नमस्कार मित्रांनो या ब्लॉग मध्ये आपण Career options after 12th arts या संबंधित माहिती घेणार आहोत.
दहावीचा निकाल लागला की बहुतेक पालकांचा कल मुलांनी SCIENCE घ्यावे याकडे असतो आणि मुलांना नसेल घ्यायचं सायन्स तर मग COMMERCE ला एडमिशन घ्यावे असा सूर आळवला जातो.
एखाद्या मुलाने Arts घेण्याचा विचार केला तर त्याला परावृत्त केले जातं कारण पालकांना वाटत असते की आर्ट्समधून जास्त करिअर ऑप्शन्स नाहीत.
आटर्स घेऊन आयुष्यात काही विशेष करता येणार नाही असे पालकांना वाटते.
पण पालकांचा आणि मुलांचा देखील हा विचार चुकीचा आहे कारण 12th arts घेऊन ही अनेक चांगले करिअर ऑप्शन्स उपलब्ध आहेत.
आता ते कोणते ? तर तेच आपण या blog मधून जाणून घेणार आहोत. Career options after 12th arts
10 Best career options after 12th arts | 12 वी आर्ट्स नंतर 10 बेस्ट कोर्स
1. B. F. A (Bachelor of Fine arts)
जर तुमच्यात काही विशेष कलागुण असतील, तुम्हाला गायन, नृत्य, चित्रकला, शिल्पकला, अभिनय यात रस असेल तर हा 12th arts नंतर best career option ठरू शकतो.
तुम्ही चार वर्षाच्या degree साठी प्रवेश घेऊ शकता.
पदवी पूर्ण झाल्यावर तुम्हाला नोकरी किंवा स्वतःचा व्यवसाय देखील करता येऊ शकतो.
या अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यासाठी तुम्ही बारावी उत्तीर्ण असले पाहिजे, या अभ्यासक्रमात अजून बरेच उपविभाग देखील आहेत.
2. BA – LLB (Bachelor of Legislative Law OR Legum Baccalaureus)
जर तुम्हाला कायद्याचे शिक्षण घ्यायचे असेल तर बारावी आर्ट्स नंतर तुम्हाला पाच वर्षांचे इंटिग्रेटेड एलएलबी कोर्स करता येऊ शकतो.
तुम्ही हा कोर्स पूर्ण करून वकील होऊ शकता आणि सरकारी किंवा खाजगी वकिली करू शकता.
नोकरी करायची नसेल तरी देखील मोठं मोठ्या कंपन्यात कायदेविषयक सल्लागार म्हणून तुम्हाला चांगल्या पॅकेजची नोकरी मिळू शकते.
तसेच तुम्हाला वाटले तर न्यायिक सेवांच्या माध्यमातून जिल्हा न्यायाधीश, दिवाणी न्यायाधीश आदि पदांवर नियुक्ती मिळू शकते.
3. B.B.A (Bachelor in Business Administration)
जर तुम्हाला बिझनेसमध्ये रस असेल आणि तुमच्याकडे व्यवस्थापन कौशल्य असेल तर हा बारावी आर्ट्स नंतर तुमच्या करिअरसाठी उत्तम पर्याय ठरू शकतो.
तुम्ही तीन वर्षांचा पदवी पूर्ण वेळ कोर्स करू शकता, तुम्ही B. B. A करून पुढे M. B.A केलं तर तुम्हाला जागतिक पातळीवरील कंपन्यांमध्ये उत्तम नोकरीच्या संधी उपलब्ध आहेत.
यात तुम्ही तुमच्या इच्छेनुसार वित्त, विपणन, ऑपरेशन्स (Finance, Marketing, Operations) यासह इतर क्षेत्रात स्पेशलायझेशन करू शकता.
4. B.H.M (Bachelor of Hotel Management)
हॉटेल मॅनेजमेंट हा कॉलेजिअन्समध्ये आवडते करिअर आहे.
तुम्हाला जर स्वयंकाची आणि व्यवस्थापनाची आवड असेल तर हा फूल टाइम कोर्स तुमच्यासाठी आहे.
तुम्ही बारावी आर्ट्स नंतर तीन वर्षांचा पदवी कोर्स करू शकता तसेच एक किंवा दोन वर्षांचा डिप्लोमा कोर्सही उपलब्ध आहे.
यामध्ये हॉस्पिटैलिटी इंडस्ट्री, टूरिझम इंडस्ट्री आणि फूड इंडस्ट्री अशा वेगवेगळ्या विभागात तुम्ही करिअर करू शकता.
या कोर्स नंतर तुम्ही नोकरी किंवा स्वतःचे हॉटेल काढू शकता.
career options after 12th arts पैकी हा एक उत्तम मार्ग असू शकतो.
5. B.C.A (Bachelor of computer Application)
हा कोर्स तुम्ही बारावी आर्ट्स नंतर करू शकता, हा तीन वर्षांचा पूर्णवेळ कोर्स असून तुम्हाला पदवी नंतर सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट करण्यासाठी नोकरी मिळू शकते.
आजचे युग हे संगणक युग आहे त्यामुळे या क्षेत्रात नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध आहेत, तुम्हाला कोणत्याही कंपनीमध्ये चांगल्या पगाराची नोकरी मिळू शकते.
6. B. E. M (Bachelor of Event Management)
आजकाल आपण पाहतो की वेगवेगळे सांस्कृतीक, राजकीय, घरगुती आणि सामाजिक सोहळे आयोजित होत असतात आणि या सोहळ्यांचे आयोजन आणि व्यवस्थापन करण्याची जबाबदारी इव्हेन्ट मॅनेजमेंट कंपन्यांकडे दिली जाते.
तुम्हाला जर अशा सोहळ्यांचे आयोजन करण्याची आवड असेल तर तुम्ही बारावी आर्ट्स नंतर तीन वर्षाची पदवी घेऊन नोकरी करू शकता किंवा मग स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकता.
या Career options after 12th arts मध्ये देखील एक ते दोन वर्षांचा डिप्लोमा कोर्स उपलब्ध आहे.
7. B.S.W (Bachelor of Social Work)
तुम्हाला जर समाजसेवेची आवड असेल तर हा पूर्णवेळ कोर्स तुमच्यासाठीच आहे.
तुम्ही बारावी आर्ट्स नंतर तीन वर्षांचा हा पदवी अभ्यासक्रम पूर्ण करून नोकरी मिळवू शकता.
अनेक सहकारी संस्था आणि समाजसेवी ट्रस्टमध्ये तुम्हाला नोकरीच्या संधी उपलब्ध होऊ शकतात.
8. B.J.M.C (Bachelor in Journalism And Mass Communication)
आज आपल्या देशात अनेक न्यूज चैलन्स रोज लॉन्च होत आहेत आणि त्यामुळे पत्रकारिता आणि पत्रकारांना आज खूप मागणी वाढली आहे.
तुम्ही तीन वर्षांचा पूर्णवेळ अभ्यासक्रम पूर्ण करून या क्षेत्रात नोकरी मिळवू शकता.
न्यूज रीडर, अँकर, रिपोर्टर तसेच या मुख्य धाऱ्यातील माध्यमगृह व्यतिरिक्त कैक कंपन्या कंटेंट रायटर पदाची ऑफर देतात.
तुम्हाला लेखन चांगले जमत असेल तर हा तुमच्यासाठी उत्तम पर्याय ठरू शकतो.
तसेच बॅचलर डिग्री नंतर रेडिओ, फिल्म बनवणे, सिनेमॅटोग्राफी, क्रिएटिव्ह रायटिंग सारख्या क्षेत्रात डिप्लोमा करून तुमच्या करिअरला वेगळी दिशा देऊ शकता.
आता वळूयात बारावी आर्ट्स नंतर करता येणाऱ्या क्रिएटिव्ह फिल्ड मधील करिअरकडे.
बारावी आर्ट्स नंतर तुम्हाला क्रिएटिव्ह फिल्डमध्ये करिअर करायचे असेल तर हे करिअर ऑप्शन्स तुमच्यासाठीच आहेत.
Career options after 12th arts in Creative field
1. Fashion Design (फॅशन डिझाईन)
तुम्ही जर कपड्यात रमत असलात किंवा कपड्यांची तुम्हाला चांगली जाण असेल आणि तुमची बुद्धी सर्जनशील असेल तर बारावी आर्ट्स नंतर फॅशन डिझानिंगचा चार वर्षांचा कोर्स तुमच्यासाठीच आहे.
तुम्ही हा पदवी अभ्यासक्रम पूर्ण केल्या नंतर तुम्हाला करिअरच्या अनेक संधी उपलब्ध होऊ शकतात.
तुमच्यासाठी ग्लॅमरस फॅशन इंडस्ट्रीचे दरवाजे खुले होऊ शकतात.
हा अभ्यासक्रम देखील डिप्लोमा / पदविका रुपात उपलब्ध आहे, या कोर्स नंतर तुम्ही एखाद्या फॅशन हाऊसमध्ये नोकरी करू शकता किंवा मग स्वतःचे बुटीक खोलून स्वतःचा व्यवसाय करू शकता.
2. Interior Design (इंटिरियर डिझाईन)
आजकाल गृह सजावट ही एक नवीन इंडस्ट्री बाजारात फोफावत आहे.
इंटिरिअर डिझाइन म्हणजे गृह सजावट, जर तुम्ही सर्जनशील असाल आणि तुम्हाला गृह सजावट करण्यात रस असेल तर बारावी आर्ट्स नंतर तीन वर्षांचा पदवी कोर्स तुमच्यासाठीच आहे.
तुम्ही हा कोर्स करून एखाद्या बिल्डरकडे किंवा इंटिरिअर डिझानिंग करणाऱ्या कंपनीकडे नोकरी करू शकता किंवा मग स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकता.
3. Graphic Design (ग्राफिक डिझाईन)
जर तुम्हाला संगणक हाताळण्याची चांगली जाण असेल आणि तुम्ही सृजनशील असाल तर बारावी आर्ट्स नंतर हे करिअर ऑप्शन तुमच्यासाठी आहे.
आजच्या डिजिटल युगात ग्राफिक्स डिझायनिंग इंडस्ट्री झपाट्याने वाढत आहे.
हा विषय खूप मोठा आणि विस्तृत आहे, ग्राफिक डिझायनिंगमध्ये जाहिराती, फोटोग्राफी, प्रिंटिंग, वेब डिझाइन, ऍनिमेशन अशा वेगवेगळ्या विषयांचा समावेश होतो.
या पैकी कोणत्याही विषयात तुम्ही स्पेशलायझेशन करू शकता.
career options after 12th arts मध्ये creative फील्ड साठी हा उत्तम मार्ग आहे.
आणि सगळ्यात महत्त्वाचा आणि सर्रास शिकला जाणारा अभ्यासक्रम म्हणजे B.A
B. A (Bachelor in Art)
बारावी आर्ट्स नंतर तुम्ही तीन वर्षांच्या या पूर्णवेळ अभ्यासक्रमाकडे वळू शकता.
हा सगळ्यात महत्त्वाचा आणि सर्रास शिकला जाणारा अभ्यासक्रम आहे.
या अभ्यासक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे हा तीन वर्षांचा अभ्यासक्रम पूर्ण केल्या नंतर एखादा कोर्स करून तुम्ही वर दिलेल्या कोणत्याही करिअर ऑप्शनकडे वळू शकता.
Career options after 12th arts मध्ये हा सर्वात सोपा मार्ग आहे.
तसेच यात कोणत्याही एका विषयात स्पेशलायझेशन करून तुम्ही शिक्षक पेशासाठी आवश्यक असणारा कोर्स करून त्यात देखील करिअर करू शकता.
निष्कर्ष
पाहिलंत ना बारावी आर्ट्स नंतर करिअरचे किती आणि कोण कोणते पर्याय उपलब्ध आहेत त्यामुळे मुलांनी बारावी आर्ट्स करून या पैकी कोणता ही एक पर्याय करिअरसाठी निवडायला काहीच हरकत नाही.
आणि पालकांनी ही त्यांच्या मुलांना दहावी नंतर सायन्स किंवा कॉमर्सलाच जाण्याची जबरदस्ती न करता त्यांच्या पाल्याला आर्ट्स शाखेत प्रवेश घ्यायचा असल्यास नक्की घेऊ द्या कारण बारावी आर्ट्स नंतर देखील करिअरच्या अनेक संधी मुलांसाठी उपलब्ध आहेत.
आम्ही आशा करतो की Career options after 12th arts हा ब्लॉग आपल्याला नक्कीच आवडला असेल.
धन्यवाद.
TEAM माय मराठी ब्लॉग
हे सुद्धा वाचा
- ChatGPT म्हणजे काय ? Magic of AI in Marathi
- Machine learning म्हणजे काय | मशीन लर्निंग म्हणजे काय
- What is Internet banking ? इंटरनेट बँकिंग म्हणजे काय व त्याचे फायदे
- Neuralink म्हणजे काय ? Neuralink information in Marathi
- Data Science म्हणजे काय ? | डेटा सायन्स ची संपूर्ण माहिती
- Electric Vehicle कसं काम करते ? | EV working in Marathi