या blog मध्ये तुम्हाला ISKCON temple / इस्कॉन मंदिर म्हणजे काय ? याची स्थापना कोणी व कधी केली याचबरोबर अनेक माहिती मिळेल.
ISKCON Full form
International Society for Krishna Consciousness / इंटरनेशनल सोसाइटी फॉर कृष्णा कॉन्शियसनेस हा iskcon temple चा फूल फॉर्म आहे.
संक्षिप्त रूपात इस्कॉन, ज्याला हरे कृष्णाची मुव्हमेंट म्हणून ओळखले जाते, ही एक हिंदू धार्मिक संघटना आहे.
ISKCON चे संस्थापक कोण होते ?
ISKCON चे संस्थापक स्वामी प्रभुपाद होते, यांचा जन्म १ सप्टेंबर १८९६ रोजी कलकत्ता (कोलकाता) येथे सुशिक्षित व सुसंस्कृत कुटुंबात झाला.
भारतातील एक सात्त्विक धर्मगुरू, ISKCON TEMPLE (इंटरनॅशनल सोसायटी फॉर कृष्ण कॉन्शसनेस) या आंतरराष्ट्रीय संस्थेचे संस्थापक आणि वैदिक वाङ्मयाचे ते गाढे अभ्यासक होते.
त्यांचे पूर्वाश्रमीचे पूर्ण नाव अभय चरणरविंद भक्तिवेदान्त स्वामी प्रभुपाद, प्रारंभीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी स्कॉटिश चर्च कॉलेज (कलकत्ता) येथून १९२० साली बी.ए. ही कलकत्ता विद्यापीठाची पदवी संपादन केली.
त्या सुमारास त्यांच्या माता-पित्यांनी त्यांचे लग्न लावून दिले, त्यानंतर त्यांनी कलकत्त्यात एक रसशाळा (औषधनिर्मिती) काढली.
तसेच त्यांचे हिंदू वैष्णव पंथीय आध्यात्मिक गुरू भक्तिसिद्धान्त सरस्वती ठाकूर यांनी १९२२ मध्ये पाश्चात्त्य देशांत वैष्णव पंथाचा प्रसार व प्रचार करावा, असे त्यांना आवाहन केले.
त्यामध्ये मुख्यत्वे श्रीकृष्णाची शिकवण आणि तत्त्वज्ञान यांचा अंतर्भाव असावा, असे त्यांचे मत होते.
या मताला प्रतिसाद म्हणून त्यांनी आपला बहुतेक वेळ श्रीकृष्णाची शिकवण व भक्तिसंप्रदायाचा प्रचार करण्यासाठी खर्च करण्याचे ठरविले.
त्यासाठी त्यांनी व्याख्याने दिली व बॅक टू गॉडहेड हे पुस्तक लिहिले, कृष्णावरील लेखनाचे संपादन केले.
१९३३ मध्ये त्यांनी अलाहाबाद येथे आपल्या गुरूंचे औपचारिक शिष्यत्व पतकरले मात्र त्यांच्या या धार्मिक आचरणात त्यांच्या कुटुंबियांनी काहीच रस दाखविला नाही.
एवढेच नव्हे, तर त्यांना उत्तेजनही दिले नाही परंतु प्रभुपाद यांनी आपला रसशाळेचा धंदा मलावडे यांच्याकडे सुपूर्त करून १९५० मध्ये त्यांनी वान-प्रस्थाश्रम स्वीकारला आणि पत्नी, मातापिता यांच्याशी असलेले भावनिक संबंध त्यांनी तोडले.
स्वामी प्रभूपाद यांचा संन्यास
वृंदावन येथील राधा दामोदर मंदिरात उपासनेसाठी ते राहू लागले, तिथे ते कीर्तन व भागवत पुराणाचा इंग्रजी अनुवाद तसेच अन्य हस्तलिखितांचे भाषांतर करीत.
१९५४ पासून त्यांनी पुढे पूर्ण वेळ ‘हरेकृष्ण’ या चळवळीला वाहून घेतले.
१९५९ मध्ये त्यांना स्वामी हे बिरुद त्यांच्या गुरुवऱ्यांनी दिले, गौडिय पत्रिका हे मासिक ते प्रचारार्थ चालवीत असत.
नंतर १९६५ मध्ये ते संन्यास घेऊन गुरुजींच्या सल्ल्यानुसार बॉस्टन (मॅसॅचूसेट्स) येथे आपल्या श्रीकृष्ण या दैवताच्या प्रचारार्थ गेले.
काही महिन्यांनी त्यांनी न्यूयॉर्कला प्रयाण केले, तिथे त्यांनी ‘हरेकृष्ण’ चळवळीचे मुख्यालय स्थापन केले.
आपल्या भांडारगृहाच्या पुढील भागांत त्यांनी एक छोटे सभागृह बांधून घेऊन तिथे ते वेदवाङ्मयाचे वर्ग घेऊ लागले.
अल्पावधीतच त्यांची कृष्ण चेतना सर्वदूर प्रसृत झाली आणि त्यांच्या अनियंत्रित भौतिकवादाचा दृश्य परिणाम अमेरिकेतील लोकसमूहावर चांगलाच झाला.
हरेराम हरेकृष्ण मुव्हमेंट
‘हरेराम हरेकृष्ण’ चळवळ मुख्यत्वे तरुणांमध्ये अधिक लोकप्रिय झाली आणि स्वामींची पुस्तके मोठ्या प्रमाणात वाचली जाऊ लागली.
महाविद्यालये आणि विद्यापीठांमधून त्यांचे अध्ययन होऊ लागले, त्यांनी ‘हरेराम हरेकृष्ण’ या चळवळीच्या प्रीत्यर्थ १९६६ मध्ये ISKCON TEMPLE / इस्कॉन ही संस्था काढली.
पाश्चात्त्य देशांमध्ये तिच्या अनेक शाखा असून भारतात उत्तर प्रदेशातील वृंदावन (जि. मथुरा) येथे तिचे मुख्य कार्यालय आहे.
जगभर या संस्थेच्या सुमारे शंभर शाखा असून श्रीकृष्णाचा हरेकृष्ण हा जप त्यांची भक्तमंडळी करतात.
मद्य, मांस, व्यसन यांपासून अलिप्त असलेल्या भक्तांनी स्वतःच्या पत्नीव्यतिरिक्त अन्य स्त्रीशी समागम करू नये आणि त्या सर्वांना मातेसमान मानावे, अशी शिकवण या संस्थेमार्फत दिली जाते.
इस्कॉनच्या सर्व शाखांमधून श्रीकृष्णाची नित्यनैमित्तिक पूजाअर्चा चालते, त्यांच्या वैष्णव पंथीय आध्यात्मिक विचारसरणीवर काही लोकांनी टीका केली असली, तरी पाश्चात्त्य जगात ज्यांचा धार्मिक विचारवंत म्हणून गवगवा आहे, अशा जे. स्टीलमन जुडाह, हार्व्हे कॉक्स, लॅरी शीन, टॉमस हॉपकींझ प्रभृतींनी त्यांच्या अनुवादित पुस्तकांचे कौतुक केले आहे.
एवढेच नव्हे, तर त्यांच्या टीकाकारांना समर्पक उत्तरे दिली आहेत.
अमेरिकेतील अनेक ख्यातकीर्त विद्वानांनी त्यांच्या अलौकिक व्यक्तिमत्त्वाचे कौतुक केले असून हजारो तरुण त्यांच्याकडे आकर्षित होतात, यातच त्यांच्या कार्याचे यश दडले आहे, असे त्यांनी म्हटले आहे.
स्वामी प्रभूपाद यांचा अमेरिका दौरा कसा होता ?
ISKCON TEMPLE अस्तित्वात नव्हते तेव्हाची गोष्ट आहे.
वयाच्या ६९ व्या वर्षी ए.सी. भक्तिवेदांत स्वामी प्रभुपाद जलदुत जहाजाने अमेरिकेला जात होते.
अटलांटिक महासागराच्या लाटांवर वेगाने जाणाऱ्या जहाजावर ते अचानक आजारी पडले, २३ ऑगस्ट १९६५ या दिवशी त्यांना जहाजावर सलग दोन दिवस दोन हृदयविकाराचे झटके आले.
जेव्हा ते अमेरिकेत पोहोचले तेव्हा तेथे त्यांना कोणीही सहयोगी नव्हते, काही दिवसांनी एका अमेरिकन तरुणाने त्यांच्याकडून दीक्षा घेतली.
अमेरिकेत प्रभूपाद यांचा दिनक्रम कसा होता ?
अमेरिकेतील बोस्टन येथे एका भाड्याच्या घरात दररोज भगवद्गीतेवर व्याख्याने देणे, नंतर स्वतःच्या हाताने तयार केलेला प्रसाद वाटणे आणि प्रत्येक रविवारी बोस्टनमधील टॉमकिन स्क्वेअरवर हरे कृष्णाचा जप करणे हा त्यांचा महिनाभराचा दिनक्रम होता.
हळूहळू लोक त्यात सामील होऊ लागले, मग एके दिवशी अमेरिकन वृत्तपत्र न्यूयॉर्क टाइम्सनेही प्रभुपादांच्या या संकीर्तनावर एक लेख प्रसिद्ध केला.
अमेरिकन युवक त्यांच्यात सामील होत होते, कीर्तनात भाग घेत होते.
हे सुमारे एक वर्ष चालले, त्यानंतर ११ जुलै १९६६ रोजी त्यांनी न्यूयॉर्कमध्ये इंटरनॅशनल सोसायटी ऑफ कृष्णा कॉन्शियसनेस म्हणजेच इस्कॉनची नोंदणी केली आणि असे ISKCON TEMPLE / इस्कॉन सुरू झाले.
प्रभूपाद यांचा रशिया दौरा कसा होता?
श्रील प्रभुपाद प्रथम आणि शेवटच्या वेळी १९७० – ७१ मध्ये रशियाला गेले, त्या काळात तिथे कम्युनिस्ट सरकार होते.
ते भिक्षूंच्या वेशात दोन शिष्यांसह मॉस्को विमानतळावर उतरले आणि त्यांच्या पोशाखामुळे त्यांना हॉटेलमध्ये नजरकैदेत ठेवण्यात आले, मॉस्को विद्यापीठात त्यांचे व्याख्यान होते, जे ते देऊ शकले नाहीत.
ते शाकाहारी होते म्हणून त्यांनी आपल्या दोन्ही शिष्यांना फळे वगैरे आणण्यासाठी बाजारात पाठवले.
तिथेच त्यांच्या शिष्यांची दोन लोकांशी भेट झाली, त्यात एक भारतीय आणि एक रशियन होता.
दोघेही प्रभुपादला भेटण्यासाठी हॉटेलमध्ये आले, त्यांची बैठक सुमारे दोन तास चालली, इवान नावाचा रशियन मुलगा प्रभुपादाने प्रभावित झाला आणि तिथेच त्याने दीक्षा घेतली.
इवानने दीक्षा घेतल्यावर लगेचच त्याचे अनंत शांती दास असे नामकरण करण्यात आले.
तो भगवद्गीतेची इंग्रजी प्रत घेऊन बाहेर आला, त्यानंतर प्रभुपाद कधीही रशियाला गेले नाहीत पण अनंत शांती दास यांनी त्यांची मोहीम पुढे नेली.
कम्युनिस्ट सरकारने ही मोहीम दाबण्याचा प्रयत्न केला, यात काही इस्कॉन भक्तही मारले गेले, परंतु रशियात सुमारे १०० इस्कॉन केंद्रे बांधण्यात आली, आजही रशियामध्ये हजारो कृष्णभक्त आहेत जे इस्कॉनशी संबंधित आहेत.
स्वामी प्रभूपाद भारतात कधी परत आले ?
प्रभुपाद यांची प्रकृती खालावू लागली, तेव्हा ते भारतात आले व वृंदावन येथे राहू लागले.
प्रभूपाद यांनी कोणकोणती पुस्तके लिहिली ?
त्यांनी कृष्ण चैतन्यवादावर सुमारे ५० पुस्तके लिहिली आहेत.
त्यांपैकी भगवद्गीता, भागवत पुराण, बॅक टू गॉडहेड इ. महत्त्वाची असून त्यांच्या भक्तांनी १९७२ मध्ये भक्तिवेदान्त ट्रस्ट स्थापन केला आहे.
या प्रतिष्ठानतर्फे श्री प्रभुपाद लीलामृत हे त्यांचे चरित्र प्रकाशित केले आहे, याशिवाय लॅरी शीन यानेही त्यांचे चरित्र लिहिले आहे.
प्रभुपाद यांनी ‘हरेकृष्ण’ चळवळीच्या प्रसारार्थ अमेरिकेमध्ये स्थापन केलेल्या संस्थेचा मूळ उद्देश बंगालमध्ये लोकप्रिय असलेली भक्ती चळवळ पाश्चात्त्य देशांत प्रसृत करणे हा होता.
प्रत्यक्षात ही चळवळ चैतन्य महाप्रभू यांनी इ.स. १४८५ – १५३४ मध्ये प्रथम सुरू केली होती.
प्रभुपादांचे पहिले अनुयायी न्यूयॉर्क शहरातील हिप्पी हे होते, त्यांनी केशवपन करून भगवी वस्त्रे परिधान करून हरेकृष्ण नामाचा जप सुरू केला.
‘हरेकृष्ण’ चळवळीची शिकवण हे प्राचीन हिंदू धर्मातील, विशेषतः श्रीमद्भागवत आणि श्रीमद्भगवद्गीता यांवर आधारित आहे.
त्यांच्या मते श्रीकृष्ण हे सर्वोच्च श्रेष्ठ पुरुष असून प्रत्येक व्यक्तीचे भवितव्य त्याच्या कर्मावरून किंवा पूर्व कर्मावरून ठरते.
पूर्वापार कर्ममालिका भक्तिमार्गाने बदलता येते, रामकृष्णांचा जप केल्याने ह्या गोष्टी साध्य होतात, असे ते मानत.
स्वामी प्रभूपाद यांनी मृत्यूपूर्वी किती ISKCON TEMPLE /मंदिरे बांधली होती?
आपल्या आयुष्याच्या शेवटच्या दहा वर्षात त्यांनी केवळ इस्कॉनची स्थापना केली नाही, तर संपूर्ण जगात श्री कृष्ण भक्तीची संपूर्ण चळवळ निर्माण केली.
न्यूयॉर्कमधील पहिले मंदिर १९६६ मध्ये बांधले गेले आणि १९७५ साली वृंदावन मध्ये भारतातील पहिले बांधले गेले.
१४ नोव्हेंबर १९७७ रोजी त्यांच्या मृत्यूपर्यंत १०८ मंदिरे बांधली गेली होती. सध्या, इस्कॉनची जगभरात एकूण ६०० मंदिरे आणि केंद्रे आहेत.
मृत्यूपूर्वी प्रभुपादांनी आंतरराष्ट्रीय चळवळ पुढे नेण्यासाठी एका कार्यकारी मंडळाची स्थापना केली.
या मंडळात त्यांना गुरू म्हणून मान्यता दिली होती. इ. स. २००० च्या सुमारास साठ देशांत सुमारे २२५ ‘हरेराम हरेकृष्ण’ चळवळीची केंद्रे होती, त्यांपैकी ५० केंद्रे केवळ अमेरिकेत होती.
स्वामी प्रभुपादांचे वृद्धापकाळाने वृंदावन येथे १४ नोव्हेंबर १९७७ मध्ये निधन झाले.
धन्यवाद, माय मराठी ब्लॉग
हे सुद्धा वाचा
- Ayodhya Ram Mandir Information in Marathi | अयोध्येचे राम मंदिर
- नोकरी की व्यवसाय | Nokari ki vyavsay | Job or Business
- Career opportunities after BBA | बी बी ए नंतर काय करावे ?
- 2G Spectrum Scam case | 2 जी स्पेक्ट्रम घोटाळा
- राजीव दीक्षित यांची माहिती | Rajiv Dixit information in marathi
- G20 म्हणजे काय ? G20 Information in marathi
- Neuralink म्हणजे काय ? Neuralink information in Marathi
- Data Science म्हणजे काय ? | डेटा सायन्स ची संपूर्ण माहिती
- मराठी माणूस आणि रोजगार | Marathi manus aani rojgar
- नॉर्थ सेंटीनेल आयलँड |North Sentinal Island Information in Marathi
- अविश्वास प्रस्ताव म्हणजे काय? | No confidence motion in marathi
- Eye flu म्हणजे काय ? डोळे येणे | Eye Flu in marathi
- ECG test म्हणजे काय? | ECG Information in marathi
- What is Hindu Dharm? | Hindu Religion explained in Marathi
- ChatGPT म्हणजे काय ? Magic of AI in Marathi