आपल्या देशात North Sentinel Island नावाची एक जागा आहे आणि तिथे अशी एक जमात आहे जी सगळ्या गोष्टींपासून अलिप्त तर आहेच व ते अजूनही आदी मानवासारखे आयुष्य जगत आहेत.
इतकेच काय तर त्यांना आजच्या काळात शेती करणे देखील माहीत नाही.
आपण आधुनिकतेची कास धरून आता एकविसाव्या शतकात जगत आहोत, कॉम्प्युटर, मोबाईल, टॅबलेट, कार, रॉबर्ट आणि आता आर्टिफिशिअल इंटेलिजन्स या सगळ्या गोष्टी आपल्यासाठी परिचित आहेत.
आपण रोज एक नवीन संशोधन करत आहोत आणि दिवसागणिक प्रगती करत आहोत पण तुम्हाला माहित आहे का? North Sentinel Island वर राहणाऱ्या लोकाना यांची थोडीसुद्धा माहिती नाही.
तुम्ही म्हणाल हे कसे शक्य आहे? विश्वास नाही बसत ना तुमचा? पण अशी एक आदिवासी जमात आणि असा प्रदेश आपल्या भारतातच आहे.
सेंटीनेल आदिवासी म्हणजेच SENTINEL TRIBE विषयी आज आपण नवीन माहिती जाणून घेणार आहोत.
रहस्यमय बेट आणि रहस्यमय आदिवासी लोकं | North Sentinel Island
भारतात अंदमान-निकोबार द्विप समूहामध्ये (NORTH SENTINEL ISLAND) उत्तर सेंटीलन बेट आहे, या बेटावर सेंटीनेलिज नावाची आदिवासी जमात राहते.
हे आदिवासी लोक आपल्या जगापासून पूर्णपणे अलिप्त आहेत.
त्यांचा ते राहत असलेल्या बेटाशिवाय आणि त्यांच्या समूहातील लोकांशिवाय बाहेरच्या जगाशी कोणताही संपर्क नाही.
ते लोक आपल्या जगापासून अलिप्त आणि एकाकीने आहेत, त्याचे कारण देखील ते स्वतःच आहेत कारण त्यांना बाहेरून त्यांच्या संपर्कात आलेले लोक आवडत नाहीत.
ते बाहेरील लोकांवर सरळ हल्ला करतात, North sentinel island वरील लोकणविषयी भारत सरकारकडे देखील ठोस अशी माहिती नाही.
सेंटीनल बेटावरील निसर्ग कसा आहे ?
North Sentinel Island / सेंटीलन बेट चारी बाजूंनी समुद्राने घेरलेले तर आहेच व या बेटावर घनदाट जंगल देखील आहे.
आपल्या सारख्या सामान्य लोकांना जाण्यासाठी हा अतिशय दुर्गम भाग आहे, तिथे अनेक जंगली प्राणी आणि वेगेवेगळे वनस्पती आढळतात.
निसर्गाने देखील या आदिवासी लोकांच्या अलिप्त राहण्याला साथ दिली आहे असं म्हणावं लागेल.
नॉर्थ सेंटीलन बेटावर जाण्यास मनाई का आहे ?
North sentinel island वर जाण्यास संकट मनाई आहे कारण या बेटावर गेल्या साठ हजार वर्षांपासून सेंटीनेलिज ही आदिवासी जमात राहते.
ही जमात आपल्या बाह्य जगापासून अलिप्त तर आहेच पण त्यांना बाहेरून त्यांच्या बेटावर कोणी गेलेलं आवडत नाही.
ते बाहेरून जाणाऱ्या लोकांवर हल्ला करतात, त्यामुळे नॉर्थ सेंटीलन बेटावर सामान्य नागरिकांना जाण्यास मनाई आहे.
शासनाकडून योग्य परवानगी घेऊन इथे फक्त प्रशासकीय अधिकारी जाऊ शकतात.
सेंटीनेलिज आदिवासी लोकांची लोकसंख्या किती आहे ? Population on North Sentinel Island
हे सेंटीनेलिज लोक कोणाला ही त्यांच्या जवळ आणि बेटावर येऊ देत नाहीत त्यामुळे या लोकांची गणना छायाचित्रांव्दारे केली जाते.
त्यामुळे सेंटीनेलिज आदिवासी समूहाची निश्चित लोक संख्या माहीत नाही पण अंदाजे एकूण पन्नास ते शंभर लोकांचा समूह त्या बेटावर वास्तव्यास आहे असा प्रशासनाचा अंदाज आहे.
सेंटीनेलिज आदिवासी लोकं दिसतात कसे आणि खातात काय ?
सेंटीनेलिज लोक निग्रो वांशिक आहेत, उत्तर सेंटीलन बेटावर सर्वेक्षणात कोणती ही शेती होत असलेली आढळून आली नाही.
त्यामुळे हे लोकं मासेमारी करून, तसेच समुहाने जंगली जनावरांची शिकार करून आणि जंगली वनस्पती खाऊन जगतात असा अंदाज आहे.
सेंटीनेलिज आदिवासी जमात राहते कशी ?
सेंटीनेलिज आदिवासी लोक झावळ्या आणि मातीच्या भिंत्ती बांधून त्याचा निवारा तयार करतात आणि अशा निवाऱ्यांमध्ये हे लोक राहतात.
त्यांच्या निवाऱ्यांची छायाचित्रे उपलब्ध आहेत त्यातून ते झोपडी व निवऱ्यात राहत आहेत असे आढळून आले आहे.
सेंटीनेलिज आदिवासी लोकांची भाषा कोणती आहे ?
हे आदिवासी लोकांच्या भाषेची कोणतीही लिपी नसावी, ते लोक सेंटीलन भाषा बेलतात असा अंदाज आहे.
सेंटीनेलिज आदिवासी लोक कोणती हत्यारे वापरतात ?
North sentinel island वरील लोकाना धातूंची माहिती नाही ते समुद्रातून वाहून आलेल्या धातूंचा वापर करून त्यांची हत्याने बनवण्यासाठी करतात.
तसेच धनुष्य बाण आणि भाले ही त्यांची मुख्य हत्यारे आहेत.
कोणी बाहेरील व्यक्ती त्यांच्या संपर्कात आल्यास ते बाणांचा मारा करून त्यांना ठार करतात.
त्सुनामी नंतर त्यांना मदत करायला म्हणून अन्न- पाणी हवेतून टाकायला गेलेल्या हेलिकॉप्टरवर त्यांनी जमिनीवरून बाणांचा मारा केला होता त्यामुळे पायलटला हेलिकॉप्टर घेऊन तेथून काढता पाय घ्यावा लागला होता.
भारतातील ही सगळ्यात घातक जमात का समजली जाते ?
या लोकांना बाहेरील लोक यांच्या बेटावर आलेले आवडत नाही, सेंटीनेलिज लोक बाहेरून आलेल्या लोकांना मारून टाकतात.
2004 मध्ये जेंव्हा त्सुनामी आली तेंव्हा या बेटावर देखील पाणी भरले होते म्हणून सरकारने तिथं हेलिकॉप्टरमधून अन्न- पाणी टाकून तिथल्या लोकांना मदत करण्याचा प्रयत्न केला पण या आदिवासी लोकांनी जमिनीवरून हवेत बाणांचा मारा केला ज्यामुळे हेलिकॉप्टरला परत फिरावे लागले.
सेंटीनेलिज लोकांनी 2006 मध्ये बेटावर चुकून गेलेल्या दोन कोळी लोकांना ही मारलं आहे तसेच 2018 मध्ये बेकायदेशीर रित्या बेटावर ख्रिस्त धर्माचा प्रसार करायला गेलेल्या जॉन एलेन चाऊ या ख्रिस्ती मिशनरीला देखील मारले आहे.
प्रशासकीय अधिकारी त्यांच्या बेटावर गेले होते तेंव्हा सेंटीनेलिज लोकांनी त्यांच्याकडून काही नारळ घेतले होते ते ही अगदी लांबून.
तोच त्यांचा बाह्य जगाशी जो काही आला तो संबंध आहे, या लोकांना बेटावर कोणत्याही बाह्य लोकांचा हस्तक्षेप नको आहे.
त्यामुळे भारत सरकारने सामान्य नागरिकांना बेटावर जायला मनाई केली आहे.
ब्रिटिश सरकारचा फसलेला प्रयोग
1880 मध्ये ब्रिटिश सरकारने या लोकांवर संशोधन करण्यासाठी सेंटीलन बेटावरून दोन वृद्ध आणि दोन बालकांना पळवून आणले होते.
पण हे चार आदिवासी बेटा बाहेरील वातावरणाच्या संपर्कात येताच आजारी पडले आणि मरणासंन्न अवस्थेत पोहोचले त्यामुळे त्यांना पुन्हा बेटावर सोडून देण्यात आले.
भारत सरकारचा विशेष कायदा | North Sentinel Island
या सेंटिनेलीज लोकांच्या जमातीला अंदमान आणि निकोबार बेटांच्या ग्रेट अंदमानीज, ओंग, जरावा आणि शॉम्पेन पीव्हीटीजी म्हणून इतर चार जमातींच्या बरोबरीचा दर्जा दिला जातो.
या सर्व जमातींना अंदमान आणि निकोबार द्वीपसमूह (आदिवासी जमातींचे संरक्षण) नियमन, 1956 द्वारे संरक्षण दिले गेले आहे.
हा कायदा आदिवासींच्या ताब्यातील पारंपारिक क्षेत्रे संरक्षित क्षेत्र म्हणून घोषित करतो.
अधिकारी वगळता इतर कोणालाही प्रवेश करण्यास मनाई करतो.
यासोबतच या आदिवासींचे फोटो काढणे किंवा त्यांच्यावर कोणत्याही प्रकारचे चित्रीकरण करणे हा गुन्हा आहे.
तसेच या लोकांनी कोणाचा खून केला तर या लोकांवर भारत सरकार कोणताही खटला दाखल करत नाही.
सेंटीनेलिज लोकांना कोणत्या भेटवस्तू आवडत असतील ?
एन. पंडित हे 1991 मध्ये मानववंश संशोधन टीमचा भाग बनून सेंटीलन बेटावर गेले होते.
त्यांनी सांगितले की सेंटीनेलिज लोकांनी त्यांच्या टीमला पहिल्यांदा त्यांच्या जवळ येऊ दिले.
त्यांनी भेट म्हणून सेंटीनेलिज लोकांना नारळ आणि लोखंडाचे तुकडे दिले ते सेंटीनेलिज लोकांनी घेतले होते.
सेंटीलन बेटावर नारळाची झाडे नाहीत आणि लोखंड त्यांना धनुष्यबाण तसेच भाले बनवायला उपयोगी येतात.
जगभरात आदिवासी समुदाय कमी होत असताना सेंटीलन आदिवासी समूह अजून कसा टिकून आहे ?
एकूणच जगभरातील आणि अंदमान- निकोबार द्विप समूहावरील बाकी बेटांवरील आदिवासी जमातीची लोकसंख्या झपाट्याने कमी होत असताना सेंटीनेलिज आदिवासी लोक अजून कसे टिकून आहेत याचे उत्तर ते बाह्य जगाच्या संपर्कात येत नाहीत.
लोक सेंटीलन बेटावर जायला घाबरतात, तसेच भारत सरकारने देखील त्यांच्या जमातीला संरक्षित जमात आणि North sentinel island / नॉर्थ सेंटीलन बेटाला देखील संरक्षित क्षेत्र म्हणून घोषित केले आहे.
निष्कर्ष
हे आदिवासी लोकं बाह्य जगापासून पूर्णपणे अलिप्त असल्याने त्यांचा आणि आधुनिकतेचा कोणता ही संबंध नाही.
सेंटीनेलिज लोकांचे अस्तित्व आणि त्यांची संस्कृती आपल्या जगापेक्षा वेगळी आहे.
ते जगापासून खूपच अलिप्त असल्याने आणि बाह्य लोकांना यांच्या जवळ फटकू देत नसल्याने त्यांच्याबद्दल भारत सरकारला देखील खूप कमी माहिती आहे.
आपण इतकंच म्हणू शकतो की सेंटीनेलिज लोक अजून ही आपल्या पेक्षा साठ हजार वर्षे मागे आहेत.
आपल्या आधुनिक जगाशी समांतर त्यांचे एक वेगळे जग आहे, अजून ही आपल्यापेक्षा अनेक शतके ते मागे आहे.
धन्यवाद, माय मराठी ब्लॉग
हे सुद्धा वाचा
- अविश्वास प्रस्ताव म्हणजे काय? | No confidence motion in marathi
- Eye flu म्हणजे काय ? डोळे येणे | Eye Flu in marathi
- ECG test म्हणजे काय? | ECG Information in marathi
- What is Hindu Dharm? | Hindu Religion explained in Marathi
- ChatGPT म्हणजे काय ? Magic of AI in Marathi
- oppenheimer कोण होता ? | j. robert oppenheimer
- Uniform civil code | यूनिफॉर्म सिविल कोड
- Trademark Registration in India | ट्रेडमार्क रजिस्ट्रेशन प्रोसेस
- Food license documents in Marathi | फूड license कसे घ्यावे?
- Top 10 Marathi Blogging Tips | मराठी ब्लॉगिंग टिप्स
- Marathi blog कसा लिहावा | How to write Marathi blog
- Blog in Marathi म्हणजे काय? How to write a blog in Marathi