GDP म्हणजे काय ? GDP in Marathi

gdp mhanje kaay

आपण अनेकदा ऐकलं असेल GDP बद्दल, पन बऱ्याच लोकाना या बद्दल माहिती नसते या ब्लॉग मधून तुम्हाला जी डी पी बद्दल माहिती मिळेल.

कोणत्याही देशाच्या आर्थिक हालचाली मध्ये GDP चा खूप कमोलचा वाटा असतो, प्रत्येक नागरिकाला जी डी पी म्हणजे काय ही माहीती असणे गरजेच आहे.

तर चला पाहू GDP म्हणजे काय.

GDP काय आहे ?

GDP चा इंग्लिश मध्ये अर्थ असा होतो की (Gross Domestic Product), म्हणजेच संपूर्ण देशांतर्गत उत्पादन.

ग्रॉस डोमएस्टिक प्रॉडक्ट (जीडीपी) म्हणजे विशिष्ट कालावधी मध्ये एखाद्या देशांतर्गत तयार झालेले प्रॉडक्ट, वस्तु व सर्विसेस (सुविधा) यांची टोटल मार्केट वॅल्यू.

कोणत्याही देशाचे आर्थिक आरोग्य ही आपल्याला त्या विशिष्ठ देशाच्या GDP वॅल्यू वरुण समजून जाईल.

देशाचा जीडीपी हा सामान्यतः वार्षिक किंवा तिमाही कालावधीत मोजली जाते, आपल्या देशांमध्ये शासनाद्वारे तिमाही तसेच वार्षिक जीडीपी प्रसारित केला जातो.

देशाच्या आर्थिक जडणघडणीसाठी जीडीपी वॅल्यू माहीत असणे गरजेच आहे, यामुळे देशाच्या विकास दराचा आणि अर्थव्यवस्थेचा आकारचा अंदाज घेत येतो.

वाढती महागाई व जनसंख्या लक्षात घेऊन याचा खोल अभ्यास घेता येऊ शकतो.

जीडीपी दोन प्रकारची असते रीयल व नॉमिनल, वाढत्या महागाईचा रीयल जिडीपी वर फरक पडतो पान नॉमिनल जीडीपी चा फरक पडत नाही.

GDP चे प्रकार

सामान्यतः आपल्याला जीडीपी दोन प्रकारची आढळते रीयल व नॉमिनल जीडीपी, दोन्ही जीडीपी चा आपल्या अर्थव्यवस्थेला फरक पडतो.

रीयल जीडीपी (Real GDP)

REAL GDP हा महागाई वाढीवर आधारित असतो, यामध्ये एक विशिष्ठ कालावधीत जनसंख्येने तयार केलेले वस्तु व सुविधा समयोजित केली असते.

वस्तु व सुविधांची टोटल मार्केट वॅल्यू वर जीडीपी आधारित असल्याने, महागाई व इतर गोष्टींचा फरक पडत असतो.

वस्तु व सेवांच्या क्वालिटी मध्ये कोणत्याही प्रकारचा बदल न आणता वाढत्या किमती बरोबरच जीडीपी सुद्धा वाढत जातो.

म्हणून किमती वाढल्या मुले जीडीपी वाढतो असे आपण म्हणू शकतो.

अर्थशास्त्रज्ञ महागाई मुळे होणाऱ्या या मार्यावर थोडा फार कंट्रोल आणू शकतात, पन पूर्णपणे नाही.

रीयल जीडीपी ही जीडीपी प्राइस डेफलेटर (Price Deflator) च्या मदतीने काढली जाऊ शकते, ज्यामध्ये चालू वर्ष व बेस वर्षामधील फरक दाखवला जातो.

ज्या वर्षामध्ये प्रचलित प्राइस लेवल साठी त्या वर्षाच आउटपुट अडजस्ट केल जाते त्याला बेस वर्ष (Base Year) म्हणतात.

रीयल जीडीपी वर्षानुवर्षे चालत आलेल्या मार्केट वॅल्यू च्या बदलाला कारणीभूत ठरते, व आउटपुट वॅल्यू मधील फरक कमी करते.

नॉमिनल जीडीपी (Nominal GDP)

नॉमिनल जीडीपी (Nominal GDP) ही एक मूल्यांकन काढण्यासाठी वापरली जाणारी प्रणाली आहे, यामध्ये वस्तूंचे व सुविधांचे मूल्यांकन काढण्यासाठी त्या वस्तूच्या सध्याच्या किमतीचा उपयोग केला जातो.

थोडक्यात सांगायचे असेल तर या जीडीपी चा आणि महागाईचा काही संबंध नाही, या जीडीपी ने महागाई चा वेग कमी करता येत नाही.

वस्तु व सुविधा दर वर्षी ज्या किमती वर विकल्या जातात, त्याच किमतीवर नॉमिनल जीडीपी मध्ये सुद्धा मोजल्या जातात.

जेव्हा जेव्हा वस्तु व सुविधांच्या किमतीची तुलना एका वर्षा मधील तिमाहीच्या वेळी होते तेव्हा नॉमिनल जीडीपी चा उपयोग केला जातो.

तसेच एक किंवा दोन वर्षामधील वस्तूच्या किमतीची तुलना करण्यासाठी रीयल जीडीपी चा उपयोग केला जातो.

जेव्हा जेव्हा देशाच्या रीयल व नॉमिनल जीडीपी मध्ये जास्त फरक असतो तेव्हा चलन वाढीचे तसेच महागाईचे संकेत आपणास दिसते.

GDP फॉर्म्युला

जीडीपी तीन पद्धतीने calculate केली जाऊ शकते त्यामध्ये

  1. Expenditure Method (एक्सपेंडेचर मेथड)
  2. Income Method (इन्कम मेथड)
  3. Production Method (प्रॉडक्शन मेथड)
GDP FORMULA IN MARATHI

एक्सपेंडेचर मेथड मध्ये जीडीपी काढण्यासाठी कंजंम्पशन, इणवेसटमेंट, गवर्नमेंट व नेट एक्सपोर्ट यांची बेरीज करावी लागते

GDP = C+I+G+NX

C=CONSUMPTION

I=INCOME

G=GOVERNMENT

NX=NET EXPORT

इन्कम मेथड मध्ये पगार, रेंटल रेट आणि कॅपिटल व प्रॉफिट यांची बेरीज केली जाते

GDP=W+RC+P

W=WAGES

RC=RENTAL RATE AND CAPITAL

P=PROFIT

प्रॉडक्शन मेथड मध्ये गूड्स आणि सर्विस ची फायनल वॅल्यू व इंटर्मीडियट कॉस्ट यांची बेरीज केली जाते

GDP= GS+IC

GS=GOODS AND SERVICES

IC=INTERMEDIATE COST

आशा करतो की आपणास हा ब्लॉग आवडला असेल व या ब्लॉग मधून दिलेली माहिती आपणास उपयुक्त ठरलेली असेल, काही शंका असल्यास आम्हाला कॉनटॅक्ट करा.

RSS
Instagram