Chandrayaan 3 ने रचला इतिहास!! भारताच्या चंद्रावर पहिलं पाऊल!!! अशाच न्यूज headline 23 ऑगस्ट 2023 दिवशी सगळ्याच न्यूज चॅनेल वर होत्या.
भारतात वैज्ञानिक निरीक्षणांची, वैज्ञानिक अभ्यासाची प्राचीन परंपरा आहे.
शल्व, कणाद, वराहमिहिर, आर्यभट, भास्कराचार्य, चरक, सुश्रुत, बौधायन, भास्कराचार्य, पाणीनी, अशी कितीतरी नावे सांगता येतील या सर्वांनी विविध विषयांतील मूलभूत संशोधन जगाच्या आधी मांडले,ही वस्तुस्थिती आहे.
त्याचबरोबर आपल्याला बर्याच गोष्टी रामायण महाभारत यासारख्या ग्रंथातून मिळाल्या.
पण त्याचबरोबर विज्ञान आणि गणित या दोन विषयात भारतीय आणि भारतीयांनी मोलाची कामगिरी केली आहे, यात शंकाच नाही.
एकविसाव्या शतकातील आजच्या भारतात आपल्याकडे दोन गोष्टी मुबलक आहेत एक म्हणजे माहिती व दुसरी तंत्रज्ञान (Information and Technology) या दोन्ही गोष्टीत भारताच्या विज्ञानाला शिखरापर्यंत नेण्याची ताकद आहे.
Chandrayaan मोहिमेच्या यशस्वितेचे मानकरी भारतीय वैज्ञानिक आहेत.
त्यांच्या अथक परिश्रमांमुळे ऐन श्रावणात यशाचे टिपूर यशाचे चांदणे अवघ्या भारताला तसेच जगाला अनुभवता आले.
चंद्रयानाची सुरुवात | Begining of Chandrayaan
भारत 2008 पर्यंत चंद्रावर आपले यान पाठवेल, या मोहिमेचे नाव असेल Chandrayaan 1 /चांद्रयान-1.
लाल किल्ल्यावरून भारताचे तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी 2003 साली ही घोषणा केली तेव्हापासून चंद्र भेटीचे स्वप्न भारतीयांनी उराशी बाळगले होते.
गेल्या 20 वर्षांपासून भारतीय शास्त्रज्ञांच्या अथक परिश्रमांनी 24 ऑगस्ट 2023 रोजी भारताची चांद्रयान तीन मोहीम फत्ते झाली.
तसेच चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणारा भारत हा पहिलाच देश आहे, चंद्रावर मानव सर्व सात प्रथम उतरला 20 जुलै 1969 मध्ये.
अमेरिकेच्या अपोलो 11 या मोहिमेनंतर साधारण महिनाभराने म्हणजे 15 ऑगस्ट 1969 रोजी भारतीय अवकाश संशोधन संस्थेची ISRO (इस्रो) ची स्थापना विक्रम साराभाई यांच्या प्रयत्नामुळे झाली.
अवकाशातील महासत्ता होण्याचे इस्रोचे प्रयत्न पहिल्यापासूनच चालू आहेत.
चंद्रयान मिशन / Mission Chandrayaan
इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन (ISRO) ने चंद्रावर मागील दोन मोहिमा हाती घेतल्या होत्या त्या म्हणजे चंद्रयान-1 आणि चंद्रयान -2.
चंद्रयान एक 2008 मध्ये प्रक्षेपित करण्यात आले होते आणि 2009 पर्यंत त्याचे संपर्क तुटले होते; 2019 मध्ये चंद्रयान दोनने चंद्रावर सॉफ्ट लँडिंगचा प्रयत्न केला परंतु अयशस्वी झाला, मात्र 2023 मध्ये Chandrayaan 3 ने यशस्वीरीत्या सॉफ्ट लँडिंग केले.
Chandrayaan तीन हे मिशन अंतराळ संशोधनात भारताच्या क्षमतांचे प्रदर्शन करेल आणि देशाला या क्षेत्रात भारताला आघाडीवर ठेवण्यास मदत करेल.
चंद्रयान तीन मिशन 14 जुलै 2023 रोजी प्रक्षेपित झाले, लँडर आणि रोव्हर चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरले होते.
या प्रदेशात पाण्याचे अवशेष असल्याचे मानले गेले. चंद्रयान 3 ने यशस्वी लँडिंग केल्यानंतर इस्रो ने एक आठवड्यानंतर संपूर्ण जगाला बातमी देताना असे सांगितले की, chandrayaan 3 वरील प्रज्ञान रोवर ने चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर ऑक्सिजनचा शोध लावला आहे.
चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सल्फर, अल्युमिनियम, मँगनीज, सिलिकॉन, लोह, क्रोमियम, कॅल्शियम, टायटेनियम, सिलिकॉन असल्याची माहिती रोवर ने इस्रोला दिली.
इस्रोच्या विक्रम लँडरवरील चास्ते या उपकरणाने काही दिवसांपूर्वी चंद्रावरील तापमानसंदर्भात माहिती पाठवली होती.
जर, चंद्रावर हैड्रोजन आढळून आला तर पाणी असल्याबद्दलच्या गृहीतकाच्या जवळ जाता येऊ शकते.
आदित्य एल 1 | Aditya L1
CHANDRAYAAN तीनच्या यशानंतर इस्रो ने सूर्याचा अभ्यास करण्यासाठी आदित्य एल वन लॉन्चिंगची घोषणा केली.
2 सप्टेंबर ला श्रीहरीकोटा येथील सतीश धवन अवकाश तळावरून याचे लॉन्चिंग केले गेले.
भारताचे हे पहिले सोलर मिशन आहे, मिशन च्या लाँचिंगसाठी भारताने पुन्हा एकदा श्रीहरिकोटा या संशोधन संस्थेची निवड केली आहे.
श्रीहरीकोटा हे भारताचे लॉन्चिंग स्टेशन आहे, श्रीहरिकोटा आंध्र प्रदेशच्या किनार्यावर वसलेले आहे, भारतीय अवकाश विज्ञानासाठी ही जागा खूप महत्वाची आहे.
भारताच्या नुकत्याच यशस्वी ठरलेल्या चंद्रयान तीन मिशन चे लाँचिंग याच तळावरून झालं होतं.
पृथ्वी आणि सूर्याच्या मध्ये एक एल वन पॉईंट आहे, तिथे आदित्य एल वनला स्थापित करण्यात येणार आहे.
सूर्याचा पूर्ण वेळ अभ्यास करण्यासाठी भारतीय अवकाश संशोधन संस्था इस्रो ने आदित्य एल वन उपग्रह पाठवला आहे.
सूर्यावर वादळ येतात, स्फोट होतात या सगळ्याचे पृथ्वीवर काय परिणाम होतो ? आपल्या अवकाशात फिरणार्या उपग्रहांना धोका आहे का ? याचा अभ्यास आदित्य एल वन मिशनमध्ये होणार आहे.
पृथ्वीपासून सूर्याजवळ असणार्या एल वन पॉईंटपर्यंतचं अंतर 15,00,000 किलोमीटर आहे, आदित्य एल वन तिथपर्यंत पोहचायला जवळपास चार महिने लागणार आहेत.
चंद्रयान 3 चे उद्देश | Purpose of Chandrayaan 3
चंद्राच्या पृष्ठभागावर सुरक्षितपणे लँडिंग करणे, प्रगत अवकाशयान तंत्रज्ञान, चंद्रावर यान उतरवण्याचे तंत्रज्ञान, स्वदेश उपकरणे यांच्या चाचण्या करणे.
रोवरच्या फिरण्याच्या क्षमतेचे निरीक्षण आणि प्रात्यक्षिक.
चंद्राची रचना अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी आणि सराव करण्यासाठी चंद्राच्या पृष्ठभागावर उपलब्ध असलेल्या रासायनिक नेसर्गिक घटकांचे निरीक्षण करणे तसेच इंटर प्लानेटरी म्हणजे ग्रहांमधील मोहिमांसाठी आवश्यक असलेल्या नवीन तंत्रज्ञानाचा विकास आणि प्रात्यक्षिक.
अधिक माहिती
- भारतीय अंतराळ कार्यक्रमाचे जनक विक्रम साराभाई यांच्या नावावरून लँडर चे नाव विक्रम असे ठेवले गेले आहे.
- रोव्हरचे नाव प्रज्ञान असे आहे.
- प्रोल्युशन मॉडलचे नाव चांद्रयान तीन ऑर्बिटर आहे.
- मिशनमध्ये कॅमेरा, स्पेक्ट्रोमीटर्स, आणि मॅग्नेटोमीटरसह 14 वैज्ञानिक पेलोड आहेत.
- वैज्ञानिकांना चंद्र आणि त्याचा इतिहास अधिक प्रकारे समजून घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात डेटा निर्माण केला गेला.
चंद्रयान मोहिमेचे वैशिष्ठ
- चंद्रयान -2 मोहिमेचा उद्देश पूर्ण करण्यासाठीची ही मोहिम
- चंद्रयान -3 मध्ये जुन्या यानाच्या तुलनेत 21 बदल, यानावरील ‘सोलर पॅनल’चा विस्तार वाढवला.
- चंद्रयान दोनच्या तुलनेत नव्या यानावरील सॉफ्टवेअर मध्ये मोठे बदल.
- चंद्राच्या पृष्ठभागावरच्या अभ्यासासाठी महत्त्वाची मोहिम.
- 14 दिवसांच्या मोहिमेत चंद्राच्या गुणधर्मांचा अभ्यास केला जाणार.
- चंद्रयान तीन यशस्वी मोहीम करणारा भारत जगातला चौथा देश.
- चंद्रयान तीन मोहिमेसाठी गेल्या चार वर्षात 615 कोटींचा खर्च.
- विक्रम लँडर, स्वयंचलित वाहन, वाहक यंत्रणा हे यानातील मुख्य भाग.
- चांद्रयान तीन मोहिमेचा नासाच्या आर्टिमिस मिशनलाही मोठा फायदा.
चंद्रयान 3 बाबत अधिक माहिती
Chandrayan 3 Mission Information | |
Mission type | Lunar lander, rover,propulsion modul |
Operator | Indian Space Research Organisation (ISRO) |
Website | www.isro.gov.in |
Mssion duration | 14 days |
Payload mass | Propulsion Module 2148 kg, Lander Module (Vikram) 1752kg including rover of 26kg Total 3900kg |
Rocket | Propulsion Modul:758W Lander: 738W, WS with Bias Rover: 50W |
Launch Date | 14 July 2023 at 2:35 pm |
Rocket | LVM3 M4 |
Payloads | Satish Dhawan Space Canter |
Contractor | ISRO |
Spacecraft component | Rover |
Power | 738 W |
Payloads | 3 |
Landing Date | 23 August 2023 |
Landing site | 69.367621 S, 32.348126 E |
शेअर मार्केटच्या निर्देशांकांची जोरदार उसळी
चंद्रयान तीन चंद्रावर उतरवण्याच्या च्या ऐतिहासिक घटनेच्या पार्श्वभूमीवर शेअर मार्केट मधील कंपन्यांनी जोरदार उसळी मारली.
जिओ समभागांनी 52 आठवड्यांचा उच्चांक गाठला भेल, लार्सन अँड टुर्बो, हिंदुस्थान एरोनाटिक्स, भारत फोर्ज, वालचंदनगर इंडस्ट्रीज, नाल्को, पारस डिफेन्स इत्यादि कंपन्यांचा यात समावेश आहे.
तसेच बँकिंग क्षेत्रातील कंपन्यामध्ये जोरदार खरेदी झाली चंद्रयान मोहिमेशी संबंधित कंपन्या चे शेअर्स आणि संरक्षण क्षेत्रा मधील शेअर यांनी देखील चांगली वाढ दर्शवली.
अवकाश संशोधनातील स्वायत्त तंत्रज्ञान निर्मितीतील भारताचे महत्त्वाचे पाऊल
- आगामी काळात अवकाश मोहिमां करण्यास इच्छुक असणार्या देशांसाठी भारत आदर्श ठरेल.
- अनेक देश भारताच्या मदतीने अवकाश संशोधन करण्यास पुढे येतील.
- चंद्रयान तीन मोहिमेतील रोव्हरच्या साह्याने इतर देशांनाही संशोधनात सहभागी होण्याचा मार्ग मोकळा होईल.
- कमी खर्चात यशस्वी अवकाश मोहिमा करणारा देश म्हणून जागतिक स्तरावर भारताची नवीन प्रतिमा.
- भारतात कमी खर्चात अवकाश मोहिमा यशस्वी होत असल्याने अन्य देशांसमोर आव्हान.
- कोणत्याही देशाच्या सहकार्याशिवाय स्वतःच्या हिमतीवर अवकाश मोहिमा करण्याचा भारताचा आत्मविश्वास वाढला.
- आता संपूर्ण जगाचे लक्ष अत्यंत आधुनिक तंत्रज्ञान वापरलेल्या आदित्य एल वन मोहिमेकडे.
चंद्रयान -3 सायन्स रिजल्ट
लुनर सेल सेमी एक्टिविटी (ILSA) लँडिंग साईट च्या आसपासच्या हालचालींचा शोध घेते.
रेडियो एनाटॉमी ऑफ मून बॉण्ड हायपर सेंसिटिव्ह आयनोस्फिअर ॲटमॉस्फियर लँगम्यूर प्रोब (RAMBHA-LP) ऑनबोर्ड चांद्रयान-3 सा जवळच्या पृष्ठभागावरील प्लाझ्मा सामग्री मोजते.
अल्फा पार्टिकल एकसरें (APXS)- Rover किरकोळ घटकांची उपस्थितची ओळखतो.
द लेझर इंडय़ुस्ड ब्रेकडाऊन स्पेक्ट्रोस्कोपी (LIBS)-साऊथ पोलवरील सल्फरच्या उपलब्धततेची पाहणी करते.
चांद्र सर्फेस थर्मो फिजिकल एक्सपरीमेंट -विक्रम लँडरचे पहिले निरीक्षण.
चंद्रावर मोहिमा का केल्या जातात?
भारताने Chandrayaan 3 मोहीम फत्ते करून जगासमोर एक नवीन इतिहास रचला आहे.
पृथ्वीच्या जवळचा ग्रह म्हणजे चंद्र सात, जगातल्या बहुतांश देशांसाठी चंद्र म्हणजे विज्ञान.
भारतासाठी सुद्धा चंद्र म्हणजे विज्ञानच आहे, भारतीयांच चंद्राबाबतचं प्रेम काही वेगळेच आहे.
पूर्वीपासून भारतीयासाठी रोमॅंटिक असलेला हा चंद्र भावनिकदृष्ट्या खूप जवळचा वाटतो, त्याला कारण म्हणजे भारतातील अनेक लेखक, कवींनी, चंद्राच अतिशय रोमँटिक असं वर्णन कथा, कादंबर्या , लहान मुलांच्या कथा, चित्रपट, नाट्य, संगीत, पौराणिक कथांमधून केले आहे.
म्हणून भारतीयांना चंद्र अतिशय जवळचा वाटतो.
वैज्ञानिकदृष्ट्या विचार केला तर, चंद्रावर केल्या जाणार्या मोहिमांच्या मागे एक उदात्त हेतू आहे.
अमेरिकेच्या नील आर्मस्ट्रॉंग याने चंद्रावर पहिले पाऊल टाकले होते, तदनंतर चंद्रावर मानवरहित मोहिमा चालू झाल्या.
पृथ्वी आणि विश्वाच्या इतिहासाचा अभ्यास करण्यासाठी चंद्र हे वैज्ञानिकांचे लक्ष बनल आहे.
चंद्रयान दोन च्या क्रश लँडिंगनंतर जवळ जवळ चार वर्षांनी चांद्रयान तीन ही यशस्वी मोहीम ठरली आहे.
वैज्ञानिकांच्या मतें, चंद्र हा पृथ्वीपासून तयार झाला आहे, पृथ्वी चंद्र प्रणाली, सौर यंत्रणा, लघुग्रहांची भूमिका, पाणी, पर्यावरण या सर्व गोष्टींचा शोध घेण्यासाठी हि मोहिम केली गेली.
निष्कर्ष
चंद्रयान तीन चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सॉफ्ट लँडिंग करणारा भारत हा जगातला पहिलाच देश ठरला आहे.
चंद्रयान तीनच्या यशाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इस्रोला केलेले संबोधन-
- “भारत चंद्रावर पोहोचला आहे! आम्ही आमचा राष्ट्रीय अभिमान चंद्रावर प्रस्थापित केला आहे”
- चंद्रयानचे मून लँडर जिथे उतरवले गेले तो भाग “शिव शक्ति” म्हणून ओळखला जाईल.
- चंद्रयान तीन मोहिमेत नारीशक्तीने मोठी भूमिका बजावली आहे.
- यापुढे 23 ऑगस्ट हां दिवस राष्ट्रीय आंतराळ दिवस म्हणुन ओळखला जाईल.
धन्यवाद, माय मराठी ब्लॉग
हे सुद्धा वाचा
- नोकरी की व्यवसाय | Nokari ki vyavsay | Job or Business
- Career opportunities after BBA | बी बी ए नंतर काय करावे ?
- 2G Spectrum Scam case | 2 जी स्पेक्ट्रम घोटाळा
- राजीव दीक्षित यांची माहिती | Rajiv Dixit information in marathi
- G20 म्हणजे काय ? G20 Information in marathi
- Neuralink म्हणजे काय ? Neuralink information in Marathi
- Data Science म्हणजे काय ? | डेटा सायन्स ची संपूर्ण माहिती
- मराठी माणूस आणि रोजगार | Marathi manus aani rojgar
- नॉर्थ सेंटीनेल आयलँड |North Sentinal Island Information in Marathi
- अविश्वास प्रस्ताव म्हणजे काय? | No confidence motion in marathi
- Eye flu म्हणजे काय ? डोळे येणे | Eye Flu in marathi
- ECG test म्हणजे काय? | ECG Information in marathi
- What is Hindu Dharm? | Hindu Religion explained in Marathi
- ChatGPT म्हणजे काय ? Magic of AI in Marathi