Vande Bharat express ची मराठी माहिती | वंदे भारत एक्सप्रेस

vande bharat express information in marathi

या ब्लॉग मध्ये तुम्हाला Vande bharat express ची संपूर्ण माहिती मिळेल, तर चला सुरू करूया …..

16 एप्रिल 1853 साली भारताची पहिली रेल्वे धूर सोडत निघाली, बोरीबंदरच्या लाकडी स्थानकावर 14 डब्यांची ही रेलगाडी भायखळापर्यंत धावली.

त्यानंतर या रेल्वे इंजिनला अशी गती मिळाली की ती थांबलीच नाही, काही वर्षांच्या कालावधीमध्ये रेल्वेसाठी स्वतंत्र अर्थसंकल्प स्थापित करण्यात आला.

अनेक पुल, अनेक स्टेशन्स आणि अनेक बोगदे असा त्यांचा आपल्या रेल्वेचा प्रवास आजतागायत सुरु आहे.

हा झाला इतिहास पण आज् आपणं माहिती बघणार आहोत, Vande bharat express बद्दल.. पहिल्यादा ट्रेन कुठं धावली ? वन्दे भारत ट्रेनची रचना कशी आहे ?

आपल्या महाराष्ट्रात ती किती ठिकाणी धावते, त्याचे तिकीट दर काय आहेत ? या सगळ्याची उत्तम इत्यंभूत माहिती या blog मध्ये आपण पाहणार आहोत.

Vande Bharat Express ची सुरुवात

वंदे भारत रेल्वे सगळ्यात पहिल्यांदा वाराणसी मधून धावली, 15 फेब्रुवारी 2019 रोजी नरेंद्र मोदींच्या हस्ते वंदे भारत ट्रेनचे उद्घाटन करण्यात आले. 

वाराणसी ते दिल्ली पर्यन्त पहिली vande bharat express सज्ज झाली.

आताच्या घडीला देशभरात 10 वंदे भारत ट्रेन सुरु झाल्या आहेत, तसेच आणखी 9 ट्रेन्स याच मार्गावर सुरु करण्यात येणार आहेत.

तसेच महाराष्टात 4 वंदे भारत ट्रेन सध्या सूरू आहेत, पूर्णतः भारतात तयार झालेल्या या वंदे भारत ट्रेनला ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी पुरेपूर बसवलेले आहेत.

त्यामुळं प्रवासी देखिल त्याचा पुरेपूर उपयोग करताना दिसत आहेत. 

वंदे मातरम् ही कविता बंकिमचंद्र चॅटर्जी यांनी लिहिली होती. तर रवींद्रनाथ टागोर यांनी याचे गाण्यात रुपांतर केलं होत ते म्हणजे “वंदे मातरम्” आणि याच भारत मातेच्या शिरपेचात मानाचा तुरा म्हणजे “Vande Bharat Express / वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन..”

ऑटोमॅटिक दरवाजा, सीसीटीव्ही आणि बरंच काही

ही रेल्वे 18 डब्यांची आहे, त्यामुळं तिला T – 18 म्हणून ओळखलं जातं होत.

पण थोड्याच अवधीत या डब्याची संख्या घटवून 16 करण्यात आली आहे, पुर्ण विजेवर चालणारी रेल्वे म्हणुन वंदे भारत ट्रेनला ओळखले जाते.

वंदे भारत एक्सप्रेस मध्ये सगळीकडे ऑटोमॅटिक दरवाजे बसवलेले आहेत.

कोणताही दरवाजा असो चढण्याच्या किंवा उतरण्याचा सर्वकाही ऑटोमॅटिक आहे तसेच आपण कधी उत्तरलो कधी चढलो तसेच आपल्या आणि त्यांच्या सेफ्टीसाठी सुरक्षिततेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसवलेले आहेत.

वंदे भारत ट्रेनमध्ये 16 वातानुकूलित डबे आहेत, तर त्यापैकी 2 डबे हे एज्युकेटिव्ह कोच क्लास आहेत.

Vande Bharat Express ची बैठक व्यवस्था

ज्या काही सीटिंग खुर्च्या आहेत त्या 360 डिग्री फिरतात खुर्चीच्या खालीच सीटिंग अरेंजमेंट असते त्याच्यानुसार आपण खुर्ची इकडे तिकडे आपल्याला पाहिजे तसे अरेंज करू शकतो.

तसेच झोपण्यासाठी सुद्धा आपण खुर्ची मागे पुढे करू शकतो, वंदे भारत ट्रेनची एक सगळ्यात महत्त्वाची खासियत म्हणजे वंदे भारत ट्रेनच्या प्रत्येक खुर्चीला चार्जिंग लावता येईल अशी सिस्टीम आहे.

तसेच 2 बाय 3 म्हणजे एका बाजूला 3 आणि एका बाजूला 2 व्यक्ती बसू शकतील अशी देखील व्यवस्था वंदे भारत ट्रेन मध्ये आहे.

संपुर्ण विमानात जी सेवा असते ती सेवा वंदे भारत ट्रेनमध्ये प्रवासांना मिळत आहे. 

मेक इन इंडिया (Make in India) आणि वंदे भारत ट्रेन

Vande Bharat Express च्या स्थापनेमागे नरेंद्र मोदी व त्यांच्या सहकाऱ्यांचा मोठा वाटा आहे, मेक इन इंडिया या संकल्पनेतून ही रेल्वे साकारलेली आहे.

वंदे भारत ही देशातील पहिली हाय स्पीड, पुर्ण ऑटोमॅटिक ट्रेन आहे.

वंदे भारत एक्सप्रेस ची आसन क्षमता

vande bharat express या ट्रेन मध्ये एकूण १,१२८ प्रवासी बसू शकतात.  

संपूर्णपणे वातानुकुलित असलेल्या ह्या गाडीत शयनयान सुविधा नसून केवळ बसण्याची सोय आहे.

प्रवाशांच्या सोयीसाठी स्वतंत्र मोबाईल चार्जिंगची सुविधा, जेवण किंवा नाश्ता करण्यासाठी फोल्डेबल कॉम्पॅक्ट टेबल, वेगवेगळ्या घाटासह विविध दृश्य पाहण्यासाठी ३६० डिग्री रोटेट चेअर ही आहेत.

वाय-फाय, गाडीचा वेग, पुढील स्थानक इत्यादी माहिती पुरवणारी यंत्रणा, स्वयंचलित दरवाजे, आपोआप फ्ल्श होणारी शौचालये, अगदी विमानात प्रवास करावा अशा पद्धतीच्या अद्ययावत सुविधा ह्या गाडीमध्ये देण्यात आल्या आहेत.

स्क्रीनद्वारे प्रत्येक गोष्टीची माहिती

वंदे भारत ट्रेनमध्ये ट्रेन कुठून आली, कुठे जाणार आहे, तसेच कोणते स्टेशन आलं आहे, दरवाजा आता बंद होईल दरवाजा आता उघडणार आहे.

या प्रत्येक गोष्टीची माहिती आपल्याला प्रत्येक डबाच्या स्क्रीनवर पाहायला मिळेल.

प्रवासांना योग्य ती माहिती वेळोवेळी देण्यासाठी GPS आधारित ऑडिओ – व्ह्युजवल पॅसेंजर इन्फॉर्मेशन सिस्टीम बसवण्यात आलेली आहे.

तसेच प्रत्येक गोष्टीची स्पीकर द्वारे तुम्हाला वेळोवेळी माहिती दिली जाते.

यामध्ये दरवाजा उघडणार आहे बंद होणार आहे, डावीकडून उघडणार की उजवीकडून अशा प्रकारची सगळी माहिती आपल्याला पहायला मिळते. 

वंदे भारत एक्सप्रेस चे स्पीड

वंदे भारत एक्सप्रेस चे स्पीड 160 किलोमीटर प्रतीतास आहे.

म्हणजे नेहमीच्या ट्रेन पेक्षा तुम्हाला हव्या असलेल्या ठिकाणी 2-3 तास आधीच पोहोचू शकता.

बरोबर टाईम टू टाईम ज्या-त्या फलाटवरून ट्रेन चालू होते व टाइम टू टाइम थांबते तसेच प्रत्येक फलट वर 2 मिनिटांमध्ये अजिबात टाईमपास न करता ट्रेन चालू करावी लागते. 

नाश्त्याची आणि जेवणाची व्यवस्था

vande bharat express च्या प्रत्येक डब्यामध्ये नाश्त्याची व जेवणाची चांगल्या प्रकारची व चांगल्या प्रकारच्या पदार्थांची उत्तम अशी सोय असते.

त्याचबरोबर चहा ,कॉफी, कोल्ड्रिंक याची देखील सोय असते.

आपले तिकीट बुक करतानाच आपण थोड्या ऑप्शन वर क्लिक केलं तर चांगल्या प्रकारचे शाकाहारी व चांगल्या प्रकारचे मांसाहारी जेवण सुद्धा आपल्याला वंदे भारत ट्रेनमध्ये मिळते.

तसेच जर तुम्ही त्यावेळी काही समजलं नसल्याने जर फूड हा ऑप्शन सिलेक्ट केला नसला तर ट्रेनमध्ये जास्तीचे पैसे देऊन तुम्हाला जेवण चहा नाष्टा घेता येतो.

वंदे भारत ट्रेनमध्ये बाहेरच्या फेरीवाल्यांचा त्रास तुम्हाला अजिबात होणार नाही कारण जेवणाची, चहाच्या वेळेनुसार जी काही वेळ असेल त्याप्रमाणे तुम्हाला आणून दिले जाते.

त्यामुळे विनाकारण आवाज किंवा फेरीवाल्यांच्या गोंगाट्याच्या त्रासापासून वंदे भारत ट्रेनमध्ये तुम्हाला नक्कीच मुक्ती मिळेल.

वंदे भारत ट्रेनच्या तिकीटाची किंमत

या ट्रेनचे तिकिटाचे दर प्रवासाच्या अंतरानुसार ठरवले जातात.

वंदे भारत ट्रेनच्या तिकिटामध्ये साधारण चेअर कार आणि एक्झिक्युटिव्ह चेअर कार असे दोन प्रकार पडतात.

तसेच वंदे भारत ट्रेन काही मोजक्याच ठिकाणी थांबते, तिकिटाचे बुकिंग करताना फूड ऑप्शन सिलेक्ट केला असेल तर तुम्हाला तिकिटाच्या दरासोबतच थोडीशी सवलत ही मिळते व जेवण नाश्ता चहा देखील मिळतो.

कमी वेळात लवकर पोहोचण्याचे काही लोकांचे स्वप्न वंदे भारत ट्रेनच्या सहाय्याने पूर्ण होऊ शकते. 

अप्रतिम सुविधा व निसर्गाचा आनंद

वंदे भारत ट्रेनमध्ये चढल्यापासून ते तुम्ही उत्तरेपर्यंत ट्रेनचे कर्मचारी आपल्याला हवी ती गोष्ट हवी ती वस्तू आपल्या हातात आणून देतात.

शिवाय जेवण व नाश्ता याची सोय देखील खूपच चांगल्या प्रकारचे असते.

पण तरीही कोणत्याही प्रकारची अस्वच्छता आपल्याला ट्रेनमध्ये पाहायला मिळणार नाही.

जिकडे बघेल तिकडे सर्व काही ऑटोमॅटिक असल्याने स्वच्छता देखील चांगल्या प्रकारचे असते.

आणि ट्रेनच्या खिडक्या अशा काही पद्धतीने बसवल्या आहेत की बाहेरच्या निसर्गाचे संपूर्ण दर्शन आपल्याला आतमध्ये होते.

सूर्य मावळत आहे किंवा पाऊस पडत आहे किंवा ऊन पडत आहे हे सर्वकाही आपण आत मध्ये बसून पाहू शकता, एकंदरीत कोणत्याही ऋतूचा आनंद आपल्याला घेता येतो.

धार्मिक स्थळांना भेटी

भारतातील सर्वांत वेगवान रेल्वे म्हणुन सद्या वंदे भारत ट्रेनला ओळखले जाते.

नाशिकचे रामकुंड , त्र्यंबकेश्वर आणि शिर्डी अशा अनेक स्थळांना भेटी देणाऱ्या भाविकांची संख्या मोठी असल्याने भाविकांसाठी वंदे भारत ट्रेन खास आकर्षण बनली आहे.

एक्झिक्यूटिव्ह चेअर कार

वरती सांगितल्याप्रमाणे एक्झिक्युटिव्ह कोच क्लासचा एक डब्बा असतो त्यामध्ये 2-2 प्रकारे सीटिंग असते.

एक्झिक्युटिव्ह कोच क्लासचा अर्थ असा की यामधील ज्या खुर्च्या असतात ते 180 काटकोनात मागे- पुढे आजूबाजूला होतात.

त्यामुळे आपण कोणत्याही बाजूला बसू शकतो. तसेच आपल्याला जर खिडकीच्या बाजूने निसर्गाचा आनंद घ्यायचा असेल तर आपण तिकडे तोंड करून देखील बसू शकतो.

फक्त याचे एक्स्ट्रा पैसे आपल्याला भरावे लागतात.

एक्झिक्युटिव्ह कोचचा अजून एक फायदा म्हणजे जर तुम्ही ग्रुपने येत असाल तर समोरासमोर बसून आपण एकमेकांशी गप्पा देखील मारू शकतो फॅमिली साठी हा डब्बा आनंदाची पर्वणीच म्हणावी लागेल.

वंदे भारत मेट्रो

लोकल रेल्वे, मेट्रो रेल्वे यांच्या पार्श्वभूमीवर वंदे भारत मेट्रो देखील चालू करण्याचा रेल्वे मंत्रालयाचा विचार आहे.

लोकल रेल्वे प्रमाणे उपनगरांना जोडणारी मेट्रो म्हणुन भविष्यात ओळखली जावू शकते. 

वंदे भारत ट्रेनने एक वेळ सगळ्यांनी नक्कीच प्रवास करावा, निसर्गाचा आनंद व प्रवासाचा आनंद काय असतो तो या ट्रेनमध्ये तुम्हाला नक्कीच मिळून जाईल.

vande bharat express ही ट्रेन आपल्या भारत देशामध्ये बनवली गेलेली ट्रेन आहे.

आपल्या देशामधील एक नंबरची ट्रेन म्हणून ती आता ओळखली जात आहे, त्यामूळे आपल्या सर्वांसाठी ही खरंच खुप मोठी अभिमानास्पद अशी गोष्ट आहे.

धन्यवाद, माय मराठी ब्लॉग

हे सुद्धा वाचा

RSS
Instagram