12 वी चे विद्यार्थी ऑनलाइन नक्की हे वाक्य सर्च करत असतील ते म्हणजे “Career options after 12th science”.
पण मित्रांनो आता काळजी करण्याची गरज नाही या ब्लॉग मध्ये तुम्हाला 12 वी सायन्स नंतर करियर चे किती ऑप्शन आहेत हे समजेल.
जर तुमची 12 वी झालेली आहे किंवा तुम्ही आत्ता 12 वी मध्ये शिकत असाल तर तुम्हाला आता तुमच्या career साठी थोड सिरियस होणे गरजेचे आहे.
science साइड ही भरपूर पर्यायाणी भरलेले क्षेत्र आहे, यामध्ये तुम्हाला commerce व arts या दोनहीपेक्षा जास्त पर्याय निवडण्यासाठी मिळतात.
तर मग चला पाहू best career options after 12th science.
Career Options After 12th Science
विज्ञान शाखेत तुम्हाला अनेक करियर चे मार्ग मिळतात, एक्सप्लोर करण्यासाठी science शाखेत भरपूर असे विषय आहेत.
तुम्हाला तंत्रज्ञानात रस असेल तर त्यासाठी सुद्धा अनेक विषय आहेत, research आणि development साठी पूरक असे वातावरण विज्ञान शाखा प्रदान करते.
career options after 12th science संबंधित सर्व माहिती आम्ही खालील प्रमाणे दिली आहे.
1. BE/BTech – Bachelor of Engineering/ Bachelor of Technology
बॅचलर ऑफ इंजीनीरिंग किंवा बॅचलर ऑफ टेक्नॉलजी हा एक professional पदवी चा कोर्स आहे.
यामध्ये तुम्हाला 4 वर्षाचा पदवीचा कोर्स पूर्ण करावा लागतो, तुम्ही BE आणि BTech मध्ये थोडे कन्फ्युज झाला असणार तर तुमच कन्फ्युजन दूर करूया.
“जेव्हा एखाद्या विद्यापीठातून तुम्ही 4 शैक्षणिक वर्ष पूर्ण करता व त्यानंतर विद्यापीठ तुम्हाला degree देते तेव्हा त्या degree ला bachelor of engineering म्हणजेच BE असे म्हणतात”
“जेव्हा एखाद्या (institute)\ शैक्षणिक संस्थेमधून तुम्ही 4 शैक्षणिक वर्ष पूर्ण करता व त्यानंतर ती शैक्षणिक संस्था तुम्हाला degree देते तेव्हा त्या degree ला bachelor of Technology म्हणजेच BTech असे म्हणतात”
BE\BTech ची पदवी घेण्यासाठी तुम्हाला 12 वी सायन्स मधून Physics, Chemistry आणि Mathematics विषयामध्ये पास व्हावे लागते व या तिन्ही विषयात तुम्हाला 50% पेक्षा जास्त गुण मिळावे लागते.
इंजीनीरिंग मध्ये तुम्हाला मेकॅनिकल, सिविल, केमिकल, प्रॉडक्शन, ई सारख्या अनेक शाखा निवडता येतात.
12 वी नंतर तुम्हाला JEE किंवा CET स्पर्धा परीक्षा द्यावी लागते.
इंजीनीरिंग चा खर्च दरवर्षी 90000 ते 190000 रु पर्यन्त किंवा या पेक्षा ही जास्त असतो.
10 वी नंतर 3 वर्षाचा डिप्लोमा करून तुम्ही इंजीनीरिंग च्या दुसऱ्या वर्षात प्रवेश घेऊ शकता, यांची प्रवेश प्रक्रिया प्रत्येक इंजीनीरिंग कॉलेज त्यांचयानुसार ठरवते.
2. Bachelor of Medicine and Bachelor of Surgery (MBBS)
समाजामध्ये देवाचा दर्जा आपण डॉक्टर लोकांना देतो यात काही शंका नाही.
तर तुम्हाला देव बनायचं असेल तर MBBS करा 😂……. मस्करी केली, आता आपल्या विषयाकडे पाहूया.
MBBS ही मेडिसिन आणि सर्जरि मध्ये प्राप्त करण्याची पदवी आहे, ही पदवी घेऊन तुम्ही डॉक्टर बनू शकता, थोडक्यात डॉक्टर होण्यासाठी MBBS कराव लागतं.
12 वी सायन्स मध्ये Physics, Chemistry व Biology (PCM) किंवा Physics, Chemistry, Mathematics व Biology (PCMB) मध्ये 60% पेक्षा जास्त गुण प्राप्त करावा लागतो.
आपल्या देशमध्ये अनेक medical चे कॉलेज आहेत, काही कॉलेज ची फी कोटी मध्ये आहे.
एकमात्र खर आहे की डॉक्टर होण्यासाठी भरपूर पैसे लागतात, पण जर तुम्ही चांगला अभ्यास करून पुढे जात असाल व चांगले गुण प्राप्त केल असाल तर तुम्हाला शिष्यवृत्ती सुद्धा मिळू शकते.
एमबीबीएस मध्ये प्रवेश घेण्यासाठी तुम्हाला NEET नावाची स्पर्धा परीक्षा द्यावी लागते, या परीक्षेच्या गुणांवर तुम्हाला कोणतं कॉलेज मिळणार आहे हे ठरत.
3. Bachelor of Architecture (BArch)
BArch ही architect म्हणजेच वास्तुविशारद होण्या साठीची पदवी आहे, आपल्याला माहीतच आहे की घर बनवत असताना वास्तुविशारद हा खूप महत्वाचा घटक असतो.
बॅचलर ऑफ आर्किटेक्चर ही पदवी घेण्यासाठी एकूण 5 वर्षाचा कोर्स पूर्ण करावा लागतो, यामध्ये 4 शैक्षणिक तर शेवटच वर्ष प्रॅक्टिस व मेगा प्रोजेक्ट साठी असतो.
आर्किटेक्ट लोकांच काम म्हणजे कोणतेही प्रोजेक्ट करत असताना त्यामध्ये प्लॅनिंग, डिझाईन व कन्स्ट्रकशन करून देणे.
बिल्डिंग ची रचना ही architect च्या डिझाईन व प्लॅनिंग नुसार ठरवली जाते.
जर तुम्हाला कन्स्ट्रकशन डिझाईन फील्ड मध्ये आवड असेल तर तुम्ही बॅचलर ऑफ आर्किटेक्ट ची पदवी घेऊ शकता.
यामध्ये प्रवेश घेण्यासाठी तुम्हाला 12th science मध्ये mathematics विषय असणे बंधनकारक असते व एकूण 50% पेक्षा आधी गुण 12 वी मध्ये मिळाल्यास तुम्ही BArch ला admission घेऊ शकता.
4. Bachelor of Science (BSc)
बॅचलर ऑफ सायन्स ही डिग्री पूर्णपणे सायन्स क्षेत्रामध्ये आहे.
जेव्हा तुम्ही career options after 12th science बद्दल विचार करता तेव्हा BSc ही सुद्धा महत्वाची पदवी म्हणून गृहीत धरली जाऊ शकते.
ज्या विद्यार्थ्याना विज्ञान क्षेत्रात करियर करायचे आहे त्यांनी बॅचलर ऑफ सायन्स ही पदवी घ्यावी.
BSc पदवी ही 3 वर्षाची असते, यामध्ये प्रवेश घेण्यासाठी तुम्हाला 12 वी सायन्स मध्ये उत्तीर्ण होणे गरजेचे असते.
5. Bachelor of Pharmacy (BPharma)
ज्या विद्यार्थ्याना मेडिकल क्षेत्रात रस आहे त्यांनी bachelor of pharmacy ही पदवी घेतली पाहिजे.
ही डिग्री घेऊन तुम्ही pharma क्षेत्रात करियर घडऊ शकता.
या क्षेत्रात प्रवेश घेण्यासाठी तुम्हाला 12 वी सायन्स (PCMB) मध्ये 50 % पेक्षा जास्त गुण प्राप्त करावा लागतो.
फार्मा क्षेत्र हे खूप चांगल्या गतीने वाढत जाणारे क्षेत्र आहे, त्यामुळे BPharma ची पदवी तुमच्यासाठी खूप उपयोगी ठरू शकते.
10 वी ची परीक्षा उत्तीर्ण होईण तुम्ही फार्मा क्षेत्रात डिप्लोमा सुद्धा करू शकता, त्या पदवी ला DPharma असे म्हणतात.
DPharma हा कोर्स 2 वर्षांचा असतो.
6. Bachelor of Business Administration (BBA)
BBA म्हणजेच बॅचलर ऑफ बिझनेस अॅडमिनिसट्रेशन ही पदवी कॉमर्स क्षेत्रातील विद्यार्थ्याना तसेच जे विद्यार्थी career options after 12th science शोधत आहेत त्यांच्यासाठी सुद्धा आहे.
BBA ही पदवी घेण्यासाठी तुम्हाला 12 वी सायन्स किंवा कॉमर्स मधून Mathematics किंवा statistics मधून उत्तीर्ण व्हावे लागते.
ही पदवी घेण्यासाठी 3 वर्षाचा अभ्यासक्रम पूर्ण करावा लागतो.
जेव्हा एखाद्या विद्यापीठ अंतर्गत तुम्हाला डिग्री प्रदान केली जाते तेव्हा त्या डिग्री ला BBA बॅचलर ऑफ बिझनेस अॅडमिनिसट्रेशन डिग्री असे म्हणतात.
जर एखाद्या institute म्हणजेच शिक्षण संस्थेने डिग्री प्रदान केली तर त्या डिग्री ला BMS (Bachelor of Management studies) असे म्हणतात.
बॅचलर ऑफ मॅनेजमेंट स्टडीज ही पदवी घेण्यासाठी तुम्हाला 3 वर्षाचा कोर्स पूर्ण करावा लागतो.
7. Bachelor of Design (BDes)
डिझाईन मध्ये आवड असणाऱ्या विद्यार्थ्यानी हमखास ही पदवी पूर्ण केली पाहिजे.
बॅचलर ऑफ डिझाईन ही पदवी घेण्यासाठी 3 वर्षाचा कालावधी लागतो.
या पदवीसाठी सायन्स ,आर्ट्स तसेच कॉमर्स शाखेतील विद्यार्थी सुद्धा अप्लाय करू शकतात.
12 वी उत्तीर्ण होऊन तुम्ही ही पदवी घेऊ शकता.
8. Nursing
12 वी सायन्स करून तुम्ही नर्सिंग कोर्स साठी अप्लाय करू शकता.
नर्सिंग संबंधित अधिक माहिती जाणून घेण्यासाठी व नर्सिंग प्रॉफेशन ची उद्दिष्टय समजून घेण्यासाठी तुम्ही नर्सिंग ची डिग्री घेऊ शकता.
यामध्ये प्रवेश घेण्यासाठी तुम्हाला 12 मध्ये 50% पेक्षा जास्त गुण मिळवावे लागतात.
ही पदवी घेऊन Nurse, Assistant, बॉय यांसारखे अनेक काम करू शकता.
9. Hotel Management (HM)
ज्या विद्यार्थ्याना हॉटेल क्षेत्रात रस आहे त्यांनी हॉटेल मॅनेजमेंट ची डिग्री घ्यावी.
हॉटेल मॅनेजमेंट या क्षेत्रात तुम्ही डिग्री तसेच डिप्लोमा सुद्धा करू शकता.
यामध्ये किचन, हाऊस कीपिंग, रीसेप्शन, ई सारखे अनेक विषय निवडू शकता.
12 वी उत्तीर्ण होऊन तुम्ही हॉटेल मॅनेजमेंट चा कोर्स घेऊ शकता.
10. Bachelor of Commerce (BCom)
तुम्ही 12 वी सायन्स चे शिक्षण घेऊन कॉमर्स क्षेत्रात पदवी घेऊ शकता.
बॅचलर ऑफ कॉमर्स ची पदवी घेण्यासाठी तुम्हाला 3 वर्षाचा कोर्स पूर्ण करावा लागतो.
हे सुद्धा वाचा
- Top 10 Marathi Blogging Tips | मराठी ब्लॉगिंग टिप्स
- Marathi blog कसा लिहावा | How to write Marathi blog
- Blog in Marathi म्हणजे काय? How to write a blog in Marathi
- GDP म्हणजे काय? GDP of Country in Marathi
- Fastag म्हणजे काय ? fastag information in Marathi.
- career options after 12th arts | 12 आर्ट्स नंतर काय करावे
आशा करतो की हा ब्लॉग तुम्हाला नक्की आवडला असेल, तुम्हाला काही शंका असल्यास आम्हाला कॉनटॅक्ट करा व आमच्या ब्लॉग ला subscribe करायला विसरू नका.