Ayodhya Ram Mandir Information in Marathi | अयोध्येचे राम मंदिर

ayodhya ram mandir

Ayodhya Ram Mandir म्हणजेच प्रभू श्री राम ची जन्मभूमी, या ब्लॉग मध्ये राम मंदिर संबंधित सविस्तर माहिती देण्यात आली आहे.

रामायण हा आपल्या हिंदू धर्माचा महत्त्वाचा धर्मग्रंथ आहे, त्यात प्रभू श्रीरामांबद्दल लिहलं गेलं आहे.

या ब्लॉग मध्ये रामायणाबद्दल सांगण्याचा उद्देश वेगळा आहे, रामायणात प्रभू श्री रामांचा जन्म अयोध्येत झाला होता असा स्पष्ट उल्लेख आहे पण याच अयोध्येत श्री रामांचे मंदीर पाडून काही शे वर्षांपूर्वी इथे बाबरी मशीद बांधण्यात आली होती.

ती मशीद देखील काही वर्षांपूर्वी पाडण्यात आली. 

टेबल ऑफ कंटेंट

राम मंदिर वाद | Ayodhya Ram Mandir Controversy

Ayodhya Ram Mandir / अयोध्या राम मंदिर वाद एक दोन नव्हे तर १०६ वर्षे म्हणजे ब्रिटिश काळापासून सुरू आहे.

आपण आज या लेखात ram mandir वादाचा उहापोह करणार आहे.

ब्रिटिश काळात कोर्टात राम मंदिर विषयक खटला सुरू होता.

त्यानंतर या खटल्याचा प्रवास फैजाबाद जिल्हा न्यायालय ते सुप्रिम कोर्ट असा झाला आणि या वादामुळे अनेक वेळा आपल्या देशातील वातावरण ढवळून निघाले आहे.

अयोध्या राम मंदिर वादाचा इतिहास काय आहे ? 

अयोध्या राम मंदिर वादाचा घटनाक्रम काय आहे ?

नेमका निकाल काय आणि कसा लागला या सगळ्या गोष्टींचा उहापोह आपण पुढे करू.

राम मंदिर इतिहास / History of Ayodhya Ram Mandir

आपल्याला माहीत आहे की भारतावर अनेक परकीय आक्रमणे झाली आणि अनेक वर्षे आपल्यावर परकीय सत्ता होती.

इंग्रज येण्या आधी काही शतके आपल्या भारतावर मुघलांचे राज्य होते.

मुघल हे मुस्लिम शासक असल्याने त्यांनी अनेक ठिकाणची  मंदिरे उध्वस्त करून त्या ठिकाणी  मशीदी बांधल्या होत्या.

त्यातलीच एक बाबरी मशीद!

१५२८ मध्ये मुघल बादशाह बाबरचा सर सेनापती मीर बंकी याने अयोध्येत बाबरी मशीद बांधली.

पण याच जागेवर रामाचा जन्म झाला असं हिंदू लोक मानतात व राम मंदिर पाडून इथे बाबरी मशीद बांधण्यात आली असा हिंदू लोकांचा दावा आहे.

सन १८५३ पहिला वाद आणि पहिला खटला

१८५३ साली पहिल्यांदा हिंदू समुदायातील लोकांनी बाबरी मशीद आहे ती जागा राम मंदिराची होती आणि तिथे बाबरी मशीद पाडून राम मंदिर बांधले जावे अशी मागणी ब्रिटिश सरकारकडे केली आणि त्याबाबत खटला देखील कोर्टात दाखल केला.

तेंव्हा पहिल्यांदा अयोध्येत राम मंदिर आणि बाबरी मशीद या वादावरून  दोन समुदायात दंगल झाली. 

सन १८५९ ब्रिटिश शासनाचा निर्णय

 १८५९ साली ब्रिटिश सरकारने अयोध्येतील ayodhya ram mandir वादग्रस्त जागेला कुंपण घातले आणि मशिदीत मुस्लिम लोकांना तर बाहेर रिकाम्या जागेत चौथऱ्यावर हिंदूंना पूजा करण्याची परवानगी आली.

सन १८८५ मंदिर बांधण्याची परवानगी नाकारली

फेब्रुवारी १८८५ मध्ये महंत रघुवर दास यांनी फैजाबाद उपजिल्हा न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर याचिका दाखल करून वादग्रस्त जागेवर मंदिर उभारण्याची परवानगी मागितली.

पण ayodhya ram mandir बांधण्यासाठी अनुमती देण्यास कोर्टाने नकार दिला.

१९४६ शिया आणि सुन्नी वाद

१९४६ मध्ये बाबरी मशिदिवरून मुस्लिम समुदायातील शिया आणि सुन्नी या दोन गटात वाद उद्भवला पण बाबर सुन्नी होता त्यामुळे निर्णय सुन्नी मुस्लिमांच्या बाजूने लागला.

१९४९ मध्ये वादग्रस्त वास्तू म्हणून घोषित

२३ डिसेंबर १९४९ रोजी वादग्रस्त जागेवर प्रभू राम आणि लक्ष्मण यांच्या मूर्ती आढळून आल्याने या वादाने नवे वळण घेतले.

अयोध्येत राम प्रकट झाले असा दावा हिंदूंनी केला तर मुस्लिम लोकांनी यावर आक्षेप घेत कोणी तरी रात्रीच्या अंधारात मूर्ती आणून तिथे ठेवल्याचा दावा केला.

तो वाद वाढू लागला म्हणून  तत्कालीन सरकारने ‘वादग्रस्त वास्तू’ म्हणून शिक्का लावला आणि मशिदीला टाळे लावले.

सन १९५० टाळे बंदित मुर्त्यांची पूजा

१६ जानेवारी १९५० रोजी गोपालसिंह विशारद यांच्याकडून मशिदीतून मुर्त्या हटवण्यात येऊ नयेत तसेच कोणत्या ही अडथळ्या शिवाय मुर्त्यांची पूजा सुरू ठेवण्यात यावी, अशी फैजाबाद दिवाणी न्यायालयात मागणी करण्यात आली.

न्यायालयाने मुर्त्या हटवण्यात येऊ नयेत परंतु त्या टाळेबंदीत राहतील आणि केवळ पुजाऱ्याकडून पूजा सुरू राहील.

जनता बाहेरून दर्शन घेईल, असे आदेश दिले.

सन १९५९ ते १९६१ कोर्टात दावे दाखल

सन १९५९ मध्ये निर्मोही आखाड्याने कोर्टात मंदिर उभारणीसाठी दावा दाखल केला तर सन १९६१ मध्ये सुन्नी सेंट्रल वक्फ बोर्डाने ही कोर्टात मशिदीचा दावा दाखल केला.

१९८४ मध्ये मंदिर निर्मिती समिती स्थापन

सन १९८४ मध्ये विश्व हिंदू परिषदेने Ayodhya Ram Mandir निर्मितीसाठी एका समितीची स्थापना केली.

सन १९८६ टाळे उघडले

१ फेब्रुवारी १९८६ रोजी फैजाबाद न्यायालयात वादग्रस्त ठिकाणी लावण्यात आलेले टाळे उघडून हिंदूंना पूजा करण्याचा अधिकार बहाल करण्याचे आदेश देण्यात आले.

या निर्णयाला विरोध करत बाबरी मशीद संघर्ष समिती स्थापन करण्यात आली.

तेंव्हा केंद्रात काँग्रेसच सरकार होते आणि राजीव गांधी पंतप्रधान होते.

सन १९८९ राम मंदिर भूमी पूजन

१९८९ मध्ये विश्व हिंदू परिषदेचे नेते देवकीनंदन अग्रवाल यांनी मंदिराच्या दावा विषयक आणखीन एक खटला न्यायालयात दाखल केला आणि नोव्हेंबर १९८९ मध्ये केंद्र सरकार म्हणजेच तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांच्या परवानगीने बाबरी मशिदीच्या काही अंतर दूर राम मंदिराचे भूमिपूजन करण्यात आले.

सन १९९० रथ यात्रा

सन १९९० साली भाजप नेते लालकृष्ण अडवाणी यांनी सोमनाथ ते अयोध्या रथयात्रा सुरू केली.

त्यामुळे देशातील वातावरण ढवळून निघाले.

लालू प्रसाद यादव यांच्या सरकारने बिहारमध्ये ही रथरात्रा रोखली आणि लाल कृष्ण अडवाणी यांना अटक केली.

सन १९९१ भाजपला राजकीय फायदा 

सन १९९१ मध्ये रथयात्रेचा भाजपला मोठा फायदा झाला.

उत्तर प्रदेशमध्ये भाजपचे सरकार आले आणि देश भरातून राम मंदिर उभारणीसाठी विटांची मोहीम सुरू झाली.

सन १९९२ बाबरी मशीद उध्वस्त

३० ते ३१ ऑक्टोंबर १९९२ रोजी धर्म संसदेत कारसेवेची घोषणा करण्यात आली आणि नोव्हेंबरमध्ये उत्तर प्रदेशचे तत्कालीन मुख्यमंत्री कल्याण सिंह यांनी मशिदीच्या संरक्षणाबाबत प्रतिज्ञापत्र सोपवलं.

६ डिसेंबर १९९२ रोजी लाखो कारसेवक अयोध्येत दाखल झाले ते ११:५० वाजता मशिदीच्या घुमटावर चढले जवळ पास ४:३० वाजेपर्यंत मशीद उदध्वस्त करण्यात आली.

घाईघाईत एक लहान मंदिर तिथे उभारण्यात आले.

सन १९९२ चे  दंगे

बाबरी मशीद पाडली आणि त्याचे पडसाद देशभरात  उमटले.

गुजरात, कर्नाटक, उत्तर प्रदेश आणि मुंबईत मोठ्या प्रमाणात जातीय दंगली झाल्या.

या दंगलीत दोन हजार पेक्षा जास्त लोकांना आपले प्राण गमवावे लागले.

तत्कालीन पंतप्रधान पी. व्ही नरसिंह राव यांनी या प्रकरणाच्या चौकशीसाठी  एम.एस लिब्रहान आयोगाची नियुक्ती केली.

२००१ मध्ये आरोप हटवले

सन २००१ रोजी विशेष सीबीआय न्यायालयाने भाजप नेते लालकृष्ण अडवाणी, शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे, मुरली मनोहर जोशी, उमा भारती यांच्यासह अन्य  १३ जणांवर  बाबरी मशिद पडल्याचा कट रचल्याचा आरोप हटवण्यात आला.

सन २००२ अयोध्या विभाग स्थापन

तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी १ जानेवारी २००२ रोजी आयोध्या विभागाची स्थापना केली.

हिंदू मुस्लिम या दोन्ही पक्षकारांशी संवाद साधण्याची व वाद मिटवण्याची जबाबदारी अयोध्या विभागावर सोपवली.

सन २००३ “मंदिर अस्तित्वात होते का” ? याचा शोध.

वादग्रस्त जागेवर Ayodhya Ram Mandir कधी अस्तित्वात होते का? याच्या पडताळणीसाठी अलाहाबाद न्यायालयाने पुरातत्व विभागाला उत्खनन करण्याचे आदेश दिले.

बाबरी मशीद पाडली तिथे उत्खनन करण्यात आले, जिथे मशीद पाडली तिथे दहाव्या शतकातील राम मंदिराचे अवशेष आढळून आले व तेथे राम मंदिर होते हे पुराव्या साहित सिद्ध झाले आणि तसा अहवाल भारतीय पुरातत्व खात्याने कोर्टात सादर केला.

सप्टेंबर 2003 मध्ये एका सुनावणीत मशिदीच्या पतनास जबाबदार असलेल्या सात हिंदू नेत्यांना सुनावणीसाठी हजर राहण्याचे आदेश कोर्टाने दिले.

सन २००५ दहशतवादी हल्ला

वादग्रस्त जागेवर दहशतवादी हल्ला झाला.

या हल्ल्यात दहशतवादी कोणतेच नुकसान करू शकले नाहीत तर त्या दहशतवाद्यांना ठार करण्यात सुरक्षा यंत्रणेला यश आले.

सन २०१० उच्च न्यायालयात निर्णय आणि सर्वोच्च न्यायालयात धाव

३० सप्टेंबर २०१० रोजी अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनऊ खंडपीठाने अयोध्येतील वादग्रस्त जमीन राम मंदिर, निर्मोही आखाडा आणि सुन्नी वक्फ बोर्ड यांच्यात समसमान वाटण्याचा निर्णय दिला.

या निर्णयाला सर्वांनीच सर्वोच्च न्यायालयात आवाहन दिले.

सन २०११ लखनऊ उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती

 Ayodhya Ram Mandir वादा मध्ये ९ मे २०११ रोजी सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाच्या निर्णयाला स्थगिती दिली.

सन २०१७ ठपका लागलेल्या नेत्यांवर खटला दाखल

लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, उमा भारती यांच्या सह भाजप व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अनेक नेते यांच्यावर खटला चालवण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले.

१६ नोव्हेंबर रोजी आर्ट ऑफ लिव्हिंगचे श्री श्री रविशंकर यांनी वाद मिटवण्यासाठी मध्यस्थी केली आणि विविध पक्षांशी संवाद साधला.

सन २०१८ सुन्नी वक्फची याचिका फेटाळली

८ फेब्रुवारी रोजी सुन्नी वक्फ बोर्डा तर्फे बाजू मांडताना ज्येष्ठ वकील राजीव धवन यांनी सुप्रीम कोर्टात या प्रकरणाची सुनावणी नियमित व्हावी अशी विनंती केली.

ती विनंती कोर्टाने फेटाळली १९९४ मध्ये इस्माईल फारुखी विरुद्ध भारतीय संघ यांच्यातील खटल्यात दिलेल्या निकलाचा फेरविचार व्हावा व हे प्रकरण घटनापीठाकडे पाठवण्यात यावे अशी मागणी राजीव धवन यांनी केली.

ती मागणी देखील सुप्रीम कोर्टाने फेटाळून लावली. 

सन २०१९ हिंदू पक्षाच्या बाजूने निकाल

सर्वोच्च न्यायालयाच्या संविधानिक पीठाने हिंदू पक्षाच्या बाजूने निकाल देत संपूर्ण वादग्रस्त जमीन राम मंदिरासाठी दिली.

सोबतच मुस्लिम पक्षाला वादग्रस्त जमिनीपासून दूर पाच एकर जमीन मशीद उभारणीसाठी देण्याचा निर्णय दिला.

सन २०२० राम मंदिर भूमिपूजन

५ ऑगस्ट रोजी राम मंदिर भूमिपूजन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले.

श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या साहित १७५ जणांना सोहळ्यासाठी आमंत्रण देण्यात आले होते.

अशा प्रकारे प्रदीर्घ संघर्षानंतर शेवटी प्रभू श्रीराम यांच्या जन्मभूमीत त्यांचे मंदिर उभारले जात आहे.

|| जय श्री राम ||

हे सुद्धा वाचा

RSS
Instagram