marathi blog कसा लिहावा | How to write marathi blog

boy typing while seating on table

Marathi Blog लिहून आपण असंख्य लोकांपर्यंत आपले विचार पोहोचऊ शकतो, Marathi blog चा फायदा ब्लॉग लिहणाऱ्याला तसेच ब्लॉग वाचकाला सुद्धा होतो.

marathi blog मुळे आज अनेक लोक नाव नवीन माहिती घेण्यास समर्थ ठरत आहेत, ब्लॉग लिहण्याची व ब्लॉग वाचकांची संख्या देवसेंदिवस वाढत आहे, म्हणून मराठी ब्लॉग कसे लिहावे ही तुम्हाला माहीत असणे गरजेचे आहे.

उत्तम ब्लॉग तयार करण्यासाठी खालील घटक माहीत असणे खूप गरजेच आहे.

ब्लॉग चे मुख्य घटक

तुम्ही अनेक blog वाचले असतील, काही ब्लॉग तुम्हाला आवडतात तर काही नाही कारण ब्लॉग ची सुंदरता काही घटकांवर अवलंबून असते.

जर ते घटक ब्लॉग मध्ये वापरलेले नसले तर ब्लॉग वाचकांना काही गोष्टी अपूर्ण आहेत असे वाटते, तर चला जाणून घेऊ marathi blog चे मुख्य घटक.

1. ब्लॉग चा विषय | Marathi Blog Subject

blog तयार करण्यासाठी सर्वात महत्वाचा व सर्वात मोठा घटक म्हणजे तुमच्या ब्लॉग चा विषय, हो ब्लॉग चा विषय हा ब्लॉग चा पाया आहे व पाया हा भक्कम असणे बंधनकारक असते.

तुम्हाला कोणत्या विषयात रुची आहे ही तुम्हाला माहीत असणे अत्यंत गरजेचे आहे, ज्या विषयात तुम्हाला रस नाही त्या विषयावर तुम्ही जास्त काही लिहू शकत नाही.

तुम्हाला ही शोधावा लागेल की तुम्हाला कोणत्या विषयावर लिहणे आवडेल तो विषय कोणत्या ही क्षेत्रा मधला असो.

एखादा चांगला विषय वाचकांना आकर्षित करण्यासाठी पुरेसा असतो, आणि जर तो विषय तुम्हाला खूप आवडत असेल तर वाचकांशी तुम्ही चांगल्या पद्धतीने संवाद साधू शकता.

ब्लॉग वाचकांना आवडणारा विषय निवडा जेणेकरून जास्ती जास्त Blog Post तुम्हाला लिहिता येतील व जास्ती जास्त वाचकान पर्यन्त तुम्हाला पोहचता येईल.

2. ब्लॉग चा शीर्षक (हेडलाईन) | Marathi Blog Head Line

ब्लॉग चा विषय निवडून झाल्यानंतर ब्लॉग च्या हेडलाईन वर लक्ष द्यावा लागतो, वाचकांच्या डोळ्या समोर सर्वात पाहिला ब्लॉग ची हेडलाईन समोर येते.

हेडलाईन वाचून वाचक ब्लॉग वाचायचा आहे की नाही हे ठरवतो, ब्लॉग चा शीर्षक आवडला नसेल तर रीडर स्क्रोल करून पुढे जातो.

म्हणून उत्तम ब्लॉग ला उत्तम हेडलाईन ची गरज असते, उत्तम हेडलाईन तुमच्या वाचकांची संख्या सशक्त पणे वाढाऊ शकते.

ब्लॉग चा शीर्षक हा एसईओ SEO (Search Engine Optimization) फ्रेंडली असणे खूप गरजेच आहे, कारण जेव्हा एखादा व्यक्ति सर्च इंजिन वर काही सर्च करतो तेव्हा त्या व्यक्तीला अपेक्षित माहिती पोहचवणे हे ब्लॉग लिहिणाऱ्याचे काम असते.

जर शीर्षकामध्ये एसईओ फ्रेंडली Keyword उपलब्ध असेल तेव्हाच ते ब्लॉग पोस्ट सर्च इंजिन द्वारे वाचकाला दाखवले जाते.

एखादे चांगले हेडलाईन असलेले ब्लॉग खूप जास्त वाचले जाते.

3. ब्लॉग मधील माहिती | Marathi Blog Information

उत्तम हेडलाईन लिहल्यानंतर आपल्याला ब्लॉग पोस्ट मधील माहितीकडे लक्ष देणे खूप गरजेचे असते.

एखाद्या ब्लॉग मध्ये तीच माहिती असणे गरजेचे आहे जी माहिती घेण्यासाठी वाचक तुमच्या ब्लॉग वर आला आहे.

तुमचे ब्लॉग पोस्ट ही वाचकांची समस्या सोडवण्यासाठी प्रेरक असले पाहिजेत, जेणेकरून वाचक पुनः पुनः तुमच्या ब्लॉग वर येईल व नवनवीन ब्लॉग वाचेल.

चुकीची माहिती किंवा वाचकाला नको असलेली माहिती पुरऊ नका यामुळे तुमच्या ब्लॉग ची क्वालिटी खराब होते व वाचक तुमचे ब्लॉग पोस्ट वाचण्यास रस घेणार नाहीत.

म्हणून marathi blog लिहिताना ब्लॉग मध्ये व्यवस्तीत सर्च केलेली व उत्तम माहिती प्रदान करा.

4. ब्लॉग ची हुक लाइन | Hook of Marathi Blog

वाचक तीच माहिती सर्च करतो जी माहिती वाचकाला माहिती नसते किंवा ज्याबद्दल वाचकाला अधिक माहिती पाहिजे असते.

वाचक सर्च इंजिन वर how to…., best…., what is….., TOP 10….. असे अनेक हुक शब्द सर्च करतो.

उदा. जर वाचकाला instagram वर फोटो कसे पोस्ट करायचे यांची माहिती पाहिजे असेल तर तो सर्च करेल how to post picture on instagram?

GDP संबंधित माहिती पाहिजे असेल तर तो सर्च करेल What is GDP?

अश्या प्रकारे तुम्ही अनेक हुक लाइन चा उपयोग करून ब्लॉग पोस्ट लिहू शकता.

या ब्लॉग चा शीर्षक पहा How to write marathi blog.

मराठी ब्लॉग कसा लिहावा | Blog Writing Step by Step

1. किवर्ड रिसर्च

ब्लॉग चा विषय ठरावल्यानंतर सर्वात पहिला तुम्हाला किवर्ड रिसर्च करांव लागेल, जय विषयावर तुम्ही ब्लॉग पोस्ट लिहीत असणार त्या संबंधित किवर्ड सर्च करा.

ahref tool, ubersuggest keyword tool ई अनेक किवर्ड टूल्स आहेत ज्यांच्या मदतीने तुम्हाला उत्तम व SEO फ्रेंडली किवर्ड मिळतील.

किवर्ड मिळाल्यानंतर ते आपल्या हेडलाईन मध्ये तसेच ब्लॉग मध्ये त्या किवर्ड चा उपयोग उत्तम रीतीने उपयोग करा, 1000 शब्द असलेल्या ब्लॉग मध्ये किमान 5 वेळा तरी किवर्ड चा उपयोग करा व किमान 10 वेळा.

2. उत्तम पोस्ट टाइटल

किवर्ड रिसर्च नंतर त्या किवर्ड चा उपयोग आपल्या ब्लॉग च्या टाइटल मध्ये करा.

उदा. गिटार बद्दल माहिती लिहायची असेल तर TOP 10 BEST GUITAR असे पोस्ट टाइटल तुम्हाला देता येईल.

तुमच्या पोस्ट च टाइटल वाचून वाचक ब्लॉग वाचायच आहे की नाही ही ठरवतो, म्हणून पोस्ट टाइटल वर विशेष लक्ष द्यावा लागतो.

3. ब्लॉग चा बॅनर

टाइटल लिहून झाल्यानंतर तुम्हाला ब्लॉग विषयचे फोटो टाइटल च्या खाली लावावा लागतो, व्यवस्तीत डिझाईन केलेले ब्लॉग बॅनर वाचकाणा आकर्षित करतात.

ब्लॉग मध्ये अपलोड केलेले फोटो ही कॉपीराईट असलेले नको, गूगल बॉट यावर बारकाईने लक्ष देतात.

तुम्ही स्वतः डिझाईन केलेले किवा फ्री असलेले फोटो तुम्ही अपलोड करू शकता.

जे फोटो तुम्ही अपलोड करणार आहात ते फोटो 100 kb पेक्षा कमी साइज चे असले पाहिजेत.

जितके कमी kb चे पिक्चर तुम्ही अपलोड करणार तितक्या लवकर तुमचा ब्लॉग वाचकांच्या स्क्रीन वर ओपेन होईल.

4. ब्लॉग ची सुरुवात

ब्लॉग ची सुरुवात ही अतिशय उत्तम असली पाहिजे, त्यामध्ये उगाच पसारा केलेले वाक्य लिहणे टाळावे.

निबंध लिहल्यासारखे ब्लॉग लिहू नका, तुम्ही मांडलेले विचार ही वाचकाला आवडले पाहिजे, म्हणून ब्लॉग ची पहिली ओळ ही सुंदर पद्धतीने सांगता आली पाहिजे.

ब्लॉगच्या पहिल्या ओळीत paragraph सोडू नये, पहिली ओळ ही ब्लॉगच्या आउटलाइन पासून सुरुवात करा.

तुम्ही सर्च केलेले किवर्ड ही पहिल्या ओळी मध्ये असणे गरजेचे आहे.

अश्या रीतीने तुम्ही ब्लॉग ची सुरुवात करू शकता.

5. ब्लॉग मधील माहिती

ब्लॉग लिहिताना एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्हाला ब्लॉग मधील माहिती ही स्वतःच्या शब्दांत लिहायचे आहे, माहीत कॉपी करून लिहू नका.

व्यवस्तीत सर्च करून व स्वतःचे विचार मांडून ब्लॉग लिहावा.

माहिती लिहीत असताना किवर्ड चा ही उपयोग करा जेणेकरून SEO साठी तुमचा ब्लॉग उपयुक्त ठरेल.

ब्लॉगची माहिती 2-3 ओळींची असणे गरजेचे आहे, निबंध लिहल्यासारखे ब्लॉग लिहले जात नाही.

6. SEO कडे लक्ष द्या

कष्टाने लिहलेला ब्लॉग जर वाचकांपर्यंत पोहचत नसेल तर तुम्ही खूप निराश होणार.

आपले ब्लॉग सर्च इंजिन पर्यन्त पोहचवण्यासाठी तुम्हाला seo फ्रेंडली ब्लॉग लिहावे लागतील, म्हणजेच तुमचा ब्लॉग हा ब्लॉग टाइटल ल उद्देशून असला पाहिजे.

वाचकाला अपेक्षित असलेली माहिती वाचकपर्यंत पोचवण्यासाठी seo चा उपयोग करणे अत्यंत गरजेचे आहे.

7. सब हेडलाईन चा उपयोग करा

blog मध्ये हेडलाईन बरोबरच सब हेडलाईन असणे गरजेचे आहे, यामुळे वाचकांना संक्षिप्त पणे माहिती मिळण्यास मदत होईल.

ब्लॉग मध्ये असलेला विषय वाचकांना दर्शवण्या बरोबरच काही संबंधित असलेले विषय सुद्धा ब्लॉग मध्ये दिले जातात यामुळे ब्लॉग ची लेन्थ पन वाढते.

8. ब्लॉगने समस्या सोडवा

वाचकाला तुमचा ब्लॉग वाचून फायदा झाला पाहिजे ही एकमेव उद्देश ठेवा.

यामुळे तुम्हाला खूप ब्लॉग लीहण्याची व वाचकाला अधिक ब्लॉग वाचण्याची प्रेरणा मिळते.

विशेष प्रश्न सोडवण्यासाठी तुमच्या ब्लॉग चा उपयोग वाचलकाला झाला पाहिजे, वाचकांना पडणारे प्रश्न ही तुमच्या ब्लॉग द्वारे सुटले पाहिजे.

9. ब्लॉग सर्वप्रथम स्वतः वाचा

ब्लॉग लिहून झाल्यानंतर तुमचा ब्लॉग सर्वप्रथम तुम्ही स्वतः वाचा, काही चुका झाल्या असतील तर त्या दुरुस्त करा.

टायपिंग च्या काही चुका असतील तर त्या दुरुस्त करा, ब्लॉग वाचताना लिंक न तुटावी यांची दाखल घ्या.

स्पेलिंग मिस्टेक असेल तर ते सुधारून घ्या.

तुमचा ब्लॉग प्रथमतः तुम्हाला आवडला पाहिजे मग तो वाचकांना आवडेल.

10. ब्लॉग मनापासून लिहा

जर तुम्ही ब्लॉग मनापासून लिहिला नाहीत तर वर दिलेले स्टेप हे परिणामकारक ठरणार नाहीत.

भावना जुळल्या तर तुम्हाला उत्तम ब्लॉग लिहण्यास मदत होईल, स्वतःचे विचार मांडण्यासाठी त्याबरोबर तुमच्या भावना जुळल्या पाहिजे तेव्हाच तुमचा ब्लॉग सुंदर होईल.

मनापासून ब्लॉग लिहा व लोकांच्या हृदयापर्यंत पोहचा.

तुम्हाला तुमच्या पहिल्या ब्लॉग साठी शुभेच्छा.

आशा करतो की हा ब्लॉग तुम्हाला नक्कीच आवडला असेल, हा ब्लॉग तुमच्या मित्र मैत्रिनिणा शेअर करा व काही शंका असल्यास आम्हाला कॉनटॅक्ट करा.

RSS
Instagram