महाराष्ट्रातील १0 पर्यटन स्थळे
आज आपण महाराष्ट्रातील पर्यटन स्थळे (top 10 tourist places in maharashtra) यांची माहिती पाहणार आहोत.
महाराष्ट्र हे भारतातील एक महत्वाचे राज्य आहे, महाराष्ट्राला “गेटवे ऑफ द हार्ट ऑफ इंडिया” म्हणूनही ओळखले जाते.
इतर राज्यांप्रमाणेच महाराष्ट्राला सुद्धा विविधतेने नटलेल्या निसर्ग सौंदर्याचे वरदान मिळालेले आहे.
महाराष्ट्राच्या पश्चिमकडे सुंदर अशा पर्वतरांगा आहेत तर दुसरीकडे अथांग सागर किनारा लाभलेले कोकण आहे.
त्याच बरोबर महाराष्ट्रात अनेक धार्मिक स्थळे देखील आहेत.
Top 10 tourist places in maharashtra
१) कोल्हापूर
कोल्हापूर हे महाराष्ट्रातील एक महत्त्वाचे तीर्थक्षेत्र आहेच पण थंड हवेचे ठिकाण असल्याने एक पर्यटक स्थळ देखील आहे.
- महालक्ष्मी मंदिर
महलक्ष्मी मंदिर हे साडेतीन शक्तिपीठांपैकी एक असल्याने धार्मिक पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे.
- रंकाळा तलाव
कोल्हापूरमध्ये अहिल्याबाई होळकरांनी बांधलेला ऐतिहासिक रंकाळा तलाव प्रसिद्ध आहे, इथे सुंदर बाग बगीचा तर आहेच त्याचबरोबर आपण बोटिंग आणि विविध खाण्यापिण्याच्या पदार्थांचा ही आनंद घेऊ शकतो.
- कनेरी मठ
कनेरी मठ एक प्रेक्षणीय स्थळ आहे, तिथे प्राचीन शिव मंदिर तसेच जुन्या काळातील लोकांचे राहिणीमान मूर्तीरूपात साकारले आहे.
- न्यू पॅलेस
कोल्हापूरमधील न्यू पॅलेस हे एक ऐतिहासिक प्रेक्षणीय स्थळ आहे, तिथे भोसले राज घराण्यातील आणि शाहू महाराजांनी वापरलेली अनेक हत्यारे आणि तोफा आपल्याला पाहायला मिळतात.
- पन्हाळा
कोल्हापूर जिह्यातील ऐतिहासिक दृष्ट्या पन्हाळा किल्ला तर प्रसिद्ध आहेच पण हे थंड हवेचे ठिकाण म्हणून ही प्रसिद्ध आहे.
२) इगतपुरी
महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी हे ठिकाण निसर्गरम्य आणि अतिशय सुंदर असे पर्यटन स्थळ आहे.
पावसाळ्यात जर कुठे वर्षापर्यटनाला जायचे असेल तर इगतपुरी हे सर्वात उत्तम पर्याय आहे.
इगतपुरीच्या आसपास विपुल प्रमाणात मोठमोठे धबधबे आहेत जे पावसाळ्यात ओसंडून वाहत असतात.
महाराष्ट्रातील भरपूर प्रमाणात पाऊस पडणाऱ्या स्थळांमध्ये इगतपुरीचा समावेश होतो.
इगतपुरी हा नाशिक जिल्ह्यातील एक प्रमुख तालुका आहे, या ठिकाणी मुक्काम करून आसपासचा परिसर आपल्याला पाहता येतो.
येथील मनमोहक आणि निसर्गरम्य वातावरणामुळे अनेक टीव्ही मालिकांचे आणि चित्रपटांचे चित्रीकरण होत असते, त्यातील काही प्रमुख ठिकाणे खालीलप्रमाणे आहेत.
- विहिगाव धबधबा
विहिगाव धबधबा हा इगतपुरी पासून सुमारे १३.५ किमी अंतरावर आहे, विहिगाव धबधबा हा त्याच्या सभोवतालच्या मंत्रमुग्ध करणाऱ्या अप्रतिम अशा निसर्ग सौंदर्यासाठी प्रसिद्ध आहे.
धबधब्यापर्यंत जाण्यासाठी आपणास जंगलातून वाट काढत जावे लागते, आणि हा जंगलातील प्रवास अत्यंत वेधक आणि मनाला प्रसन्न करणारा आहे.
तसेच हा धबधबा त्याच्या १२० फूट खाली उतरण्यासाठी केलेल्या ट्रॅकसाठी प्रसिद्ध आहे.
हा ट्रॅक उतरून जाण्यासाठी साधारणपणे अर्धा तास लागतो, भारतातील मान्सून हंगाम हा जुलै ते ऑक्टोबर पर्यंत असतो, आणि या कालावधीमध्ये हा धबधबा पाहायला अतिशय योग्य आहे.
- कळसुबाई शिखर
महाराष्ट्रातील सह्याद्री पर्वतरांगांमधील आणि महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर म्हणजे कळसुबाई शिखर.
अतिशय मनमोहक,निसर्गरम्य आणि चित्तथरक असे कळसुबाई शिखराचे दृश्य आहे.जे पाहून मन अगदी प्रसन्न आणि आनंदी होऊन जाते.
हा पर्वत चढाई करण्यासाठी खूपच कठीण आहे, अनुभवी गिर्यारोहकांना देखील याची चढाई करणे कठीण जाते.
जर तुम्हाला शिखरावर चढाई करायची नसेल तर तुम्ही पायऱ्यांचा वापर करून या शिखरावर जाऊ शकता.
त्याचबरोबर कळसुबाई शिखर जवळ अनेक टेकड्या आहेत त्या वर तुम्ही जाऊ शकता. आणि या टेकड्यांवर तुम्ही सहज जाऊ शकता.
- भावली धरण
भावली धारण हे इगतपुरी जवळील भावली परिसरातील भाम या नदीवर बांधलेले एक विशाल धरण आहे.
या धरणाच्या सभोवतालचा परिसर निसर्ग सौंदर्याने भरलेला व रमणीय आहे.
या धरणाची तटबंदी सुमारे १११.५ फूट उंच तर ५०९० फूट लांबी आहे.सुमारे १०० पायऱ्या चढून या धरणावर जाता येते.
- त्रिंगलवाडी किल्ला
घाटदेवी मंदिराच्या सावलीत तुम्हाला हा त्रिंगलवाडी किल्ला मिळेल, जो जमिनीपासून ३००० मीटर उंचीवर आहे.
१० व्या शतकात बांधण्यात आलेला हा किल्ला गिर्यारोहक आणि ट्रेकिंगची आवड असलेल्या लोकांमध्ये प्रचंड लोकप्रिय आहे.
या किल्ल्यावरून कोकण आणि नाशिकमधील वाटा संपूर्णपणे दिसतात, त्रिंगलवाडी येथील किल्ल्याचा शिखर जो एखाद्या पगडीसारखा दिसतो,जे तेथील प्रमुख आकर्षणाचे केंद्र आहे.
येथेच तळेगाव तलाव आहे, या तलावाच्या सभोवतालच्या टेकडीच्या पायथ्याशी हनुमानाचे एक मंदिर आहे.
याचबरोबर भातसा नदीचे खोरे,सांधण व्हॅली, कसारा घाट, म्यानमार गेट, कॅमल व्हॅली कुलंगगड ट्रेक, बितनगड ट्रेक, अमृतेश्वर मंदिर, धम्मगिरी ध्यान केंद्र उर्फ विपश्यना केंद्र हे देखील पाहण्यासाठी सुंदर अशी ठिकाणे इगतपुरीमध्ये आहेत.
३) आंबोली
आंबोली, महाराष्ट्रातील सह्याद्री पर्वतरांगांमध्ये वसलेले एक हिल स्टेशन जे शहरी जीवनातील रोजच्या गजबजलेल्या गर्दीपासून दूर आणि आनंददायी अशा वातावरणातील एक ठिकाण आहे.
समुद्रसपाटीपासून ६९० मीटर उंचीवर वसलेले आहे, आंबोलीतील शांत वातावरण,हिरवेगार पर्वत आणि सुंदर अशा धबधब्यांनी भरलेले आहे. आंबोलीला “महाराष्ट्राच्या हिल स्टेशनची राणी” म्हणून देखील ओळखले जाते.
आंबोलीतील काही प्रसिद्ध ठिकाणे आणि त्यांची माहिती आपण पुढे पाहु.
- आंबोली धबधबा
आंबोलीतील प्रमुख आकर्षण म्हणजे भव्य आंबोली धबधबा, हे नैसर्गिक आश्चर्य १०० फुटांहून अधिक उंचीवरून खाली कोसळणारे पाणी आणि धुके यांचा मंत्रमुग्ध करणारा असा देखावा तयार करते.
जून ते सप्टेंबर दरम्यानच्या पावसाळी हंगामात हा धबधबा पाहण्याचा सर्वोत्तम काळ आहे.
- हिरण्यकेशी नदी
आंबोली हे हिरण्यकेशी नदीचे उगमस्थान देखील आहे, नदीकाठावरील नैसर्गिक सौंदर्य मनाला भुरळ पडणारे आहे.
- सनसेट पॉईंन्ट
आंबोलीला अनेक निसर्गरम्य ठिकाणे लाभलेली आहेत आणि त्यापैकी सर्वात मोहक ठिकाण म्हणजे सनसेट पॉईंट.
उंच स्थानावर स्थित, सनसेट पॉईंट आसपासच्या खोऱ्यांचे विहंगम दृश्य आणि दिवसाला निरोप देताना सूर्याचे चित्तथरारक दृश्य मनाला भुरळ घालते.
जसजसा सूर्य मावळण्यास सुरुवात होते, तसतसे केशरी, गुलाबी आणि सोनेरी रंगाने आकाश रंगून जाते,आणि एक सुंदर असा देखावा तयार होतो ज्यामुळे पर्यटक मंत्रमुग्ध होऊन जातात.
येथे बिबट्या, रानगवे, ससे, हरीण, भेकरे, रानमांजर अशी वन्यजीव देखील पहायला मिळतात.
आंबोली पासून ३० किमी अंतरावर सावंतवाडी आहे, तेथे देखील अनेक सुंदर ठिकाणे आहेत, सावंतवाडीच्या राजाचा राजवाडा, नागरतास धबधबा, महादेवगड, मनोहरगड, असे जुने किल्ले देखील बघण्यासारखे आहे.
आंबोलीला जाण्यासाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत, कोल्हापूर मधून सावंतवाडीला रेल्वेने जाऊन तेथून बसेस किंवा तेथील इतर सार्वजनिक वाहनाने आपण आंबोलीला जाऊ शकतो.
राहण्याची देखील येथे सोय आहे.
४) माळशेज घाट
काही जाणकारांच्या मते स्वित्झर्लंडपेक्षा देखील आपल्या महाराष्ट्रातील माळशेज घाट अप्रतिम निसर्ग सौंदर्याचे प्रतीक आहे.
पावसाळ्याच्या दिवसात माळशेज घाटात ठिकठिकाणी दिसणारे धबधबे, हात वर केला तरी हाताला ढगांचा स्पर्श होतो की काय असे धुक्यानी भरलेले आसमंत मनाला आनंदी करतात.
त्याचबरोबर अप्रतिम अशा डोंगररांगा,सतत कोसळणारा पाऊस,उंच उंच कड्यांवरून कोसळणारे धबधबे आपल्याला प्रेमात पाडतात.
निसर्गाने धरतीवर अंथरलेला हिरवागार गालिचा पाहून इथेच राहावे, असे प्रत्येकाला वाटायला लावणारा असा हा माळशेज घाट आहे.
त्याचबरोबर माळशेज घाटा जवळच खुबी या गावात पिंपळगाव जोगा धरण आहे.या पावसाळ्यात ठिकाणी स्थलांतरित पक्षी पाहण्याची देखील संधी आपल्याला मिळते.
माळशेज घाट या ठिकाणी जाण्यासाठी साठी मुंबई पुणे येथून विविध सार्वजनिक वाहनांची आणि बसेसची सोय आहे.
पर्यटकांच्या सोयीकरता या ठिकाणी देखील एमटीडीसीचे रिसॉर्ट देखील आहे.घाटाच्या पायथ्याशी देखील रिसॉर्ट झाले आहेत.
५) कोकण – तारकर्ली- रत्नागिरी- सिधुदुर्ग
महाराष्ट्र जसा ऐतिहासिक दृष्ट्या प्रसिद्ध आहे तसाच त्याला विस्तिर्ण असा समुद्र किनारा लाभला आहे, त्यामुळे कोकण हे पर्यटनासाठी खूप प्रसिद्ध आहे.
- तारकर्ली
तारकर्ली समुद्र किनारा आणि सुंदर निसर्ग सौंदर्यासाठी प्रसिद्ध आहे.
- रत्नागिरी
रत्नागिरी हे कोकणातील एक महत्त्वाचे जिल्ह्याचे ठिकाण असून इथे ही आपल्याला सुंदर समुद्र किनारा पाहायला मिळतो.
तसेच तिथले मत्स्यालय देखील प्रेक्षणीय आहे.
- सिंधुदुर्ग
सिंधुदुर्ग हा देखील कोकणातील एक महत्त्वाचा जिल्हा आहेच इथे ही सुंदर समुद्र किनारा आहे पण सिंधुदुर्ग जिल्ह्याचे सगळ्यात मोठे आकर्षण म्हणजे समुद्राच्या मधोमध एका बेटावर उभारलेला सिंधुदुर्ग किल्ला आहे.
अनेक लोक तिथे तो किल्ला पाहण्यासाठी दरवर्षी जात असतात.
तसेच गणपतीपुळे, मार्लेश्वर अशी धार्मिक तीर्थक्षेत्रे देखील प्रसिद्ध आहेत.
६) औरंगाबाद सध्याचे छत्रपती संभाजीनगर
महाराष्ट्रातील औरंगाबादच्या ईशान्येला सुमारे १०५ किलोमीटर अंतरावर असलेल्या नदीच्या खोऱ्यात , वाघूर नदीच्या कडेला असलेल्या घोड्याच्या नालच्या आकाराच्या खडकात अजिंठ्याची प्राचीन गुहा मंदिरे कोरलेली आहेत.
एलोरा लेण्यांपेक्षा खूप जुनी, अजिंठा गुंफेचे जाळे तयार करणाऱ्या ३० रॉक-कट बौद्ध लेणी स्मारकांची साखळी सुमारे दुसरे शतक ते ६व्या शतकादरम्यान आली.
त्यांच्या तपशीलात चमकदार, अजिंठा लेणी ही प्राचीन भारतीय गुहा कलेची सर्वात मोठी जिवंत उदाहरणे आहेत.
दगडात कोरलेल्या अशा एकूण सतरा लेण्या आपल्याला तिथे पाहायला मिळतात.
तसेच प्रति ताजमहाल म्हणून ओळखले जाणारे बीबी का मखबरा ही संभाजीनजरमध्येच आहे.
दौलताबाद किल्ला, घृष्णेश्वर मंदिर, पटेल खोरा लेणी, सोनेरी महाल ही प्रेक्षणीय स्थळे ही तिथे पाहायला मिळतात.
७) सातारा जिल्हा
- महाबळेश्वर
महाबळेश्वर हे महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध थंड हवेचे ठिकाण आहे.
- आर्थर सीट पॉईंट
महाबळेश्वरातील सर्वात प्रसिद्ध पॉईंट म्हणून ओळखला जातो, या पॉईंटच्या डावीकडे खोल दरीतून कोकणात जाणारी सावित्री नदी आहे तर उजवीकडे घनदाट जंगले आहेत यालाच ब्रम्हारण्य असेही म्हणतात.
हि सर्व मनमोहक आणि आकर्षक दृश्ये इतर गोष्टींचा विसर पडायला भाग पाडतात. हवामान जर स्वच्छ असेल तर या पॉईंटवरून रायगड किल्ला,तोरणा किल्ला स्पष्ट दिसतात.
याच मार्गावर ‘टायगर स्प्रिंग’, ‘इको पॉईंट’, ‘एलफिस्टन पॉईंट’ आहेत.
- ईको पॉईंट
आर्थर पॉईंटच्या मार्गावरच मनमोहक ,आरोग्यदायक आणि नैसर्गिक दृष्टया समृद्ध असा ईको पॉईंट आहे.इथे खोल दऱ्या, उंच पर्वत पहावयास मिळतात.
- वेण्णा लेक
सन १८४२ साली,सातारचे राजे श्रीमंत छ.आप्पासाहेब महाराज यांनी ‘वेण्णा लेक’ची निर्मिती केली.
वेण्णा लेकचा विस्तार सुमारे २८ एकर क्षेत्रात असून त्याची सरासरी खोली १०फुट आहे.
तसेच बारमाही वाहणाऱ्या झऱ्यामुळे येथील उदयाने व बगीचे फुलले आहेत.यामुळे प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरित्या येथील सौंदर्यात आणखीनच भर टाकली गेली आहे.
तलावा भोवतालचा संपूर्ण परिसर झाडे, हिरवळ आणि फुलांनी व्यापलेला आहे.
पावसाळ्यानंतर येथे भरपूर पाणी साठा असतो. त्यामुळे या ठिकाणाला भेट देण्याची हीच योग्य वेळ आहे.
हे ठिकाण पाचगणीच्या एस.टी.बस स्थानकापासून सुमारे २ किमी अंतरावर
- श्रीक्षेत्र महाबळेश्वर
महाबळेश्वर हे नाव भगवान महादेव (महाबली) यांच्या नावापासूनच प्राप्त झालेले आहे.
जुन्या महाबळेश्वर मध्ये महादेवाचे आहे, यालाच क्षेत्र महाबळेश्वर असेही म्हणतात.
महाबळेश्वर पासून ५ किमी अंतरावर क्षेत्र महाबळेश्वर आहे.या ठिकाणी अनेक धार्मिक स्थळे आहेत, तसेच १३ व्या शतकातील सर्वात जुने कृष्णाबाई मंदिर आहे.
- कास पठार
वेगवेगळ्या फूलांचा आनंद जर घ्यायचा असेल तर एक वेळेस सातारा जिल्हात असलेल्या कास पठाराला भेट द्यायलाच पाहिजेत.
कास पठार विविध प्रकारच्या फुलांसाठी ओळखले जाते. इथे फुले पाहण्यासाठी आलेल्या पर्यटकांना अजून एका ठिकाणाचे आकर्षन असते ते म्हणजे कास तलाव.
कास पठारावर आल्यानंतर पर्यटक कास तलाव पाहण्यासाठी आवर्जून जात असतात. कास तलावाच्या बाजूलाच उंच डोंगराळ भाग आहे. त्या भागामध्ये मोठ मोठे फिक्या काळ्या रंगाचे दगड आढळतात.
या दगडांवर उभे राहून निसर्गाचे सुंदर दृश्य पाहता येते.
पठारावर वेगवेगळ्या प्रकारचे फुले आहेत. सातारी वायतुरा, मंजिरी, कासा, तेरडा, कुमुदिनी, अंजन, सीतेची आसवे, सोनकी, हालुंदा, कंदील पुष्प, चवर आणि आभाळी अजून अनेक प्रकार आहेत.
कास पठाराचा महाराष्ट्राच्या सात आश्चर्यांमध्ये समावेश केलेला आहे.
तसेच अजिंक्यतारा किल्ला, प्रतापगड असे किल्ले ही पाहण्यासारखे आहेत.
८) पुणे
पुण्याला महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी असे म्हणतात पेशवे काळत पुणे हे एक महत्त्वाचे राजकिय स्थान म्हणून प्रसिद्ध होते.
- शनिवार वाडा
पुण्यातील पेशवेकालीन शनिवार वाडा प्रसिद्ध आहे, शनिवारवाडा 1732 मध्ये पेशवे घराण्याने बांधला होता.
पण दुर्दैवाने या वास्तूतील सगळे ऐतिहासिक अवशेष नष्ट झाले असून आता फक्त त्याची तटबंदीच पाहायला शिल्लक राहिली आहे.
- सारस बाग
सारस बाग हे एक ऐकतिहासिक उद्यान आहे, इथे तुम्हाला हिरवीगार झाडे आणि रंगीबेरंगी फुले पाहायला मिळतात.
इथले एक खास वैशिष्ट्य म्हणजे या बागेत एक छोटे तळे आहे त्यात एक गणपतीचे मंदिर आहे, इथे बोटिंगची ही व्यवस्था आहे.
- श्रीमंत दगडूशेठ हलवाई मंदिर
पुण्यातील दगडूशेठ हलवाई मंदिर खूप प्रसिद्ध आहे, दगडूशेठ हे एक श्रीमंत मिठाई व्यापारी होते, त्यांचा मुलगा प्लेगच्या साथीत मरण पावला म्हणून त्यांनी दगडूशेठ हलवाई मंदिराची व ट्रस्टची स्थापना केली.
तसेच तुळशी बाग एक मोठी बाजारपेठ, पर्वती अशी पाहण्यासारखी ठिकाणे इथं आहेत.
९) नाशिक
नाशिक हे देखील महाराष्ट्रातील एक प्रमुख ऐतिहासिक शहर आणि तीर्थक्षेत्र देखील आहे.
- गंगापूर धरण
हे धरण गोदावरी नदीच्या काठावर असून नाशिकपासून दहा किलोमीटर वर आहे इथं एक सुंदर बाग आहे.
- काळाराम मंदिर
नाशिक मधील पंचवटी परिसरात हे एक पुरातन मंदिर आहे या मंदिराची स्थपणा सन 1788 मध्ये सरदार रंगराव ओढेकर यांनी केली होती.
- त्र्यंबकेश्वर मंदिर
हे मंदिर बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असून हे मंदिर ब्रह्मगिरी पर्वताच्या पायथ्याशी आहे. हे मंदिर गोदावरी नदीचे उगमस्थान आणि श्रीगणेशाचे जन्मस्थान मानले जाते. इथे बारा वर्षातून एकदा भरणारा जगप्रसिध्द कुंभमेळा भरतो.
- पंचवटी
या ठिकाणी श्रीराम वनवासात असताना वास केला होता, इथेच रावणाची बहीण शूर्पणखा हिचे नाक लक्ष्मणाने कापले होते असं म्हणतात आणि त्यावरूनच या शहराला नाशिक नाव पडले अशी ही मान्यता आहे.
१०) मुंबई
हे सगळ्यात महत्त्वाचं पर्यटनस्थळ आहे, महाराष्ट्राची राजधानी आहे तर देशाची आर्थिक राजधानी देखील आहे.
हे शहर स्वप्ननगरी, मायानगरी आणि कधीही झोपत नाही अशा अनेक नावांनी ओळखले जाते.
मुंबई शहर सात बेटांवर वसलेले शहर आहे, मुंबई आपल्या महाराष्ट्राची राजधानी आहे तसेच महाराष्ट्राचा सर्व राजकीय कारभार मुंबईमधून पाहिला जातो.
राज्यातील सर्व प्रशासकीय मुख्य कार्यालये व मोठ-मोठ्या उद्योगांचे मुख्य कार्यालये मुंबईमध्येच आहे.
आपल्या देशाची आर्थिक राजधानी मुंबईच आहे, मुंबईमध्ये जगातील मोठ-मोठे उद्योग स्थित आहे.
देशाला मनोरंजन पुरवणारी फिल्म इंडस्ट्री देखील इथेच आहे, मुंबईला मायानगरी म्हनूण ओळखलं जातं, हे फक्त औद्योगिक व राजकीय शहर नसून एक मोठं पर्यटन केंद्र म्हणून प्रसिद्ध आहे.
- गेट वे ऑफ इंडिया
गेट वे ऑफ इंडिया हे मुंबईमधील प्रमुख पर्यटन स्थळ आहे.
अरबी समुद्राच्या काठावर अपोलो बंदर वॉटरफ्रंटवरील भव्य रचना ही शहराच्या वसाहतवादी भूतकाळाची साक्ष आहे.
किंग जॉर्ज पाचवा आणि क्वीन मेरी यांनी 1911 मध्ये ब्रिटिश भारताला भेट दिली तेंव्हा त्यांच्या स्वागतासाठी ते बांधण्यात आले.
- नेहरू तारांगण
नेहरू तरंगणाची स्थापना 19767 साली वरळी येथे झाले. हे देशातील सर्वांत प्रगत तरंगणापैकी एक आहे. हे विज्ञान आणि अंतरळ केंद्र तरुणांना विश्वाविषयी आणि अंतराळा विषयी शिक्षण घेण्यास प्रवृत्त करसण्यास सज्ज आहे.
- चौपाटी आणि जुहू बिच
मुंबई शहर समुद्र किनाऱ्यावर वसले आहे तिथे सुंदर असा समुद्र किनारे आहेत तसेच व्हॉटर स्पोर्ट देखील तिथे आपण खेळू शकतो. समुद्रात नौका विहाराचा आनंद ही घेता येतो.
तसेच वानखेडे स्टेडियम, कुलाबा कोजवे,छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय अशी बरीच प्रेक्षणीय ठिकाणे आहेत.
ही महाराष्ट्रातील टॉप 10 पर्यटन स्थळे आहे. Top 10 tourist places in maharashtra
धन्यवाद
TEAM MY MARATHI BLOG