आज या blog मध्ये आपण future of marathi blogging संबंधित माहिती घेणार आहोत.
आपण महाराष्ट्रात राहतो त्यामुळे आपली मातृभाषा ही मराठी आहे, जी आपण लहानपणापासून रोज बोलतो आणि लिहतो देखील त्यामुळे आपल्याला मराठीत सांगितलेलं आणि वाचलेलं लवकर कळतं.
आजच्या इंटरनेट आणि स्मार्टफोनच्या जमान्यात आपल्याला जर एखादी माहिती हवी असेल ती आपण सहज आपल्या भाषेत गुगल करतो आणि गुगल देखील आपल्याला त्याच्याकडे आपल्या भाषेत उपलब्ध असलेली माहिती लगेच पुरवतो.
पण ती माहिती आपल्यासमोर येते ती marathi blogs / ब्लॉग्सच्या रुपात आपण ती वाचतो आणि आत्मसात करतो.
Marathi Blogging कोण करतं ?
google वर असलेली ही माहिती किंवा marathi blog आपल्याला किंवा गुगलला आपल्याला हव्या असलेल्या भाषेत कोण पुरवत असते ?
अर्थात हे marathi blogging / ब्लॉग्स कोण लिहीत असते ? तर ही माहिती ब्लॉगर्स / bloggers लिहित असतात.
आणि ती आपल्याला गुगलच्या माध्यमातून पुरवली जाते.
आणि आपल्याला हवी असलेली माहिती आपल्याला हव्या असलेल्या भाषेत म्हणजे मराठीत उपलब्ध होत असते ती इंटरनेट व्दारे!
Marathi Blogging व इंटरनेट
आपला देश आता डिजिटल झाला आहे, इंटरनेटचा जमाना आहे आणि आता प्रत्येक व्यक्तीच्या हातात स्मार्टफोन आहे.
त्यावरून व्यक्ती त्याला हवी असलेली कोणतीही माहिती त्याच्या मातृभाषेतून शोधू शकतो आणि मराठी माणुस देखील या सगळ्यात कुठेही मागे नाही.
या इंटरनेटच्या युगात आपल्याला फेसबुक, यु ट्यूब, गुगलसारख्या ऑनलाईन माध्यमातून हवी ती आणि हवी तशी माहिती marathi blogging द्वारे वाचायला मिळत असते.
अनेक लोक आज मराठीतून अनेक गोष्टी गुगलवर सर्च करत असतात आणि त्यातून मराठीतुनच माहिती मिळवत असतात त्यामुळं मराठी ब्लॉगिंगला आज आणि इथून पुढे ही खूप उत्तम भविष्य आहे ते कसे ते आपण या लेखात पाहणार आहोत.
भारतात ब्लॉगिंग / Blogging in India
भारतात Blogging / ब्लॉगिंग एक खूप लोकप्रिय मध्यम आहे, इथं लाखो लोक ब्लॉगिंग करतात तर करोडो लोक ते वाचत असतात.
त्यात सोशल मीडियाचा वाढता प्रभाव देखील त्याला कारणीभूत आहे, भारतात नुसती इंग्रजी, हिंदीतूनच नाही तर प्रादेशिक भाषांमधून देखील ब्लॉगिंग केली जाते.
आणि मराठी देखील त्याच प्रादेशिक भाषेतील एक भाषा आहे.
Google adsense / गुगल ऍडसेन्सने देखील बदलत्या काळाची गरज ओळखून मराठी भाषिक ब्लॉगला अप्रुअल देऊन Marathi Bloggers / मराठी ब्लॉगर्सना केंव्हाच कमाईचे एक उत्तम साधन उपलब्ध करून दिले आहे.
त्यामुळे Marathi Blogging हा व्यवसाय दिवसेंदिवस वृद्धिंगत होत आहे आणि पुढे देखील तो वृद्धिंगत होणार आहे तो कसा ते आपण पाहू.
Marathi Blogging ला डिजिटल इंडियाने पंख दिले
2015 मध्ये पंतप्रधान नरेन्द्र मोदींनी डिजिटल इंडिया प्रकल्प लॉन्च केला, त्यामुळे भारतात सर्व दूर इंटरनेट सेवा पोहोचली.
आधी भारतात 15% लोक इंटरनेटचा वापर करत होते आता आठ वर्षात तो 47%पर्यंत पोहोचला आहे आणि त्यात महाराष्ट्रही येतोच!
महाराष्ट्रातील मराठवाड्यातील बीड जिल्ह्यातील कोळगाव हे छोटेसे खेडे तिथे राहणारा अक्षय रासकर याने याच दरम्यान एक ब्लॉग सुरू केला होता आणि याच काळात लोकांनी फेसबुक आणि व्हॉट्स ऍप जास्त वापरायला सुरुवात केली.
त्याने याच गोष्टीचा फायदा घेऊन त्याचा शेतीविषयक ब्लॉग फेसबुक आणि व्हॉट्स ऍपवर टाकायला सुरुवात केली.
शेतकऱ्यांना त्याचा ब्लॉग उपयुक्त वाटू लागला आणि त्याने त्यातून चांगल्या कमाईला सुरुवात केली.
त्याच्याकडून प्रेरणा घेऊन तिथल्या बाकी युवकांनी देखील ब्लॉगिंग सुरू केली आणि आज त्यांचे गाव ‛ब्लॉगर्स व्हिलेज’ म्हणून ओळखले जाते इथं आज मराठीतुनच ब्लॉगिंग करून अनेक तरुण ब्लॉगिंगच्या माध्यमातून लाखो रुपये कमवत आहेत.
यावरूनच आपण मराठी ब्लॉगिंगच्या भविष्याचा विचार करू शकतो.
स्मार्ट फोनचा वाढता वापर
स्मार्टफोनचा वापर झपाट्याने वाढत आहे आणि तो इथून पुढे देखील वाढतच जाणार आहे.
त्यातही प्रादेशिक भाषेत सेटिंग चेंज करून आपण त्या मोबाईलचा वापर करू शकतो.
त्यामुळे मोबाईल हाताळणे आणखीनच सोपे होऊन बसले आहे.
आजकाल अल्प शिक्षित लोक देखील स्मार्ट फोनचा वापर मनोरंजन आणि माहिती मिळवण्यासाठी करताना दिसत आहेत.
अशा परिस्थितीत त्यांना हवी असणारी माहिती त्यांना कळेल अशा भाषेत म्हणजे मराठीमध्ये ब्लॉगर्स पुरवत असतील तर नक्कीच Marathi Blogging हे भविष्यात खूप मोठे करिअर ऑप्शन होणार आहे.
सोशल मीडियाचा वाढता वापर
आपण पाहत आहोत की आजकाल सगळीकडेचे फेसबुक, इन्स्ट्राग्राम, यु ट्यूब या समाजमाध्यमांचा वापर खूप वाढला आहे.
त्यातही मराठी लोकं मराठी भाषेचा वापर करून या सगळ्याचा आनंद लुटताना आपल्याला दिसत असतात आणि पुढे हे प्रमाण वाढतच जाणार आहे.
त्यामुळे जर मराठी ब्लॉगर्सनी या माध्यमातून त्यांचा ब्लॉग प्रसारित केला तरी देखील Marathi Bloggers चे भविष्य उज्ज्वल होणार आहे.
Marathi Blogging द्वारे डिजिटल ब्रँडिंग
आजकालच्या डिजिटल युगात डिजिटल ब्रँडिंगला खूप महत्त्व प्राप्त झाले आहे.
छोटे-मोठे व्यापारी आणि कंपन्या जाहिरातीसाठी सोशल मीडियाकडे वळत आहेत.
त्यातून या जाहिराती किंवा ब्लॉग आपल्या मातृभाषेत असावेत याकडे खूप कल वाढला आहे.
त्यामुळेच हे लोक स्वतःच्या व्यवसायाच्या मार्केटिंगसाठी ब्लॉगर्सना नोकरीवर ठेवत आहेत.
ते त्यांच्या उत्पादना विषयी माहिती आणि त्याचा प्रसार ब्लॉग्सच्या माध्यमातून करताना दिसत आहेत.
आणि पुढील पाच वर्षात या क्षेत्रात आणखीन वृद्धी होण्याची शक्यता आहे, त्यामुळे Marathi Blogging आणि Marathi ब्लॉगर्सना आता सुगीचे दिवस येणार आहेत असं म्हणले तरी वावगे ठरणार नाही.
डिजिटल खरेदी-विक्री वाढणार
आजकाल लोकांचा कल ऑनलाईन शॉपिंग किंवा घरात बसून वस्तू मागवण्याकडे वाढत आहे आणि पुढच्या पाच वर्षात तो दुप्पट होण्याची शक्यता आहे.
त्यामुळे ग्राहकांना ऑनलाईन माहिती पुरवण्यासाठी प्रत्येक भाषेतील ब्लॉगिंगची देखील मागणी वाढणार आहे.
अर्थातच marathi bloggers / ब्लॉगर्सची मागणी वाढणार यात मराठी ब्लॉगर्सना देखील खूप मागणी वाढणार आहे.
प्रादेशिक भाषेतून गुगल सर्च करण्याची सुविधा
आता गुगलमध्ये मराठी भाषेत माहिती शोधण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे त्यामुळे अनेक लोक मराठी भाषेचा वापर करून माहिती शोधतात आणि इथून पुढे हे प्रमाण वाढतच जाणार आहे.
कारण प्रत्येकाला आपल्या मातृभाषेतून माहिती शोधणे आणि ती वाचणे सोपे जात असते त्यामुळे MARATHI BLOGGERS नी जास्तीत जास्त चांगली माहिती त्यांच्या ब्लॉगवर पुरवली तर नक्कीच त्याचा फायदा मराठी ब्लॉगर्सना आजच नाही तर भविष्यात देखील होणार आहे.
गुगलला (बोलून) विचारा आणि शोधा
गुगलने त्यांच्या अत्याधुनिक सुविधा लोकांपर्यंत पोहोचवल्या आहेत.
त्यातच बोला आणि सर्च करा ही देखील एक सुविधा आपल्याला उपलब्ध झाली आहे.
तेही आपल्या भाषेतून त्यामुळे ज्या लोकांना मोबाईल देखील नीट हाताळता येत नाही असे लोक देखील आता (ज्यात वृद्ध लोकांचे प्रमाण जास्त आहे.)
ते लोक देखील मराठीमध्ये बोलून त्यांना हवा तो कंटेंट शोधू शकत आहेत.
म्हणजे ज्या भाषेत कंटेंट शोधला जात आहे त्याच भाषेत माहिती पुरवली जात आहे.
मराठी बोलून कंटेंट शोधला गेला तर त्या संदर्भात माहिती मराठीमधून उपलब्ध होते, यामुळे देखील मराठी ब्लॉगर्सचे भविष्य उज्वल झाले आहे.
शैक्षणिक ब्लॉग्सची वाढती मागणी
पुढील पाच वर्षात शिक्षणावर आधारित ब्लॉग्सची मागणी दुपटीने वाढणार आहे त्यामुळे मराठी भाषा आणि व्याकरण शिकवणारे ब्लॉग लिहले गेले तरी देखील अशा ब्लॉग्स आणि ब्लॉगर्सना फायदा होणार आहे.
मराठी ब्लॉगिंगमध्ये करिअर उज्ज्वल
आजच्या डिजिटल युगात लोकांना सगळी माहिती झटपट आणि इन्स्टंट हवी असते.
त्यातून महाराष्ट्र हे प्रगत राज्य आहे, शैक्षणीक दृष्ट्या देखील महाराष्ट्र पुढारलेला आहे आज महाराष्ट्रातील गाव- खेड्यात देखील डिजिटल क्रांतीची लाट पोहोचली आहे.
घरोघरी प्रत्येक व्यक्तीच्या हातात आपल्याला स्मार्टफोन पाहायला मिळतो.
त्यातच खूप सारे विद्यार्थी आणि रिटायर झालेले लोक, अल्पशिक्षित महिला मोबाईलचा जास्त वापर करताना दिसतात आणि त्यांना मराठी ही वापरासाठी सोपी आणि सरळ भाषा वाटते.
त्यामुळे कोणत्याही प्रकारची माहिती त्यांना हवी असेल तर सर्रास मराठीचा वापर केला जातो आणि मराठी भाषेतून माहिती पाहिली जाते.
त्यामुळे मराठी ब्लॉगर्सनी मराठीतून पूरवलेली माहिती जास्त पसंत केली जाते आणि इथून पुढे अशी माहिती पसंत केली जाणार.
पुढच्या पाच वर्षात इंटरनेटचा वापर दुपटीने वाढला तर मराठी ब्लॉगर्सचे भविष्य देखील दुपटीने उज्ज्वल होणार आहे यात कोणतीच शंका नाही.
आशा करतो की Future of Marathi Blogging हा blog तुम्हाला नकीच आवडला असेल, या blog ला भरपूर शेअर कर.
धन्यवाद, टीम माय मराठी ब्लॉग
हे सुद्धा वाचा
- Top 10 Marathi Blogging Tips 2024 | मराठी ब्लॉगिंग टिप्स 2024
- Career in Marathi Blogging | मराठी ब्लॉगिंग मधील करियर ऑप्शन
- marathi blog कसा लिहावा | How to write marathi blog
- Blog in Marathi म्हणजे काय? How to write a blog in Marathi
- What is Marathi Content Writing? Marathi Content Writer जॉब संधि |
- 10 ways to make money online | ऑनलाइन पैसे कसे कमवावे ?