ECG test म्हणजे काय? | ECG Information in marathi

NOTE – ecg test हा ब्लॉग ऑनलाइन रिसर्च करून आपल्या समोर सादर केला आहे, ई सी जी समबंधीत जी माहिती इंटरनेट वर उपलब्ध आहे त्याच्याच मदतीने हा ब्लॉग लिहिला आहे.

ecg test mhanje kaay

हृदयाशी संबंधित कोणाला काही समस्या येतात तेव्हा डॉक्टर सर्वप्रथम Ecg test करांव लागेल असे सांगतात, आपण घरी आल्यावर छातीची पट्टी काढली असे सांगतो.

या blog मध्ये याच छातीची पट्टी काढणे अर्थात (Ecg test) / ई. सी. जी. / (Electrocardiogram) बद्दल आपण माहिती घेणार आहोत.

ecg चा फूल फॉर्म Electrocardiogram / इलेक्ट्रोकार्डियोग्राम असा आहे.

ई सी जी चे कार्य कसे चालते ? यातुन नेमके आपल्या हृदयाच्या समस्या कशा कळतात ? आणि अशाप्रकारच्या तुम्हाला पडणाऱ्या या संबंधीच्या निरनिराळ्या प्रश्नांचा उहापोह आपण या ब्लॉग मध्ये करणार आहोत.

हा marathi blog शेवटपर्यंत वाचा, नक्कीच तुमच्या ज्ञानात यामुळे भर पडेल यात शंका नाही.

Ecg Test मध्ये काय तपासलं जातं ?

ईसीजी टेस्ट / ecg test साठी एक विशिष्ट मशीन असते, ज्यामध्ये हात व पायांना मिळून चार तर छातीवर सहा केबल्स जोडल्या जातात.

या मशीन द्वारे जो आलेख काढला जातो त्यालाच ईसीजी असे म्हणतात व मराठीमध्ये विचाराल तर त्याला ‘हृदय विद्युत आलेख’ असे म्हटले जाते, अवघड आहे ना जरा हा मराठी शब्द? असो.

आपण या पुढे माहिती घेताना ईसीजी असाच उल्लेख करू , म्हणजे पटकन तुमच्या लक्षात येईल.

अगदीच सोप्या भाषेत सांगायचे झाले तर, आपल्या हृदयात ज्या विद्युत लहरी (electrical activity) निर्माण होत असतात, थोडक्यात त्याच आपल्याला ईसीजी रिपोर्टवरती प्रत्यंतरीत होत असतात.

या लहरींच्या माध्यमातूनच स्पष्ट होते की, रुग्णाला हृदयविकार आहे का, असेल तर किती धोका आहे, हृदय विकाराचा झटका (Heart Attack) आहे का, यापूर्वी तो येऊन गेलाय का इत्यादी.

याशिवाय हृदयाचे ठोके कसे आहेत, हृदयाची गती कशी आहे, काही विकार असे तर हृदयाच्या कोणत्या भागात आहे, या गोष्टी देखील ecg test च्या रीपोर्ट वरुण समजतात.

ईसीजी रिपोर्ट आल्यानंतर काय करावे ?

बरेचदा छातीत दुखायला लागले किंवा हृदय विकाराचा झटका आला तरी सुरुवातील ईसीजी रिपोर्ट नॉर्मल येऊ शकतो, त्यामुळे अशावेळी दर तासा-दोन तासाला ईसीजी काढावा लागेल असे आपल्याला सांगितले जाते.

फक्त छातीत दुखत असेल तर बरेचदा 50-60% लोकांमध्ये ईसीजी नॉर्मल येत असतो.

त्यामुळे हृदय विकार नाही असेही म्हणून शकत नाही किंवा हृदय विकार आहे असेही आपण म्हणू शकत नाही.

त्यामुळे अशा वेळी डॉक्टर इतर टेस्टची देखील मदत घेत असतात, ईसीजी रिपोर्ट आल्यानंतर तो हृदय विकार तज्ज्ञांना दाखवणे गरजेचे आहे.

कारण तेच योग्य प्रकारे तो रिपोर्ट पाहून, समजून घेऊन, छोटे-मोठे बदल पाहून, योग्य ते निदान आपल्याला सांगू शकतील.

यामध्ये जर काही समस्या जाणवत असतील तर ते पुढील तपासण्या देखील आपल्याला सांगू शकतील.

ECG Test अजून कुठे वापरतात ?

सध्याच्या धावपळीच्या युगात ताण-तणाव खूप वाढला आहे, लोकं डिप्रेशनचे शिकार होत आहेत, शारीरिक आरोग्यपेक्षाही मानसिक आरोग्य जास्त बिघडताना दिसत आहे.

या अशा मानसिक आजारांमध्ये / ‘स्ट्रेस टेस्ट’ (Stress Test) साठी देखील ecg machine वापरले जाते, ही ecg test तशी साधी सरळ असते.

रक्तपुरवठा नीट होतोय का, छातीत दुखत असेल तर ते कोणत्या कारणाने दुखत आहे, हे तपासून पाहण्याचा प्रामुख्याने प्रयत्न असतो, यासाठी रुग्णाला मशीनवर चालावे लागते, अर्थात ट्रेड मिलवर. 

त्या पूर्वी कसे चालायचे याची माहिती आपल्याला दिली जाते, रुग्ण चालत असताना कंप्युटर वरून हा ईसीजी काढला जातो.

यावेळी त्याचा रक्तदाब, हृदयाचे ठोके, रुग्णाला दम लागतो आहे का, त्याला नेमका काय त्रास होतो या सर्व बाबी तपासल्या जातात.

ईसीजी तपासणी पूर्व तयारी

या तापसणीपूर्वी रुग्णाची उंची, वजन, वय या गोष्टी कंप्युटरमध्ये नोंद केल्या जातात.

छातीवर ईसीजी मशीनच्या केबल्स / चकत्या लावल्या जातात तर दंडावर रक्तदाब मोजणाऱ्या मशीनचा पट्टा लावला जातो.

या सर्वांसोबत रुग्णाला ट्रेडमिल मशीनवर चालायचे असते, तुम्ही त्या मशीनवर किती वेळ चालता, तुमच्यात काय बदल जाणवतात, हे यावेळी पाहिलं जातं.

ट्रेडमिलवर चालण्यापूर्वीचा एसीजी, चालतानाचा ईसीजी व थांबल्यानंतर नॉर्मल झाल्यानंतरचा ईसीजी, या सर्वांची तुलना करून निष्कर्ष काढला जातो.

सुरुवातीचा इसीजी नॉर्मल असेल आणि चालतानाच्या ईसीजीमध्ये काही प्रॉब्लेम दाखवत असेल तर स्ट्रेस टेस्ट ही रुग्णाला हृदयविकार असल्याचे दाखवते.   

हृदयरोगासाठी केल्या जाणाऱ्या इतर चाचण्या

Echocardiography and Colour Doppler म्हणजेच याला आपण हृदयाची सोनोग्राफी म्हणू शकतो.

या टेस्टमध्ये हृदयाची रचना, कप्पे, झडपा, त्यांची कार्यक्षमता, त्यांचे आकारमान यासंदर्भात इत्यंभूत माहिती मिळते.

यामध्येच टू-डी (two dimensional Echo) आणि कलर डॉप्लर (Colour Doppler) या उच्च दर्जाच्या चाचण्या देखील उपलब्ध आहेत, या चाचण्यांच्या मदतीने हृदयविकार ओळखणे सोपे झाले आहे.

योग्य रोगनिदान करून त्यावरील उपाययोजना कितपत परिणामकारक ठरली आहे, हे देखील लक्षात येते.

या चाचणीत अल्ट्रासाऊंड ध्वनीलहरी या शरीरात सोडून त्या आतील अवयवापर्यंत धडकवून, प्रवर्तित होऊन शरीराबाहेर, मायक्रोफोनसारख्या ‘ट्रान्सडय़ूसर’द्वारे पुन्हा शोषून, संगणकाद्वारे त्याचे अवलोकन करून, पडद्यावर चित्राच्या रूपात दाखवल्या जातात.

आणि या माध्यमातुन हृदयाच्या विविध आजाराच्या कार्याची माहिती तज्ज्ञ डॉक्टरला मिळू शकते.

एम.मोड (M- Mode Echo)

या इकोमध्ये रुग्णाच्या हृदयाच्या कप्प्यांचा आकार, हृदयाच्या भिंतीची जाडी याचे मोजमाप करून हृदयाचा आकार मोठा झाला का, भिंतीना सूज आली का? याचे निदान करता येते.

२-डी एको (2-D Echo)

 या इकोमध्ये हृदयाचे आकुंचन-प्रसरण पावणे, हृदयाची कार्यक्षमता, हृदयाच्या वेगवेगळय़ा झडपा आणि त्यांची उघडझाप इ. गोष्टींचे आकलन (Filming) चलचित्राद्वारे तज्ज्ञांना करता येते.

कलर डॉप्लर (Colour Doppler)

डॉप्लरद्वारे आपल्या रक्त वाहण्याचा वेग असेल किंवा रक्त वाहण्याची दिशा पाहता येते. झडपांचा आकार कमी झाला आहे का, त्यांचे कार्य कसे सुरू आहे अशाप्रकारच्या गोष्टी सदरच्या तपासणीमध्ये कळते.

 या तपासणीमध्ये 2D चित्रीत रंगाचा वापर करून हृदयातील आणि झडपांमधील रक्तप्रवाह कोणत्या दिशेने आणी किती वेगाने होतो आहे याची माहिती कळते.

झडपा आकुंचन-पावल्या (STENOSIS) किंवा झडपांमधून गळती होत असेल (Regurgitation) तर त्याचे निदान आणि त्याची प्रखरता (Staging or grading) या कलर डॉप्लर तपासणीमधून सहजपणे कळते.

एकोकार्डिओग्राफी (Echocardiography) ही हृदयाची आतील रचना आणि त्याच्या कार्याची क्षमता बघण्याची अत्यंत सोपी व सुरक्षित तपासणी आहे.

या तपासणी मध्ये रुग्णाला काही त्रास होत नाही किंवा कुठलेही इंजेक्शन न देता 5-10 मिनिटांत ही तपासणी होते.

यामध्ये हृदयाचा आकार, पंपिंग, स्नायूची स्थिती, झडपांची स्थिती आणि कार्यक्षमता, हृदयाच्या भिंतीचे आजार, भोक, हृदयातील रक्तप्रवाह, झडपांतून वाहणाऱ्या रक्तप्रवाहाचा वेग, गळती या सर्व गोष्टींची बिनचूक माहिती आपल्याला मिळू शकते.

यासाठी वापरले जाणारे, लॅपटॉपच्या आकाराचे हे मशिन कुठेही सहजपणे नेता येते, कुठलीही पूर्वतयारी न करता देखील सदरची तपासणी करता येते.

निष्कर्ष

आपण इसिजी मशीन, ecg test, test च्या पद्धती अशी विविध माहिती या ब्लॉग मध्ये घेतली, सदरच्या माहितीपूर्ण लेखाचा समारोप करताना आम्हाला एक सांगावंस वाटतं की, Prevention is better than cure म्हणजेच उपचारापेक्षा प्रतिबंध चांगला.

रोग झाल्यावर त्याच्यावर काय उपचार करता येईल हे पाहण्यापेक्षा आपण जर रोग होऊच नये म्हणून काळजी घेतली तर आपला शारीरिक, आर्थिक आणि मानसिक तोटा होण्यापासून वाचवू शकता.

हृदविकारावर आपण बोलत आहोत तर यासंदर्भात, तेलकट-तुपकट अतिप्रमाणात खाणे, फास्टफुड-जंकफूड, अतिमसालेदार पदार्थ अशा गोष्टी टाळणे गरजेचे आहे.

स्वताच्या शरीरासाठी रोज एखादा तास राखून ठेवणे व या वेळेत व्यायाम करणे गरजेचे आहे.

पाणी पिण्यामध्ये वाढ करणे, वजन नियंत्रित ठेवण्याच्या दृष्टीने लक्ष देणे, वेळच्या वेळी प्राथमिक तपासण्या करून घेणे, या गोष्टींकडे जर आपण लक्ष दिले तर नक्कीच हृदय रोगाचा धोका नक्कीच कमी होईल.

या आधी देखील उल्लेख केल्यानुसार हृदय आणि त्यासंबंधातील विकारांवर चाचण्या करणे असेल, त्याचे आकलन करणे असेल किंवा औषधोपचार असतील.

तर या सर्व समस्यांवर संबंधित हृदयरोग तज्ञांकडूनच सल्ला घ्यावा आणि त्यांच्या देखरेखेखालीच उपचार घ्यावेत.

इंटरनेट सारख्या माध्यमातून फक्त माहिती घ्यावी, स्वतः डॉक्टर होण्याचा कृपया कधीच प्रयत्न करू नका, धन्यवाद,

हे सुद्धा वाचा

RSS
Instagram