Marathi content writing आपण करू शकतो? हे कंटेंट रायटिंग कसे करावे ? कंटेंट रायटिंग म्हणजे काय ? कंटेंट रायटिंग चे प्रकार कोणते आहेत ? आपण या ब्लॉग मध्ये जाणून घेऊ.
मराठी भाषेचा इतिहास पाहता जगभरात बोलल्या जाणाऱ्या भाषांमध्ये मराठी भाषा ही पंधराव्या तर भारतात चौथ्या स्थानावर आहे, ‘अमृतानुभव’ हे अलौकिक ग्रंथ लिहिणारे श्री ज्ञानदेव यांनी मराठी भाषा संपन्न केली.
वृत्तपत्रे आकाशवाणी, दूरदर्शन इत्यादी ठिकाणी जी मराठी भाषा सामान्यपणे वापरली जाते ती भाषा प्रमाण मानली जाते कारण ती शुद्ध आणि स्पष्ट स्वरूपात असते.
Marathi Content Writing कुठे करावे ?
Content writing आपण घरी बसून करू शकतो का? तसेच आपण कंटेंट रायटिंग मध्ये करिअर करू शकतो का किंवा हे एक उत्पन्नाचे साधन असू शकते का हे आपण या blog मध्ये बघणार आहोत.
मराठी भाषेत आपण घरी बसून ही कंटेंट रायटिंग करू शकतो, तसेच कंटेंट रायटींग मध्ये आपण करियर ही करू शकतो.
Marathi content writing करून तुम्ही उत्पन्न ही मिळऊ शकता.
ब्लॉग म्हणजे काय ?
इंटरनेटच्या सहाय्याने महत्त्वाची माहिती संकलित करून तिची देवाण-घेवाण करणे याला ब्लॉगिंग असे म्हणतात.
आपले विचार इतरांसमोर मांडण्यासाठी ब्लॉग हे उत्तम माध्यम आहे, आपल्या आवडत्या कोणत्याही विषयावर आपण ब्लॉग लिहू शकतो.
ब्लॉगिंग ही एक प्रकारची माहिती आहे जी रोज अद्ययावत करावी लागते आणि ही माहिती डिजिटल स्वरूपात इंटरनेटच्या सहाय्याने लिहिणे म्हणजे ब्लॉगिंग करणे होय.
आपण ब्लॉगिंग अनेक विषयांवर करू शकतो जसे की,
१) फॅशन
२) एज्युकेशन
३) लाइफस्टाइल
४) सोशल मीडिया
५) मार्केटिंग
६) फूड
७) हेल्थ
८) सोशल ऍक्टिव्हिटी इत्यादी.
ब्लॉग हे कंटेंट रायटिंग पेक्षा थोडया लहान स्वरूपात असतात.
कन्टेन्ट रायटिंग म्हणजे काय ?
ज्यांना मराठी लिखाणाची आवड आहे अशा लोकांसाठी marathi content writing मध्ये अनेक करिअरच्या संधी उपलब्ध आहेत वाचकाला समजेल अशा सोप्या आणि मोजक्या शब्दात परंतु मुद्देसूद माहिती लिहिणे म्हणजे कंटेंट रायटींग होय.
content writing मध्ये एखाद्या स्त्रीला जर आभूषणे घातली तर तिचे सौंदर्य आणखीन खुलून येते तसेच मराठी भाषेला अलंकार घातले तर तर भाषेचे सौंदर्य सुद्धा कंटेंट मध्ये अधिकरित्या खुलून येईल.
आजकाल आपण सोशल मीडियावर कंटेंट रायटिंग बद्दल माहिती पाहतो, अनेक इमेजेस पाहतो तर हे कंटेंट रायटिंग म्हणजे काय ?
तर आपल्या मराठी लोकांना बऱ्याच वेळा लिहिण्याची सवय असते ते लोक त्यांच्या कल्पना कंटेंट रायटींग च्या स्वरूपात मांडतात.
कंटेंट कसा लिहावा ?
आपण अधून मधून बरंच काही तोडकं मोडकं लिहित असतो, लिहिणे ही एक कला आहे त्यात फारसे काही अवघड नाही.
पण ही कला जर तुम्हाला जमली आणि या कलेचा तुम्ही योग्य वापर करून शब्दांची योग्य मांडणी केली , तर वाचकाला आवड निर्माण होईल.
लोकाना उपयोगी पडेल अशी माहिती जर आपण इंटरनेट वर सादर केली तर त्या माहिती संच म्हणजेच कंटेंट ला आपण कंटेंट रायटिंग असे म्हणू शकतो.
marathi content writing तुम्ही अगदी घरी बसून करू शकता आणि पैसे मिळवू शकता, ऑनलाइन पैसे कमवण्याचा एक छान मार्ग असे देखील आपण याला म्हणू शकतो.
लोक जेव्हा आपली माहिती छोट्या छोट्या विषयांवर लिहायला सुरुवात करतील आणि ती कंटेंट स्वरूपात मांडू लागतील तेव्हा कंटेंट रायटिंगची महत्व वाढत जाईल.
कंटेंट रायटींग ची सविस्तर माहिती
१) कंटेंट म्हणजे काय ?
२) marathi content writing कसे करावे ?
३) कंटेंट रायटिंग चे प्रकार कोणते ?
४) ऑनलाइन ऑफलाइन कन्टेन्ट रायटर म्हणजे काय ?
५) फ्रीलान्स कंटेंट रायटर म्हणजे काय ?
६) कंटेंट रायटिंग मधून पैसे कसे मिळवायचे ?
७) कन्टेन्ट रायटिंग मध्ये आपण किती पैसे मिळू शकतो ?
८) सोशल मीडिया किंवा एखाद्या साहित्यासाठी कंटेंट लिहिणे म्हणजे काय ?
१) कंटेंट म्हणजे काय ?
एखाद्या गोष्टीची साध्या सोप्या भाषेत पण मुद्देसूत बांधणी करणे म्हणजे कंटेंट.
आपल्याला ज्या गोष्टींवर लिहायचे आहे त्या गोष्टीबद्दल आपल्याला माहिती असणे गरजेचे आहे आणि ही माहिती खरी असावी जेणेकरून वाचकाला काहीतरी शिकावयास मिळेल.
आपण केलेले लिखाण हे वाचनीय आणि इंटरेस्टिंग असे असले पाहिजे.
२) कंटेंट रायटिंग कसे करावे ?
आपण आता जो कन्टेन्ट तयार केलेला आहे तो कंटेंट अगदी सोप्या भाषेत म्हणजे लहान मुलाला समजेल अशा भाषेत पण आकर्षक पद्धतीने लिहिणे आणि तो डिजिटल स्वरूपात मांडणे म्हणजे कंटेंट रायटिंग.
Marathi content writing मध्ये पैसे मिळवण्याच्या खूप संधि आहेत.
3) कन्टेन्ट रायटिंग चे प्रकार
१. कॉपीरायटर – जाहिरात किंवा व्यवसायाच्या प्रसिद्धीसाठी केले जाणारे लिखाण म्हणजे कॉपीरायटर.
२. ब्लॉग रायटर (ब्लॉगर) – साध्या सरळ भाषेत कमी शब्दात लिहिणे म्हणजे ब्लॉग राइटिंग.
३.टेक्निकल रायटर – तांत्रिक पद्धतीने माहितीचे एकत्रीकरण करून लेखन करणे म्हणजे टेक्निकल रायटर.
४. सोशल मीडिया कॉपी – आपल्या भाषेत केलेले लिखाण हे समाज माध्यमावर लिहिणे किंवा मांडणे म्हणजे सोशल मीडिया कॉपी होय.
५. गेस्ट रायटर – गेस्ट रायटर म्हणजे दुसऱ्या कोणासाठी तरी लेखन करणे.
६. ब्रँड जर्नलिस्ट– एखादी माहिती किंवा बातमी सोशल मीडियाचा वापर करून ती वाचकांपर्यंत पोहोचवणे म्हणजे ब्रँड जर्नलिस्ट.
४) ऑफलाइन \ऑनलाईन कंटेंट रायटर
ऑनलाइन आणि ऑफलाइन या दोन्ही प्रकारे आपण ब्लॉगिंग व कॉन्टेन्ट रायटिंग करू शकतो.
ऑनलाइन म्हणजे इंटरनेटवरून घरी बसून कन्टेन्ट रायटिंग चे काम करणे आणि ऑफलाइन म्हणजे ऑफिसमध्ये बसून marathi content writing चे काम करणे.
सध्या डिजिटल युगामुळे ऑनलाईन म्हणजे इंटरनेटवरून काम करण्याचे प्रमाण वाढत चालले आहे.
५) फ्रीलान्स कंटेंट रायटिंग
freelance content writing म्हणजे आपल्या स्किल चा वापर करून ऑफलाइन पद्धतीने काम करणे.
तसेच स्वतंत्रपणे काम करणे म्हणजे फ्रीलान्सिंग यामध्ये आपण कंपनीच्या माध्यमातून क्लाएंट कडून येणारे काम करून देतो.
सध्या आपल्या देशात फ्रीलॅंस वोर्केर ची संख्या वाढत चालली आहे, त्यामध्ये कंटेंट रायटर चा मोठा समावेश आहे.
६) कंटेंट रायटिंग मधून पैसे कसे मिळवायचे ?
सध्याचा काळ हा ऑनलाईन चा आहे त्यामुळे या क्षेत्रात आपण चांगले काम करून चांगले पैसे मिळू शकतो.
आपण content writing चे काम करून पार्ट टाइम तसेच फुल टाइम सुद्धा चांगले पैसे कमवू शकतो.
सोशल मीडिया वरून कामे मिळवण्याच्या बऱ्याच संधी आपल्याला मिळू शकतात.
आपला अनुभव आणि लेखन कौशल्य याच्यावर आपले चांगले प्रोफाइल तयार होईल आणि आपल्याला चांगले पैसे मिळवता येतील.
७) कन्टेन्ट रायटिंग मध्ये किती पैसे मिळवता येतील ?
आपल्या स्किल्स आणि एक्सपर्टीज जसजशा वाढत जातील तसतसे marathi content writing मध्ये आपल्याला करिअर ग्रोथ करता येईल.
सुरुवातीला छोटी कामे, कमी पैसे मिळतील पण एकदा जम बसला की याच्यामध्ये आपण चांगले नाव व पैसे कमावू शकतो.
आपल्या भारत देशात एक कंटेंट रायटर साधारणतः 5000 रु ते 10000000 रु (1 कोटी) कामाऊ शकतो.
८) सोशल मीडिया किंवा एखाद्या साहित्यासाठी कंटेंट लिहिणे
युट्युब फेसबुक तसेच बरेच प्रकारच्या सोशल मीडिया साइटसाठी आपण ऑनलाइन पद्धतीने काम करू शकतो.
वेगवेगळ्या प्रकारचे ब्लॉग लिहिणे न्यूज चॅनेल एजन्सी एडवर्टाइजमेंट यामध्ये बराच स्कोप आहे.
मोठ्या कंपन्यांची स्वतःची वेबसाईट असते त्यांना ब्लॉगर तसेच कंटेंट रायटर ची गरज असते अशा ठिकाणी आपण सोशल मीडियाचा वापर करून कंटेंट लिहू शकतो.
प्रसिद्ध ब्लॉग आणि कंटेंट रायटरची नावे
- मराठी टेक – हा ब्लॉग सर्व मराठी भाषिकांसाठी नवीन तंत्रज्ञानाची माहिती मिळवण्यासाठी तयार केला आहे या चे संपादक सूरज बागल यांनी गूगल ट्रांसलेशन स्पर्धेत भाग घेऊन मराठी भाषेसाठी 5000 शब्दांची निवड करून प्रथम 10 मध्ये स्थान मिळवल.
- माय मराठी ब्लॉग – ही वेबसाईट 2020 मध्ये इंद्र निषाद यांनी स्थापन केली आहे, माय मराठी ब्लॉग महाराष्ट्रातील कोल्हापूर येथे सुरू झाल्यापासून खूप पुढे आला आहे. हा ब्लॉग, दैनंदिन बातम्या, वित्त, शिक्षण आणि तंत्रज्ञान साठी नंबर एक स्रोत आहे.
- नमकशमक – नमकशमक हां ब्लॉग खाद्यपदार्थांशी निगडित असलेला ब्लॉग आहे. यामध्ये आपल्याला विविध प्रांतातील पदार्थ व त्यांच्या रेसिपी सापडतील. फूड ब्लॉगर शेफ भगिनी सोनाली राऊत आणि हर्षदा यांना 2016 साली या ब्लॉग साठी आयएसबीएन इंडियन फूड ब्लॉगर ने सन्मानित करण्यात आले.
- हल्ला गुल्ला – काही वेळा मनाला आवडणार, छान, हलकंफुलकं असं वाचव असं वाटतं तर यासाठी या ब्लॉगला नक्की भेट द्या . लेखिका स्नेहल अखिला अन्वित यांनी अगदी मनमोकळ्या, वेगवेगळ्या विषयांवर अगदी सोप्या शब्दात इथे लेखन केले आहे.
- उगीच काहीतरी -लेखक अमित मोहोड यांनी उगीच काहीतरी या ब्लॉगमध्ये अगदी छोट्या चारोळ्या कविता किंवा मनात आलेले विचार यांचे कथन केले आहे.
- मी मराठी – मी मराठी हा ब्लॉग लेखक गुरू यांचा असून या ब्लॉगमध्ये त्यांनी मराठी विनोद, पू ल देशपांडे यांचे विनोदी किस्से तसेच छोटे लेख लिहिले आहेत.
- गुंजारव – लेखक मिलिंद फणसे यांनी गुंजारव या ब्लॉगमध्ये आपले आयुष्य आणि जीवनातील सुख दुख: यावर प्रकाशझोत टाकत लेखन केले आहे.
- रिमझिम पाऊस – या ब्लॉगवर सामाजिक व राजकीय तसेच लेखकाची वैयक्तिक मग लेखक विजय शेंडगे यानी मांडली आहेत.
निष्कर्ष
सध्याचे युग हे डिजिटल स्वरूपाचे युग आहे त्यामुळे इंटरनेटवरून जास्तीत जास्त कामे केली जातात.
ब्लॉगिंग तसेच कंटेंट रायटिंग हा एक करिअरचा उत्तम मार्ग असू शकतो तसेच एक उत्तम उत्पन्नाचे साधनही होऊ शकते.
हे आर्टिकल जर तुम्ही पूर्ण वाचला तर आपल्याला नक्की आयडिया येईल की ब्लॉगिंग कसे करावे आणि कन्टेन्ट रायटिंग कसे करावे.
छोट्या मोठ्या कंपन्यांसाठी ब्लॉग राईटर तसेच कॉन्टेन्ट रायटर ची आवश्यकता असते, तसेच आपण स्वतःची वेबसाईट तयार करून त्याच्यावर marathi content writing करू शकतो.
कन्टेन्ट रायटिंग मुळे समाजातील अनेक लोकांना जसे की, रिटायर्ड पर्सन, गृहिणी, कॉलेज कुमार /कुमारी, अर्धवेळ नोकरी करणाऱ्यांसाठी हा एक उत्तम उत्पन्नाचा स्त्रोत निर्माण झाला आहे.