Career opportunities after BBA | बी बी ए नंतर काय करावे ?

BBA NANTAR KAY KARAVE / career opportunities after BBA

नमस्कार मित्रांनो माय मराठी ब्लॉग मध्ये आपलं स्वागत आहे, Career opportunities after BBA या ब्लॉग मध्ये तुम्हाला BBA केल्यानंतर करियर चे किती पर्याय आहेत याची संपूर्ण माहिती मिळणार आहे, हा blog पूर्ण वाचा .. स्कीप करू नका.

टेबल ऑफ कंटेंट

BBA Full form

Bachelor of Business Administration हा BBA चा फुल फॉर्म आपल्या सर्वांना माहिती आहेच.

12 वी नंतर मोठ्या प्रमाणात विद्यार्थी BBA हा करियर ऑप्शन निवडतात, BBA हा तीन वर्षांचा Business Administration मधील एक कोर्स आहे.

12 वी नंतर तीन वर्षांनी हा कोर्स पूर्ण झाल्यावर Business Administration मधून विद्यार्थी Graduate होतो.

BBA मध्ये काय शिकवले जाते ?

BBA हा कोर्स शिकत असताना विद्यार्थ्याला Management / व्यवस्थापनामधील बेसिक ते ऍडव्हान्स लेव्हलचे शिक्षण दिले जाते.

थेअरी बरोबरच प्रॅक्टिकल ज्ञान इंटरशीपमधून मोठ्या प्रमाणावर मिळते, व्यवस्थापनामधील शिक्षणाबरोबरच BBA करणाऱ्या विद्यार्थ्यांचे संभाषण कौशल्य तर वाढतेच त्याचबरोबर त्याचा आत्मविश्वास देखील वाढायला मदत होते. 

फक्त BBA करून तुम्हाला नोकरीसंदर्भात खूप जास्त संधी मिळणार नाहीत.

जास्तीच्या संधींसाठी तुम्हाला BBA नंतर,  MBA, PGDM, Chartered Accountant, Company Secretary, Masters in Finance Management, Masters in Hotel Management, Masters in Marketing Management, Masters in Advertising,  इ. अनेक PG (Post Graduation) कोर्सेस उओलब्ध आहेत, जेणेकरून या कोर्सेनंतर चांगली नोकरी आणि चांगला पगार मिळवण्यासाठीचा मार्ग सोप्पा होईल.

career opportunities after BBA साठी BBA नंतर अनेक संधी आपल्यासाठी उपलब्ध आहेत अर्थात, PG (Post Graduation) कोर्सेस न करता.

याच संधी आपण आजच्या या Blog मध्ये पाहणार आहोत, लेख खूप माहितीपूर्ण होणार आहे त्यामुळे शेवटपर्यंत वाचायला विसरू नका.

बी.बी.ए. नंतर वित्तीय क्षेत्रातील करियरच्या संधी (Career opportunities after BBA in Finance)

बीबीए पदवी संपादित केल्यानंतर तुम्हाला बँकिंग क्षेत्रामध्ये जॉब मिळू शकतो, याशिवाय बऱ्याचश्या स्पर्धा परीक्षांसाठी देखील तुम्ही पात्र असता.

बीबीए पदवी पूर्ण झाल्यानंतर वित्तीय क्षेत्रातील संधी आपण आता बघूयात.

1. बँकेचे शाखाधिकारी (Bank Branch Manager)

बँकेचा बँक मॅनेजर हा त्या शाखेमधील सगळ्या गोष्टी मॅनेज करत असतो, बरेचदा कामगार भरणे आणि त्यांची मॅनेजमेंट करणे ही सुद्धा जबाबदारी त्याच्यावर असते.

बँकेचे प्रॉफिट होईल या संदर्भाने बँकेतील अकाउंट ची संख्या वाढवणे, वेगवेगळ्या कर्जांना संमती देणे आणि ग्राहकांसाठी उत्तम प्रकारची सेवा देणे, या दृष्टीने शाखाधिकाऱ्याचे महत्त्वाचे काम असते.

2.  आर्थिक विश्लेषक (financial analyst)

आर्थिक विश्लेषक हा कंपन्यांना व्यवसायासंदर्भात काही निर्णय घेण्यासाठी मदत करतो.

यासाठी मार्केटमधील ट्रेंड्स (market trends), कंपनीचे आर्थिक कामगिरी (financial performance),  झालेल्या व्यवहारांवरून परिणाम काय होईल याचा अंदाज, या सर्वांची मदत घेत असतो.

financial analyst सर्व डेटा एकत्र करून, त्यावरून कंपनीच्या पुढच्या वाटचालिंबद्दल अंदाज बांधत असतो, सुधारणा सुचवत असतो.

3. आर्थिक नियोजक (financial planer)

आर्थिक नियोजक हा तुमच्या (Financial) आर्थिक आयुष्याचे प्लानिंगच करत असतो असे म्हटले तरी वावगे वाटू नये.

financial planer हा आपले बजेट बनवणे, सेव्हिंग्ज संदर्भात मदत, टॅक्स कमी होईल या दृष्टीने मार्गदर्शन करणे आणि या सर्वातून तुमच्या पुढच्या पिढीसाठी तरतूद करण्यासंदर्भात देखील मार्गदर्शन करत असतो.

4. पोर्टफोलिओ मॅनेजर (Portfolio Manager)

Portfolio Manager हा एक असू शकतो किंवा अनेक लोकांचा समूह असू शकतो.

Portfolio Manager हे गुंतवणुकीच्या दृष्टीने उत्तम स्ट्रॅटेजी वापरणे तसेच रोजचे ट्रेडिंग्ज मॅनेज करणे या गोष्टी पाहत असतात.

त्यामुळे गुंतवणुकीमध्ये पोर्टफोलिओ मॅनेजर चे खूप महत्व असते.

बी.बी.ए. नंतर मार्केटींग क्षेत्रातील करियरच्या संधी (Career in marketing after BBA)

मार्केटिंग हा बीबीए नंतर सर्वोत्तम करिअरचा पर्याय मांडला जातो.

मार्केटिंग क्षेत्रामध्ये तुम्हाला करिअर करायचा असेल तर अजून वेगळ्या काही डिग्री किंवा सर्टिफिकेट कोर्सची गरज नसते. सुरुवातीला तुम्ही खालीलपैकी मार्केटिंगशी रिलेटेड जॉब्स करू शकता.

1. मार्केटिंग एक्झिक्यूटिव्ह (Marketing Executive)

मार्केटिंग एक्झिक्यूटिव्ह कंपनीसाठी वेगवेगळ्या मार्केटिंग स्ट्रॅटेजी (Marketing strategies) बनवत असतात तसेच देखरेख देखील ठेवत असतात.

आपली कौशल्य वापरून Marketing Executive, कंपनीचे सेवा कोंब उत्पादन यासंदर्भात स्ट्रॅटेजी ठरवून मार्केटिंग करत असतो. या मार्केटिंग स्ट्रॅटेजीवरतीच विक्री अवलंबून असते.

2. सेल्स एक्झिक्यूटिव्ह (Sales Execurive)

कंपनीचे वार्षिक विक्री धोरण ठरवणे, त्यानुसार स्ट्रॅटेजी बनवणे, त्यादृष्टीने काम करणे, सेल्सच्या सहकाऱ्यांना, सेल्स मॅनेजरला (sales manager) या दृष्टीने मदत करणे इ. कामे सेल्स एक्झिक्यूटिव्ह सेल्स एक्झिक्यूटिव्ह करत असतो.

सेलच्या दृष्टीने नवनवीन कल्पना आमलात आणणे व त्याद्वारे ग्राहक वाढवणे हे देखील सेल्स एक्झिक्यूटिव्ह पाहत असतो.

3. जाहिरात अधिकारी (Advertising Executive)

career opportunities after BBA मध्ये Advertising Executive हा जाहिरात एजन्सीमधील सिनियर म्हणून गणला जातो.

स्टाफ मॅनेजर, डिझायनर, कॉपीरायटर्स, सेल्स मॅनेजर या सर्वांचे काम पाहणे, मॅनेज करणे ही कामे तो पाहत असतो.

4. मार्केट रिसर्च अनालिस्ट (Market Reseqrch Analyst)

Market Research Analyst हा नावाप्रमाणेच मार्केटचा रिसर्च करून, ट्रेंड काय आहे, किवर्ड कोणते काम करतात किंवा करतील, सर्वेना रिस्पॉन्स करणे, सोशल मीडिया टॅग्ज शोधणे, आपल्या ग्राहकांपर्यंत पोहचण्यासाठी डिजिटल मार्केटिंगची ताकद काशी वापरली जाऊ शकते आदी गोष्टीवर काम करत असतो.

रिसर्च आणि डेटाच्या माध्यमातून स्पर्धेमध्ये टिकून राहणे, डेव्हलपमेंट करणे, यासाठी मार्केट रिसर्च अनालिस्ट कंपनीला मदत करत असतो.

बी.बी.ए. नंतर मानव संसाधन क्षेत्रातील करियरच्या संधी (Career opportunities in human resources after BBA)

BBA पूर्ण केल्यानंतर तुम्ही HR म्हणून देखील काम करू शकता.

सुरुवातीला कंपनीमध्ये वेगवेगळ्या पदांसाठी वेगवेगळ्या माणसांना कामासाठी नेमण्यासंदर्भात तुम्ही शिकू शकता.

बरेचदा यामध्ये अगदी त्यांचे मानधन ठरविण्याचा अधिकार देखील तुमच्याकडे असतो, यामध्ये पुढील पोस्ट्ससाठी तुम्ही काम करू शकता.

1. HR Assistant

HR Assistant हा एच.आर. मॅनेजरला मदत करत असतो.

नोकर भरती, फायदे, त्यांचे पगार, प्रशासन यामध्ये मदत करतो, कंपनीच्या एच आर मॅनेजर चे काम सुकर होण्यासाठी HR Assistant ची नेमणूक केली जाते.

2. HR Co-ordinator

Co-ordinator हा बरेचदा, HR Specialist,  HR Assistant किंवा HR Generalist यासारखीच कामे करत असतो.

HR टीम मधील वेगवेगळ्या प्रोग्रॅम्समध्ये समन्वय राखण्याचे काम HR Coordinator करत असतो.

3. HR Specialist

HR Specialist हा योग्य नोकर भरती करणे, सहकार्य करणे, आणि नोकरदारांना योग्य ते प्रशिक्षण देण्याचे काम करत असतो.

या पदावर जाण्यासाठी, HR officer किंवा HR analyst म्हणून तुम्हाला अनुभव असणे गरजेचे आहे.

4. HR Recruiter

HR Recruiter हा फक्त नोकर भरतीच करतो असे नाही तर, त्यांचा बॅकराऊंड तपासणे, भूतकाळातील त्यांच्या कामाची चौकशी करणे, आणि यातून सदरचा उमेदवार आपल्या कंपनीसाठी किंवा संस्थेसाठी योग्य आहे की नबी हे ठरवण्याचे काम करत असतो.

बी.बी.ए. नंतर सरकारी नोकरीच्या संधी (Government Jobs after BBA)

बीबीए पूर्ण झाल्यानंतर तुम्ही निरनिराळ्या गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये नोकरीसाठी प्रयत्न करू शकता.

काही अशी सरकारी क्षेत्र आहेत जिथे BBA असणे गरजेचे नाही तर, कोणत्याही शाखेतून आपण पदवी पूर्ण केली असाल तरीही तुम्ही स्पर्धा परीक्षा देण्यासाठी पात्र ठरता.

UPSC, MPSC सारख्या परीक्षा देऊन, सरकारी नोकरीमध्ये जाऊ शकता.

1. नागरी सेवा परीक्षा (Civil Sercixe Exam)

नागरी सेवा परीक्षांमध्ये तुम्हाला जर यश आले तर, तुम्ही भारतीय प्रशासकीय सेवा indian administrative service (IAS), भारतीय पोलीस सेवा indin police services (IPS), भारतीय परराष्ट्र सेवा indian foreign service (IFS), या आणि अशा इतर अनेक क्षेत्रांमध्ये नोकरी केऊ शकता.

2. RRB NTPC

RRB NTPC म्हणजे मुख्यतः भारतीय रेल्वे विभागाच्या विविध क्षेत्रांमध्ये नोकरीच्या संधी असतात.

उदाहरणार्थ मालगाड्यांसाठी मॅनेजर, वेगवेगळ्या वॅगन्सचे रेकॉर्ड ठेवणे,  तारांचे वजन, मालगाड्यांचे दरवाजे, काही संशयास्पद आढळले तर त्याचा तपास करणे इ.

3. SEBI Grade A

SEBI Grad A अर्थात शेअर मार्केट संदर्भातील विविध विभागांमध्ये काम करणे.

शेअर बाजारा संदर्भातील विविध कायद्यांना मान्यता देणे, स्टॉकमधील निरनिराळी अथवा संशयास्पद खाती तपासणे, अशापद्धतीचे वेगवेगळी कामे असतात.

4. RBI Grade B

RBI Grade B अधिकारी म्हणून जर आपली निवड झाली तर हा खूपच छान जॉब आहे.

कमीत कमी दोन वर्षाचे प्रोबेशन आणि 15 आठवड्याचे रिजर्व बँकेच्या स्टाफ कॉलेजमध्ये प्रशिक्षण यामध्ये असते.

लोकेशन नुसार अधिकाऱ्यांची कामे वेगवेगळी असू शकतात.

फायनांशीयल मार्केटिंग, बँकांचे सुपर्व्हिजन, बँकांसाठी नियम बनवणे, चलनासंदर्भातील समस्या, परकीय चलन या संदर्भात वेगवेगळी कामे असतात.

5. LIC AAO

हा प्रशासकीय जॉब आहे, यामध्ये निरनिराळे भूमिका आणि जबाबदाऱ्या असतात.

LIC AAO हे  भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या अंतर्गत येते.

यामध्ये, अकाउंट, आयटी, मार्केटिंग, सेल्स या आणि अशा विविध ठिकाणी कामाच्या संधी उपलब्ध होतात.

निष्कर्ष

शेवटी थोडक्यात सांगायचे झाले तर, एवढेच म्हणता येईल की, BBA नंतर अनेक करियरची दारे उघडली जातात.

तरीदेखील फक्त BBA डिग्रीवरती अवलंबून न राहता, MBA करणे किंवा विविध संलग्न डिप्लोमा कोर्सेस करण्याने, तुमच्यासाठी अजून संधी उपलब्ध होतात.

या उलट यामुळे पगार देखील मनासारखा भेटू शकतो.

धन्यवाद, माय मराठी ब्लॉग

हे सुद्धा वाचा

RSS
Instagram