Abdul Karim Telgi हे नाव सहसा कुणाच्या लक्षात नसेल पण तेलगी Stam Paper Scam / घोटाळा सर्वांच्या लक्षात असेलच.
तब्बल 30 हजार कोटी रुपयाचा घोटाळा करून या व्यक्तीने देशाची अर्थव्यवस्था खिळखिळी केली म्हटलं तर वावगं ठरणार नाही.
अब्दुल करीम तेलगी नक्की कोण होता ? तेलगी स्टॅम्प पेपर घोटाळा म्हणजे नक्की काय ? हे सगळ आपण या ब्लॉग च्या आधारे जाणून घेणार आहोत.
अब्दुल करीम तेलगी चे बालपण आणि शिक्षण / Abdul Karim Telgi Education
अब्दुल करीम तेलगीचा जन्म 29 जुलै 1961 मध्ये कर्नाटकातील खानापूर मध्ये झाला, तो आपल्या आई – वडील आणि 2 भावासोबत राहत असे.
आई वडील दोघेही भारतीय रेल्वे अधिकारी त्यामुळं घरची परिस्थिती अत्यंत चांगली होती, पण आपल्या आयुष्याला काय वळण लागेल सांगता येत नाही तसच काहीसं तेलगी कुटुंबीयांसोबत घडलं.
अब्दुल तेलगी हा 9-10 वर्षाचा असताना तेलगीचा वडिलांचा मृत्यू झाला, आता एकट्या आईवर घर कसे चालणार म्हणून सगळे कुटुंबीय रेल्वे स्टेशनवर जाऊन फळे आणि भाज्यांचा व्यवसाय करू लागले.
Abdul Karim Telgi ने देखील ही परिस्थिती पाहता फळांचा व्यवसाय चालू केला.
या फळ आणि भाजी च्या व्यवसायामध्ये संपुर्ण कुटुंबाचे पोट भरेल एवढेच पैसे मिळत, पण तरीही अब्दुल तेलगीला शिक्षणाची भारी आवड म्हणून त्यांनी आपले शिक्षण चालूच ठेवले त्याचा खर्च ते फळे विकून भागवत होता.
आपल्या फळ विकण्याच्या या व्यवसायावर तेलगिने बीकॉम पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले आणि त्यानंतर अनेक ठिकाणी नोकरी देखील केली.
पण म्हणतात ना माणसाला एकदा पैशांची हाव लागली की त्याचे चित्त विचलित होते, तसेच अब्दुल तेलगी देखील कोणत्याच नोकरीवर टिकत नव्हते.
मग तो जास्त पैसे कसे कमवता येतील यावर विचार विनिमय करु लागला.
अब्दुल करीम तेलगीचा मुंबई मध्ये प्रवेश / Abdul Karim Telgi’s Entry in Mumbai
Abdul Karim Telgi जास्त पैशाच्या हव्यासाने आपल गाव सोडून मुंबईत आला.
पण इथे आल्यावर त्याला कळले की आपल्या देशापेक्षा बाहेरच्या देशात जास्त पैसे मिळतात मग तो पैसे कमविण्यासाठी सौदी अरेबियात गेला.
सौदी अरेबियात त्याने भरपूर पैसै मिळविले, त्यावेळी अब्दुल तेलगीचा लक्षात आले की आपल्या सारखं बऱ्याच लोकांना बाहेरच्या देशात जावून पैसे कमविण्याची इच्छा असते.
आणि या सर्व मधूनच त्यांच्या डोक्यात पासपोर्ट, कागदपत्र अशा गोष्टींची आवश्यकता असते.
पण ते नसल्यामुळ लोक आहे तिथंच अडकून राहतात आणि या सर्व गोष्टीमधून तेलगीचा डोक्यात सुपीक कल्पना रंगू लागली.
परत भारतात येवून वेगळ्या पद्धतीनें काम करुन पैसे कमवायचे असे विचार चालू लागले आणि ते भारतात आले.
अरेबियन मेट्रो ट्रॅव्हल्स कंपनीचा शुभारंभ
सौदी अरेबियात असतानाच जी कल्पना सुचली होती त्याला पूर्णत्वास नेण्यासाठी अब्दुल तेलगिने अरेबियन मेट्रो ट्रॅव्हल्स या नावाची कंपनी चालू केली.
नंतर त्याने स्टॅम्प पेपरचा व्यवसाय चालू केला, असं म्हटलं जातं की सौदी अरेबियातून परत आल्यावर तो ट्रॅव्हल एजंट बनला.
सौदी अरेबियात असो किंवा बाहेर कूठे जाण्यासाठी असो तेलगी खोटे डॉक्युमेंट्स आणि खोटे पासपोर्ट काढून देण्याचे काम करू लागला.
Abdul Karim Telgi चे असे म्हणणे होते की तो लोकाना बाहेर देशात पाठऊन समाजसेवा करत आहे, पान तसे काही नव्हते.
अल्पावधीतच या धंद्याने जोर धरला डुबलीकेट पासपोर्ट नंतर डुबलीकेट व्हिजा आणि डुबलीकेट इमिग्रेशन सर्टिफिकेट बनवायला सुरुवात केली.
ज्या लोकांना पासपोर्ट किंवा इतर डॉक्युमेंट्स बनवायला अडचणी येत असतील, त्या लोकांना अब्दुल तेलगी काहीच तासामध्ये पासपोर्ट बनवून देत होता आणि याच पासपोर्टच्या आधारे लोक देश सोडून बाहेर जात होते.
या सर्वाच्या आधारे तेलगीचा धंदा जोमाने चालू लागला.
पण म्हणतात ना जसे पैसे नसलेले लोकांना खटकते तसे जास्त पैसे येवू लागल्यावर देखील लोकांना खटकते तसेच काही सरकारी एजन्सींना त्याच्या या धंद्याबद्दल समजले.
मिळालेल्या माहितीनुसार बोगस पासपोर्ट बनविण्याच्या गुन्ह्यामध्ये तेलगीला 1991 मध्ये पहिल्यांदा अटक करण्यात आली होती.
स्टॅम्प पेपर घोटाळ्याची सुरुवात
सरकारी एजन्सी ना समजल्यावर या गुन्ह्यासाठी Abdul Karim Telgi ला जेलमध्ये जावे लागले.
जेलमधे गेल्यावर माणसे सुधारतात असे म्हणतात, तेथील वातावरणामुळे कदाचित असू शकते की माणसे शांत होतात त्यांचे आयुष्य बदलून जातं.
पण तेलगीच्या बाबतीत थोडे उलट घडलं, जेलच्या शांततेत त्यांना वेगळीच कल्पना सुचली तसेच संगतीचा परिणाम म्हणा जेल मध्ये तेलगी ची राम रतन या व्यक्तीशी भेट झाली.
या जेलमध्ये त्यांची मैत्री झाली, राम रतन याचा कोलकता येथे स्टॅम्प पेपरचा व्यवसाय होता.
त्यांची मैत्रीची समीकरणे व्यवसायाच्या निमित्ताने एकरूप झाली, राम रतनने यावेळी बनावट स्टँप पेपर बाबत तेलगीला सागितले आणि यातूनच दोघं भविष्याची स्वप्ने पाहू लागले.
स्टॅम्प पेपरच्या धंद्यात आपण पाण्यासारखा पैसा मिळवू शकतो अशी गोष्ट रामरतन ने तेलगी ला भरवली आणि अब्दुल तेलगीला देखील ते पटले.
काही महिन्यांनी तेलगी शिक्षा संपून जेलमधुन बाहेर पडला, बाहेर आल्यावर थोडा वेळ शांत बसून त्याने राम रतनशी संपर्क केला.
नंतर दोघे मिळून बनावट स्टँप पेपर विकायचे, त्यातून त्यांना भरपुर पैसे मिळत.
पण मोठया ताटात खायची सवय झाली की छोटे ताट माणसाला नको होत याची प्रचिती परत तेलगिला आली.
मग तेलगीने स्टँप पेपर या व्यवसायाबद्दलची सर्व माहिती काढली, त्याचा अभ्यास केला त्यातील अडचणी समजून घेतल्या आणि मग तेलगीने स्टँप पेपर विकायचे सरकारी लायसन्स काढून घेतले.
लायसन्स यासाठी काढले की पुढें त्याच्यावर संशय यायला नको पण तेलगीचा उद्देश अमाप पैसा मिळविणे हा होता.
तेलगीला यासाठी मशीनची गरज होती म्हणून त्याने इंडियन सिक्युरिटी प्रेस कडून स्टॅम्प मशीन घेतले.
ही मशीन घेताना देखील तेलगिने आपले सुप्त डोकं लावून लिलावातून ती खरेदी केली.
तसेच प्रिंटिंग साठी लागणारा कागद आणि शाहीची खरेदी मोठया प्रमाणावर केली यासाठी प्रिंटिंग मध्ये काम करणाऱ्या अधिकाऱ्याला मोठ्या प्रमाणात लाच देऊन त्यांची या कामामध्ये मदत घेतली.
स्टॅम्प पेपर बिझनेस यशस्वी
मशीन, शाई आणि कागद घेतल्यावर तेलगीला या कामामध्ये गती वाढवली यातून भरमसाठ पैसा मिळू लागला आणि मग Abdul Karim Telgi ने अजून मशीन घेतले.
कालांतराने तेलगिने स्टॅम्प पेपर ची फॅक्टरीच काढली, तसेच ही फॅक्टरी अशा ठिकाणी होती की सहजा सहजी कुणाला सापडणार नाही.
पहिला तर तेलगी स्वतचं काही लोकांना हाताशी धरुन हे काम करत होता, पण आता फॅक्टरी काढलीय म्हटल्यावर काम वाढले आणि मनुष्य बळाची गरज देखील तेलगीला भासू लागली.
मग तेलगीने देशभरातून 350 MBA ग्रॅज्युएट लोक कामासाठी घेतले, तरीही तेलगीला थोडी अडचण वाटू लागली.
मग तेलगिने ओरिजनल स्टॅम्प पेपर मध्ये आपले बनावट स्टॅम्प पेपर मिक्स करून विकण्यास सुरुवात केली.
या शिकलेल्या लोकांकडून तेलगी एकच काम करून घ्यायचा की, मोठ्या मोठ्या कार्पोरेट कंपन्या, ऑफिसमध्ये अशी सेटिंग लावली लावायची की तेथे फक्त अब्दुल चे स्टॅम्प पेपर घेतले जात.
तसेच ओरिजनल स्टॅम्प पेपर साठी जो कागद आणि शाई वापरली जायची तीच या बनावट स्टॅम्प पेपर साठी देखील तेलगी वापरायचा त्यामुळे हे स्टॅम्प पेपर बनावट आहेत, अशी शंकाच कुणाला यायची नाही.
त्यामुळं त्याचे ग्राहक आणि उत्पन्न वाढू लागले, हळूहळू तेलगीच्या या व्यवसायाने इतका जोर धरला की देशातील 28 पैकी 25 राज्यामध्ये बनावट स्टॅम्प पेपर विकले जात असत.
जवळपास 70 शहरांमधील प्रत्येक कार्यालयात आणि कोर्ट कचऱ्यामध्ये देखील तेलगीचे हे स्टॅम्प पेपर वापरले जाऊ लागले.
पुढें पुढें तर भारत सरकारचे ओरिजिनल स्टॅम्प पेपर तेलगी गायब करू लागला, हे करण्यासाठी सरकारी अधिकाऱ्यांना तो भरमसाठ लाच देत असे त्यामुळे त्यांचीही तोंडे बंद झाली.
त्यामुळं मार्केटमध्ये तेलगीच्या स्टॅम्प पेपरची मागणी वाढू लागली ते बनावट आहेत याची शंका देखील कोणाला यायची नाही.
अब्दुल करीम तेलगीने खुप मेहनतीने आणि हुशारीने हा धंदा सुरू ठेवला होता पण काळे धंदे कधी ना कधी समोर येणारच तसेच तेलगीचा हा धंदा सरकारी एजन्सी जवळ येवून पोहचला होता.
अखेर तेलगीला अटक / Finally Abdul Karim Telgi was arrested
सलग 8 वर्षे म्हणजे 1992 पासुन 2001 पर्यंत तेलगीचा हा बनावट स्टॅम्प पेपरचा हा धंदा सगळ्यापासून लपून आणि तेजीत सुरु होता.
पण, बेंगलोर पोलीस स्टेशनला एक ट्रक सापडला त्यात सगळे बनावट स्टॅम्प पेपर होते हे ड्रायवर कडून समजल.
केस वर काम केल्यावर समजल की ही केस दिसते तशी साधी नाही आणि मग पोलिसांनी कडक तपास सुरु केला.
केस साठी स्पेशल फोर्स अपॉइंट करण्यात आली, कारण सगळ्या कडया तेलगीपाशी येऊन जुळत होत्या, याची Abdul Karim Telgi ला खबर लागल्यावर तेलगी रातोरात गायब झाला.
सगळीकडे तेलगीची शोध मोहीम सुरू झाली, त्याचवेळी पोलिसांना समजले की तेलगी अजमेरच्या मशिदीमध्ये लपून बसला आहे आणि तेथे छापा टाकून पोलिसांनी नोव्हेंबर 2001 मध्ये तेलगीला अटक केली.
त्यानंतर पोलिसांना एक एक अशी माहिती मिळत गेली की पोलिसांना धक्क्यावर धक्के बसू लागले जवळजवळ आठ वर्ष खोट्या स्टॅम्प पेपरचा धंदा राजरोसपणे तेलगी करत होता.
तेलगीला विचारले असता तेलगी अजिबात पोलिसांना जुमानत नव्हता तसेच उडवा उडवीची उत्तरे देऊन त्यांचे दिशाभूल करत होता.
शेवटी पोलिसांनी तेलगिची नार्को टेस्ट केली, यावेळी त्याने सगळे कबुल केले, या नार्को टेस्ट मुळे ही देखील माहिती मिळाली की यामध्ये मोठमोठे अधिकारी आणि राजकीय मंडळी देखील सामील आहेत तसेच महाराष्ट्रातील दोन राजकीय नेत्यांची देखील नावे समोर आले.
पुढें ही केस सीबीआय च्या हातात गेली, पण सीबीआयच्या अधिकारी हे तेलगीभोवतीच फिरू लागले.
सीबीआयच्या चौकशीत समोर आले की तेलगीचा बिजनेस जवळजवळ 25 राज्यांमध्ये तसेच सत्तर शहरात हा बिजनेस चालू आहे.
तसेच अठरा शहरांमध्ये Abdul Karim Telgi ची 36 कोटी रुपयाची प्रॉपर्टी समोर आली, सीबीआयने सगळ्या गोष्टीचा विचार करता जवळजवळ 22000 ते 30000 कोटीचा रुपयांचा हा घोटाळा असल्याचे त्यांनी जाहीर केले.
देशाच्या इतिहासातील हा सगळ्यात मोठा घोटाळा होता, तर काही तज्ञ लोक म्हणतात की हा घोटाळा 1 लाख कोटी रुपयांहून मोठा होता.
अब्दुल करीम तेलगीची शिक्षा आणि मृत्यू
बनावट स्टॅम्प पेपर आणि करोडो रुपयांच्या घोटाळ्यासाठी तेलगिला 2006 मध्ये तीस वर्षाची सश्रम कारावासाची शिक्षा झाली.
तसेच अब्दुल करीम तेलगी ला 2002 कोटी रुपयाचा दंडही ठोठावण्यात आला होता.
तसेच अजून सहा ते सात लोकांना देखील शिक्षा सुनविण्यात आली होती शिक्षण नंतर अब्दुल करीम तेलगीला बेंगलोर मधील एका जेल मध्ये ठेवण्यात आले होते.
शिक्षा भोगत असतानाच 2017 ला शरीरातील अवयव निकामी झाल्याने तेलगीचा मृत्यू झाला.
Stamp Paper Scam कायदेशीर ठरविला
1992 ते 2001 पर्यंत तेलगिच्या बनावट स्टॅम्प पेपर ने जे जे व्यवहार झाले होते ते बेकायदेशीर ठरवण्यात आले.
पण यातील नुकसान हे सरकारला परवडणारे नव्हते, अनेक कुटुंबे उध्वस्त झाली असती, अनेकांच्या नोकऱ्या गेल्या असत्या म्हणून भले ते खोट्या स्टॅम्प पेपरवर व्यवहार झाले असतील पण ते कायदेशीर रित्या वैद्य मांडले जातील असा तो निर्णय सरकारने घेतला होता.
SCAM : 2003 वेबसिरिज
स्कॅम 1992 : द हर्षद मेहता स्टोरी या वेब सिरीजने धुमाकूळ घातला होता.
आता याच वेब सिरीज चे दिग्दर्शक हंसल मेहता स्कॅम : 2003 अब्दुल करीम तेलगीची वर आधारित ही नवीन वेब सिरीज घेऊन येत आहेत.
अब्दुल करीम तेलगिने बनावट स्टॅम्प पेपर द्वारे फसवणुकीच्या जोरावर कसे आपले साम्राज्य उभा केले.. हे सर्व यामध्ये दाखवण्यात येणार आहे.
ही वेब सिरीज रीलीज झाली असून ती सर्व लोकांना आवडत आहे.
धन्यवाद, माय मराठी ब्लॉग
हे सुद्धा वाचा
- Neuralink म्हणजे काय ? Neuralink information in Marathi
- Data Science म्हणजे काय ? | डेटा सायन्स ची संपूर्ण माहिती
- मराठी माणूस आणि रोजगार | Marathi manus aani rojgar
- नॉर्थ सेंटीनेल आयलँड |North Sentinal Island Information in Marathi
- अविश्वास प्रस्ताव म्हणजे काय? | No confidence motion in marathi
- Eye flu म्हणजे काय ? डोळे येणे | Eye Flu in marathi
- ECG test म्हणजे काय? | ECG Information in marathi
- What is Hindu Dharm? | Hindu Religion explained in Marathi
- ChatGPT म्हणजे काय ? Magic of AI in Marathi
- oppenheimer कोण होता ? | j. robert oppenheimer
- Uniform civil code | यूनिफॉर्म सिविल कोड
- Trademark Registration in India | ट्रेडमार्क रजिस्ट्रेशन प्रोसेस
- Food license documents in Marathi | फूड license कसे घ्यावे?
- Top 10 Marathi Blogging Tips | मराठी ब्लॉगिंग टिप्स
- Marathi blog कसा लिहावा | How to write Marathi blog
- Blog in Marathi म्हणजे काय? How to write a blog in Marathi