10 ways to make money online | ऑनलाइन पैसे कसे कमवावे ?

10 ways to make money online marathi

नमस्कार मित्रांनो आज आपण या blog मध्ये 10 ways to make money online म्हणजेच ऑनलाइन पैसे कमावण्याचे 10 उत्तम मार्ग याची माहिती घेणार आहोत.

आज बऱ्याच महिलाची मुलं लहान आहेत आणि त्यांना सांभाळणारे घरी कोणी नाही, तसेच मुलांना त्यांना पाळणाघरात ठेवायचे नसते म्हणून नोकरी सोडून घरात बसतात.

तसेच बऱ्याच वेळा घरात थकलेली वृद्ध माणसे असतात त्यांची देखरेख करण्यासाठी कोणी नाही म्हणून देखील मनात नसताना सुद्धा त्यांना जॉब सोडावा लागतो.

आणि इथून सुरू होते आर्थिक चणचणीचे दुष्ट चक्र आजच्या महागाईच्या जगात एकाच्या पगारात घर खूप मुस्कीलीने भागते आणि काटकसर करत आणि मन मारत जगावे लागते पण जर तुम्हाला घरबसल्या काही काम करून पैसे कमावता आले तर?

How to make money online ? ऑनलाइन पैसे कसे कमवावे ?

make money online कल्पना तर चांगली आहे ना !आजच्या तंत्रज्ञानाच्या जगात आणि आजकालच्या ऑनलाईनच्या जगात आपल्याला घर बसल्या काम करून पैसे कमावणे शक्य आहे.

कोरोनाच्या काळात तर वर्क फ्रॉम होमची सुविधा आपल्याला उपलब्ध झाली होती.

आजकाल प्रत्येक व्यक्तीकडे स्मार्ट फोन आहे तसेच घरोघरी संगणक आणि इंटरनेट कनेक्शन उपलब्ध आहेत.

आपल्याकडे उपलब्ध असलेल्या सोयी सुविधांचा वापर करून आपण घरात बसून पैसे कमवू शकतो पण असं घर बसल्या काम करून पैसे कमावण्याचे मार्ग कोणते आहेत आणि आपण त्यांचा अवलंब कसा करू शकतो हे आपण या blog मध्ये पाहणार आहोत चला तर मग पाहूयात घरी बसून पैसे कमावण्याचे मार्ग / 10 ways to make money online

10 Ways to Make money online in Marathi

1) फ्रिलान्सिंग (Freelancing)

Freelancing / फ्रिलान्सिंग करणं हा घरात बसून काम करण्याचा एक सोपा आणि सहज मार्ग आहे.

तुम्ही घरात बसून लेखन, संवाद, प्रशिक्षण, डिझायनिंग, अकाउंट सेटल करणे, ग्राफिक्स डिझायनिंग,टायपिंग,घराचे नकाशे काढून देणे अशा प्रकारची कामं online पद्धतीने करू शकता.

त्यामुळे तुमचा ऑफिसला जाण्या येण्याचा खर्च वाचेल आणि ऑफिसचे भाडे ही.

तुम्ही घरात देखील छोटेखानी ऑफिस काढून हे काम घर बसल्या आरामात करू शकता आणि चांगले पैसे कमवू शकता.

आजकाल अनेक अशा वेबसाईट उपलब्ध आहेत तिथून तुम्हाला अशी कामे मिळू शकतात.

https://www.upwork.com

https://www.fiverr.com

https://www.freelancer.in

2) कंटेंट रायटिंग (Content Writing)

तुमच्याकडे लेखन कौशल्य असेल तर तुम्ही घरात बसून वेगवेळ्या वेबसाईट, ब्लॉग्स आणि यु ट्यूब चॅनल्ससाठी कंटेंट रायटिंग करू शकता त्यातून तुम्हाला चांगले उत्पन्न मिळवता येऊ शकते.

तसेच एखाद्या एजन्सीसाठी तुम्ही घरात बसून लेखन करू शकता.

पुस्तकाचे लेखन आणि संपादन  करण्यासाठी देखील चांगले पैसे मिळतात.

तसेच तुम्हाला जर वेगवेगळ्या भाषा अवगत असतील तर भाषांतराचे काम देखील तुम्हाला घर बसल्या मिळू शकते.

हे वाचा

कंटेंट रायटींग कसे करावे ?

करियर इन मराठी ब्लॉगिंग

3) सोशल मीडिया व्यवस्थापन (Social Media Management)

आजकालच्या डिजिटल युगात सगळेच सोशल मीडिया वापरतात.

त्यामुळे सोशल मीडिया हे नुसते टाईमपास करण्यासाठी न राहता त्यावर अनेक व्यवसायिक त्यांच्या बिझनेसचे प्रमोशन करू पाहत आहेत.

त्यासाठी त्यांना सोशल मीडिया व्यवस्थापकाची गरज लागते, तुम्हाला जर सोशल मीडिया आणि त्याबद्दलचे ज्ञान असेल तर तुम्ही सोशल मीडिया व्यवस्थापनाचा व्यवसाय घर बसल्या करू शकता.

आज अनेक कंपन्या आणि सेलिब्रिटी त्यांचे सोशल मीडिया मार्केटिंग अशा सोशल मीडिया व्यवस्थापकांकडून करून घेतात.

तुम्ही फेसबुक, इंस्ट्राग्राम यासारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर त्यांचे पेजेस काढून त्यांचे मार्केटिंग घर बसल्या करून देऊ शकता आणि चांगले पैसे कमवू शकता.

you can make money online through social media management.

4) पॅकेजिंग

अनेक कंपन्या त्याच्या प्रोडक्टचे पॅकेजिंगचे काम गरजू लोकांना देत असतात.

ते त्यांचे प्रोडक्ट आणि पेकेजिंगचे सामान घरपोच करतात आणि काम झाल्यावर ते घेऊन ही जातात.

तुम्ही घरात बसून ऑनलाइन जाहिरात देऊन हे packaging चे काम घेऊ शकता.

असे packaging चे काम करून चांगले पैसे कमवू शकता.

packaghing जॉब

5) कलागुण 

तुम्हाला जर एखादी कला अवगत असेल जसे चित्रकला, विणकाम,शिवनकाम, भरतकाम, लोकरीच्या वस्तू विणणे तर तुम्ही अशा वस्तू  तयार करून देण्यासाठी ऑनलाइन ऑर्डर घेऊ शकता.

instagram किंवा फेसबूक वर online जाहिरात करून तुम्ही हे काम घेऊ शकता.

तसेच तुम्हाला अवगत असलेल्या कलेचे चांगले प्रशिक्षण घेऊन तुम्ही त्याचे क्लास घरात बसून सुरू करू शकता आणि तसेच ऑन लाईन क्लासेस (online teaching) सुरू करू शकता.

तसेच गायन, वादन, नृत्य या कला तुम्हाला अवगत असतील तर तुम्ही याचे देखील घरात बसून क्लासेस घेऊ शकता तसेच ऑन लाईन ही हे क्लासेस तुम्ही सहज घेऊ शकता.

आणि घरात बसून पैसे कमवू शकता.

6) ट्युशन

जर तुम्हाला मुलांना शिकवण्याची आवड असेल आणि एखाद्या विषयात तुम्हाला चांगली गती असेल तर तुम्ही घरी बसून मुलांच्या ट्युशन घेऊ शकता तसेच ऑन लाईन क्लासेस सुद्धा सुरू करून तुम्ही चांगले पैसे कमवू शकता.

you can make money online through online teaching.

7) फूड बिझनेस

जर तुम्हाला स्वयंपाक चांगला करता येत असेल आणि तुम्ही किचनमध्ये रमत असाल तसेच तुम्हाला खाण्याची आणि जेवण बनवण्याची आवड असेल तर हा व्यवसाय तुमच्यासाठी आहे असं समजा.

तुम्ही घरात बसून खानावळ सुरू करू शकता, तसेच वेगवेगळ्या कार्यक्रमात लागणाऱ्या पदार्थांच्या ऑनलाइन ऑर्डर्स घेऊन तुम्ही ते पदार्थ तयार करून घरी बसून विकू शकता.

उन्हाळ्यात पापड, शेवया, लोणची तसेच थंडीत डिंक लाडू, आलेपाक, तसेच विविध प्रकारचे पौष्टिक लाडू तसेच विविध प्रकारच्या चटण्या, चिवडा, लाडू अशा विविध पदार्थांच्या ऑर्डर्स घेऊन तुम्ही असे एक ना अनेक पदार्थ तयार करून विकून घरात बसून चांगली कमाई करू शकता.

8) ब्लॉगिंग (Blogging)

आजच्या डिजिटल युगात बाकी गोष्टी बदलल्या तसेच वाचन संस्कृती देखील बदलली आहे.

आज प्रत्येकाच्या हातात मोबाईल आणि त्यात इंटरनेट असतेच, लोकं आता पुस्तक हातात घेऊन वाचण्या ऐवजी मोबाईलवर वाचणे पसंत करत आहेत.

त्यामुळे उत्तम लेखक असाल तर ब्लॉगिंग हा पर्याय तुमच्यासाठीच आहे 

जर तुमच्याकडे कथा लेखन, विविध माहितीपर लेख, कविता, बातमी लेखन, संवाद लेखन, नाटक लेखन अशी लेखन कौशल्य असतील तर हा पर्याय तुमच्यासाठीच आहे.

तुम्ही तुमचा स्वतःचा ब्लॉग तयार करून त्यावर अशा विषयांवर लेखन करून त्या ब्लॉगमध्ये ऍड्स लावून तुम्ही चांगली कमाई करू शकता.

गुगल ऍड सेन्स, अल झेब्रा अशा कंपन्या तुमच्या ब्लॉगवर ऍड्स लावून तुम्हाला पैसे देतात.

तसेच छोटे मोठे उद्योजग देखील तुम्हाला त्यांच्या प्रोडक्टची ऍड तुमच्या ब्लॉगवर लावण्यासाठी पैसे देतात, घर बसल्या कमाईचा हा एक उत्तम पर्याय उपलब्ध आहे.

स्वतःची ब्लॉग साईट काशी बनवावी ?

9) यु ट्यूब चॅनल

आजकालच्या डिजिटल युगात एक नवीन इंडस्ट्री नावारूपाला येत आहे ती इंडस्ट्री म्हणजे यु ट्यूब इंडस्ट्री!

आज जगातील करोडो लोक यु ट्यूब रोज पाहतात आणि त्यांचे मनोरंजन तर करून घेतातच शिवाय त्यांना हवी असलेली माहिती देखील यु ट्यूब चॅनल व्दारे मिळवत असतात. 

तुमच्याकडे जर एखादे कौशल्य असेल, तुम्हाला ऍक्टिग येत असेल.

तुमच्याकडे सौंदर्य प्रधानांचे ज्ञान, फॅशन सेन्स, पाक कौशल्य, रांगोळी, चित्रकला, टेक्निकल नॉलेज, चित्रपटांविषयी ज्ञान, गाणे येत असेल, नृत्य येत असेल किंवा लोकांना हसवता येत असेल एक ना अनेक पर्याय तुमच्यासाठी खुले आहेत.

यातला एखादा पर्याय निवडून तुम्ही जर यु ट्यूब चॅनल सुरू केले तर त्यावर ऍड्स लावून तुम्ही चांगली कमाई करू शकता.

10) ब्युटीपार्लर

आजचे जग हे दिखाव्याचे आहे, तुम्ही कसे असता या पेक्षा तुम्ही कसे दिसता याला महत्त्व प्राप्त झाले आहे.

जर तुम्हाला इतरांना नटवण्याची आवड असेल तर हे क्षेत्र तुमच्यासाठी आहे, online order घेऊन तुम्ही हे काम करू शकता.

ब्युटी पार्लर आणि ब्युटीशियन हे क्षेत्र दिवसेंदिवस वाढतच चालले आहे, तुम्हाला जर याची आवड असेल तर तुम्ही ब्युटीशियनचा कोर्स करून तुमच्या घरात ब्युटीपार्लर सुरू करू शकता.

त्यात ही स्किन ट्रीटमेंट, मेडिक्युर, पेडिक्युर पासून वेगवेगळ्या शाखांचा उगम होत आहे.

मेकअप आर्टिस्ट, हेअर स्टाइलिस्ट, नेलं आर्टिस्ट, ब्युटी ट्रीटमेंट, स्पा  अशा अनेक शाखा आज उपलब्ध झाल्या आहेत.

तुम्ही तुमची आवडीची शाखा निवडून घरबसल्या हे काम करून चांगले उत्पन्न मिळवू शकता.

निष्कर्ष

आजकाल पैसे कमवण्यासाठी घरातून बाहेर पडणे हा एकच पर्याय राहिला नाही तर आजच्या काळात घरात बसून काम करून पैसे मिळवण्याचे अनेक पर्याय उपलब्ध झाले आहेत.

आजच्या डिजिटल युगात अनेक कामे सोपी होऊन गेली आहेत आणि त्याच मुळे घरात बसून पैसे कमावण्याचे अनेक पर्याय आपल्यासमोर उपलब्ध झाले आहे. 

याच पर्यायांचा वापर करून आपण  घरी बसून अशा प्रकारची कामे करून घर बसल्या पैसा कमवू शकतो. 

आशा करतो की 10 ways to make money online हा ब्लॉग तुम्हाला नक्की आवडला असेल.

धन्यवाद

TEAM, MY MARATHI BLOG

हे सुद्धा वाचा

RSS
Instagram