इस्रायल एक सुंदर देश……पण गेल्या 2 आठवड्यापासून Israel and Palestine War सुरू आहे.
7 ऑक्टोंबर 2023 दिवशी इस्रायलमध्ये मिसाईल अटॅक करण्यात आले, Israel मधे केलेल्या या हल्ल्यामुळे संपुर्ण जग हादरून गेले आहे.
हमास या दहशतवादी संघटने कडून 5 हजार रॉकेट सोडण्यात आले, यामध्ये दोन्हीकडे मोठया प्रमाणावर जिवितहानी झालेली आहे, गेल्या अनेक दशकांपैकी हा सर्वात मोठा हल्ला इस्रायलमध्ये झाला असे म्हणता येईल.
इस्रायल व पॅलेस्टाईन | Israel and Palestine Conflict
नेमक हमास म्हणजे काय ? पॅलेस्टाईन म्हणजे काय ? याची सगळी इत्यंभूत माहिती आपण पाहणार आहोत.
अचानक सकाळी 7 वाजता मिसाईल अटॅक होतो आणि त्याचा व्हिडिओ व्हायरल होतो.
एखादा थ्रिलर चित्रपटात त्यातील एकादी घटना कशी आपोआप समोर येते आणि व्हायरल होते, त्याप्रमाणे काही घटना अचानक समोर आल्या.
त्यातून इस्त्राईलसाठी एक संदेश देण्यात आला, हमासकडून अल अकसाफ ऑपरेशनची घोषणा करण्यात आली.
त्यानंतर अनेक ठिकाणी बॉर्डर तोडण्यात आली, जवानांवर हल्ले झाले, असा झाला सुरु अनेक दशके चालु असलेला हा खेळ…
इस्त्राईल आणि हमास 100 वर्षांचा इतिहास
इस्त्राईल आणि ह्या मागच्या युद्धाच्या कहाण्या अनेक दशकांपासून चालत आलेले आहेत इस्त्राईल पॅलेस्टाईन वेस्टबँक याच्यावर 1948 आधी ब्रिटिशांची सत्ता होती.
विश्व युद्धाच्या अनेक वर्षांनी लोकांनी इस्त्राईल या देशाची स्थापना केली गेली.
त्यानंतर जो हिरव्या रंगाचा भाग आहे तो पॅलेस्टाईन हिरव्या रंगाचा भाग आहे तो इस्त्राईल देश म्हणून घोषित केला गेला होता.
मात्र त्यावेळी अनेक देशाने विरोध करत इस्त्राईल या देशावर 1949 वेळी पहिल्यादा इस्त्राईलवर हल्ला केला होता.
त्यावेळी एकट्या इस्त्राईल देशाने चार देशांशी लढून आपलं स्वातंत्र आणि देश आबादीत ठेवलं होतं.
1949 ब्रिटिशांनी इस्त्राईल आणि पॅलेस्टाईनला वेगळं केल गेल्या मुळे या संघर्षाची सुरुवात दमदार झाली.
त्यानंतर 1967 साली परत 6-7 दिवसाचं मोठं युद्ध झालं. त्यानंतर इस्त्राइलच्या आसपासचा बराच भूभाग इस्त्राईल आपल्या ताब्यात घेतला.
थोड्या वेळाच्या काळानंतर म्हणजेच ला पुन्हा एकदा इस्त्राईल देश युद्धात उतरल.
या युद्धाच्या वेळी साम, दाम, दंड, भेद वापरून इस्त्राईलने जॉर्डन देशाकडून वेस्ट बँक आणि गाजा पट्टीवर युद्ध करून पॅलेस्टाईनला आपल्या ताब्यात घेतलं गेलं.
1993 साली बऱ्याच समझोत्यानंतर गाझा पट्टीतून आपला हकक काढून घेतला आणि बरोबर याच वेळी हमास संघटनेची स्थापना करण्यात आली.
अगदी सोप्या पद्धतीनुसार ISRAEL AND PALESTINE WAR / इस्रायल आणि पॅलेस्टाईन च्या युद्धात हमासचा महत्त्वाचा रोल आहे.
आज बघितलं तर गाझा पट्टीत हमास पाय रोवून उभे आहे आणि तिथूनच इस्त्राईलवर हल्ले सुरू आहेत, तर इस्त्राईलने देखील हमासला हद्दपर करण्याचा जणू ठाम निश्चयक केल्याचे दिसते.
इस्रायल पॅलेस्टाईनच्या वादात हिटलरचे स्थान
अवघ्या 20 मिनिटात 5000 क्षेपणास्त्रे सोडली गेली. आतापर्यंतचा इस्त्राईल वरील सर्वांत मोठा मानला जातो. पण हे युद्ध इस्रायल देशाच्या स्थापनेपूर्वीपासूनच आहे. मुख्यत्वे करून पॅलेस्टाईन हा वाद शतकानुशतके जुना आहे. ज्या वेळी इस्रायल देशाची स्थापना देखील झाली नव्हती. 20 व्या शतकात युरोप देशात ज्यु लोकांची संख्या मोठी होती. बहुतेक करून या लोकांना भेदभावाला सामोरे जावे लागले म्हणुनच ते युरोप सोडून पॅलेस्टाईनला वास्तव्यास येऊ लागले. हेअर स्टाईल मध्ये अरब लोकांची संख्या देखील मोठ्या प्रमाणावर होती. या शहराला धार्मिक महत्व देखिल खुप होतें म्हणून तिथे मुस्लिम, ज्यु आणि ख्रिचन लोकांची संख्या जास्त होती. परिणामी ज्यु लोकांना नविन जागेत वास्तव्य करण्यास त्रास जाणवू लागला या अनुषंगाने त्यांनी नवीन देशाची मागणी केली. या कारणावरून अरबी लोक आणि ज्यु लोक यांच्यात भांडणे होवू लागली.
त्यामुळं मोठया प्रमाणावर तणावाचे वातावरण निर्माण झाले. परिणामी ज्यावेळी हिटलर 1933 मध्ये जर्मनीचा हुकूमशहा बनला त्यावेळी त्याने ज्यु लोकांवर खुप अत्याचार केला आणि त्यामुळेच ज्यु लोकांनी अनेक ठिकाणी स्थलांतरास सुरुवात केली. त्यामुळेच पॅलेस्टाईन मध्ये मोठ्या प्रमाणावर ज्यु लोक वास्तव्यास येऊ लागले. हिटलरने त्याच्या काळात 6 दशलक्ष ज्यु लोकांची हत्या केली होती. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे ज्यु लोकांना तो खूप तिरस्कार करतं असे, त्यांच्या वर्णावरून भेद निर्माण करत असे या कारणाने ते स्वतःचा देश स्वतः निर्माण करण्यासाठी स्थलांतरित करत असत.ज्यु नेताच्या या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी ब्रिटनने नविन देश निर्माण करण्याची घोषणा केली आणि त्या घोषणेनुसर 14 मे 1948 रोजी इस्त्राईल देशाची स्थापना करण्यात आली. ही बाब ज्यु लोकांसाठी आनंदाची ठरली पण थोड्याच अवधीत या आनंदावर विरजण पडले. इस्रायल देशाची घोषणा होताच इजिप्त जॉर्डन आणि सीरिया या देशांकडून पहिल्यांदा इजराइल वर हल्ला झाला. हा इस्राईलचा सर्वात पहिला हल्ला समजला जातो.
इस्त्राईल वर हल्ला करण्याचं कारण काय
इस्रायल आसपासच्या देशात सहसा ज्यू लोक, ख्रिश्चन लोक आणि मुस्लिम लोक मोठ्या प्रमाणावर राहतात. त्या अनुषंगानेच त्यांची धार्मिक स्थळे तिथे मोठ्या प्रमाणावर आहेत. यावेळी रमजान ईदच्या वेळी इस्रायलने मस्जिदीचे प्रवेशद्वार बंद केले आणि त्याला तारेचे कुंपण देखिल घालण्यात आले. त्यामुळे आमच्या धर्माला व आमच्या धार्मिक सणामध्ये इस्त्राईल मध्ये मध्ये करत आहे व हे आम्हाला पटलेले त्यांच्या हस्तक्षेपावर पॅलेस्टाईनने संघर्ष सुरू केला. थोड्याच अवधित त्याच रूपांतर युद्धात झाल. हमासने 7 ऑक्टोंबर ला सकाळी 7 वाजल्यापासून मिसायला अटॅक सुरू केला. अचानकपणे हल्ला झाला असला असे म्हटल, तरी देखील पुर्ण नियोजित हल्ला आहे. असं तज्ञांचं मत आहे. इजराइलच्या सुरक्षिततेला धक्का देण्याचं हा हल्ला आहे असे देखील अभ्यासातून सिद्ध झालेला आहे.
50 वर्षाचे पुनरावलोकन / Israel and Palestine War
हमास ही पॅलेस्टाईन मधील मुस्लिम कट्टरवादी संघटना आहे. खूप वर्षापासूनच त्यांचा वाद सुरु आहे. गेल्या काही वर्षापासून शांत राहून हमने अचानक पणे शस्त्रास्त्र हाती घेतले. अभ्यासकांच्या म्हणण्यानुसार हमासच्या या युद्धाची पार्श्वभूमी आहे. अभ्यासकांचं म्हणणं आहे की पन्नास वर्षांपूर्वी देखील असाच हल्ला हमासने इस्त्राईलवर केला होता. असाच हा हल्ला 50 वर्षानंतर परत एकदा झाला ज्या दिवशी यहुदी म्हणजेच ज्यू लोकांचा धार्मिक सोहळा चालू होता त्या दिवशी हा हल्ला झाला. गाझापट्टीत हमासच्या बऱ्याच लोकांचा तळ आहे. गाजा पट्टीतील या लोकांना बाहेर काढण्याचे एकच उद्दिष्ट इस्त्राईल समोर होते म्हणुनच आणि त्यातूनच या युद्धाला परत एकदा सुरुवात झाली. जेवढे इस्त्राईल पट्टीतील नागरिक मारले गेले त्याच्यापेक्षा अधिक संख्येने गाझा पट्टीतील लोक मृत्यूमुखी पडले.
हल्ल्यानंतर इस्त्राईलची भूमिका काय / Israel and Palestine War
बेसावध असलेल्या इस्त्राईलवर हमासने हल्ला केला. मग इस्त्राईलने देखील बचावात्मक पवित्रा घेत हमास वर पलटून हल्ला केला. पहिल्याच हल्ल्यात त्यांनी हम्मासला योग्य ते प्रत्युत्तर दिल. आणि गेल्या दोन आठवड्यांपासून हे युद्ध खूप गंभीर होत चालला आहे. अनेक राष्ट्रांच्या मदतीने इस्त्राईलने हवाई जमीन आणि पाण्यावरील वरील लढाई करून युद्ध छेडल आहे. या सर्वांमध्ये इस्त्राईल आणि पॅलेस्टाईन येथील स्थानिक नागरिकांचा विनाकारण बळी जात आहे. आत्तापर्यंत दोन्ही देशातील नागरिकांचा मृत्यू झाला आहे तर जखमींवर उपचार करण्यासाठी पुरेश्या सुविधा देखिल नाहीत अशी गंभीर जन्य परिस्थिती निर्माण झाले आहे. आत्तापर्यंत इतराला आणि हमास युद्धात चौदाशे इस्रायली नागरिकांचा मृत्यू झाल्याची माहिती इस्त्राईल संरक्षण डिपार्टमेंट मार्फत देण्यात आली आहे.
रुग्णालयावरील मोठे संकट / Israel and Palestine War
मृत व्यक्ती आणि जखमी झालेल्यांची संख्या ही हजारोंच्या वर आहे. या युद्धात आत्तापर्यंत इस्त्राईलच्या 1400 पेक्षा अधिक लोकांचा मृत्यु झाला आहे. तर 4600 पेक्षा जास्त लोक जखमी आहेत. रुग्णालयामध्ये आवश्यक असलेली साहित्य सामग्री काहीच दिवसांमध्ये संपेल अशी शक्यता डॉक्टरनी वर्तविली आहे. स्थानिक नागरिकांना लाईट, पाणी, पुरेसे अन्न मिळते आहे की नाही याची देखील शाश्वती राहिलेली नाही. डॉक्टर मोबाईलच्या प्रकाशात शस्त्रक्रिया करत आहेत तर व्हिनेगार च्या पाण्याने जखमा स्वच्छ करण्याचे काम चालू आहे हीच जर परिस्थिती राहिली तर हजारोमध्ये हकनाक लोकांचा मृत्यु होईल.
जोपर्यंत विजयी होत नाही तोपर्यंत लढत राहू
हमासमध्ये असलेल्या दोन अमेरिकेतील ओलिसाची सुटका केली आहे. इस्त्राईलच्या पंतप्रधानांनी घोषणा केली आहे की जोपर्यंत विजयी होत नाही तोपर्यंत आम्ही लढत राहू. जोपर्यंत स्थलांतरित लोक घरी परतत नाहीत तोपर्यंत मी प्रयत्न करत राहणार. अशी एक प्रकारची ग्वाहीच इस्राईलच्या पंतप्रधानांनी दिली आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर अमेरिका इंग्लंड आणि भारत देशाने इस्त्राईलला या लढ्यास पाठिंबा दिला आहे. दरम्यान हम मदतीसाठी रशियाशी संपर्क साधण्याचे देखील ऐकिवात येत आहे. हमास मधील दहशतवाद्यांनी 200 पेक्षा अधिक ओलीस ठेवले आहे. यामध्ये जर अमेरिका आणि रशियाने इस्रायलची मदत केली तर संपूर्ण जगाला याचे परिणाम भोगावे लागतील असे तज्ञांचे मत आहे.
इस्रायल आणि हमास हे युद्ध अजून किती दिवस चालणार आहे याची पक्की माहिती कोणाकडेच नाही आहे. या युद्धामुळे हजारो लोकांचा जीव गेला आहे. पर्यंत या युद्धाच्या बाबतीत कोणत्याही ठोस निर्णय घेण्यात आलेला नाही आहे. हे जर असंच चालू राहिल तर संपुर्ण जग तिसऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.
धन्यवाद, माय मराठी ब्लॉग
हे सुद्धा वाचा
- नोकरी की व्यवसाय | Nokari ki vyavsay | Job or Business
- Career opportunities after BBA | बी बी ए नंतर काय करावे ?
- 2G Spectrum Scam case | 2 जी स्पेक्ट्रम घोटाळा
- राजीव दीक्षित यांची माहिती | Rajiv Dixit information in marathi
- G20 म्हणजे काय ? G20 Information in marathi
- Neuralink म्हणजे काय ? Neuralink information in Marathi
- Data Science म्हणजे काय ? | डेटा सायन्स ची संपूर्ण माहिती
- मराठी माणूस आणि रोजगार | Marathi manus aani rojgar
- नॉर्थ सेंटीनेल आयलँड |North Sentinal Island Information in Marathi
- अविश्वास प्रस्ताव म्हणजे काय? | No confidence motion in marathi
- Eye flu म्हणजे काय ? डोळे येणे | Eye Flu in marathi
- ECG test म्हणजे काय? | ECG Information in marathi
- What is Hindu Dharm? | Hindu Religion explained in Marathi
- ChatGPT म्हणजे काय ? Magic of AI in Marathi