विकास साधणे हा या गटाचा मुख्य हेतू आहे.
हा गट 2021 मध्ये स्थापन करण्यात आला.
आपत्ती जोखीम कमी करणे
आपत्ती जोखीम कमी करण्यासाठी हा इंडोनेशियाच्या अध्यक्षते खाली हा गट स्थापन करण्यात आला.
हवामानातील स्थिरता, पायाभूत सुविधा आणि विकासकार्य इत्यादि कामें या गटाकडे येतात.
G20 राष्ट्रांकडे अनेक संस्था, संबंधित तज्ञ आणि अद्यावत तांत्रिक साधने आहेत ज्याद्वारे 2030 पर्यंत आपत्ती संबंधित नुकसानीची शक्यता लक्षणीय रित्या कमी करण्यात येईल.
डेव्हलपमेंट वर्किंग ग्रुप-(DWG)
डेवलपमेंट वर्किंग ग्रुप हा 2010 मध्ये स्थापन झाला आणि तेव्हापासून ‘डेवलपमेंट अजेंडा’ चा संरक्षक म्हणून हा गट काम करत आहे.
हां डेवलपमेंट वर्किंग ग्रुप G-20 च्या शाश्वत विकासाचा अजेंडा पुढे नेण्यासाठी व शेर्पाना पाठिंबा देण्यासाठी कार्यरत आहे.
एज्युकेशन वर्किंग ग्रुप-(EDWG)
एज्युकेशन वर्किंग ग्रुपची स्थापना 2018 मध्ये अर्जेंटिनाच्या अध्यक्ष पदाच्या काळात झाली.
हां वर्किंग ग्रुप सार्वत्रिक दर्जेदार शिक्षण, डिजिटलायजेशन, राष्ट्रीय सहकार्याद्वारे शिक्षण इत्यादी गोष्टींवर काम करतो. कौशल्यविकास आणि शाळा ते काम यासारख्या मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करण्याचे काम या गटाकडे आहे.
एम्प्लॉयमेंट वर्किंग ग्रुप – (EWG)
Employment वर्किंग ग्रुपची सुरुवात 2011 मध्ये फ्रांसच्या अध्यक्षतेखाली झाली आणि 2014 मध्ये ऑस्ट्रेलियाच्या लीड्स डिक्लेरेशन नंतर वर्किंग ग्रुप स्तरावर वाढ होत गेली.
एम्प्लॉयमेंट वर्किंग ग्रुपची पहिली बैठक 2015 मध्ये टर्कीच्या अध्यक्षतेखाली करण्यात आली होती.
यामध्ये सामाजिक समस्या, रोजगार हमी, सशक्त संतुलित रोजगार विकासाला चालना, सर्वसमावेशक समृद्ध नोकरभरती यासारख्या मुद्द्यांना प्रोत्साहन दिले गेले.
क्लायमेट सस्टेनिबिलिटी वर्किंग ग्रुप – (CSWG)
पर्यावरण आणि हवामान स्थिरता वर्किंग ग्रुप (CSWG) ची स्थापना 2018 मध्ये अर्जेंटिनाच्या अध्यक्षतेखाली करण्यात आली होती.
तर 2019 मध्ये जपानच्या अध्यक्षतेखाली पर्यावरण प्रतिनिधींची बैठक सुरु झाली;
यामध्ये सागरी रचना, मातीची धूप, जैवविविधता हानि, जल संसाधन व्यवस्थापन, हवामान बदल, संसाधन कार्यक्षमता, पर्यावरण आणि हवामान समस्या कमी करण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरु आहेत.
एनर्जी ट्रांझिशन वर्किंग ग्रुप – (ETWG)
ऊर्जासंबंधित समस्यांवर चर्चा करण्यासाठी 2013 मध्ये एक समर्पित ऊर्जा शाश्वतता कार्यगट स्थापन करण्यात आला.
2017 मध्ये हवामान शाश्वतता कार्यगटाचा एक भाग म्हणून ऊर्जेवर चर्चा करण्यात आली, 2018 मध्ये अर्जेंटिनाच्या अध्यक्षतेखाली ऊर्जा समस्यांना हवामानापासून वेगळे केले गेले आणि एनर्जी ट्रान्समिशन वर्किंग ग्रुपअंतर्गत ऊर्जा संक्रमण चर्चेकडे पुनर्निर्देशित केले गेले.
हा कार्यगट ऊर्जासुरक्षा, ऊर्जा कार्यक्षमता, अक्षय ऊर्जा, नवे तंत्रज्ञान या समस्यांवर लक्ष पुरवते.
हेल्थ वर्किंग ग्रुप –
याग्रुपची स्थापना जर्मनीच्या अध्यक्ष पदाच्या काळात गंभीर जागतिक आरोग्य समस्यांवर G20 नेत्यांना चर्चा करण्यासाठी आणि माहिती देण्यासाठी करण्यात आली होती.
सध्याच्या आणि भावी पिढ्यांसाठी समान आरोग्य प्राप्त करण्यासाठी वचनबद्ध शाश्वत कल्याणकारी समाज निर्माण करण्याच्या दिशेने हा गट कार्यरत आहे.
यामध्ये आणीबाणीच्या वेळी लागणारी आरोग्य यंत्रणेची तयारी, आरोग्य दृष्टीकोन ,डिजिटल आरोग्य, आंतरराष्ट्रीय आरोग्य नियमांचे पालन, सार्वत्रिक आरोग्य यासारख्या महत्त्वाच्या मुद्यांवर चर्चा केली आहे.
ट्रेड आणि इन्वेस्टमेंट वर्किंग ग्रुप – (TIWG)
या ग्रुप ची स्थापना 2016 मध्ये केली गेली.
यामध्ये व्यापार आणि गुंतवणूक यंत्रणा मजबूत करणे, जागतिक व्यापार विकासाला चालना देणे, जागतिक गुंतवणूक धोरण समन्वय आणि सहकार्य इत्यादी गोष्टींचा यामध्ये समावेश आहे.
टुरिझम ग्रुप –
2020 मध्ये पर्यटन कार्यगटाची स्थापना झाली.
यामध्ये जागतिक पर्यटन विकास, विचारविनिमय, कार्यवाही, मार्गदर्शक तत्वे यांना अनुसरून पर्यटनवाढीसाठी योग्य ते प्रयत्न चालू आहेत.
भारतात G20 चे आयोजन कोणी केले ?
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली G20 शिखर परिषद नवी दिल्ली येथे आयोजित झाली होती.
भारताचे अध्यक्ष पद 1 डिसेंबर डिसेंबर 2022 पासून सुरु झाले आणि 2023 च्या तिसर्या तिमाहीपर्यंत चालू राहिले.
भारताची विश्व विक्रमी कामगिरी –
दिनांक 9 सप्टेंबर आणि 10 सप्टेंबर हे दोन्ही दिवस फक्त भारतासाठी नव्हे तर पूर्ण जगासाठी अत्यंत मोलाचे आणि नव्या इतिहासाची साक्ष देणारे असे होते.
या दोन महत्त्वाच्या दिवशी अवघ्या जगाचे लक्ष भारताची राजधानी असलेल्या दिल्ली शहराकडे लागलं होतं.
“अतिथी देवो भव” या भारतीय परंपरेनुसार ,भारताच्या पंतप्रधानांनी परदेशी पाहुण्यांचं स्वागत अगदी हसत मुखाने केले.
या दोन दिवसात अनेक मुद्द्यांवर, प्रश्नावर चर्चा झाली, अनेक प्रस्ताव मांडण्यात आले.
जवळपास सुमारे 112 प्रस्तावांना या परिषदेत मंजुरी मिळाली, G20 शेर्पाचे अमिताभ कांत यांनी परिषदेविषयी बोलताना असे म्हटले की, G20 ही इतिहासातील सर्वात महत्त्वाकांक्षी परीषद आहे आणि यातून बाहेर आलेले परिणाम आणि अध्यक्षीय दस्तऐवजांची संख्या ही मागच्या तुलनेत दुप्पट आहे.
परदेशी पाहुण्यांनी घेतला यूपीआयचा अनुभव –
भारतात डिजिटल माध्यमातून होणार्या आर्थिक देवाणघेवाणीची भुरळ सर्व जगाला पडली नाही तर नवलच.
यूपीआय म्हणजे डिजिटल माध्यमातून होणारी आर्थिक देवाण घेवाण.
याचा अनुभव घेण्यासाठी G20 परिषदे निमित्त आलेल्या जगभरातील मान्यवरांना नमुना स्वरूपात यूपीआय वॉलेट देण्यात आले होते.
आणि यासाठी एक विशेष मोबाईल ॲपची निर्मिती करण्यात आली होती.
या माध्यमातून जगभरात नावाजलेल्या भारतातील डिजिटल आर्थिक देवाणघेवाणीचा अनुभव मान्यवरांना घेता आला.
निष्कर्ष –
“काळानुसार जो बदलत नाही तो संदर्भहिन ठरतो” या नैसर्गिक नियमानुसार जगाच्या नव्या स्वरूपाचे प्रतिबिंब जागतिक संस्थामध्ये पडणें अत्यावश्यक आहे.
असे म्हणत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज G-20 अध्यक्ष पदाची सूत्रे ब्राझीलचे अध्यक्ष लुईझ एक्सओ डूला यांच्याकडे सुपूर्द केली.
युरोप मध्य पूर्व आशिया आणि भारताला जोडणाऱ्या आर्थिक कॉरिडोरच्या निर्मितीचा निर्धार या समिटमधून पुढे आला.
या माध्यमातून भविष्यात लोहमार्ग, बंदरे, वीज आणि डेटाचे नेटवर्क जोडले जाणार.
अमेरिकेचे अध्यक्ष जिओ बायडेन एन आय यांनी याचे “बिग डील” अशा शब्दात वर्णन करताना ही ऐतिहासिक गोष्ट आहे असेही त्यांनी नमूद केले.
युरोपीय आयोगाच्या अध्यक्षांनी देखील याचे स्वागत केले आहे.
हे सुद्धा वाचा
- Neuralink म्हणजे काय ? Neuralink information in Marathi
- Data Science म्हणजे काय ? | डेटा सायन्स ची संपूर्ण माहिती
- मराठी माणूस आणि रोजगार | Marathi manus aani rojgar
- नॉर्थ सेंटीनेल आयलँड |North Sentinal Island Information in Marathi
- अविश्वास प्रस्ताव म्हणजे काय? | No confidence motion in marathi
- Eye flu म्हणजे काय ? डोळे येणे | Eye Flu in marathi
- ECG test म्हणजे काय? | ECG Information in marathi
- What is Hindu Dharm? | Hindu Religion explained in Marathi
- ChatGPT म्हणजे काय ? Magic of AI in Marathi