मित्रांनो चित्रपट हे आपण मनोरंजनसाठी पाहतो हे मात्र नक्की पन कित्येक असे सुद्धा मराठी चित्रपट आहेत जे आपण पाहिले नसणार किंवा आयुष्यात एकदा तरी तुम्ही पहावे, आशा top 20 Marathi films ची यादी या ब्लॉग मध्ये देण्यात आली आहे.
चित्रपटांची सुरुवात आपल्या मराठी माती पासूनच झाली आहे हे बऱ्याच लोकाना माहीत नाही, प्रत्येक मराठी माणसाने कोणतेही Marathi films असो, कोणत्याही विषयावर असो त्याला प्रोत्साहन दिले पाहिजे.
तर चला पाहूया आज पर्यंतचे top 20 Marathi films.
पुढील films ची क्रमवारी ही त्यांच्या IMDB रेटिंग नुसार ठरवण्यात आली आहे.
टॉप 20 Marathi Films
1. अशी ही बनवा बनवी (1988)
अशी ही बनवा बनवी हा चित्रपट 1988 या वर्षी प्रदर्शित झाला, यामध्ये Marathi films चे सुपेरस्टार अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे, सचिन पिळगांवकर व सिद्धार्थ यांनी भूमिका केली आहे.
या चित्रपटांचे दिग्दर्शक सचिन पिळगांवकर आहेत.
चार मित्रांची तूफान कॉमेडी असलेले ही चित्रपट तुम्ही नक्कीच पाहावे.
याची imdb rating 9.0 आहे.
2. अष्टविनायक (1979)
अष्टविनायक हे चित्रपट 1979 साली प्रदर्शित झाले, यामध्ये सचिन पिळगांवकर, राजा गोसावी व वंदना पंडित सारख्या नामवंत कलाकारांनी भूमिका साकारली आहे.
या चित्रपटांचे दिग्दर्शक राज दत्त हे आहेत.
एका मुलांवर सावत्र आईकडून होत असलेल्या अत्याचारापासून श्री गणेश कसे वाचवतात यांची कथा या चित्रपटामध्ये दाखवण्यात आली आहे.
याची imdb rating 8.7 आहे.
3. इनवेस्टमेंट (2013)
investment हे चित्रपट 2013 साली प्रदर्शित झाले आहे, यामध्ये तुषार दळवी, सुप्रिया विनोद, सुलभा देशपांडे व संजय मोने सारखे चांगल्या कलाकारांनी भूमिका साकारली आहे.
या चित्रपटाचे दिग्दर्शक रत्नाकर मेटकरी हे आहेत.
या चित्रपटामध्ये जॉब सोडून अमेरिकन फिल्म्स मध्ये काम करण्याची स्वप्न बघण्याऱ्या व्यक्तीची भूमिका व त्याची उत्कृष्ट कथा अतिशय उत्तम पद्धतीने सादर केली आहे.
याची imdb rating 8.7 आहे.
4. हरिश्चंद्राची फॅक्टरी (2009)
हा चित्रपट 2009 साली प्रदर्शित झाला, यामध्ये नंदू माधव, विभावारी देशपांडे, अथर्व कर्वे व मोहित गोखले यांनी अत्यंत सुंदर अशी भूमिका स्वीकारली आहे.
या चित्रपटाचे दिग्दर्शक परेश मोकाशी हे आहेत, हे चित्रपट त्यांनी दिग्दर्शित केलेले पहिले चित्रपट आहे.
1913 साली भारतीय चित्रपट सृष्टीचा जन्म दादासाहेब फालके यांच्या द्वारे झाला, भारताचे पहिले चित्रपट कसे तयार झाले यांची कथा या चित्रपटामध्ये दाखवण्यात आली आहे.
याची imdb rating 8.4 आहे.
5. जोगवा (2009)
जोगवा हा चित्रपट 2009 साली प्रदर्शित झाला, या चित्रपटामध्ये उपेंद्र लिमये, मुक्ता बर्वे ही मुख्य भूमिकेमध्ये आहेत.
या चित्रपटाचे दिग्दर्शक राजीव पाटील आहेत.
समाजाद्वारे जबरदस्ती झालेल्या जोगता व जोगतिनिची कथा दाखवण्यात आलेली आहे.
याची imdb rating 8.4 आहे.
6. अनुमति (2013)
अनुमति हा चित्रपट 2013 साली प्रदर्शित झाला, या चित्रपटामध्ये विक्रम गोखले, आनंद अभ्ह्यांकर, सुबोध भावे, ई सारख्या उत्तम कलाकारांनी भूमिका साकारली आहे.
या चित्रपटाचे दिग्दर्शक गजेंद्र अहिरे हे आहेत.
एका वृद्ध माणसाने आपल्या पत्नीचे आयुष्य वाचवण्यासाठी केलेली धडपड या चित्रपटमध्ये दाखवण्यात आली आहे, संपूर्ण कुटुंबासाठी या चित्रपटमधून उत्तम अशी शिकवण देण्यात आली आहे.
याची imdb rating 8.3 आहे.
7. शाळा (2011)
शाळा हे चित्रपट 2011 साली प्रदर्शित झाले, या चित्रपटामध्ये केतकी माटेगावकर, अंशुमन जोशी, दिलीप प्रभावळकर, ई कलाकार आहेत.
या चित्रपटाचे दिग्दर्शक सुजीत दहाके यांनी केले आहे.
9 वी इयत्तेतील मुळे त्यांच्या स्वप्ना बद्दल काय विचार करतात यांची एक उत्तम रचना आपणास या चित्रपटामध्ये पाहावयास मिळते
याची imdb rating 8.2 आहे.
8. देऊळ (2011)
हा चित्रपट 2011 साली प्रदर्शित झाला, या चित्रपटामध्ये नाना पाटेकर, दिलीप प्रभावळकर , उषा नाडकर्णी, ई कलाकार आहेत.
या चित्रपटाचे दिग्दर्शक उमेश कुलकर्णी ही आहेत.
गावातील एका व्यक्तीला असे वाटते की देव आला आहे व त्याच्यावर गावतील एकही व्यक्ति विश्वास करत नाही या वर आधारित कथा या चित्रपटामध्ये दाखवण्यात आली आहे.
याची imdb rating 8.2 आहे.
9. वाजवा रे वाजवा (1993)
वाजवा रे वाजवा हे चित्रपट 1993 साली प्रदर्शित झाले, या चित्रपटामध्ये अशोक सराफ, प्रशांत दामले, अजिंक्य देव व सतीश शहा ही मुख्य भूमिकेत आहेत.
या चित्रपटाचे दिग्दर्शन गिरीश घाणेकर यांनी केले आहे.
दोन उत्तम मित्र तसेच बिझनेस पार्टनर असलेल्या व्यक्तीची व त्यांच्या मुलांची कथा या चित्रपटामध्ये दाखवण्यात आलेली आहे.
याची imdb rating 8.2 आहे.
10. लपंडाव (1993)
हे चित्रपट 1993 साली प्रदर्शित झाले, या चित्रपटांमध्ये अशोक सराफ, वंदना गुप्ते व विक्रम गोखले सारख्या नामवंत कलाकारांनी भूमिका साकारलेली आहे.
या चित्रपटाचे दिग्दर्शक शरबणी देवधर ही आहेत.
दोन श्रीमंत कुटुंबांचे प्रेम तसेच एक लवलेटर वरुण झालेले मतभेद अशी उत्तम पटकथा या चित्रपटामध्ये दाखवण्यात आलेली आहे.
याची imdb rating 8.2 आहे.
11. बालक पालक (2013)
बालक पालक हा चित्रपट 2013 साली प्रदर्शित झाला, या चित्रपटामध्ये मदन देवधर, सास्वती पिंपलेकर, भागयश्री मिलिंद व अभिजीत केळकर यांनी भूमिका साकारली आहे.
या चित्रपटाचे दिग्दर्शक रवी जाधव यांनी केले आहे.
पालकांबरोबर संभाषण होत नसल्याने मुले वाईट वळणावर लागतात यांची कथा या चित्रपटामध्ये दाखवण्यात आली आहे.
याची imdb rating 8.1 आहे.
12. काकस्पर्श (2012)
काकस्पर्श हा चित्रपट 2012 साली प्रदर्शित झाला, या चित्रपटामध्ये सचिन खेडकर, प्रिया बापट, गौरी इंगवले व अभिजीत केळकर सारखे नामवंत कलाकारांनी भूमिका साकारली आहे.
या चित्रपटाचे दिग्दर्शक महेश मांजरेकर आहेत.
एक स्त्री जीने कमी वयातच तिच्या पतीला गमावले व तीला किती छळले जात आहे अशा स्त्रीची एक सुंदर कथा या चित्रपटाध्ये दाखवण्यात आली आहे.
याची imdb rating 8.0 आहे.
13. मुंबई पुणे मुंबई (2010)
मुंबई पुणे मुंबई हा चित्रपट 2010 साली प्रदर्शित झाला, यामध्ये स्वप्नील जोशी व मुक्ता बर्वे मुख्य भूमिकेत आहेत.
या चित्रपटाचे दिग्दर्शक सतीश राजवाडे ही आहेत.
मुंबई वरुण पुण्यात आलेली मुलगी होणाऱ्या वराला लग्नासाठी नकार देण्यासाठी असंख्य कारणे घेऊन येते पण पुढे वेगळेच काहीतरी घडते.
याची imdb rating 8.0 आहे.
14. मी शिवाजीराजे भोसले बोलतोय (2009)
मी शिवाजीराजे भोसले बोलतोय हा चित्रपट 2009 साली प्रदर्शित झाला आहे, या चित्रपटामध्ये महेश मांजरेकर, सचिन खेडकर, मकरंद अनासपुरे व सिद्धार्थ जाधव यांसारखे उत्तम कलाकार आहेत.
या चित्रपटाचे दिग्दर्शक संतोष रामदास मांजरेकर आहेत.
एका मराठी माणसाला कसे वागावे, कसे राहावे यांची शिकवण छत्रपती शिवाजी महाराज देतात या कथेवर आधारित हा चित्रपट आहे.
याची imdb rating 8.0 आहे.
15. डोंबिवली फास्ट (2005)
डोंबिवली फास्ट हा चित्रपट 2005 साली प्रदर्शित झाला, या चित्रपटामध्ये संदीप कुलकर्णी, पूर्णिमा अहिरे, औदुंबर अफळे व अश्विनी आपटे यासारखे उत्तम कलाकार आहेत.
या चित्रपटाचे दिग्दर्शक निशिकांत कामत आहेत.
भ्रष्टाचार विरुद्ध एका सामान्य माणसाचा लढा या चित्रपटामध्ये दाखवण्यात आला आहे.
याची imdb rating 8.0 आहे.
16. वास्तुपुरूष (2002)
वास्तुपुरुष हा चित्रपट 2002 साली प्रदर्शित झाला, या चित्रपटामध्ये सदाशिव अम्रापूरकर, उत्तरा बाओकर, सिद्धार्थ दफ्तरदार, ई कलाकार आहेत.
या चित्रपटाचे दिग्दर्शन सुमित्रा भावे व सुनील सुखठणकर यांनी केला आहे.
या चित्रपटामध्ये एका सुप्रसिद्ध डॉक्टर ची कथा दाखवण्यात आली आहे त्याच्या जीवणामधील वेग वेगळ्या घटना बद्दल माहिती उत्तम रित्या प्रदर्शित केली आहे.
याची imdb rating 8.0 आहे.
17. भारतीय (2012)
भारतीय हा चित्रपट 2012 साली प्रदर्शित झाला, या चित्रपटामध्ये मकरंद अनासपुरे, सुबोध भावे, मोहन आगाशे व कलूरम ढोबळे यांनी उत्तम भूमिका साकारली आहे.
या चित्रपटाचे दिग्दर्शक गिरीश मोहिते यांनी केल आहे.
एक व्यक्ति त्याच्या पूर्वजांची प्रॉपर्टी मिळवण्यासाठी गावी जातो ती प्रॉपर्टी त्याला मिळवण्यासाठी किती धडपड करावी लागते याबद्दल चित्रपट आहे.
याची imdb rating 7.9 आहे.
18. मला आई व्हायचंय (2011)
मला आई व्हायचंय हे चित्रपट 2011 साली प्रदर्शित झाला, या चित्रपटामध्ये उर्मिला कोठारे, stacy bee, समृद्धी पोरे व विवेक राऊत यांनी उत्तम भूमिका साकारली आहे.
या चित्रपटाच्या दिग्दर्शिका समृद्धी पोरे या आहेत.
या चित्रपटामध्ये एक फॉरेनर स्त्री सरोगेट आई च्या शोधात येते, तिला एक माहिला भेटते जी तिच्या मुलाला जन्म देण्यासाठी तयार होते या कथेवर आधारित हे चित्रपट आहे.
याची imdb rating 7.9 आहे.
19. एक होता विदूषक (1992)
एक होता विदूषक हा चित्रपट 1992 साली प्रदर्शित झाला, या चित्रपटाच्या मुख्य भूमिकेत लक्ष्मीकांत बेर्डे, सतीश आळेकर, मोहन आगाशे, ई आहेत.
या चित्रपटाचे दिग्दर्शक जबर पटेल हे आहेत.
एक विदूषक जो वेळेबरोबर प्रसिद्धीच्या अधीन होते याची कथा या चित्रपटामध्ये दाखवण्यात आली आहे.
याची imdb rating 7.9 आहे.
20. धूमधडाका (1985)
धूमधडाका हा चित्रपट 1985 साली प्रदर्शित झाला, या चित्रपटामध्ये महेश कोठारे, अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे व शरद तळवलकर हे कलाकार आहेत.
या चित्रपटाचे दिग्दर्शक महेश कोठारे ही आहेत.
मराठी सुपरस्टार ची भन्नाट कॉमेडी कथा या चित्रपटामध्ये दाखवण्यात आलेली आहे.
याची imdb rating 7.8 आहे.
हे सुद्धा वाचा
- Best Career options after 12th Science | 12 वी सायन्स नंतर काय करावे?
- Top 10 Marathi Blogging Tips | मराठी ब्लॉगिंग टिप्स
- Marathi blog कसा लिहावा | How to write Marathi blog
- Blog in Marathi म्हणजे काय? How to write a blog in Marathi
- GDP म्हणजे काय? GDP of Country in Marathi
- Fastag म्हणजे काय ? fastag information in Marathi.
आशा करतो की हा ब्लॉग तुम्हाला नक्की आवडला असेल, तुम्हाला काही शंका असल्यास आम्हाला कॉनटॅक्ट करा व आमच्या ब्लॉग ला subscribe करायला विसरू नका.