2G Spectrum Scam case | 2 जी स्पेक्ट्रम घोटाळा

2g spectrum scam case in marathi

देशभरात गाजलेला आणि 1 लाख 76 हजार कोटीचा 2G SPECTRUM SCAM / 2 G स्पेक्ट्रम घोटाळा प्रकरण मधील जे कोणी आरोपी होतें त्याची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आणि म्हणुनच 2G स्पेक्ट्रम घोटाळ्याच्या चर्चेला उधाण आलं आहे.

आज आपण 2G Spectrum Scam नेमका कसा झाला ? 2 G स्पेक्ट्रम म्हणजे नेमकं काय ? हे जाणून घेणार आहोत.

भारतात 2G स्पेक्ट्रम कधी आले, त्याचा उपयोग कशासाठी केला जायचा, 2 G स्पेक्ट्रम घोटाळा प्रकरण काय आहे.

गेल्या काही वर्षामध्ये त्यात नेमके कसे बदल झाले, याची आपण मुद्देसूद माहिती घेवूया.

2G स्पेक्ट्रम म्हणजे काय ? What is 2G Spectrum ?

2G स्पेक्ट्रम म्हणजे अशी रेडिओ फ्रिक्वेन्सी जी(Second generation) दुसऱ्या पिढीच्या वायरलेस टेलिकम्युनिकेशन तंत्रज्ञानासाठी वापरली जाते.

इंटरनेट आणि सोशल मीडियाने सर्व जगाला जवळ आणले आणि सर्व काही बदलून टाकले.

भारतात इंटरनेटचा वापर वाढला.. त्यामूळे ध्वनीलहरी अपुऱ्या पडू लागल्या. त्यामुळं तत्कालीन काँग्रेस सरकारने 2007 मध्ये ध्वनी लहरी म्हणजेच टू जी स्पेक्ट्रमच्या विक्रीचा निर्णय घेतला.

त्यासाठी भरपुर खर्च ही होता आणि अनेक परवाने देखिल लागणार होते, तब्बल 22 परवान्याचे वितरण त्यावेळी करण्यात आले.

साधारणपणे स्पेक्ट्रम ची विक्री ही लीलावाद्वारे केली जाते, पण त्यावेळी काँग्रेसचे तत्कालीन मंत्री ए. राजा यांनी “प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य” या तत्त्वावर विक्री करण्याचा घाट घातला होता.

या स्पेक्ट्रमच्या विक्रीसाठी अर्ज करण्यासाठी थोडीच मुदत दिलेली होती.

पण कमी लोकांच्या अभावाने यामध्ये वाढ देखील केली गेली, 2009 साली या 2G स्पेक्ट्रम च्या विक्रीत गैरव्यवहार झाल्याचं निदर्शनास आल. 

गैरव्यवहाराची चौकशी

2G Spectrum Scam बाबत त्यानंतर ए राजा ची कसून चौकशी करण्यात आली.

त्यात CAG ने आपला अहवाल सादर केला, त्यामध्ये असे लिहले होतें की 2G स्पेक्ट्रम हा सर्वांत मोठा घोटाळा झाला असून त्यामध्ये भारत सरकारचे 1 लाख 76 हजार 645 कोटींच नुकसान झाल्याचा दावा केला होता.

त्याचे खुप मोठे पडसाद काँग्रेस पक्षावर उमटले.

2G स्पेक्ट्रम विक्री कशी झाली

2001 च्या दरानुसार 2008 मध्ये स्पेक्ट्रम विक्री केल्याने मोठे अर्थिक नुकसान झाल्याचं निदर्शनास आले.

2008 मध्ये स्पेक्ट्रम ची किंमत बरीच वाढली होती तरीही 2001 च्या मूल्य किंमतीत परवाने विकले गेले.

यामुळेच सरकारच्या महसुलाचे मोठं नुकसान झालं, टेलिकॉम शेत्रातील काही संबंध नसलेल्या कंपन्यांनी अतिशय कमी दरात सरकारकडून स्पेक्ट्रम खरेदी केले आणि इतर कंपन्यांना मोठया दराने विकुन त्या कंपन्यांना भरपुर फायदा झाला.

त्यासाठी दूरसंचार मंत्री ए. राजा यांनी 3 हजार कोटींची लाच घेतल्याचा आरोप करण्यात आला होता. 

2G स्पेक्ट्रम घोटाळ्यात समावेश असलेल्या व्यक्ती

या घोटाळ्यात माजी दूरसंचार मंत्री ए. राजा, खासदार काझिमोनी, श्वान टेलीकॉमचे शाहिद बलवा, रिलायन्सचे अनिल अंबानी यासारखे अनेक कार्पोरेट क्षेत्रातील अधिकारी तसेच राजकारणी मंडळी यांचा समावेश होता.

यांच्यासह 18 जणांविरोधात या घोटाळ्याबाबत गुन्हे दाखल करण्यात आले.

ए. राजा यांना 2 फेब्रुवारी 2011 रोजी तर 11 मे रोजी काझिमोनी अटक केली गेली.

यावेळी विक्री केलले सर्व 122 परवाने रद्द करण्यात आले. 

किती वर्ष चालले खटल्याचे काम

2G Spectrum Scam खटल्याचे कामकाज तब्बल 7 वर्ष चालले.

21 डिसेंबर 2017 रोजी मुख्य आरोपी ए. राजा यांच्यासह सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली.

2G स्पेक्ट्रम विक्रीत कोणतेही कारस्थान झाल्याचे दिसत नाही, कोणताही आरोप सिद्ध झाला नाही असे ताशेरे विशेष न्यायालयाने ओढले. 

विशेष सीबीआय न्यायालयाने 2017 मध्ये या प्रकरणाची कसून चौकशी केली कसून त्याचा तपास देखील केला पण पुराव्याअभावी या प्रकरणातील सर्व दोषींची निर्दोष मुक्तता केली गेली. 

त्यानंतर 2018 मध्ये हे प्रकरण सीबीआय आणि ईडीने उच्च न्यायालयाकडे सोपविले होते.

उच्च न्यायालयाने निर्दोष मुक्तता बाजूला ठेवून या प्रकरणाचा खटला नव्याने चालवण्याचे आदेश दिले होते.

2G स्पेक्ट्रम घोटाळ्याचे प्रकरण भारताच्या नियंत्रक आणि महालेखा परिक्षक ने आपल्या अहवालात उघड केला आहे. 

2G स्पेक्ट्रम घोटाळा नंतर सरकार बदलले

या घोटाळ्यामुळे देशात अनेक देशव्यापी आंदोलने आनी निदर्शने झाली.

2G Spectrum scam परवान्याच्या वाटप करताना पंतप्रधानांनी यामध्ये लक्ष घातले होते की नाही यावरून टार्गेट मनमोहन सिंग यांना करण्यात आले.

त्यावेळी ते दळण वळण आणि माहिती मंत्री देखील होते, या घोटाळ्यामुळे त्यांच्या कार्यकारणीवर प्रश्नचिन्ह उभे केले आणि त्यांच्या राजीनाम्याची मागणीही करण्यात आली होती.

तसेच या घोटाळ्यानंतर यु. पी. ए सरकारच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले.

तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांची प्रतिमा मलिन झाली, हे घोटाळे बाजांचे सरकार असल्याचं चित्र उभे करण्यास भाजप यशस्वी झाला.

याचा परिणाम म्हणजे काँग्रेसला त्यावेळी सत्तेतून पायउतार व्हावं लागल आणि त्यावेळीच देशात 2014 मध्ये मोदी सरकार आलं. 

घोटाळ्यामुळे दूरसंचार आणि सरकारवर परिणाम

भ्रष्टाचार, घराणेशाही आणि आपल्या पदाचा अयोग्य वापर यामुळं काँग्रेस सरकार यांच्यावर अविश्वास निर्माण झाला त्याचं कारण म्हणजे 2G Spectrum Scam Case तसेच या घोटाळ्यानंतर दूरसंचार क्षेत्रावर सर्वव्यापी परिणाम झाला.

त्यांचं कामकाज ठप्प झाल, थोड्या महिन्यांनी त्यामध्ये योग्य ते बदल करुन प्रामुख्याने लक्ष केंद्रित करुन त्याचे काम सुरु केलं गेलं.

5G ची क्रांती

भारतात सध्या 5G जोर धरुन आहे, अलीकडेच 5G लिलाव प्रक्रिया पार पडली.

यामध्ये रिलायन्स जिओच्या अंबानी यांनी बाजी मारली आहे 5G च्या सेवेमुळे टेलिकॉम क्षेत्रात अग्रगण्य प्रगती होणार आहे.

भारतात मोठमोठ्या शहरामध्ये 5G वापरायला सुरुवात कधीचं झाली आहे.

5G आल्या मुळे आता नवनविन आव्हाने आणि शोध मोहिमेला नक्कीच एक दिशा मिळेल, पुढें पुढें आपल्याल मोबाइल नेटवर्कची आधुनिक पिढी म्हणन संबोधले जाईल.

पण अखेर देशाचं राजकारण हादरवणारा, पंतप्रधानाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण करणारा आणि थेट देशात सत्ता बदल करणारा 2G Spectrum Scam Case अखेर बिनबुडाचा ठरला.

धन्यवाद, माय मराठी ब्लॉग

हे सुद्धा वाचा

RSS
Instagram