मित्रांनो Marathi blogging Tips ची क्रेज हळू हळू वाढत चालली आहे, त्याबरोबरच Marathi blogger ची संख्या ही वाढत चालली आहे, तर तुमचा ब्लॉग अधिक सुंदर बनवण्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत top 10 Marathi blogging tips for beginners.
आपले online अस्तित्व निर्माण करण्यासाठी ब्लॉगिंग हे उत्तम उपाय ठरेल, यामुळे तुम्हाला तुमच्या भावना लोकांपर्यंत पोहचवता येतात तेही त्या लोकांशी न भेटता.
blogging सुरू करण्याचा उद्देश काहीही असो परंतु ब्लॉग वाचून लोकाना पुरेपूर माहिती मिळत आहे.
लोकांपर्यंत आपले चांगले विचार पोहचवण्यासाठी आपल्याला चांगले ब्लॉग लिहावे लागतील व चांगले व सुंदर ब्लॉग लिहण्यासाठी तुम्हाला खाली दिलेले blogging tips नक्कीच मदतयोग्य ठरतील.
10 best Marathi blogging Tips
1. Niche selection | निश निवडा
Marathi Blogging करत असताना “ब्लॉग चा निश निवडणे म्हणजे ब्लॉगचा विषय निवडणे” खूप महत्त्वाचे असते, आपण कोणत्या विषयावर ब्लॉग लिहाणार आहोत हे माहीत असायला पाहिजे.
जर एखाद्या विषयामध्ये आपली आवड नसेल तर आपण फारकाळ त्या विषयाबद्दल बोलू किंवा लिहू शकत नाही ही मात्र खरं, म्हणून blog niche सिलेक्ट करणे महत्वाचे असते.
म्हणून असे विषय निवड जय विषयावर तुमचं खोलपर्यंत अभ्यास आहे व ज्या विषयावर रिसर्च करताना तुम्हाला कंटाळा येणार नाही.
सर्वप्रथम तुमच ध्येय निवडा, स्वतःला प्रश्न विचारा की तुम्हाला ब्लॉग नेमका का सुरू करायच आहे, माहिती शेअर करण्यासाठी ? पैसे कामावण्यासाठी ? टाइमपास करण्यासाठी?
जो काही तुमचा ध्येय असेल तुम्हाला आवडीचा विषय निवडा जेणेकरून तुम्हाला तुमच्या आवडीची गोष्ट करायला खूप मज्जा येईल व तुमचा ब्लॉग ही चालवता येईल.
तुमचा ब्लॉग हा पुढे जाऊन तुमची ऑनलाइन ओळख बनणार आहे त्यामुळे ब्लॉग निश निवडताना खूप काळजी घ्या, खाली काही ब्लॉग निश आहेत.
- ट्रॅवल ब्लॉग
- पर्सनल ब्लॉग
- बिझनेस ब्लॉग
- हेल्थकेअर ब्लॉग
- टेक्नॉलजी ब्लॉग
- फॅशन ब्लॉग
यापेक्षाही जास्त असंख्य ब्लॉग निश तुम्हाला मिळतील त्यातून तुम्हाला आवडणारा निश निवड.
2. Readers Research | वाचक शोधा
marathi blogging करता पन तुम्हाला तुमचे वाचक कोण आहेत हे माहीत नसेल तर तुम्हाला तुमचा blog फारकाळ टिकवता येणार नाही.
तुम्ही ब्लॉग कोणासाठी लिहीत आहात हे तुम्हाला माहीत असणे अत्यंत गरजेचे आहे, तुम्हाला तुमचे वाचक माहीत असणे गरजेचे आहे.
आपल्या वाचकांची विचार करण्याची पद्धत तुम्ही लक्षात घेतली पाहिजे, त्यांच्या आवडीनिवडी तुम्हाला माहीत असायला पाहिजे.
तुम्ही ब्लॉग कोणासाठी तयार केला आहे शाळकरी मुलांसाठी? कॉलेज च्या मुलांसाठी? महिलांसाठी? पुरुषांसाठी? बिझनेस पर्सन साठी ? की कोणासाठी?
तुम्हाला तुमची खरी ऑडियन्स माहिती असायला पाहिजे, तुमच्या ऑडियन्स प्रमाणे विचार करा त्यांना कोणते प्रश्न पडत असतील त्या प्रश्नांचे उत्तर तुमच्या ब्लॉग मधून द्या.
वाचकांचा interest जाणून घ्या ज्याच्या मदतीने तुम्हाला भरपूर ब्लॉग लिहायचे subject मिळतील.
तुमच्या वाचकांची आवड लक्षात घेऊन सुंदर असा ब्लॉग आपल्या वाचकांना सादर करा.
3. Search Information | माहिती शोधा
ब्लॉग निश निवडून झाला , वाचक कोण आहेत ते समजल आता येते सर्वात महत्वाची गोष्ट “ब्लॉगसाठी माहिती” शोधणे.
वाचक माहीत असून जर त्यांच्या पर्यन्त त्यांना पाहिजे असलेली माहिती पोहोचत नसेल तर आपण माहिती शोधण्यात कुठे तरी कमी पडत आहोत.
उत्तम माहिती देणे हाच एकमेव मार्ग आहे blogging मध्ये पुढे जाण्याचा.
सुरुवात तुमच्या इंडस्ट्री मधील ब्लॉगपासून करा, त्यांचे ब्लॉग वाचा त्यांची विचार करण्याची पद्धत तपासा, त्यांचे ब्लॉग वाचून तुम्हाला तुमची चूक लक्षात येईल.
माहिती प्रदान करण्यापासून ते वाचकांना आकर्षित करण्यापर्यंतचे सगळे मार्ग शोधून काढा.
कोणाचीही माहिती कॉपी करू नका , एखादी माहिती जर तुम्ही दुसऱ्या ब्लॉग वरुण कॉपी केली तर google तुम्हाला ब्लॉग मोनेटाईज करू देत नाही.
उत्तम व वाचकाना गरज असेलेली माहिती शोधा व सुंदर ब्लॉग लिहा.
तुम्ही google trend चा उपयोग करू शकता.
4. Use Searching Tools | सर्च टूल्स चा उपयोग करा
आता Marathi Blogging सुरुवात झाली आहे तर तुम्हाला Keyword searching tool चा उपयोग करता आला पाहिजे.
तुमचे वाचक इंटरनेट वर काय शोधत आहेत ही तुम्हाला keyword research tool द्वारे समजते, टूल्स चा उपयोग करण्यासाठी कोणतेही कोर्स करायची गरज नाही, ते एकदम सोपे व सरळ असते.
पन एक गोष्ट माहीत असणे गरजेचे आहे की लोक सर्च बार वर कोणते वाक्य सर्च करत आहेत व त्यांना आता कोणती माहिती पाहिजे आहे.
त्या वाक्यातील शब्द keyword research baar मध्ये टाइप करून सर्च बटन वर क्लिक करा, बस फक्त एवढेच करायचे आहे.
हळू हळू हे करत करत तुम्हाला रिसर्च टूल्स ची सवय होईल व तुम्हाला रिसर्च टूल्स चा उपयोग करता येईल.
काही keyword research tool खालीलप्रमाणे
5. Use Keyword | कीवर्ड चा उपयोग करा
कीवर्ड टुल चा उपयोग करून आपल्याला योग्य ते कीवर्ड मिळतील व त्या कीवर्ड चा उपयोग करून आपल्याला चांगला ब्लॉग लिहिता येईल.
आपले वाचक काय वाचण्यासाठी इच्छुक आहेत ही माहीत झाल्यानंतर त्या विषयाशी संबंधित कीवर्ड चा उपयोग आपल्याला ब्लॉग मध्ये करणे खूप गरजेचे आहे.
कीवर्ड चा उपयोग करूनच आपल्याला ब्लॉग रॅंक करता येईल.
तुम्ही रिसर्च केलेले कीवर्ड हे तुमच्या ब्लॉग च्या मेटा टाइटल, हेडलाइन मध्ये, मेटा टॅग मध्ये, स्लॅग मध्ये, मेटा description, alt टेक्स्ट मध्ये व संपूर्ण 1000 शब्दांच्या ब्लॉग मध्ये निदान 6 वेळा तरी दिसले पाहिजे.
उदा. कीवर्ड आहे “मराठी गाणे”
मेटा टाइटल – 10 बेस्ट मराठी गाणे व त्यांचे गीतकार
मेटा description – या ब्लॉग मध्ये तुम्हाला टॉप 10 बेस्ट मराठी गाणे व त्यांचे गीतकार कोण आहेत यांची माहिती मिळेल.
कीवर्ड ला जबरदस्तीने कोणत्याही वाक्यात लाऊ नाक हे वाईट blogging चे लक्षण आहे, व्याकरणाच्या दृष्टीने जर ते वाक्यात फिट बसंत असेल मगच keyword चा use करा अन्यथा करू नका.
6. Free Blog Structure | ब्लॉग सुटसुटीत बनवा
निबंध लिहिणे व ब्लॉग लिहिणे यामध्ये खूप अंतर आहे, marathi blogging करत असताना तुम्हाला ब्लॉग चा स्ट्रक्चर एकदम सुटसुटीत बनवावा लागेल.
फ्री स्ट्रक्चर मुळे वाचकांना easily ब्लॉग चा फेरफटका मारता येईल, नको त्या गोष्टी उगाच ब्लॉग मध्ये अपलोड करू नका.
गरज असलेले एलिमेंट व विजेट ब्लॉग मध्ये असुद्या जसे की “हेडर, फूटर, साइड बार व मैन ब्लॉग बॉडी”.
वाचकांचे लक्ष या गोष्टींवर जास्त असते त्यामुळे तुमचा ब्लॉग सोपं व सुटसुटीत बनवा, एक्स्ट्रा काही करायला जाऊ नका.
नवीनच ब्लॉग सुरू केलं असल्याने nevigation menu मध्ये जास्त कॅटेगरी अॅड करू नका, वाचक तुमच्या ब्लॉग मध्ये आले की लगेच त्यांना पाहिजे असलेली माहिती मिळायला पाहिजे.
ज्या ब्लॉग वर जास्त visitors येतात असे ब्लॉग गूगल टॉप ला रॅंक करतो.
तुमचा कॉनटॅक्ट पेज फूटर ला असुदया जेणेकरून वाचकांना काही शंका असल्यास लगेच ते तुम्हाला कॉनटॅक्ट करतील.
google वर crawl होण्यासाठी खालील पेज तुमच्या ब्लॉग मध्ये असणे गरजेचे आहे.
- कॉनटॅक्ट पेज
- टर्म्स अँड कंडिशन पेज
- अबाऊट पेज
- डेस्कलाइमर पेज
7. Set Perfect Outline | आउटलाइन सेट करा
ब्लॉग चा स्ट्रक्चर बनवल्यानंतर आपल्याला ब्लॉग च्या आउटलाइन वर लक्ष द्याव लागेल.
आउटलाइन मध्ये introduction, body व conclusion चा समावेश असला पाहिजे, तुमच्या प्रत्येक ब्लॉग पोस्ट मध्ये आउटलाइन अशीच असली पाहिजे
1. Introduction
2. Body
3. Conclusion
सर्वप्रथम उत्तम सुरवात म्हणजे introduction त्यानंतर ब्लॉग त्यानंतर सारांश म्हणजेच conclusion अशी आउटलाइन तुमच्या प्रत्येक ब्लॉग मध्ये असुदया.
8. Attractive Begining | आकर्षक सुरुवात करा
आपण जेव्हा marathi blogging ची सुरुवात करतो तेव्हा एक गोष्ट लक्षात ठेवा की आपल्या वाचकाला आपण आपल्या ब्लॉग शी नेहमी जोडून ठेवणे गरजेचे आहे.
उत्तम कंटेंट लिहून सुद्धा ब्लॉग वर वाचक येत नसतील तर ब्लॉग च्या सुरुवाटी मध्ये काहीतरी चुकत आहे.
सुरुवात ही भक्कम, सुंदर व आकर्षित करणारी पाहिजे, यामुळे वाचक ब्लॉग वर टिकून राहील व पूर्ण ब्लॉग वाचेल व तुमचा ब्लॉग subscribe ही करेल.
हलकी सुरुवात करून चालणार नाही, ब्लॉग च्या पहिल्याच वाक्यात तुम्हाला intersting शब्दरचनेचा उपयोग करावा लागेल.
उदा. मराठी गाणे ही कीवर्ड आहे तर पहिले वाक्य असे अशू शकते.
“मित्रांनो तुम्ही अनेक मराठी गाणे ऐकले असतील पण हे 10 सुंदर गाणे व त्यांचे सुप्रसिद्ध गीतकार यांच्या बद्दल तुम्ही नक्कीच जाणून घेतले पाहिजे, तर चला तुमच्या गाण्यांच्या माहिती संग्रहासाठी सुप्रसिद्ध गाणी व त्यांच्या गितकारांची माहिती घेऊया”
9. Give your best writing | उत्तम ब्लॉग लिहा
ब्लॉग ची भक्कम सुरुवात केल्यानंतर तुम्ही रिसर्च केलेली जी माहिती आहे त्या माहिती चा उपयोग एक सुंदर रचणे मध्ये करा.
रिसर्च केलेली माहिती सुटसुटीत व सुंदर पद्धतीने वाचकांसाठी सादर करा, यामुळे वाचक तुमचा ब्लॉग वाचण्यासाठी उत्साहित होईल व तुमच्या ब्लॉग वर टिकून राहील.
“Marathi blogging च सीक्रेट म्हणजे वाचकांच्या बाजूने विचार करून ब्लॉग लिहिणे, विचार करा की वाचक कसा विचार करतात व तसा ब्लॉग लिहा”
ब्लॉग लिहिताना तुमचा बेस्ट द्या व वाचकांसाठी भरपूर कंटेंट सादर कारा.
10. Use Data | डेटा चा उपयोग करा
ब्लॉग लिहून झाल्यानंतर तो पब्लिश करा, search console वर इंडेक्स करण्यासाठी request करा.
एकदा ब्लॉग इंडेक्स झाला तर तुमचा ब्लॉग कोण कोण वाचत आहे, कोठून वाचत आहे, मोबाइल वर वाचत आहे की टॅब वर की कम्प्युटर वर यांची माहिती google analytics तसेच google search console द्वारे मिळून जाईल.
वाचकांची आकडेवारी मिळाल्यानंतर आपल्याला समजेल की कोणत्या वयाचे लोक आपला ब्लॉग जास्त वाचत आहेत, त्या age ग्रुप साठी तुम्ही जास्तीजास्त ब्लॉग लिहू शकता.
कोणता कीवर्ड चा उपयोग करून वाचक तुमच्या ब्लॉग पर्यन्त पोहचले आहेत ही सुद्धा तुम्हाला समजेल व त्या कीवर्ड वर भरपूर ब्लॉग तुम्ही लिहू शकता.
थोडक्यात डेटा चा उपयोग करून तुम्हाला marathi blogging च्या करियर मध्ये लांबचा पल्ला गाठता येईल.
Bonus – Marathi Blogging Tips
Earn Money from Blog | ब्लॉग चा उपयोग करून पैसे कमवा
मित्रांनो ब्लॉग फक्त लिहू नका ब्लॉग पासून पैसे सुद्धा कमवा व तुम्ही लिहिलेल्या कंटेंट चा बॅकअप घ्यायला विसरू नका.
दररोज रिसर्च करा आठवड्यातून 3 ब्लॉग तरी पब्लिश करा, 1 वर्ष झाले की google adsense ला अप्लाय करा.
गूगल अडसेंसे तसेच affiliate मार्केटिंग द्वारे तुम्हाला पैसे कमवता येईल.
मराठी कंटेंट ची internet वर कमी आहे, त्यामुळे तुमच्या ब्लॉग ची सुरुवात आजपासूनच करा, जेणेकरून लवकर गूगल वर ब्लॉग रॅंक करता येईल.
हे सुद्धा वाचा
- Marathi blog कसा लिहावा | How to write Marathi blog
- Blog in Marathi म्हणजे काय? How to write a blog in Marathi
- GDP म्हणजे काय? GDP of Country in Marathi
- Fastag म्हणजे काय ? fastag information in Marathi.
आशा करतो की हा ब्लॉग तुम्हाला नक्की आवडला असेल, तुम्हाला काही शंका असल्यास आम्हाला कॉनटॅक्ट करा व आमच्या ब्लॉग ला subscribe करायला विसरू नका.