या जगात अनेक ठिकाणी Artificial Intelligence /आर्टिफिशियल इंटेलिजन्स या पद्धतीचा वापर मोठ्या प्रमाणावर होत आहे याचेच सविस्तर माहिती आपण या blog मध्ये पाहणार आहोत.
पाहायला गेले तर computer मनुष्यांचे अनेक कार्य योग्य पद्धतीने करते.
त्यामध्ये क्लाऊड कॅम्पेनिंग म्हणा, बिग डेटा म्हणा अशा अनेक शाखांद्वारे काम चालते.
आता AI (Artificial Intelligence) अशी एक कॉम्प्युटरद्वारे चालणारी तांत्रिक पद्धती आली आहे त्याचीच संपूर्ण माहिती आपण या आर्टिकल द्वारे पाहणार आहोत.
Artificial Intelligence | आर्टिफिशियल इंटेलिजेंस
आज मशिन्स मनुष्याच्या बोलण्यामुळे किंवा त्यांच्या आदेशाद्वारे जे काही असेल ते स्क्रीनवर दाखवतात.
मग ते काही फोटो असोत, गेम्स असोत, किंवा मानवाच्या सोयीची अनेक उत्तरे असोत.
मशीनची बरीच कामे या तंत्रज्ञानामुळे सोपे झाले आहेत, त्यातलाच सद्या चर्चेत असलेला भाग म्हंजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स.
आर्टिफिशियल इंटेलिजन्सला मराठी मध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता असे म्हणतात.
आर्टिफिशल याचा सोपा अर्थ कृत्रिम किंवा आभासी असा होतो सर्वात प्रथम आपण याचा अर्थ समजून घेतला पाहिजे, याचा वापर अलीकडे अनेक क्षेत्रात केला जातो यामध्ये लोकांचा भरपूर वेळ वाचत आहे.
Artificial Intelligence चा शोध
सध्या सगळीकडेच मोठ्या कंपन्या तसेच मोठमोठ्या क्षेत्रात Artificial Intelligence या तंत्रज्ञानाचा उपयोग केला जात आहे.
पण या सगळ्यांमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स चा शोध कसा लागला आणि ते कसे काम करते याची आपण माहिती घेऊया.
भविष्यात मानवांचं एक महत्त्वाचं संसाधन म्हणून आर्टिफिशियल इंटेलिजन्स या तंत्रज्ञानाकडे पाहिले जात आहे.
1956 साली जॉन मेककार्थी यांनी Artificial Intelligence या अद्भुतशा तंत्रज्ञानाचा शोध लावला.
आजकाल छोट्या छोट्या कामात देखील AI एआय ह्या तंत्रज्ञानाचा उपयोग केला जातो.
मशीन लर्निग ह्याचा देखील समावेश आर्टिफिशियल इंटेलिजन्स मध्ये होतो.
जसे की जुनी माहिती जमवून त्यात बदल करणे आणि त्या अनुषंगाने दुसरी माहिती तयार करणे अशा अनेक गोष्टींत याचा उपयोग होत आहे.
आर्टिफिशल इंटेलिजन्स म्हणजे ही एक कम्प्युटरची भाषा आहे, कॉम्प्युटरची CCC+, Jawa, Python अशा भाषा फिट केलेल्या असतात, त्याप्रमाणे ते काम करते.
Artificial Intelligence काम कसे करते | Working of AI in marathi
Artificial Intelligence / आर्टिफिशियल इंटेलिजन्स मशीन्सना मनुष्य प्राण्यांप्रमाणे वागायला शिकवलं जातं… पन त्या मनुष्य असू शकत नाहीत हे सुद्धा लक्षात घेतले पाहिजे.
या मशिन्स मनुष्यांप्रमाणे काम करू शकतात, तसे वागू शकतात, मनुष्यप्रमाणे निर्णय घेऊ शकतात.
पण कितीही झाल तरी त्या मशीन्स आहेत हे विसरून आपल्याला चालणार नाही, त्याचप्रमाणे सद्या जास्तीत जास्त चर्चेत असणारे हे तंत्रज्ञान आहे.
Artificial Intelligence हे आताच्या जगातील सर्वात जलद आणि वापरायला सोपे असे हे तंत्रज्ञान म्हटले तर वावगे ठरणार नाही.
आजकाल आपल्या आजूबाजूला अनेक अशा मशिन्स असतात, ज्या त्यांचं जेवढ काम असेल तेवढं करतात आणि बाजूला होतात.
पण आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे तसे नाही जे काही काम असेल जे काही प्रश्न निर्माण झालेत त्याचे उत्तर ही मशीन स्वतः देते.
सरळ सरळ म्हणायला गेला तर एक कृत्रिम मनुष्यच असे आपण या technology ला संबोधू शकतो.
यामध्ये तर आपण एखांदा रोबोट तयार करून त्याला योग्य ते प्रशिक्षण दिले तर तो वेगवेगळ्या क्षेत्रात अग्रेसर ठरू शकतो.
– त्यामध्ये गाडी चालवणे.
– बँकिंग क्षेत्र
– सैन्य
– न्यायालय
अशा क्षेत्रामध्ये देखील उत्तम प्रकारे कार्य करू शकते.
शैक्षणिक क्षेत्र आर्टिफिशियल इंटेलिजन्स बोलबाला
सध्या भारत देशात आणि परदेशात सुद्धा Artificial Intelligence मोठे मोठे रिसर्च सेंटर उभे केलेले आहेत.
अनेक सायंटिस्ट यावर प्रयोग करत आहेत, अनेक शैक्षणिक संस्थांमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स चे प्रशिक्षण दिले जात आहे.
भविष्यामध्ये सर्वकाही खूप वेगळे असणार आहे आणि त्याच्या दृष्टिकोनातूनच आर्टिफिशियल इंटेलिजन्स याचे प्रशिक्षण घेणे आज महत्त्वाचे बनले आहे.
भविष्याच्या विचार करून अनेक शैक्षणिक संस्थांना याचे महत्त्व चांगल्या प्रकारे समजले आहे, त्यामुळे अनेक शैक्षणिक संस्थांमध्ये याबद्दल शिक्षण सुरू झाले आहे.
Artificial Intelligence चे भविष्य | Future of AI
आर्टिफिशल इंटेलिजन्सच्या मदतीने भविष्यात मशिन्स आणि यंत्रे बसवून अनेक कामे सोपी होवू शकतात.
मनुष्यांच्या बदली या मशीनचा वापर करून अनेक अवघड कामे सोपी केली जाऊ शकतात.
तसेच 24 तास आपण या मशीनचा वापर करू शकतो, भारतातील अनेक ऑनलाईन कंपन्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स द्वारे ऑनलाईन सेवा अधिक चांगल्या प्रकारे देऊ शकत आहेत.
या सर्व सोबतच सायबर क्राईम, डेटा चोरी होणे, ऑनलाइन फ्रॉडस् या गोष्टींना देखील मोठ्या प्रमाणावर आळा बसू शकतो.
या गोष्टी इतक्या कमी वेळात होतात की मनुष्यांचा देखील यात वेळ वाचू शकतो.
त्यामुळेच या तंत्रज्ञानाचा विकास झपाट्याने होत आहे आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स या क्षेत्रामध्ये नोकऱ्यांचे प्रमाण देखील वाढत आहे.
Career in Artificial Intelligence | आर्टिफिशियल इंटेलिजन्सची वाढती व्याप्ती
प्रत्येक वर्षी काहीतरी नवीन शोध किंवा नवीन आव्हान आपल्यासमोर येऊन उभे राहते.
सध्या आयटी क्षेत्राबरोबरच आर्टिफिशल इंटेलिजन्स या तंत्रज्ञानाची व्याप्ती वाढली आहे.
कोरोना महामारी नंतर आर्टिफिशियल इंटेलिजन्स याचा वापर सगळीकडे सुरू आहे, तुम्हाला भरघोस पगाराची नोकरी हवी असेल तर आर्टिफिशियल इंटेलिजन्स या क्षेत्रामध्ये तुम्ही करिअर करू शकता.
संशोधन अहवालानुसार Artificial Intelligence / आर्टिफिशिअल इंटेलिजन्स च्या नोकऱ्यांमध्ये 2024-25 साली 33% वाढ होईल असा अज्ञान अंदाज संशोधकांनी वर्तविला आहे.
आर्टिफिशियल इंटेलिजन्स बरोबरच
– मशीन लर्निंग
– डीप लर्निंग
– सॉफ्टवेअर ऍनालिस्टिक
– रोबोटिक्स
– NLP (Natural language processing)
या क्षेत्रात देखील नोकरीच्या संधी झपाट्याने वाढत आहेत.
Artificial Intelligence अन्य क्षेत्रामध्ये
हॉस्पिटल्स, बँका, वाहने याबरोबरच बिझनेस मध्ये अनेक उपकरणे एकत्रित करण्यासाठी, वाहतूक, मनोरंजना आणि करमणूक, ऊर्जा शेत्र, शेती आणि शेतीचा विकास, उद्योगधंदे, उत्पादने तसेच व्यवसायामधील आकडेवारी व त्याचे विश्लेषण करण्यासाठी देखील आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्स या तंत्रज्ञानाचा वापर करू शकतो.
आर्टिफिशियल इंटेलिजन्स तंत्रज्ञानाचे फायदे | Advantages of Artificial Intelligence
– कामामध्ये अचूकता
– वेळेची बचत
– निर्णय घेण्याची क्षमता
– सुरक्षेची हमी
– कामाची गोपनीयता
– अनेक संसाधने आणि उपाययोजनांमध्ये वाढ
आर्टिफिशियल इंटेलिजन्स शिकण्यासाठी चे कोर्स | Courses for Artificial Intelligence
इंजीनियरिंग क्षेत्रात काम करणारे मुले आर्टिफिशियल इंटेलिजन्स, सॉफ्टवेअर, रोबोटिक्स या गोष्टी हाताळू शकतात.
आर्टिफिशियल इंटेलिजन्स मधे करिअर करण्यासाठी तुम्ही Computer Science /कम्प्युटर सायन्स ही फिल्ड निवडू शकता तसेच कम्प्युटर सोबत गणित विषयांचा देखील अभ्यास केला पाहिजे.
आर्टिफिशिअल इंटेलिजन्स प्रशिक्षण कोर्सेस
– कम्प्युटर सायन्स
– आयटी
– मेकॅनिकल
– इलेक्ट्रॉनिक्स
– पोस्ट ग्रॅज्युएशन
हे आर्टिफिशियल इंटेलिजन्स प्रशिक्षण घेण्याचे मुख्य कोर्सेस आहेत.
AI मुळे अर्थकारणाला मोठी मदत
भारतामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स आर्थिक क्षेत्रांमध्ये मोठ्या प्रमाणावर उपयोग केला जात आहे आणि त्याची अर्थकारणाला मदत देखील होत आहे.
आधुनिक तंत्रज्ञान आपल्या भारतातील लोकांच्या अर्थकारणावर परिणाम करत आहे.
आर्टिफिशल इंटेलिजन्स च्या मदतीने आपण आपल्या भारताच्या अर्थकारणाला योग्य ती चालना दिली तर आपल्या भारताचे अर्थकारण हे पुढील काही वर्षात नक्कीच जगात तिसऱ्या नंबर ला येईल.
Artificial Intelligence / आर्टिफिशियल इंटेलिजन्स मुळे भारताचे अर्थकारण सुधारू शकते.
देशातील सगळ्यात पहिले आर्टिफिशियल इंटेलिजन्स विद्यापीठ
आजच्या 21 व्या शतकात चॅट जी पी टी एप्लीकेशन व अनेक सॉफ्टवेअर अशा अनेक तंत्रज्ञानाचा वापर वाढला आहे.
त्यामुळे भविष्यात या तांत्रिक कामाचे जागा मशीन्स नक्की घेणार यात कोणतेही दुमत नाही आर्टिफिशल इंटेलिजन्स चे क्षेत्र दिवसेंदिवस अधिक वेगाने वाढताना आपल्याला दिसत आहे.
म्हणूनच या क्षेत्रात करिअरच्या लाखो संधी उपलब्ध आहेत.
आर्टिफिशियल इंटेलिजन्स निगडित कोर्सेस जर तरुण पिढीने केले तर तरुणाईचे उज्वल भवितव्य आपण पाहू शकतो.
सध्या हे कोर्सेस केले तर आर्टिफिशियल इंटेलिजन्स च्या संबंधित नोकरी करताना सुरुवातीला 50 ते 60 हजार रुपये पगार तरुणांना मिळू शकतो.
अनुभव आणि कौशल्याच्या आधाराद्वारे या पगारांमध्ये मागे पुढे होऊ शकते.
सद्या देशातील पहिलं Artificial Intelligence विद्यापीठ मुंबई ते कर्जत येथे सुरू होत आहे.
त्यामुळे या क्षेत्रात करिअर करू शकणाऱ्या तरुण-तरुणींसाठी एक अनोखी संधी चालून आलेली आहे.
निष्कर्ष
गेल्या काही वर्षांमध्ये Artificial Intelligence / कृत्रिम बुद्धिमत्ता चे विकास झपाट्याने झाल्यामुळे अनेक बेरोजगार लोकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील.
भविष्याचा विचार करता आर्टिफिशल इंटेलिजन्स हे तंत्रज्ञान मनुष्याला सुरक्षितेचे हमी देत आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.
आजच्या एकविसाव्या शतकात आपण देखील आर्टिफिशल इंटेलिजन्स सारख्या तंत्रज्ञान अभ्यास करणे गरजेचे आहे.
कारण पुढे जाऊन आपल्याला भविष्यात याची गरज नक्की लागू शकते त्यामुळे आत्तापासूनच आर्टिफिशियल इंटेलिजन्स सारख्या तंत्रज्ञानाची ओळख व व्याप्ती आपण समजावून घेतली पाहिजे.
धन्यवाद, माय मराठी ब्लॉग
हे सुद्धा वाचा
- ChatGPT म्हणजे काय ? Magic of AI in Marathi
- Machine learning म्हणजे काय | मशीन लर्निंग म्हणजे काय
- What is Internet banking ? इंटरनेट बँकिंग म्हणजे काय व त्याचे फायदे
- Neuralink म्हणजे काय ? Neuralink information in Marathi
- Data Science म्हणजे काय ? | डेटा सायन्स ची संपूर्ण माहिती
- Electric Vehicle कसं काम करते ? | EV working in Marathi