मित्रांनो माय मराठी ब्लॉग मध्ये आपला स्वागत आहे, या ब्लॉग मधून पासपोर्ट साठी कसे अप्लाय करावे म्हणजेच How to apply passport online हे समजेल.
परदेशात जाण्यासाठी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजेच तुमच्या जवळ तुमचे पासपोर्ट असणे अत्यंत गरजेचे आहे, पासपोर्ट नसले तर तुम्ही तुमचं देश वगळता इतर कोणत्याही देशात जाऊ शकत नाही.
पूर्वी पासपोर्ट बनवण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागत होती, एवढी मेहनत घेऊन सुद्धा कधी कधी पासपोर्ट मिळायला 1 वर्ष सुद्धा लागत होते.
Passpoprt मिळवण्यासाठी मोठ मोठ्या रांगा लागत होत्या, थोडक्यात भरपूर वेळ वाया करून सुद्धा पासपोर्ट वेळेवर मिळत नसे.
पण आता काळजी करण्याची गरज नाही अगदी कमी वेळेत how to apply passport online, passport apply document, passport apply fees व passport apply process हे तुम्हाला या ब्लॉग मधून समजेल.
हा ब्लॉग वाचून तुम्हाला नक्कीच how to apply passport online हे नक्की समजेल, त्यासाठी पूर्ण ब्लॉग वाचा.
Passport म्हणजे काय ? What is Passport ?
Passport म्हणजे देशाच्या सरकारने त्या देशाच्या नागरिकांसाठी आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी जारी केलेले सरकारी दस्तावेज होय, याचा उपयोग आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळखपत्र म्हणून सुद्धा केला जातो.
आंतरराष्ट्रीय प्रवास करत असताना किंवा दुसऱ्या देशात प्रवेश घेण्यासाठी तुमच्याकडून passport मागितले जाते, जर तुमच्याकडे passport नसेल तर तुमचा प्रवेश नाकारला जाऊ शकतो.
तुम्हाला जर परदेशात नोकरी करण्यासाठी जायचं असेल तर तुमच्याकडे passport असणे आवश्यक आहे.
पासपोर्ट ही एक छोटी पुस्तिका असते ज्यामध्ये व्यक्तीचे फोटो, त्याचे नाव, त्याचा पत्ता, जन्मदिनांक, जन्मस्थळ, स्वाक्षरी,ई माहिती असते.
Passport ची गरज का भासते
परदेशात जायचे असेल तर पासपोर्ट लागतोच, परदेशात फिरायचे असेल तर passport लागतो, परदेशात ओळख पटवायची असेल तर passport लागतो.
जर तुम्ही दुसऱ्या देशात फिरत असताना तुम्हाला तुमची ओळख पटवण्यासाठी तुमच्याजवळ तुमचे passport नसेल तर तुम्हाला तुरुंगवास होऊ शकतो.
दुसऱ्या देशातून परत येत असताना passport नसेल तर तुमच्या मायदेशात तुम्ही परत कधीच येऊ शकत नाही.
म्हणून दुसऱ्या देशात जाताना तुमच्या जवळ passport असणे गरजेचे आहे.
Passport साठी लागणारे डॉक्युमेंट | Passport apply document
Aadhar card, pan card तसेच voter ID बनवण्यासाठी जसे वेगवेगळे document लागतात तसेच passport बनवण्यासाठी सुद्धा अनेक डॉक्युमेंट लागतात.
ज्यामध्ये तुम्हाला तुमचे अॅड्रेस प्रूफ, तुमची जन्म तारीख, तुमचे फोटो, ई गोष्टी समाविष्ट असतात.
Indian Passport Apply Documents
- Pan Card (पॅन कार्ड)
- Voter ID (मतदार ओळखपत्र)
- Aadhar card (आधार कार्ड)
- Driving license (ड्रायविंग लायसेंस)
- Birth Certificate (जन्म दाखला)
- light bill (वीज बिल)
- 10th & 12th Certificate (10 वी व 12 वी प्रमाणपत्र)
- Gas connection book (गॅस कनेक्शन पुस्तिका)
- Ration Card (रेशन कार्ड)
- Bank Passbook (बँक पासबूक)
- Identity size photo (आयडेनटिटी साइज फोटो)
लहान मुलांसाठी लागणारे डॉक्युमेंट | Passport apply document for children
- College\school ID (शाळा\कॉलेज ओळखपत्र)
- Aadhar Card (आधार कार्ड)
- आई वडिलांचा आधार कार्ड
- आई वडिलांचा पासपोर्ट
- आई वडिलांचे ओळखपत्र
जर का तुम्ही 18 वर्षापेक्षा कमी वयाचे असाल तर तुम्हाला वरील दिलेले डॉक्युमेंट passport बनवण्यासाठी जमा करावे लागतील.
Online Passport कसे बनवावे ? Passport apply Process
तुम्ही passport बनवण्यासाठी ऑनलाइन तसेच ऑफलाइन सुद्धा अप्लाय करू शकता, या ब्लॉग मध्ये तुम्हाला online passport apply कसे करावे याची माहिती दिलेली आहे.
ऑफलाइन पासपोर्ट साठी तुम्ही तुमच्या जवळच्या पासपोर्ट केंद्रात जाऊन offline passport apply करू शकता.
online passport apply process खालीलप्रमाणे दिलेले आहे.
How to apply passport online ? ऑनलाइन पासपोर्ट अप्लाय कसे करावे ?
online passport apply process चे स्टेप्स खालीलप्रमाणे
- सर्वप्रथम इंटरनेट वर https://www.passportindia.gov.in हे सर्च करा.
- सर्च केल्यानंतर तुमच्या स्क्रीन पासपोर्ट इंडिया ची वेबसाइट ओपन होईल, त्यामध्ये डाव्या बाजूला New user registration वर क्लिक करा.
- पुढच्या स्टेप मध्ये तुम्हाला तुमच्या शहराचे पासपोर्ट ऑफिस निवडायचे आहे.
- त्याच्या खाली तुमची संपूर्ण माहिती भरायची आहे जसे की तुमचे नाव, तुमच्या वडिलांचे नाव, टीमचे आडनाव, ई (तुमचे नाव हे तुमच्या आधार कार्ड किंवा बाकीच्या ओलखपत्रांनुसार असावे)
- तुमचा ईमेल id व लॉगिन पासवर्ड द्या.
- त्यानंतर हिंट प्रश्न निवडा, त्याचे उत्तर द्या, captcha भरा, पूर्ण दिलेली माहिती एकदा वाचून घ्या वाचून झाल्यानंतर Register वर क्लिक करा.
- तुमचा email id इनबॉक्स चेक करा, या ईमेल id वर पासपोर्ट ऑफिस कडून अॅक्टिवेशन लिंक येईल, त्या लिंक वर क्लिक करून तुमचा id अॅक्टिवेट करा.
- पासपोर्ट ची वेबसाइट रीफ्रेश करा तुम्ही सेट केलेल्या ईमेल id व पासवर्ड टाइप करून लॉगिन करा.
- लॉगिन करून झाल्यानंतर apply for fresh passport वर क्लिक करा.
- तुमच्या समोर पर्याय येतील जर तुम्हाला नवीन पासपोर्ट हवा असेल तर फ्रेश पासपोर्ट वर क्लिक करा, तत्काळ पासपोर्ट पाहिजे असेल तर त्या ऑप्शन वर क्लिक करा, पासपोर्ट रीन्यू करायच असेल तर reissue ऑप्शन वर क्लिक करा.
- तत्काळ पासपोर्ट नको असेल तर नॉर्मल वर क्लिक करा.
- आता तुमच्या समोर ऑप्शन येईल तुम्हाला 30 पानांचा पासपोर्ट हवा आहे की 60 पानांचा, तुम्ही तुमच्या नुसार हे निवडू शकता.
- आता पुढे तुमचे नाव, आडनाव, जन्मतारीख, बाकीची माहिती भरून घ्या.
- पुढे जर तुमचे माता पिता किंवा कोणी कुटुंबातील व्यक्ति गवर्नमेंट सेवक असतील तर Yes वर क्लिक करा, नसतील तर No वर क्लिक करा.
- (ECR – Emigration Check Required) पुढच्या स्टेप मध्ये जर तुमचे शिक्षण 10 वी पेक्षा खालचे असेल तर No वर क्लिक करा, 12 वी पेक्षा वरचे असेल Yes वर क्लिक करा.
- त्यानंतर save my details वर क्लिक करून next वर क्लिक करा.
- पुढे तुमचा पत्ता भरा, हा पत्ता तुमच्या बाकीच्या ओलखपत्रणूसार असावा, त्यानंतर save my details वर क्लिक करा.
- पुढच्या स्टेप मध्ये स्क्रीन वर मागितलेली माहिती भरा, save my details वर क्लिक करून पुढे जा.
- पुढच्या ऑप्शन मध्ये रेफरेन्स साठी दोन जणांची माहिती भरा.
- पुढच्या ऑप्शन मध्ये पहिल्या ऑप्शन ला No करा, दुसऱ्या ऑप्शन ल Yes करा.
- पुढे तुमच्यावर कोणताही गुन्हा आहे का ही विचारले जाते, थोडक्यात तुमचा क्रिमिनल रेकॉर्ड चेक केला जातो, त्यामध्ये मागितलेली माहिती भरा.
- पूर्ण माहिती पुनः एकदा चेक करून घ्या, त्यानंतर तुमचं फोटो अपलोड करा.
- त्यानंतर डीटेल सेव करा व पुनः होमपेज वर जाऊन Check appointment availability वर क्लिक करून अपॉईंटमेंट घ्या, होम पेजच्या डाव्या बाजूलाच हा ऑप्शन मिळेल.
- पुनः तुमच्या अॅप्लिकेशन फॉर्म च्या शेवट च्या स्टेप मध्ये जाऊन ऑनलाइन पैसे जमा करा, फॉर्म सबमिट करा.
- भरलेला फॉर्म डाउनलोड करून घ्या.
- अपॉईंटमेंट दिवशी जाऊन तुम्ही डाउनलोड केलेल्या फॉर्म व तुमचे सगळे डॉक्युमेंट घेऊन जवळच्या पासपोर्ट केंद्रांवर भेट द्या, त्यांनी काही प्रश्न विचारतील त्या प्रश्नांची उत्तरे द्या.
- थोड्या दिवसांनी तुमच्या जवळ च्या पोलिस स्टेशन मधून तुम्हाला कॉल येईल तिथे जाऊन ते प्रश्न विचारतील त्या प्रश्नांची उत्तरे द्या (पोलिस स्टेशन मध्ये कसलीही फीस लागत नाही)
- थोडे दिवस वाट पाहा.
- तुमचा पासपोर्ट झाला आहे की नाही ही चेक करण्यासाठी वेबसाइट च्या Homepage वर Track Application Status वर क्लिक कारी id व लॉगिन पासवर्ड देऊन तुमचा passport झाला आहे की नाही ही चेक करू शकता.
Passport साठी किती पैसे लागतात ? Passport apply Fees
तुम्ही कोणत्या प्रकारच्या passport साठी अप्लाय करत आहात याच्यावर तुमची passport fees अवलंबून असते.
थोडक्यात जर तुम्हाला तात्काळ पासपोर्ट पाहिजे असेल तर त्यासाठी नॉर्मल पासपोर्ट पेक्षा जास्त खर्च येतो.
नॉर्मल पासपोर्ट बनवण्यासाठी थोडा कालावधी लागतो त्यामुळे तात्काळ पासपोर्ट व नॉर्मल पासपोर्ट यांच्या फीस मध्ये अंतर असतो.
तात्काळ पासपोर्ट साठी तुम्हाला 4000/- ते 6000/- रु पर्यन्त खर्च येऊ शकतो.
नॉर्मल पासपोर्ट साठी 2000/- ते 3500/- रु पर्यन्त खर्च येऊ शकतो.
Passport बनवण्यासाठी किती वेळ लागतो ?
आधी पासपोर्ट बनवण्यासाठी 2 ते 3 महिन्याचा कालावधी लागत होता.
परंतु आता शासनाने अगदी सोप्या पद्धतीत जनतेसाठी पासपोर्ट उपलब्ध करण्याचे मार्ग दिले आहेत.
जर तुम्ही Tatkal Passport साठी अप्लाय केलं असाल तर 9-12 दिवस किंवा काही अडचण आल्यास त्यापेक्षा जास्त ही दिवस लागू शकतो.
जर तुम्ही नॉर्मल पासपोर्ट साठी अप्लाय केलं असाल तर 1 ते 1.5 महीने लागू शकतो.
हे सुद्धा वाचा
- Top 20 Best Marathi Films | 20 बेस्ट मराठी चित्रपट
- Best Career options after 12th Science | 12 वी सायन्स नंतर काय करावे?
- Top 10 Marathi Blogging Tips | मराठी ब्लॉगिंग टिप्स
- Marathi blog कसा लिहावा | How to write Marathi blog
- Blog in Marathi म्हणजे काय? How to write a blog in Marathi
- GDP म्हणजे काय? GDP of Country in Marathi
आशा करतो की How to apply passport online हा ब्लॉग तुम्हाला नक्की आवडला असेल, तुम्हाला काही शंका असल्यास आम्हाला कॉनटॅक्ट करा व आमच्या ब्लॉग ला subscribe करायला विसरू नका.