
नमस्कार मित्रांनो, आज या blog मध्ये आपण Import Export Business ची संपूर्ण माहिती घेणार आहोत.
आपण एकविसाव्या शतकात जगत आहोत आणि या शतकात जग खूप जवळ आले आहे.
आपल्याला आयात निर्यात व्यवसायाबद्दल बोलायचे झाले तर हा असा व्यवसाय आहे ज्यात आपण आपल्या देशीतल्या उत्पादित वस्तू आणि साधनसामग्री परदेशात पाठवू शकतो आणि परदेशात उत्पादित होणाऱ्या वस्तू किंवा सामग्री आपल्या देशात मागवू शकतो.
What is Import Export Business ? इम्पोर्ट एक्सपोर्ट बिझनेस म्हणजे काय ?
“आपण आणि जगातले अनेक देश त्यांच्या देशात पिकत किंवा निर्माण होत नसलेल्या वस्तू बाहेर देशातून सहज मागवून घेतात तसेच आपल्या देशात मुबलग पिकत आणि निर्माण होत असलेल्या वस्तू बाहेर देशात पाठवतात या आंतरदेशीय देवाण-घेवाणीलाच आयात निर्यात / import export business असं म्हणतात”
आपण अनेक माध्यमातून जगाशी जोडले गेलो आहोत, त्यातच व्यवसाच्या नवनवीन संधी आपल्याला उपलब्ध झाल्या आहेत.
आपण जगाशी अनेक प्रकारे आज व्यापार करत आहोत, तर त्यातलाच आणखीन एक महत्त्वपूर्ण व्यापार म्हणजे आयात-निर्यात.
आपल्या देशातील कंपन्यांकडून वस्तू घेऊन आपण त्या परदेशात असणाऱ्या अनेक कंपन्याना पाठवू शकतो आणि परदेशात तयार होणाऱ्या वस्तू तिथल्या कंपन्यांकडून खरेदी करून आपण आपल्या देशातील कंपन्यांना जास्त किंमतीत विकू शकतो.
तर या blog मध्ये आपण जाणून घेणार आहोत आयात-निर्यात म्हणजेच import-export या व्यवसायाबद्दल पण त्या आधी आपल्याला जाणून घ्यावे लागेल import export business / आयात-निर्यात व्यवसाय म्हणजे काय ?
आयात / import म्हणजे काय ?
“जगातले सगळेच देश त्यांच्या देशात निर्माण किंवा पिकत नसलेल्या वस्तू म्हणजेच साधन सामग्री ज्या देशात त्या वस्तू मुबलग प्रमाणात उत्पादित होतात त्या देशातून त्या वस्तू मागवतात म्हणजेच आयात करतात“
आपण परदेशातून काही कंपन्यांची उत्पादने कमी किंमतीत आयात करून ती आपल्या देशातील व्यापाऱ्यांना जास्त किमतीत विकून खूप नफा कमवू शकतो.
उदारणार्थ
भारतातील लोकांचे सोन्याबद्दलचे प्रेम आपल्याला माहीतच आहे, सोन्याचे उत्पादन भारतात कमी आहे किंवा सोन्याच्या खाणी भारतात खूप कमी आहेत आणि त्यामुळे सोन्याचे उत्पादन कमी होते असे आपण म्हणू.
त्यामुळे परदेशातुन भारतात मोठ्या प्रमाणात सोने आयात केले जाते.
आणि जर आपण बाहेर देशातील सोने उत्पादन करणाऱ्या एखाद्या कंपनीशी संबंध बांधून त्यांच्याकडून कमी किमतीत सोने आयात करून घेतले आणि ते भारतात जास्त दारात विकले तर या व्यवसायात आपल्याला खूप नफा कमावता येऊ शकतो.
निर्यात / export म्हणजे काय ?
“आपल्या देशात ज्या वस्तूंचे किंवा साधनसामग्रीचे उत्पादन जास्त प्रमात होते, त्या वस्तू आपण ज्या देशात त्या वस्तूंचे किंवा साधनसामग्रीचे उत्पादन कमी प्रमाणात होते त्या देशाला विकतो, त्यालाच आपण निर्यात असं म्हणतो”
आपण आपल्या देशातून ती उत्पादने कमी किंमतीत खरेदी करून बाहेर देशात जास्त किंमतीत विकली तर आपल्याला या व्यवसायात मोठा नफा मिळू शकतो.
आयात व्यवसायापेक्षा निर्यात व्यवसायात जास्त नफा मिळतो.
उदारणार्थ
भारतात लेदर आणि त्याची उत्पादने मोठ्या प्रमाणात उत्पादित होतात.
या वस्तू भारतातील व्यवसायिकांकडून आपण कमी किंमतीत खरेदी करून या बाहेर देशातील कंपन्यांना जास्त किंमतीत विकल्या तर आपल्याला या व्यवसायात मोठा नफा होऊ शकतो.
आयात-निर्यात / इम्पोर्ट एक्सपोर्ट व्यवसाय कसा सुरू करावा ? How to start Import Export Business ?
आयात निर्यात व्यवसाय सुरू करताना तुम्हाला अनेक अडचणींचा सामना करावा लागू शकतो पण हा व्यवसाय तुम्हाला अधिक उत्पन्न आणि नफा मिळवून देणारा व्यवसाय आहे.
या व्यवसायात तुम्हाला परदेशी वस्तू आपल्या देशात आणून विकाव्या लागतात आणि आपल्या देशातील वस्तू बाहेर देशाला विकत पाठवाव्या लागतात त्यामुळे हा import export business विदेशी व्यापार धोरणांतर्गत येतो.
आयात निर्यातीच्या व्यवसायाला परकीय व्यापार धोरण असे म्हणतात.
import export business / आयात निर्यात हा असा व्यवसाय आहे जो वेळ आणि परिस्थितीनुसार सतत बदलत असतो कारण इतर देशांशी व्यापारी राजकीय संबंध हे त्या देशातील मागणी आणि उत्पादनावर अवलंबून असतात.
आयात निर्यात व्यवसाय करण्यासाठी तुम्हाला फार काही करण्याची गरज लागत नाही.
Import export business risky आहे का ?
हा व्यवसाय सगळ्यात जास्त जोखमीचा मानला जातो, जर या व्यवसायात करण्यासारखे जास्त काही नाही तर हा व्यवसाय इतका जोखमीचा का आहे ? कारण हा व्यवसाय करताना तुम्हाला अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय नियम पाळावे लागतात.
जर हे नियम पाळण्यात जरा जरी चूक झाली तरी तुम्हाला खूप मोठे नुकसान सहन करावे लागू शकते.
म्हणून IMPORT EXPORT BUSINESS RISKY आहे.
Import Export Business मध्ये उत्पादन / Prpduct ची निवड
आयात निर्यात व्यवसायात तुम्हाला ज्या उत्पादनाची निवड करायची आहे ते उत्पादन गुणवत्ता पूर्ण आणि त्याची मागणी जास्त असली पाहिजे तुमची Product निवड चुकली तर तुम्हाला आयात निर्यात व्यवसात यश मिळण्याची शक्यता खूप कमी आहे.
आणि जर तुम्ही योग्य उत्पादनाची निवड केली तर तुम्हाला या व्यवसायात चांगले यश मिळू शकते.
import export हा व्यवसाय सुरू करताना तुम्हाला आपल्या देशातील विदेशी बाजारपेठ इथे कोणत्या विदेशी वस्तुंना जास्त मागणी आहे याचा अभ्यास करावा लागेल तसेच आंतरराष्ट्रीय बाजारपेठ आणि तिथे कोणत्या वस्तूंना जास्त मागणी आहे या सगळ्याचा सखोल अभ्यास करावा लागेल.
आयात निर्यात या व्यावसायिक क्षेत्रात तुम्हाला जर यश मिळवायचे असेल तर राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेचा सखोल अभ्यास करणे गरजेचे आहे, तरच तुम्हाला निश्चितपणे या व्यवसायात यश संपादन करता येईल.
खाली तुमच्या माहितीसाठी आयात आणि निर्यात केल्या जाणाऱ्या वस्तूंची यादी देत आहोत.
भारतात आयात / Import केल्या जाणाऱ्या वस्तू
● खनिज तेल
● शस्त्र सामग्री
● सोने-चांदी
● मौल्यवान वस्तू (कच्च्या स्वरूपात)
● इलेक्ट्रॉनिक वस्तू
● रासायनिक खते
● औद्योगिक यंत्र
भारतातून निर्यात / Export होणाऱ्या वस्तू
● लेदर आणि त्याची उत्पादने
● पेट्रेलियम पदार्थ
● रत्ने आणि दागिने
● ऑटोमोबाईल्स आणि उत्पादने
● फर्मास्युटिक उत्पादने
● इलेक्ट्रॉनिक वस्तू
● दुग्धजन्य पदार्थ
● हातमाग आणि सूती धागे
Import Export Business साठी कोणत्या नोंदणी आवश्यक आहे ? Documents for Import Export Business
कोणताही व्यवसाय करताना त्याची कायदेशीर नोंदणी होणे आवश्यक आहे.
Import Export Business ची देखील कायदेशीर नोंदणी करणे आवश्यक आहे.
तुम्हाला जर हा व्यवसाय सुरू करायचा असेल तर तुम्हाला परिवहन अंतर्गत नोंदणी करणे आवश्यक आहे.
जर तुम्ही बाहेर देशातील व्यक्तीशी व्यापार करत असाल तर तो व्यापार केवळ दोन व्यक्तीमधील न राहता तो व्यापार दोन देशांतर्गत होत असतो.
आयात निर्यात व्यवसाय सुरू करताना खालील नोंदण्या तुम्हाला कराव्या लागणार आहेत.
कोणतही व्यवसाय सुरू करताना आपल्याला काही नोंदणी कराव्या लागतात आणि आयात निर्यात व्यवसाय तर आंतरराष्ट्रीय व्यवसाय आहे त्यामुळे तुम्हाला हा व्यवसाय सुरू करण्यापूर्वी या नोंदणी करून घेणे आवश्यक आहे.
● ना हरकत प्रमाणपत्र / NOC
तुम्ही हा व्यवसाय जर ग्रामीण भागातून करणार असाल तर तुम्हाला तिथल्या ग्रामपंचायतीकडून ना हरक प्रमाणात म्हणजे N. O. C घ्यावे लागते.
● एमएसएमई अंतर्गत नोंदणी
आता कोणत्याही व्यवसायासाठी तुम्हाला MSME / एमएसएमई अंतर्गत नोंदणी अनिवार्यपणे करावी लागते.
त्याशिवाय तुम्ही उद्योग आधारच्या मदतीने तुमच्या व्यवसायाची पाच मिनिटात भारत सरकार अंतर्गत ऑनलाईन नोंदणी करता येऊ शकते.
● IE कोड
IE कोड पूर्णपणे Import Export / आयात निर्यात कोड आहे, त्यामुळे तुम्हाला आयात निर्यात व्यवसायासाठी IE कोड नोंदणी करणे अनिवार्य आहे.
हा कोड भारत सरकारच्या परराष्ट्र व्यापार मंत्रालयाकडून प्राप्त होतो आणि त्यासाठी तुम्हाला तिथे अर्ज करणे अनिवार्य आहे.
● जीएसटी नोंदणी
भारत सरकारने देशाची अर्थव्यवस्था लक्षात घेऊन जीएसटी कर प्रणाली सुरू केली आहे.
आणि तुम्हाला जर आयात निर्यात व्यवसाय सुरू करायचा असेल तर तुम्हाला तुमच्या व्यवसायाची जीएसटी नोंदणी करणे अनिवार्य आहे.
हे वाचा – GST म्हणजे काय ?
Best Tips for Import Export Business / आयात निर्यात व्यवसाय करण्यासाठी काही टिप्स
● वेळेचे पालन
आयात निर्यात व्यवसाय करताना तुम्हाला वेळेचे पालन करावे लागते.
अनेक देशात वेळेला खूप महत्त्व आहे, जर तुमचे उत्पादन उशिरा तिथे पोहोचले तर तुम्हाला या व्यवसायत खूप नुकसान सहन करावे लागू शकते म्हणून तुमची उत्पादने वेळेवर पोहोचवण्याची खबरदारी घ्या.
● उत्पादनाचे पॅकिंग
तुम्ही तुमचे जे उत्पादन आयात किंवा निर्यात करणार आहात त्याच्या बॉक्सवर तुमचे नाव, पत्ता आणि फोन नंतर व्यवस्थित घातला पाहिजे.
तसे केले तर तुमचे उत्पादन योग्य वेळत आणि योग्य ठिकाणी पोहोचेल.
● कायदेशीर प्रक्रिया
तुम्ही जी उत्पादने आयात किंवा निर्यात करणार आहात ती कायदेशीर नियमात आहेत का ते पडताळून पहा कारण जर तुमची फसवून झाली आणि ती उत्पादने नियमात बसत नसतील तर तुम्ही काही करू शकत नाही.
आशा प्रकारे तुम्ही Import Export Business करून चांगले उत्पन्न मिळवू शकता.
धन्यवाद
TEAM, MY MARATHI BLOG
हे सुद्धा वाचा
- ChatGPT म्हणजे काय ? Magic of AI in Marathi
- Machine learning म्हणजे काय | मशीन लर्निंग म्हणजे काय
- What is Internet banking ? इंटरनेट बँकिंग म्हणजे काय व त्याचे फायदे
- Neuralink म्हणजे काय ? Neuralink information in Marathi
- Data Science म्हणजे काय ? | डेटा सायन्स ची संपूर्ण माहिती
- Electric Vehicle कसं काम करते ? | EV working in Marathi