मित्रांनो लांबचा प्रवास करत असताना आपल्याला वाटेत खूप ठिकाणी toll भरावा लागतो, टोलसाठी होणाऱ्या गर्दीमुळे आपला वेळ ही वाया जातो, ही वेळ वाचवण्यासाठी Fastag ची आपल्याला खूप मदत होऊ शकते, तर चला पाहू. fastag म्हणजे काय ?
Toll नाक्यांवर लागलेली रांग पाहून कधी कधी चक्कर येते, पन आता काळजी करण्याची गरज नाही भारत सरकार ने गाड्यांना फास्टॅग बसवणे बंधनकारक केले आहे.
सुट्टे पैसे लोकांकडे नसल्यामुळे toll plaza वर वाहनांची खूप गर्दी होते, पन फास्टॅग आल्यामुळे वेळेची खूप बचत होत आहे.
Fastag म्हणजे काय?
fastag ही एक अशी यंत्रणा आहे ज्याच्या मदतीने आपण ऑनलाइन टोल भरू शकतो. भारत सरकारने टोल घेण्यासाठी ही नवीन व मॉडर्न पद्धत साकारलेली आहे.
ही यंत्रणा National Highway Authority of India – NHAI च्या अंतर्गत कार्यरत आहे. यामध्ये radio frequency identification चे तंत्रज्ञान वापरले गेलेले आहे.
ज्याच्या मदतीने आपल्या अकाऊंट मधून पैसे automatically कट होऊन टोल मालकाच्या प्रिपेड अकाऊंट मध्ये जमा होतात.
fastag कार्ड ला आपल्या गाडीच्या विंड स्क्रीन वर लाऊन अपान फास्टॅग चा use करू शकतो.
Fastag कसे काम करते ?
फास्टॅग ल आपण आपल्या गाडीच्या विंडस्क्रीन ल चिटकऊ शकतो, जेणे करून टोल प्लाझा आल्यावर दुरून सुद्धा फास्टॅग निदर्शनास येईल.
फास्टॅग कार्ड वर एक कयू आर कोड (QR CODE) दिलेला असतो, जेव्हा आपण टोल नाक्यावर पोहचतो तेव्हा आपला कोड टोल नाक्यावर लावलेला रेडियो फ्रिक्वेन्सी आयडेनटिफिकेशन द्वारे स्कॅन केले जाते.
स्कॅन झाल्या नंतर नियोजित रक्कम आपल्या अकाऊंट मधून कट होऊन टोल मालकाच्या प्रिपेड अकाऊंट मध्ये जमा होते.
आशा पद्धतीने रांगेत न थांबत आपण टोल जमा करू शकतो.
Fastag कसे खरेदी करावे ?
फास्टॅग खरेदी करण्यासाठी आपल्याला राष्ट्रीय महामार्गावरील फी प्लाझा ला भेट द्यावी लागेल, तसेच स्टेट बँक, पंजाब नॅशनल बँक, ई च्या शाखेवरून सुद्धा आपल्याला खरेदी करता येईल.
याबरोबरच पेट्रोल पंप वर सुद्धा आपल्याला फास्टॅग खरेदी करता येईल ज्याला point of sales location- POSL सुद्धा म्हणतात.
महा ई सेवा केंद्रा मध्ये सुद्धा आपल्याला फास्टॅग खरेदी करता येईल.
Fastag चा रीचार्ज कसा करावा ?
जेव्हा आपण फास्टॅग चा अकाऊंट बनवतो म्हणजेच वालेट बनवतो. जेव्हा जेव्हा आपण रीचार्ज करतो तेव्हा आपले पैसे या वॉलेट मध्ये जमा होतात व वॉलेट मधून डायरेक्ट पैसे टोल म्हणून कट होतात.
फास्टॅग कहा रीचार्ज करण्यासाठी आपल्याला कोणत्याही बँकेत जाण्याची गरज नाही , भारत सरकारने फास्टॅग साठी ऑनलाइन पोर्टल दिलेल आहे त्यावर आपण ऑनलाइन रीचार्ज करू शकतो.
फास्टॅग ची संकल्पना यशस्वी रित्या पार पाडण्यासाठी भारत सरकारने 22 बँकेनशी करार केला आहे, यामुळे फास्टॅग व्यवहार सुरळीत पाने चाललेला आहे.
या कारारमुळेच आपल्याला कोणत्याही बँकेत जाण्याची गरज नाही, आपण PhonePe, Gpay द्वारे आपण रीचार्ज करू शकता.
अकाऊंट ओपेन झाल्या नंतर एक स्पेशल नंबर मिळतो त्या नंबर वर आपण फास्टॅग पोर्टल वर जाऊन ऑनलाइन रीचार्ज करू शकतो.
कमीत कमी 100 रु व जास्ती जास्त 100000 रु कहा रीचार्ज तुम्ही करू शकता, याची वैधता 5 वर्षाची असते.
Fastag ची थोडी अधिक माहिती
वाहनाची RC जय नावावर आहे त्याच नावावर आपण फास्टॅग अकाऊंट ओपेन करू शकतो, कुटुंबा मधील इतर कोणाच्या ही नावावर आपण फास्टॅग घेऊ शकत नाही.
रीचार्ज आपण कोणाच्या ही ऑनलाइन पेमेंट मेथड वरुण करू शकता त्याला काही बंधन नाही.
फास्टॅग चोरी झाल्यानंतर किंवा हरवल्या नंतर कंपनी ते अकाऊंट ब्लॅककलिस्ट करते.
आपण फास्टॅग अकाऊंट वरील पैसे खर्च करू शकतो, किंवा रिफंड घेऊ शकतो, आपले पैसे वाया जात नाहीत.
जर आपल्या गाडीला फास्टॅग नसेल तर आपल्या कडून दुप्पट टोल वसूल केला जाऊ शकतो, त्यामुळे लवकरात लवकर गाडीला फास्टॅग लाऊन घ्या.
Fastag चे फायदे
- सुट्टे पैसे नसल्यामुळे जे भांडण होत असे ते बंद होतील
- लवकर, गर्दीमद्धे न सापडत प्रवास पूर्ण होईल
- ट्राफिक जाम कमी होईल
- तुमच्या पेट्रोल चे ही बचत होईल
- कॅशलेस व्यवहारणा प्रोत्साहन मिळेल
- गर्दीचा मानसिक त्रास नाहीसा होईल
- थोडक्यात लांब प्रवास सुलभ होईल
या पोस्ट मधून तुम्हाला फास्टॅग बद्दल माहिती देण्यात आली आहे, आशा करतो आपणास हा ब्लॉग आवडला असेल काही शंका असल्यास आम्हाला कॉनटॅक्ट करा.