Mukhymantri majhi ladki bahin yojna Kolhapur | मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना

MUKHYMANTRI MAJHI LADKI BAHIN YOJNA

2024 मध्ये महाराष्ट्र राज्यातील मुख्यमंत्र्यांनी सुरू केलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना / Mukhymantri majhi ladki bahin yojna ही आजची बहुचर्चित योजना आहे.

सध्या सरकारी कार्यालयाच्या बाहेर आणि संगणक केंद्राच्या बाहेर या योजनेचे फॉर्म भरण्यासाठी महिलांच्या लांबच लांब या रांगा लागत आहेत. 

या योजनेबद्दल आपण आज या ब्लॉगमध्ये संपूर्ण माहिती पाहणार आहोत. 

  • योजना नक्की काय आणि कोणासाठी आहे? 
  • Mukhymantri majhi ladki bahin yojna या योजनेचे स्वरूप काय?
  • या योजनेचे फायदे काय?
  • या योजनेसाठी कोणत्या महिला पात्र आहेत?
  • Mukhymantri majhi ladki bahin yojna योजनेसाठी वयोमर्यादा काय आहे?
  • या योजनेचा फॉर्म भरण्यासाठी कोणते कागदपत्रे लागतात?
  • या योजनेसाठी फॉर्म कुठे आणि कसा भरायचा?

 या सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळणार आहेत 

Mukhymantri majhi ladki bahin yojna Kolhapur | मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना नक्की काय आणि कोणासाठी आहे ?

महाराष्ट्र शासनाने लाडकी बहीण योजना म्हणजे Mukhymantri majhi ladki bahin yojna / मुख्यमंत्री लाडकी बहीण ही नवीन योजना सुरू केली आहे.

या योजनेची घोषणा मुख्यमंत्र्यांनी काही दिवसांपूर्वीच केली आहे.

या योजने सारखीच योजना मध्यप्रदेशमध्ये ‛लाडली बहना योजना’ नावाने  सुरू आहे.

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही गरीब आणि गरजू महिलांना आर्थिक पाठींबा देण्यासाठी सुरू करण्यात आली आहे. 

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे स्वरूप काय ?

लाडकी बहीण योजनेसाठी पात्र ठरणाऱ्या महिलांना महिना एक ठराविक रक्कम सरकार तर्फे मिळणार आहे.

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे फायदे काय ?

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी पात्र ठरलेल्या महिलांना  दरमहा ₹ 1500 म्हणजेच वर्षाला ₹ 18000 मिळणार आहेत.

तसेच वर्षाला 3 गॅस सिलेंडर मोफत मिळतील.

या पैशातून महिलांना त्यांच्या दैनंदिन खर्च आणि घरगुती गरजा पूर्ण करता याव्यात हा या योजने  मागचा उद्देश आहे.

अर्ज भरण्याची सुरुवात  – 1 जुलै 2024  

अंतिम तारीख  31ऑगस्ट 2024

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी  कोणत्या महिला पात्र आहेत?

लाभार्थी महिला महाराष्ट्राची रहिवासी असणे आवश्यक आहे.

ज्या महिला गरीब आणि गरजू आहेत म्हणजेच ज्या महिलांच्या संपूर्ण कुटूंबाचे आर्थिक उत्पन्न दोन लाख पन्नास हजार पेक्षा कमी आहे अशा महिला या योजनेसाठी पात्र ठरू शकतात.

महिला ज्या 18 ते 65 वर्षाच्या आहेत त्यांना  या योजनेचा लाभ घेता येणार आहे.

ज्या महिलांच्या घरातील सदस्य सरकारी कर्मचारी  आणि आयकरदाता नाही अशाच महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.

ज्या महिलांच्या घरात ट्रॅक्टर शिवाय कोणते ही चारचाकी वाहन नाही त्या महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे.

एका कुटुंबातील दोन पेक्षा जास्त महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही.

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरण्यासाठी कोणते कागदपत्रे लागतात ?

Documents for Mukhymantri majhi ladki bahin yojna Kolhapur | मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना-

  • आधार कार्ड
  • अधिवास प्रमाणपत्र किंवा जन्म प्रमाणपत्र किंवा शाळा सोडल्याचा दाखला 
  • अधिवास प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर 15 वर्षांपूर्वीचे (1) रेशनकार्ड (2) मतदान ओळखपत्र (3) जन्म प्रमाणपत्र (4) शाळा सोडल्याचा दाखला.
  • उत्पन्न प्रमाणपत्र किंवा पिवळे किंवा केशरी रेशनकार्ड
  • अर्जदाराचे हमीपत्र
  • बँक पासबुक
  • अर्जदारचा फोटो
  • महिलेचा जन्म परराज्यातील असल्यास पतीचे अधिवास प्रमाणपत्र/ 15 वर्षांपूर्वीचे (1)रेशनकार्ड (2) मतदार ओळखपत्र (3) जन्म प्रमाणपत्र (4) शाळा सोडल्याचा दाखला

या योजनेसाठी फॉर्म कुठे आणि कसा भरायचा ?

ऑनलाईन फॉर्म

ऑनलाईन फॉर्म Narishakti Doot या वेबसाइट वर किंवा,

मोबाइल वर Narishakti Doot app वर भरता येईल.

सूचना

अजून सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी कोणती ही वेबसाईट सुरू केलेली नाही.

ऑफलाईन

ग्रामीण भागातील महिलांनी ग्रामसेवक किंवा अंगणवाडी सेविकांकडे अर्ज भरावा.

शहरी भागातील महिलांनी त्यांच्या वॉर्ड अधिकाऱ्याकडे अर्ज भरावा

धन्यवाद

TEAM, MY MARATHI BLOG

हे सुद्धा वाचा

RSS
Instagram