Maldives lakshadweep controversy | मालदिव लक्षद्वीप वाद

maldives lakshadweep controversy

Maldives lakshadweep अचानक जास्त चर्चेत आले मालदीवच्या बातम्या सगळीकडे व्हायरल होऊ लागल्या.

पण या बातम्या साध्या सुद्धा नसून यांपासून एक वादाची ठिणगी चालू झाली, या सगळ्याची सुरुवात झाली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लक्षद्वीप दौऱ्यावरून …. बीचवर त्यांची निवांत बसलेले फोटो बरेच व्हायरल झाले आणि त्यावरून वेगवेगळ्या प्रतिक्रिया आल्या.

मालदीव पेक्षा लक्षदीप खूपच सुंदर ठिकाण आहे अशा देखील प्रतिक्रिया आल्या, maldives lakshadweep ची तुलना होऊ लागली आणि इथेच पडली वादाची ठिणगी..

त्यानंतर मालदीवचे मंत्री यांनी भारतातल्या बीचवर, ट्रॅव्हलिंग बद्दल आक्षेपार्य मत व्यक्त केलं.

मग भारतातल्या अनेकांनी त्यांच्या ट्विटर मधल्या मताला निषेध केला आणि त्यातूनच सुरुवात झाली हॅशटॅग बॉयकोट मालदिव (#boycottmaldives)..

तर नेमका काय वाद आहे त्याचे पडसाद कसे उमटतील हे आपण या blog मध्ये पाहूया.

काय आहे Maldives lakshadweep वाद ?

भारत आणि मालदीव या वादामुळे दोन्ही देशाचे राजकीय व आर्थिक संबंध धोक्यात आले आहेत.

जे गेल्या सहाशे वर्षापासून बांधले गेले होते, आपत्तीच्या वेळी भारत मालदीवला मदत करण्यास नेहमी अग्रस्थानी असतो.

पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच आपल्या देशावर करण्यात आलेल्या आक्षेपार्ह विधानामुळे दोन्ही देशाचे संबंध ताणले गेलेले आहेत.

पंतप्रधान मोदींनी lakshadweep ला भेट दिल्यानंतर, तसेच पोस्ट शेअर केल्यानंतर मालदीवच्या तीन मंत्र्यानी देखील नरेंद्र मोदींच्या पोस्टवर आक्षेपार्ह विधान केले.

आणि यावरूनच सर्व भारतीय पेटले आणि भारत मालदीव वाद चालू झाला, अनेक भारतीय आणि सेलिब्रिटींनी तर मालदीवचे आपले बुकिंग केलेले रद्द केले.

भारत देशाने 1965 पासून राजकीय संबंध चांगल्या रीतीने प्रस्थापित केलेले आहेत, सैन्य, शिक्षण, वैद्यकीय मदत, विविध व्यवसाय या सगळ्या गोष्टींसाठी मालदीव भारत देशाशी जोडला गेला आहे.

2008 नंतर भारत आणि मालदीवचे संबंध अधिक दृढ झाले होते.

मालदीव वर याचा कसा परिणाम होऊ शकतो ?

शिक्षण: मालदीव हा बेटांवरील देश आहे, पर्यटन क्षेत्र असल्याने इतरत्र बेटे पसरलेले आहेत.

मालदीवला शिक्षण प्रदात्याचे काम भारत देश करत आहे, maldives मध्ये कोणतीही मोठी शिक्षण संस्था नाही आहे.

त्यामुळे मालदीव मधील शिक्षण घेणारे विद्यार्थी हे भारतीय शिक्षण संस्थांमध्ये आपले शिक्षण पूर्ण करतात किंवा त्याबरोबरच भारतातील बोर्डिंग मध्ये राहून देखील ते शिक्षण घेतात.

मालदीवच्या विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबरच राहण्याची सोय तसेच त्यांच्या शिक्षणाानुसार योग्य ती शिष्यवृत्ती देखील भारत सरकार त्या विद्यार्थ्यांना देऊ करते.

जर भारत मालदीव वाद जास्त पेटला तर मालदीवच्या शिक्षण संस्थेवर याचा मोठा परिणाम होऊ शकतो.

एवढ्या लांबून शिकण्यासाठी जी मुले भारतात येतात त्यांचे नुकसान न होऊ देणे हे मालदीव सरकारचे प्रथम कर्तव्य असले पाहिजे. 

आर्थिक बळकटीकरण

मालदीव मध्ये सर्व वस्तू किंवा व्यापार हे भारतामधून निर्यात होतात, 2022- 23 च्या आकडेवारीनुसार एका वर्षात 50 कोटी चा व्यापार मालदीवला निर्यात केला होता.

वर्षानुवर्ष भारत देश मालदीवला व्यापार व वस्तू यांची देवाण-घेवाण करत आला आहे आणि हळू हळू त्यामध्ये अधिक वाढ होताना पाहायला मिळत आहे.

मालदीवला लागणाऱ्या सर्व प्रमुख गोष्टी ह्या भारतामधून पुरविल्या जातात, त्यामुळे मालदीव हा देश अनेक गोष्टींसाठी भारत देशावर अवलंबून आहे.

त्यामुळे भारताशी वैर पत्करणे हे मालदीवला बरेच जड जाईल असे प्रथमदर्शनी तरी दिसते.

भारत हा आधारस्तंभ

मालदीव वर कोणतेही संकट आले तर त्याच्या पाठीशी भक्कमपणे आधारस्तंभ म्हणून भारत देश उभारतो.

2004 मधे जेव्हा बेटांवर सुनामीचा उद्रेक झाला त्यावेळी त्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले त्यावेळी सर्वात प्रथम आधी मदत भारत देशाने मालदीवला पाठवली होती.

परत त्यांना उभे राहण्यास भारताने आधार दिला होता, त्यानंतर 2014 मध्ये जेव्हा दूषित पाण्याचे डीसलेशन प्लॅट तुटल्यामुळे दूषित पाण्याची समस्या जाणवू लागली, तेव्हा भारत देशाने मालदीवला पाणी पुरविले होते.

तसेच कोविडमध्ये देखील भारत देशाने वैद्यकीय साहित्य, पीपीई किट आणि कोविडची लस देखील मालदीवच्या बेटावर पोहोचविली होती.

एकंदरीत पाहता मालदीव हा सर्वच गोष्टींसाठी भारत देशावर अवलंबून आहे हे कोणालाही पुराव्याने सिद्ध करण्याची गरज नाही.

रोज लागणाऱ्या मूलभूत बाबींची पूर्तता

भारत देश मालदीवला नेहमीच दैनंदिन आणि मूलभूत गोष्टीचा पुरवठा करतो, त्यामध्ये तांदूळ, मसाले, फळे, भाज्या, पोल्ट्री आणि सर्व खाद्यपदार्थ मालदीवला भारत आजपर्यंत पुरवत आलेला आहे.

तसेच अनेक पायाभूत सुविधांची पूर्तता मालदीव मधे भारतच करतो.

मालदीव मधील इंदिरा गांधी मेमोरियल हॉस्पिटल हे भारत देशाच्या प्रयत्नातून उभे राहिलेले आहे, दररोजची लागणारी औषधे देखील भारत देश मालदीवला पुरवत आलेला आहे.

योग्य त्या पायाभूत सुविधा त्यामध्ये सिमेंट, चिरे, दगड एकंदरीत घर किंवा एखादी संस्था बांधण्यासाठी जे काही पायाभूत सुविधा लागतात त्या सर्व भारतामधून मालदीवला निर्यात होतात.

सी फूड सोडले तर असं म्हणता येईल की सर्वच गोष्टींसाठी भारत देशांवर मालदीव हा अवलंबून राहिलेला आहे, मालदीव आणि भारत देशाचा वाद असाच राहिला तर दैनंदिन गोष्टींवर देखील त्याचा सर्वात मोठा परिणाम होऊ शकतो.

मालदीवच्या बेटामुळे भारत कसा सुरक्षित आहे ?

संपूर्ण जगात बेटांचे जागतिक स्थान म्हणून मालदीवला मोठे महत्त्व आहे. 

मालदीव भारताच्या पश्चिम किनाऱ्यापासून आणि हिंदी महासागरातून जाणाऱ्या समुद्राच्या मार्गावर असलेले व्यापारी मोठे केंद्र आहे, हिंदी महासागरातील जेवढा भारताचा भाग आहे त्याची संपूर्ण सुरक्षा मालदीवचा सागर किनारा करतो.

संरक्षण आणि सुरक्षा | Defense and Security Maldives lakshadweep

भारत देश आपल्या संरक्षण दलांना प्रशिक्षण देऊन मालदीवच्या बेटांच्या संरक्षणासाठी अशा दलांना तयार करत आहे.

हा सर्वात मोठा परिणाम मालदीवला वादाच्या भोवऱ्यात भोगायला लागू शकतो, मालदीवला जवळ जवळ 70 ते 80 टक्के संरक्षण भारत सरकारकडून मिळते.

तसेच भारतीय नौदलाने मालदीवच्या बेटांवरील संरक्षणासाठी तसेच हवाई निरीक्षणासाठी विमाने आणि हेलिकॉप्टर्स दिलेले आहेत.

तसेच ही विमाने बेटांवर कशा रीतीने संरक्षण करतील आणि ते बेटांवर कशा रीतीने उतरायचे आणि उड्डाण कसे करायचे याचे देखील जवानांना प्रशिक्षण भारतीय नौदलाने दिलेले आहे.

भारताचा पश्चिम किनारपट्टीचा भूभाग आणि हिंदी महासागराच्या हालचालीवर या विमानाद्वारे आणि हेलिकॉप्टर द्वारे लक्ष ठेवता येते.

भारत नौदला तर्फे आणि भारत सरकार तर्फे चांगले लष्करी प्रशिक्षण घेतलेले जवान मालदीवला भारत देश संरक्षित करण्यासाठी पाठवतो, या वादाच्या ठिणगीचे पडसाद यावर देखील उमटू शकतात.

Maldives Lakshadweep वादाचा फटका मालदीवला कसा बसला

maldives lakshadweep या वादामुळे अनेक सेलिब्रिटींनी मालदीवकडे पाठ फिरवलेली दिसत आहे.

अक्षय कुमार, सचिन तेंडुलकर तसेच अनेक सेलिब्रिटींनी त्यांच्या ट्विटर अकाउंट वरून देखील भारताच्या पर्यटन स्थळांना भेट द्यावी अशा पोस्ट केल्या आहेत.

अनेक लोकांनी ट्रॅव्हल्स कंपन्यांच्या मालदीवची बुकिंग रद्द केल्यामुळे मालदीवचे पर्यटन क्षेत्र अडचणीत सापडले आहे.

अनेक कंपन्यांनी यावर आपला प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत की आमच्यासाठी आमचा हा देश महत्त्वाचा आहे त्यामुळे आम्ही मालदीवच्या ज्या काही गोष्टी आहेत त्या अनिश्चित काळासाठी रद्द केलेले आहेत.

यामुळे मालदीवच्या पर्यटनाला मोठा फटका बसल्याचा दिसून येत आहे.

लक्षद्वीपकडे पर्यटकांचे वाढते आकर्षण

भारत देश 7500 किलोमिटर समुद्र किनाऱ्याचा देश म्हणून ओळखला जातो.

बंगाल, कोकण, अंदमान, गोवा, केरळ आणि यामध्ये लक्षद्वीपचा समावेश आहे, मालदीव भारताच्या वादामुळे दोन गोष्टींचा ट्रेण्ड सद्या चालू आहे ते म्हणजे #boycottmaldives आणि #chalolakshdweep यामुळेच लक्षद्वीपच्या ट्रॅव्हलिंग आणि पर्यटनासाठी अनेक कंपन्या वेगवेगळ्या ऑफर देत आहेत.

तसेच maldives lakshadweep या वादामुळे भारतीय ट्रॅव्हलिंग कंपन्यांनी भरपूर प्रमाणात लक्षद्वीप ला जाण्याच्या तिकिटामध्ये डिस्काउंट देखील दिलेला आहे.

त्यामुळे आत्ता पर्यटकांचे आकर्षण केंद्र Lakshadweep / लक्षद्वीप बनले आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.

मालदीवच्या अर्थव्यवस्थेमध्ये पर्यटनाचा वाटा मोठा

मालदीवला 1965 ला स्वतंत्र मिळाले, ब्रिटिशानंतर तिथे अनेक राजांची सत्ता होती, मालदीव बाराशे बेटांचा समूह असलेला देश आहे.

तसेच यातील बहुतेक बेटांवर कोणतीही मनुष्यवस्ती नसून ती निर्जन आहेत, या बेटांच्या आकर्षणात पोटीच पर्यटकांचा ओढा मालदीवकडे मोठ्या प्रमाणावर आहे.

मालदीवची लोकसंख्या ही चार लाखांवर आहे, मालदीवची अर्थव्यवस्था ही पर्यटनावर अवलंबून आहे.

वर्षभरात जवळ जवळ वीस लाख लोक मालदीव देशाकडे पर्यटनासाठी येत असतात.

बेटे ,आकर्षक समुद्रकिनारे, निळेशार पाणी यामुळे मालदीव हा अनेक सेलिब्रिटी तसेच अनेक लोकांच्या आकर्षणाचा घटक आहे.

मालदीव टुरिझमच्या आकडेवारीनुसार जवळजवळ 25. 5 टक्के अर्थव्यवस्थेचा वाटा हा पर्यटनाचा आहे, मालदीवला परकीय चलन व अनेक उत्पन्नापेक्षा पर्यटनाचा वाटा सगळ्यात मोठा मिळतो.

निष्कर्ष

आजच्या घडीला भारत देशाबरोबर चीन देशाने आता maldives lakshadweep या वादात उडी घेतलेली आहे.

जवळ जवळ दैनंदिन गरजा असोत किंवा संरक्षण तसेच पर्यटनाचा मुख्य घटक म्हणून मालदीव कडे पाहिले जाते.

या वादामुळे मालदीवला अनेक गोष्टींचा फटका बसलेला दिसत आहे तसेच संरक्षण आणि पर्यटनाचा फटका हा सगळ्यात मोठा मालदीव साठी असू शकतो.

त्यामुळे मालदीवने सामंजस्याने भारताशी बोलणी केली तर मालदीव देश पुन्हा नव्याने उभा राहू शकतो.

धन्यवाद, माय मराठी ब्लॉग

हे सुद्धा वाचा

RSS
Instagram