Trademark Registration in India | ट्रेडमार्क रजिस्ट्रेशन प्रोसेस

TRADEMARK REGISTRATION PROCESS

trademark registration हे एखाद्या कंपनी साठी तितकाच महत्वाचे आहे जितका गाडीसाठी पेट्रोल, तहाणलेल्यासाठी पानी, भुकलेल्यासाठी अन्न, ई, जर तुमची कंपनी Trademark registered नाही तर तुम्हाला धोका आहे.

आपल्या देशामध्ये कंपनी चा logo, कंपनी च नाव, कंपनी च स्लोगण, ई साठी trademark registration करून कंपनी चालवण्याचा कायदेशीर अधिकार मिळतो.

trademark registration करणे ही तशी अवघड प्रक्रिया आहे पण या ब्लॉगद्वारे तुमच्यासाठी रजिस्ट्रेशन ची प्रक्रिया थोडी सोपी होईल.

खालीलप्रमाणे trademark registration kase karave याचे step by step वर्णन केले आहे.

ट्रेडमार्क म्हणजे काय | What is Trademark ?

ट्रेडमार्क हे कंपनी चे नाव, लोगो, स्लोगण किंवा डिझाईन हे मालकी हक्काचे आहे हे दाखवण्यासाठी सादर केलेले एक प्रमाणपत्र आहे ज्याच्या द्वारे तुम्ही तुमच्या लोगो किंवा कंपनी च्या नावापुडे TM किंवा ® हे चिन्ह लाऊ शकतो.

ही चिन्ह दर्शवतात की तुम्ही त्या कंपनी, लोगो किंवा स्लोगण चे मालक आहात.

त्या लोगो चे तुम्ही कायदेशीर मालक असणार, जर कोणीही तुमच्या मालकीचा ट्रेडमार्क वापरला तर तुम्ही त्या व्यक्ति अथवा कंपनी वर कायदेशीर कारवाई करू शकता.

1.ट्रेडमार्क सर्च करा | Trademark search

trademark registration करण्यापूर्वी तुम्हाला पडताळणी करणे गरजेचे असते.

ट्रेडमार्क वेबसाइट वर तुम्ही तुमचे कंपनी चे नाव सर्च केले पाहिजे, जेणेकरून तुम्हाला समजेल की तुमच्या आधी अजून कोणी तर रजिस्टर केले की नाही.

ट्रेडमार्क सर्च करून तुम्हाला इतर ट्रेडमार्क ची माहिती मिळेल, जे आधीपासून ट्रेडमार्क साइट वर रजिस्टर आहेत.

जर तुमचं नाव किंवा लोगो आधीच रजिस्टर असेल तर तुम्हाला दुसरे ट्रेडमार्क रजिस्टर करावे लागेल.

या करीत सर्वप्रथम trademark search करणे खूप गरजेचे असते.

2.डिजिटल सिग्नेचर खरेदी करा | Buy Digital Signature

Trademark registration process साठी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे digital signature.

online search करून डिजिटल सिग्नेचर डाउनलोड करून घ्या.

अॅप्लिकेशन फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला डिजिटल सिग्नेचर ची गरज असेल.

3.ट्रेडमार्क फॉर्म भरा | Trademark Application Form

ट्रेडमार्क सर्च वर जर तुमच नाव अथवा लोगो किंवा इतर माहिती रजिस्टर करण्यासाठी उपलब्ध असेल तर तुम्ही पुढच्या स्टेप ला येऊ शकता.

ट्रेडमार्क फॉर्म भरण्यासाठी application form वर क्लिक करा.

फॉर्म ओपेन करून तुमच्या कंपनी चे अथवा ज्या नावाने trademark पाहिजे ते नाव लिहा, संपूर्ण मागितलेली माहिती फॉर्म मध्ये भरा.

संपूर्ण माहिती भरून झाल्यावर मागीतलेल शुल्क भरा व सबमिट करा.

4. ट्रेडमार्क एप्लिकेशन नंबर | Application Number

trademark application form मध्ये संपूर्ण माहिती भरून सबमिट केले असता काही दिवसांत तुम्हाला तुमच्या ईमेल id वर किंवा फोन नंबर वर अॅप्लिकेशन नंबर पाठवला जातो.

तुमच्या application चे स्टेटस पाहण्यासाठी तुम्ही या नंबर चा उपयोग करू शकतो, या मुळे तुम्हाला तुमच्या अॅप्लिकेशन पुढे कुठेपर्यंत गेला आहे यांची माहिती मिळते.

महत्वाची माहिती म्हणजे जेव्हा तुम्हाला नंबर मिळेल त्यावेळीपासून तुमच्या लोगो वर तुम्ही TM लिहू शकता.

5. विएणा classification | Vienna Classification

Vienna Classification किंवा Vienna Codification 1973 साली विएणा अॅग्रीमेंट च्या द्वारे स्थापन करण्यात आले.

Vienna classification ही एक आंतरराष्ट्रीय वर्गीकरण पद्धत आहे ज्यामध्ये एखाद्या एलिमेंट च्या घटकाचे वर्गीकरण केले जाते.

एक ठराविक कालावधी नंतर नियमितपणे विएना क्लासिफिकेशन सुधारले जाते.

trademark registration फॉर्म भरून झाल्यानंतर ज्या registrar कडे तुमचा फॉर्म जातो, तो तुमचा फॉर्म विएणा वर्गीकरणासाठी पाठवतो.

नंतर तुमच्या एलिमेंट च्या आधारावर वर्गीकरण केले जाते, व तुम्हाला Vienna classification मिळून जाते.

ही सर्व प्रोसेस झाल्यानंतर तुम्ही दुसऱ्या दिवशी तुमच्या application चे स्टेटस पाहू शकता.

अॅप्लिकेशन स्टेटस पाहण्यासाठी तुम्हाला मिळालेल्या application number चा उपयोग तुम्ही करू शकता.

6. ट्रेडमार्क पडताळणी | Trademark Examination

जेव्हा तुमचा फॉर्म विएना वर्गीकरणासाठी गेलेल्या असतो तेव्हा तुम्ही जर स्टेटस चेक केलात तर, sent for Vienna codification असे लिहून येते.

विएना codification पूर्ण झाल्यानंतर पुढच्या स्टेप मध्ये तुमचा फॉर्म ट्रेडमार्क ऑफिसर कडे पाठवला जातो.

तुमच्या अॅप्लिकेशन फॉर्म चा निकाल पूर्णपणे trademark officer कडे असतो.

रजिस्ट्रार तुमचं application form स्वीकारतो, ठरवलेल्या नियमांप्रमाणे फॉर्म ची पडताळणी करतो.

पडताळणी करीत असताना कोणत्याप्रकरची चूक आढळल्यास तो तुमच्या फॉर्म वर योग्य ते अॅक्शन घेऊ शकतो, म्हणून फॉर्म मधील संपूर्ण माहिती अचूक असावी यांची खात्री फॉर्म भरतानाच करून घ्या.

रजिस्ट्रार पूर्णपणे फॉर्मची पडताळणी करतो व त्या पडताळणीचा रीपोर्ट सादर करतो, व सर्वकाही बरोबर असल्यास trademark registration journal पब्लिश करण्यासाठी परवानगी देऊ शकतो.

फॉर्म मध्ये काही शंका असल्यास रजिस्ट्रार तुम्हाला trademark registration office मध्ये बोलाऊन घेतो, त्या शंकेच निरसन झाल्याशिवाय तुमचा फॉर्म पुढे जात नाही.

सर्वकाही अचूक आढळल्यानंतर ऑफिसर ट्रेडमार्क रजिस्ट्रेशन जर्नल पब्लिश करण्यास परवानगी देतो.

आणि जर का तुम्ही ट्रेडमार्क रजिस्ट्रार च्या निर्णयाविरुद्ध असाल तर ट्रेडमार्क बोर्ड वर तुम्ही अपील करू शकता.

7. ट्रेडमार्क जर्नल पब्लिकेशन | Journal Publication

एकदा ट्रेडमार्क registration application ट्रेडमार्क रजिस्ट्रारने स्वीकारले की, प्रस्तावित ट्रेडमार्क ट्रेडमार्क जर्नलमध्ये प्रकाशित केला जातो.

ट्रेडमार्क जर्नल दररोज प्रकाशित केले जाते आणि त्यामध्ये ट्रेडमार्क रजिस्ट्रारने स्वीकारलेले सर्व ट्रेडमार्क असतात.

ट्रेडमार्क जर्नलमध्ये ट्रेडमार्क प्रकाशित झाल्यानंतर, लोकांना trademark registration पडताळण्याचा एक option असतो.

जर तुम्हाला काही चूक आढळल्यास अथवा तुम्हाला विश्वास असेल की त्या नोंदणीमुळे तुमचे नुकसान होईल तर तुम्ही एक्सपोस्ट्युलेशन दाखल करू शकता.

जर्नल पब्लिश झाल्यानंतर 90 दिवसांच्या आत कोणतेही एक्सपोस्ट्युलेशन दाखल केले नसल्यास, सामान्यत: 12 आठवड्यांच्या आत logo नोंदणी केली जाते.

सर्व काही ठीक असल्यास नंतर तुमचा अॅप्लिकेशन फॉर्म trademark hearing officer कडे पाठविला जातो.

8. ट्रेडमार्क रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट | Trademark registration Certificate

सर्वकाही बरोबर असल्यास तुमच ट्रेडमार्क रजिस्ट्रेशन अॅप्लिकेशन स्वीकारले जाते, आणि तुमच्या फॉर्म वर trademark registration certificate पाठवले जाते.

ट्रेडमार्क रजिस्ट्रेशन प्रमाणपत्र सादर केल्यानंतर तुम्ही कायदेशीर रीतीने तुमच्या लोगो चे कंपनी चे अथवा स्लोगण चे मालक होता व logo पुढे तुम्ही ®किंवा TM लाऊ शकता.

तुमच ट्रेडमार्क रजिस्टर झाल्यानंतर तुमचा लोगो अथवा स्लोगण कोणीही वापरू शकत नाही, वापरल्यास तुम्ही त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करू शकता.

ट्रेडमार्क रजिस्ट्रेशन साठी याही वेबसाइट चा उपयोग तुम्ही करू शकता. INDIAFILINGS.COM

9. ट्रेडमार्क रीन्यू केला जाऊ शकतो का ? Trademark Registration can be Renwed after years ?

उत्तर आहे हो तुम्ही ट्रेडमार्क रजिस्ट्रेशन रीन्यू करू शकता, दर 10 वर्षानी तुम्ही ट्रेडमार्क रजिस्ट्रेशन रीन्यू करू शकता.

सातत्याने तुमचा ब्रॅंड तुमच्याकडेच राहू शकतो जर तुम्ही दर 10 वर्षानी trademark registration renew केलात तर.

आपल्या देशात ट्रेडमार्क नोंदणीला जास्त त्रास होत नाही, ही एक सोपी प्रक्रिया आहे.

परंतु तरीही ब्रँड नाव नोंदणीसाठी खरोखर महत्त्वाची प्रक्रिया आहे.

लवकरच तुम्हीही तयार केलेल्या ब्रॅंडचे trademark registration करून घ्या.

हे सुद्धा वाचा

आशा करतो की Trademark Registration हा ब्लॉग तुम्हाला नक्की आवडला असेल, तुम्हाला काही शंका असल्यास आम्हाला कॉनटॅक्ट करा व आमच्या ब्लॉग ला subscribe करायला विसरू नका.

RSS
Instagram