Marathi Blogging मध्ये जर तुमचा रस आहे तर हा ब्लॉग तुमच्यासाठीच आहे, आताचं जग पाहता सर्वजण इंटरनेट वर जास्त वेळ देत आहेत.
लोक जास्तीजास्त Marathi content व इतर internet वर उपलब्ध असलेले content वाचात आहेत, व तसा त्या कंटेंट चा त्यांना फायदा ही होत आहे.
हळू हळू Marathi blog writing ला चालना मिळत आहे.
पन जर तुम्ही योग्य रीतीने निरीक्षण केलात तर तुमच्या निदर्शनास येईल की इंटरनेट वर Marathi content, Marathi blogging sites व Marathi blog writer ची कमतरता आहे.
या ब्लॉगमध्ये Marathi blogging मध्ये career संबंधित तुम्हाला माहिती मिळेल.
ब्लॉगर कोण असतो ? Who is Blogger ?
Blogger हा एक व्यक्ति असतो जो ऑनलाइन वेबलॉग किंवा ऑनलाइन प्लॅटफॉर्ममध्ये content लिहून योगदान देतो.
त्यांच्या वेबसाइट किंवा ब्लॉगवरील marathi content ब्लॉगर्सद्वारे रिसर्च, डेवलप, एडिट करून अपलोड केला जातो, हा कंटेंट सर्व लोकांसाठी फ्री असतो.
blogger स्वतःचे ज्ञान, स्वतःचे अनुभव, स्वतःच्या शब्दात व्यक्त करतात, हे blog इतर लोकांसाठी फायदेशीर ठरतात.
प्रत्येक ब्लॉग साठी target audience असते, target audience म्हणजे एकसारख्या लोकांची यादी ज्यांना उद्देशून blogger ब्लॉग लिहतो.
blogger हा भरपूर रिसर्च करून स्वतःचा अनुभव वापरुन उत्तम असा ब्लॉग त्यांच्या वाचकांसाठी तयार करतो.
या जगामध्ये लाखों ब्लॉग व ब्लॉगर आहेत, एक blogger ला एकाच वेळी लाखों लोकांशी संवाद साधण्यासची संधि असते, Marathi blogging साठी सिरियस असलेला व्यक्ति नक्कीच उत्तम blogger बनू शकतो.
महाराष्ट्रामद्धे Marathi blogging ला तुमचा करियर म्हणून निवडला तरी तुम्ही सक्सेसफुल होऊ शकता.
पुढे तुम्हाला marathi blog तसेच मराठी ब्लॉगिंग ची सुरुवात कशी करावी याची माहिती मिळेल.
ब्लॉगर ची भूमिका काय असते ? Role of Blogger ?
blogging career मध्ये एखाद्या blogger ला प्रत्येक आठवड्यात निदान 2-3 तरी ब्लॉग लिहावे लागतात.
हळूहळू ब्लॉग लिहीत लिहीत website वर ब्लॉगपोस्ट ची संख्या वाढते व ब्लॉगर ला करियर मध्ये कॉन्फिडंस सुद्धा येतो.
google blogger मराठी कंटेंट तयार करून social media वर आपली एक ओळख निर्माण करू शकतात.
marathi blogging मध्ये करियर करत असताना तुम्हाला ब्लॉगिंग बरोबर इतर भरपूर मार्ग असतात ज्यांच्या द्वारे तुम्ही पैसे कमऊ शकता.
उदा. ब्रॅंड प्रमोशन, कंपनी ची जाहिरात, affiliate marketing, ई
कोणत्याही Marathi Blogger चे पहिले कर्तव्य म्हणजे त्याच्या वाचकाच्या गरजा कश्या पूर्ण होतील त्याचे प्रश्न कसे सुटतील याच्यावर लक्ष केंद्रित करणे.
blogger ला मराठी ब्लॉगिंग च्या करियर मध्ये सातत्याने ब्लॉग पोस्ट करणे बंधनकारक असते.
सातत्याने blog लिहिले नाही तर तुमच्या वेबसाइट वर ट्रॅफिक येणार नाही., google bot तुमच्या साइट ला गृहीत धरणार नाहीत.
मराठी ब्लॉगर कसे व्हावे ? How to become a Marathi Blogger ?
जगात असे ही ब्लॉगर आहेत ज्यांच्याकडे 10 वी पास चा रिजल्ट सुद्धा नाही, तुम्हाला समजलं असेल मला काय म्हणायचे आहे.
blogging career सुरू करण्यासाठी डिग्री ची गरज नसते परंतु तुम्हाला ब्लॉगिंग चे बेसिक ज्ञान असणे गरजेचे आहे.
इंटरनेट वर अनेक blogging course व free blogging course असतात, त्यांच्या द्वारे तुम्ही ब्लॉगिंग चे बेसिक ज्ञान घेऊ शकता.
ब्लॉगिंग सुरू करण्यासाठी तुमच्याकडे एक डोमेन व एक होस्टिंग ची गरज आहे बस, थोड रिसर्च आणि तुमची blogging website तयार.
ब्लॉग लिहीत लिहीत तुम्हाला सगळे insight समजून जाईल व तुम्हाला ब्लॉगिंग करून पैसे सुद्धा कमावता येतील.
ब्लॉगिंग साठी कोणते स्किल्स असावेत | Marathi Blogging Skills
Marathi Blogging Career निवडताना तुम्हाला सर्वात पहिला विचार करण्याची गोष्ट म्हणजे blogging skills, ब्लॉग लिहण्यासाठी तुमच्याजवळ skill असणे खूप गरजेचे आहे.
आम्ही काही स्किल्स shortlist केले आहेत ते खालीलप्रमाणे.
- सोशल मीडिया मॅनेजमेंट – जर तुम्हाला ऑनलाइन पैसे कमवायचे असतील तर वेगवेगळ्या सोशल मीडिया साइट संबंधित माहिती असणे गरजेचे आहे.
- बिझनेस – ब्लॉगिंग हे एक प्रकारचे बिझनेस आहे, यामध्ये तुमच्या जवळ असलेल्या ज्ञानाचे आदान प्रदान केले जाते, थोडक्यात वाचकांपर्यंत तुम्हाला उत्तम कंटेंट देणे गरजेचे आहे.
- मार्केटिंग ज्ञान – Marathi Blog Writing मध्ये तुम्हाला तुमच्या ब्लॉग चा उत्तम प्रचार करण्यासाठी तुमच्याजवळ मार्केटिंग स्किल असणे गरजेचे आहे.
- जनरल नॉलेज – जनरल नॉलेज तसा सर्व क्षेत्रामध्ये उपयोगी असतो तसंच ब्लॉगिंग करताना सुद्धा जनरल नॉलेज असणे गरजेचे असते.
- क्रीएटिविटि – Marathi Blogging career मध्ये व्यक्ती त्याच्या करिअरमध्ये अद्वितीय आणि नाविन्यपूर्ण संकल्पना तयार करण्यास सक्षम असावा लागतो, त्याच्याकडे जास्ती जास्त लोकांपर्यंत पोहचण्यासाठी creativity असणे गरजेचे आहे.
- ब्रॅंडिंग चे ज्ञान – स्वतःला एक ब्रॅंड म्हणून प्रस्थापित करण्याची कला blogger मध्ये असावी, जेणेकरून भविष्यात ब्रॅंड चा प्रचार करणे सोपे होईल.
- कम्युनिकेशन स्किल – ब्लॉग म्हणजे वाचकांबरोबर संवाद साधण्याचा उत्तम मार्ग, म्हणून तुमच्याकडे बोलण्याची कला असावी.
या सर्व Marathi blogging skills तुमच्याजवळ असतील तर तुम्ही ब्लॉगिंग मध्ये खूप पुढे जाऊ शकणार.
ब्लॉग चे प्रकार | Type of Blogs
ब्लॉग चे अनेक प्रकार आहेत, तुम्ही तुमच्या आवडी नुसार ब्लॉग चा प्रकार निवडू शकता, ब्लॉग चे प्रकार खालीलप्रमाणे.
- ट्रॅवल ब्लॉग
- फूड ब्लॉग
- हेल्थ ब्लॉग
- फिटनेस ब्लॉग
- फॅशन ब्लॉग
- लाइफस्टाईल ब्लॉग
- फोटोग्राफी ब्लॉग
- पर्सनल ब्लॉग
- affiliate ब्लॉग
मराठी ब्लॉग रायटींग जॉब्स | Marathi blog writing jobs
ज्यांना लिहिण्याची आवड आहे त्यांच्यासाठी या डिजिटल क्रांति ने नवीन संधी खुल्या केल्या आहेत.
ते जुने दिवस गेले जेव्हा एखाद्या लेखकाला स्तंभलेखक किंवा पुस्तकांचा लेखक मानले जायचे, आता जग बदलल आहे, लेखकाणा भरपूर पसंती मिळत आहे.
सध्या डिजिटल विकासामुळे blogger, content writer आणि content creator यांसारख्या असंख्य जॉब प्रोफाइल तयार झाल्या आहेत.
या अनेक जॉब प्रोफाइल मुळे लाखों जॉब ओपेन झाले आहेत, तुम्हाला फक्त Marathi blogging सुरुवात करण्याची गरज आहे.
ब्लॉग रायटींग किंवा कंटेंट रायटींग करून तुम्हाला भरपूर पैसे मिळवण्याची संधि निर्माण झाली आहे.
अनेक मोठ मोठ्या कंपनी ब्लॉग रायटर अपॉईंट करत आहेत, मोठ मोठे organization कंटेंट रायटर शोधत आहेत.
तुम्ही तुमचे स्किल ऑनलाइन पोस्ट करून चांगले जॉब मिळऊ शकता, हो हे शक्य आहे घर बसल्या काही ओळी लिहून तुम्ही लाखों पैसे कमऊ शकता.
जागे व्हा Marathi content साठी पुढे या, आपण जर मराठी कंटेंट लिहीत गेलो तर मराठी वाचकांची संख्या हळू हळू वाढत जाईल.
चला तर सुरुवात या ब्लॉग पासून करूया, हा ब्लॉग जास्ती जास्त लोकांपर्यंत पोहचवा.
मराठी फ्रीलानसिंग | Marathi freelance Jobs
Marathi Blog Writing ची कला शिकून Marathi blogger व्हा, व फ्रीलॅंस जॉब मिळऊन पैसे कमवा.
freelancing website वर स्वतः च ब्लॉग रायटर प्रोफाइल तयार करा, प्रोफाइल अशी तयार करा जेणेकरून जास्ती जास्ती फ्रीलॅंस टास्क तुम्हाला मिळतील.
freelancing website वर लगेच तुम्हाला काम मिळत नाही, तुम्हाला वेगवेगळ्या संस्थाना अप्रोच कराव लागेल, कमी पैशात उत्तम काम करून द्याव लागेल.
हळू हळू एकदा ट्रस्ट बिल्ड झालं की तुम्ही तुमच्या कामाची प्राइस वाढऊ शकता.
काममध्ये सातत्य व वेळेत काम करून दिलात तर freelancing सुद्धा एका ब्लॉग रायटर ला उत्तम पर्याय ठरू शकतो.
काही freelancing वेबसाइट खालील प्रमाणे
वरील दिलेल्या वेबसाइट वर जाऊन तुमच ब्लॉग प्रोफाइल तयार करा व नवनवीन कामासाठी लोकांना अप्रोच करा व काम मिळवा, पैसे कमवा.
मराठी ब्लॉगर्स इन्कम | Marathi Bloggers Income
एखादा ब्लॉगर किती कमऊ शकतो याच काही लिमिट नाही, एका वाक्यात सांगायच म्हणजे जेवढे जास्त ब्लॉग तेवढे जास्त पैसे.
जास्त ब्लॉग असावेत पण quality ब्लॉग असावेत, निबंध लिहिल्यासारख ब्लॉग नसावेत, तुमचे ब्लॉग लोकांचे प्रश्न सोडवणारे असावेत, वाचकांच्या शंकांच निरसन करणारे असावेत.
मराठी ब्लॉगिंग ला 2019 साली google adsense द्वारा मान्यता मिळाली आहे.
2019 पासून अनेक मराठी ब्लॉगर निर्माण झाले, पन अजूनही इंटरनेट वर मराठी ब्लॉगर ची कमतरता आहे.
जागतिक पातळीवर काम करणारे International Blogger आहेत जे महिन्याचे 20-30 लाख रु मिळवतात.
आपल्या देशामध्ये असे अनेक ब्लॉगर आहेत जे एक महिन्यात 5-10 लाख मिळवतात.
मराठी ब्लॉगर आहेत जे एका महिन्यात 50 हजार – 1 लाख रु मिळवतात.
तुम्ही तुमचे Marathi blogging career सुरू करा व पैसे कमवा.
हे सुद्धा वाचा
- Top 10 Marathi Blogging Tips | मराठी ब्लॉगिंग टिप्स
- Marathi blog कसा लिहावा | How to write Marathi blog
- Blog in Marathi म्हणजे काय? How to write a blog in Marathi
- How to apply passport online? पासपोर्ट साठी कसे अप्लाय करावे?
आशा करतो की Marathi Blogging Career Option हा ब्लॉग तुम्हाला नक्की आवडला असेल, तुम्हाला काही शंका असल्यास आम्हाला कॉनटॅक्ट करा व आमच्या ब्लॉग ला subscribe करायला विसरू नका.